Go to full page →

अध्याय १८—मनाचे उपचार MHMar 187

मन आणि शरीर या दोन्हीमधील संबंध अति घनिष्ट आहेत. यामध्ये एक अति प्रभावी आणि दुसरे सहानुभूति दाखविते. मनस्थिती ज्या मर्यादेपर्यंत आरोग्यावर आपला प्रभाव दाखविते या गोष्टीची अनेकांना जाणीव नसते. अनेक आजारांमुळे मनुष्य त्रस्त होतो ते मानसिक अवस्थेमुळे शोक, चिंता, असंतोष, पश्चात्ताप, अविश्वास या सर्व गोष्टी जीवनाची शक्ति तोडून मृत्युची वाट दाखवितात. MHMar 187.1

कधी कधी आजार येतात आणि विचार केल्याने त्यामध्ये वाढ होते. अनेक लोक यामुळे जीवनभर अपंग होतात. सकारात्मक विचार केल्यास ते बरे होऊ शकतात. अनेक लोक विचार करतात की मी थोडावेळ जरी बाहेर गेलो तर आजारी पडेन आणि त्याचा वाईट प्रभाव पडतोच. कारण त्यांची तशी अपेक्षा गृहीत असते आणि त्याप्रमाणे तसेच घडते. अनेक लोक आजारी पडून मरतात ते केवळ त्यांच्या कल्पनेनेच साहस, आशा, विश्वास, सहानुभूति व प्रेम या गोष्टी आरोग्यदायी असून त्यामुळे दीर्घायुचा लाभ होतो. संतुष्ट मन, प्रसन्नचित आत्मा हे शरीराच्या आरोग्यासाठी आणि आत्म्यासाठी शक्तिवर्धक आहे. “आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध होय. खिन्न हृदय हाडे शुल्क करते.” (नीतिसूत्रे १७:२२). आजारपणाच्या उपचारामध्ये बुद्धीच्या प्रभावाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही तर यामनाच्या दडपणावर योग्य प्रकारचा प्रयोग करुन योग्य मार्गदर्शन देणे आवश्यक आहे. यामुळे आजाराशी लढण्यास बळ येते. MHMar 187.2