“येशू पुनः त्यांस दाखले देऊन बोलू लागला: स्वर्गाचे राज्य कोणाएका राजा सारखे आहे; त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी केली; आणि लग्नाच्या मेजवानीस ज्यास आमंत्रण दिले होते त्यांस बोलावण्याकरिता त्याने आपले दास पाठविले, परंतु ते येईनात. पुन: त्याने दुसरे दास पाठविले, व त्यांस म्हटले की आमंत्रितांस असे सांगा, पाहा, मी जेवण तयार केले आहे, आपले बैल व पुष्ट पशु कापिले आहेत, सर्व सिध्द आहे, लग्नाच्या मेजवानीस चला. तरी हे काही मनावर न घेता ते कोणी आपल्या शेताला, कोणी आपल्या व्यापाराला गेले-आणि उरलेल्यांनी त्याच्या दासास धरून गांजिले व जिवे मारिले. तेव्हा राजाला राग आला; त्याने आपली सैन्ये पाठवून त्या घातकांचा नाश केला व त्यांचे नगर जाळून टाकिले. मग तो आपल्या दासास म्हणाला, लग्नाची तयारी आहे खरी, परंतु आमंत्रित योग्य नव्हते, म्हणून तुम्ही चव्हाटयावर जावून जितके तुम्हांस आठवतील तितक्यास लग्नाच्या मेजवानीस बोलवा. मग त्या दासांनी रस्त्यावर जावून बरे वाईट जितके त्यांस मिळाले त्या सर्वास एकत्र केले; आणि लग्नाच्या जेवणाऱ्यांची भरती झाली. राजा जेवणाऱ्यांना पाहावयास आत आला, तेव्हा लग्नाचा पोषाख न घातलेला असा एक मनुष्य त्याच्या दृष्टिस पडला. त्याला तो म्हणाला, मित्रा, तू लग्नाचा पोषाख घातल्यावाचून येथे कां आलास ? त्याने काही उत्तर केले नाही. मग राजाने चाकरास सांगितले, याचे हातपाय बांधून याला बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे व दांतखाणे चालेल. बोलावलेले बहुत आहेत पण निवडलेले थोडके आहेत.”मत्तय २२ : १ -१४. COLMar 232.1
लग्नाचा पेहराव या दाखल्याद्वारे फार मोठा परिणाम हा धडा प्राप्त होतो. या लग्नाचे दर्शक म्हणजे मानवी जीवन व देवाचे जीवन ही एकजीव होणे असे आहे. जे कोणी लग्नासाठी योग्य आहेत असे शील त्यांचे असले पाहिजे हे त्या लग्नाचा पोषाख धारण करणे याद्वारे दर्शविले जाते. COLMar 233.1
मोठी मेजवानी त्यावेळी असे स्पष्टिकरण सुवार्तेचे आमंत्रण सर्वांना दिले, लोकांनी ते आमंत्रण नाकारले म्हणून आमंत्रण परमेश्वर कृपेने विधर्मी लोकांना दिले. याही दाखल्यांत असाच प्रकार आहे. पण या दाखल्यांत जे कोणी जेवणावळीचा नकार करितात त्यांचा ते मोठा अपमान करितात आणि त्यांना भयानक शिक्षा दिली जाते. मेजवानीस आमंत्रण राजाचे आहे आणि शिक्षा ठोठावणारे त्यांच्या स्वाधीन केले जाते. ही आज्ञा सार्वभौम व राजांचा राजा याची आहे. या आमंत्रणात मोठा सन्मान आहे असे असून अशा सन्माननीय आमंत्रणाचा नकार केला गेला. राजाचा हक्म मान्य केला नाही. पूर्वीचे जे आमंत्रण होते त्याचा भेदभाव अशी टाळाटाळ केली, पण राजाचे ह्या आमंत्रणात भेदभाव दाखविला आणि त्या आमंत्रितानी राजाचा अपमान व खून केला. त्याच्या सेवकांचाही धिक्कार केला, त्यांना नाकारले व वादविवादाचा उपयोग करून त्यांना ठार केले. COLMar 233.2
घरधन्याने पाहिले, आमंत्रणाचा नकार केला व शेवटी घरधनी म्हणाला, ज्या ज्या लोकांना आमंत्रण दिले त्यांना या मेजवानीतील एकही घास दिला जाणार नाही तर, “तेव्हा राजाला राग आला, आणि त्याने आपली सैन्ये पाठवून त्या घातक्यांचा नाश केला, व त्यांचे नगर जाळून टाकिले”(मत्तय २२ : ७). COLMar 233.3
दोन्ही मेजवानी भोजनास पाहण्यांना आमंत्रण दिले; पण दुसऱ्या मेजवानीत जे कोणी आमंत्रित होते त्यांनी मेजवानीस हजर राहणे यासाठी तयारी करावयाची होती. ज्यांनी ही तयारी करणेची निष्काळजी केली त्यांना बाहेर काढण्यात आले. राजा जेवणाऱ्यांना पाहावयास आत आला, तेव्हा लग्नाचा पोषाख न घातलेला असा एक मनुष्य त्याच्या दृष्टिस पडला. त्याला तो म्हणाला, मित्रा तू लग्नाचा पोषाख घातल्यावाचून येथे का आलास? त्याने काही उत्तर केले नाही, मग राजाने चाकरांस सांगितले, याचे हातपाय बांधून याला बाहेरील अंधारांत टाका. तेथे रडणे व दांतखाणे चालेल.”(मत्तय २२:११ -१३). COLMar 233.4
मेजवानीला आमंत्रण ख्रिस्ताच्या शिष्यांनी दिले होते. प्रभुने अगोदर बारा शिष्यांना पाठविले व पोषाख करावयास सांगितले. स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे; आणि मानवांस पाचारण केले की सुवार्तेवर विश्वास ठेवा वा पश्चात्ताप करा. पण त्या पाचारणाकडे कोणी लक्ष दिले नाही. ज्यांना अशा मेजवानीस आमंत्रण दिले ते कोणी आले नाहीत. त्यानंतर चाकरांना पाठवून पुढील संदेश दिला; ‘पहा, मी जेवण तयार केले आहे, आपले बैल व पुष्ट पशु कापिले आहेत, सर्व सिध्द आहे, लग्नाच्या मेजवानीस चला.”(मत्तय २२:४) येशू ख्रिस्ताला वधस्तंभी दिले. त्यानंतर यहदी राष्ट्रांना हा संदेश दिला; जे राष्ट्र परमेश्वराचे विशेष लोक म्हणत होते त्यांनी जी सुवार्ता, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने मिळाली तिचा नकार केला. पुष्कळांनी वरीलप्रमाणे नकार अधिक धिक्काराच्या शब्दाने केला. कित्येकांना तारणाच्या आमंत्रणाचा संताप वाटला, तारणारा, गौरवी येशू याचा नकार केला त्याबाबत पापक्षमा जी सांगितली असे असता ते सर्व सुवार्तिकावर उलटले. त्यावेळी ‘मोठा पाठलाग झाला’ प्रे.कृ. ८:१ कित्येक स्त्री-पुरूषांना तुरूंगात टाकले; आणि प्रभुचे सुवार्तिक जसे काय स्तेफन व याकोब यांना ठार मारले गेले. COLMar 233.5
अशाप्रकारे परमेश्वराचे कृपेच्या पाचारणाचा त्या यहुदी लोकांनी नकार केला. त्याचा काय परिणाम हा या दाखल्यात ख्रिस्ताने दाखविला आहे. ‘राजाने सैन्ये पाठवून त्या घातक्यांचा नाश केला, व त्यांचे नगर जाळून टाकिले’ यहुदी लोकावर अशा प्रकारे परमेश्वराने निकाल दिला; यरूशलेमाचा नाश झाला व यहदी लोक सर्व राष्ट्रभर पसरले गेले. COLMar 234.1
सुवार्तेचे तिसरे पाचारण म्हणजे विधर्मी लोकांना आमंत्रण देणे. राजा म्हणाला, “लग्नाची तयारी आहे खरी, परंतु आमंत्रित योग्य नव्हते, म्हणून तुम्ही चव्हाटयावर जावून जितके तुम्हास आढळतील तितक्यास लग्नाच्या मेजवानीस बोलवा.‘‘ मत्तय २२:८,९. COLMar 234.2
मग दासांनी रस्त्यावर जावून बरेवाईट जितके त्यास मिळाले त्या सर्वास एकत्र केले”ते लोक मित्र समाज असे होते. आता हे जे लोक आले होते त्यांच्यापैकी काही जणास मेजवानी देणारा याजविषयी काही आदर नव्हता म्हणजे हे ही लोक पूर्वी ज्यानी आमंत्रणाचा नकार केला त्याच्या सारिखे होते. त्या मेजवानीस येणे यासाठी त्यांची तशी ऐपत नव्हती, तरी त्यांनी विचार केला की राजाच्या मेजवानीस हजर राहून भाग घेणे यासाठी जगातील कोणताही स्वार्थत्याग करावयास तयार होतो. आणि ज्यांनी आमंत्रणाचा स्वीकार केला त्यांना ते केवळ त्यांच्या स्वत:च्या स्वार्थासाठी एवढेच असे वाटले. ते मेजवानीची चंगळ-आनंद यासाठी आले पण राजाचा सन्मान करावा असा विचार त्यांच्या मनात आला नाही. COLMar 234.3
जेव्हा राजा मेजवानी वेळी येवून सर्व पाहुणे पाहू लागला तेव्हा त्याला सर्वाचे शील वा स्वभाव समजला. कारण तेथील पाहुण्याला लग्नाचा पोषाख ही राजाची देणगी होती. हा पोषाख घालणे म्हणजे राजाचा मान स्वीकारणे व राखणे असे होते. पण तेथे एक मनुष्य त्याच्या नेहमीच्या नागरिक पोषाखात मेजवानीस बसला होता. राजाची जी अट होती ती त्याने मान्य केली नाही. तो पोषाख फार किंमतीने त्याला दिला होता तो त्याने तिरस्काराने नाकारला व घातला नाही ; या प्रकारे त्याने राजाचा अपमान केला. जेव्हा राजा म्हणाला, “मित्रा, तू लग्नाचा पोषाख घातल्या वाचून येथे का आलास?’ तेव्हा तो काहीच उत्तर देऊ शकला नाही. त्याने स्वत:च स्वत:ला दोषी ठरविले. त्यानंतर राजा म्हणाला, “याचे हातपाय बांधून याला बाहेरील अंधारांत टाका, तेथे रडणे व दात खाणे चालेल.” COLMar 234.4
राजाने मेजवानी वेळी येवून पाहुणे यांची तपासणी करणे याचे दर्शक म्हणते तपासणीचा न्यायाचे कार्य असे आहे. सुवार्ता मेजवानीस आलेले पाहुणे म्हणजे जे कोणी परमेश्वराची सेवा करणे असा आव आणणारे आणि ज्यांची नावे जीवनी पुस्तकांत लिहिली आहेत. पण असे दांभिक सर्वच ख्रिस्ती खरे शिष्य आहेत असे नाही. अखेरचे बक्षिस देणेपूर्वी कोण धार्मिक वतनास लायक आहेत हे पाहिले पाहिजे. हा निर्णय ख्रिस्ताचे दुसरे येणे मेघासहित होईल त्यापूर्वी घेतला पाहिजे, कारण ख्रिस्त येईल त्यावेळी त्याच्याजवळ वेतन असेल. पाहा ‘मी’ लवकर येतो, आणि प्रत्येकाला ज्याचा त्याच्या कर्माप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे”प्रकटीकरण २२ : १२ ख्रिस्ताचे येणेपूर्वी प्रत्येक मनुष्याच्या कामाची परीक्षा घेतली जाईल आणि जसे त्याचे काम असेल त्याप्रमाणे त्याला वेतन दिले जाईल. COLMar 235.1
जेव्हा मनुष्ये या पृथ्वीवर असतील त्यावेळी त्यांच्या कामाची तपासणीचा न्याय स्वर्गीय न्यासासनात घेतला जाईल. जे सर्व ख्रिस्ती कामदार परेश्वराचे सेवक म्हणतात त्याची परमेश्वरासमोर परीक्षा होईल. स्वर्गीय पुस्तकांत त्यांच्या कामाची नोंद असेल. त्याप्रमाणे त्यांचा न्याय होईल व त्याप्रमाणात त्याच्या कामाप्रमाणे त्यांचा हद्दा वा वेतन हे कायमचे ठरले जाईल. COLMar 235.2
या दाखल्यातील लग्नाचा पेहराव वा पोषाख म्हणजे ख्रिस्ताचे खरे अनुयायी यांचे शील शुध्द निष्कलंक वर्तन असे दर्शक आहे. मंडळीस हे दिले आहे ; “तिला तेजस्वी व शुध्द असे तागाचे तलम वस्त्र परिधान करावयास दिले आहे; ते तागाचे तलम वस्त्र पवित्र जनांची नीतिकृत्ये आहेत. “प्रकटीकरण १९:८. ती तागाची तलम वस्त्रे म्हणजे पवित्र शास्त्रम्हणते, “तिला गौरवयुक्त मंडळी अशी आपणास सादर करावी म्हणजे तिला डाग, सुरकती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी.‘‘ इफिस ५:२७. तिला देण्यात येणारी धार्मिकता ही ख्रिस्ताची आहे, ते ख्रिस्ताचे निर्दोष शील आहे, आणि जे कोणी ख्रिस्ताला त्यांचा व्यक्तिगत तारणारा म्हणून विश्वासाने स्वीकारतात त्यांना सर्वाना ख्रिस्ताचे शील दिले जाते. COLMar 235.3
परमेश्वराच्या एदेन बागेत आमचे प्रथमचे आईबाप जेव्हा होते तेव्हा त्यांचा निर्दोष शुभ्र पोषाख होता. ते परमेश्वराच्या संपूर्ण इच्छेप्रमाणे जीवन जगत होते. ते संपूर्णपणे स्वर्गीय परमेश्वरावर प्रिती करीत होते. परमेश्वराचा शुभ्र, कोमल प्रकाशाने त्या पवित्र जोडप्यास सभोवती प्रकाशित होता. तो प्रकाशाचा झगा म्हणजे त्यांची आत्मिक निर्दोष पोषाखाचे दर्शक होता. ते जोडपे जर परमेश्वराला विश्वासु राहिले असते तर ते त्याच प्रकाशरूपी पोषाखात राहिले असते. पण जेव्हा पाप आले तेव्हा त्यांचा परमेश्वराशी संबंध तुटला; आणि त्यांच्या सभोवरचा तो प्रकाश नाहीसा झाला. ते नग्न व लाजीरवाणे झाले तेव्हा त्या स्वर्गीय पोषाखाच्या ऐवजी अंजिराची पाने शिवून वापरणेचा प्रयत्न करू लागले. COLMar 236.1
आदाम व हव्वा यानी परमेश्वराच्या आज्ञाचा भंग केला त्याचा परिणाम तेव्हापासून असा झालेला आहे. आज्ञाभगामुळे झालेली नग्नता झाकणे यासाठी मानव अंजिराची पाने शिवून वापरीत आहेत. त्यांनी स्वतः संशोधन केलेली वस्त्रे; त्यांच्या कर्मांनी पापाचे क्षालन करणे वा पांघरून घालणेचा प्रयत्न करीत आहेत आणि अशाप्रकारे प्रयत्न करून परमेश्वराने मानवाचा स्वीकार करावा कसे कर्मकांड करीत आहेत. COLMar 236.2
परंतु अशाप्रकारे करून त्यांचा काही उपयोग नाही. मानवाचा जो निर्दोष स्वभावाचा झगा हरवला आहे त्यासाठी मानवाला काहीही करणे शक्य नाही. ख्रिस्त व त्याचे देवदूत यांच्या सोबत कोकऱ्याच्या लग्नाला बसणे यासाठी कोणत्या अंजिराच्या पानाचे वस्त्र, कोणताही जगिक नागरिकाचा पोषाख घालून त्या मेजवानीस बसता येत नाही. COLMar 236.3
केवळ ख्रिस्ताने जो पोषाख पुरविला आहे तोच घालून परमेश्वराच्या सान्निध्यात भेट घेत गेले. हा पोषाख म्हणजे ख्रिस्ताची धार्मिकता, ख्रिस्त स्वतः प्रत्येक पश्चात्तापी, विश्वासक आत्म्यास देईल, ह्याकरिता मी तुला मसलत देतो की... तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसावयास शुभ्र वस्त्रे विकत घे. प्रकटीकरण ३:१८. COLMar 236.4
हे वस्त्र स्वर्गीय मार्गावर तयार केले आहे आणि यात एकही मानवी कलेचा धागा नाही. ख्रिस्त हा त्याच्या मानवी कलेचा धागा नाही. ख्रिस्त हा त्याच्या मानवी देहांत असतांना त्याने पूर्ण शील संपादन केले, आणि हे शील ख्रिस्त आम्हांस देऊ इच्छितो. “आमची सर्व धर्म-र्कत्ये घाणेरडया वस्त्रासारखी झाली आहेत‘‘ यशया ६४:६. आम्ही स्वत: जे काही करितो ते पापाने अशुध्द असे झाले आहे. पण परमेश्वराचा पत्र, “पापे-हरण करावी म्हणून तो प्रकट झाला; त्याच्या ठायी पाप नाही; पापाची व्याख्या अशी आहे. “आज्ञाभंग करणे हे पाप आहे.‘‘ १ योहान ३:४ परंतु ख्रिस्ताने सर्व आज्ञाचे पालन केले, तो स्वत:विषयी म्हणतो, “हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला संतोष आहे‘‘ स्तोत्र ४०: ८. जेव्हा या पृथ्वीवर असताना येशू शिष्यास म्हणाला, “जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रितीत राहतो‘‘ योहान १५: १० येशूने पूर्णपणे आज्ञापालन केले आणि त्यामुळे प्रत्येक मानवास परमेश्वराच्या आज्ञा पाळणे हे शक्य केले आहे. जेव्हा आम्ही ख्रिस्ताला समर्पित करितो, तेव्हा आमचे अंत:करण ख्रिस्ताच्या अंत:करणाशी एकरूप होते, आमची इच्छा ख्रिस्ताच्या इच्छेशी समरूप होते, आमचे मन व ख्रिस्ताचे मन एक होते, आमचे विचार ख्रिस्ताच्या विचाराधीन होतात व आम्ही ख्रिस्तांचे जीवन जगतो. आम्ही ख्रिस्ताचा धार्मिक झगा घालणे याचा अर्थ वरीलप्रमाणे होतो. यानंतर प्रभु आम्हांकडे पाहातो तेव्हा त्याला अंजिराची पाने दिसत नाही, तर ख्रिस्ताने स्वत: त्याने दिलेला त्याच्या धार्मिकतेचा झगा वा पोषाख ही दिसतो आणि यामुळे आम्ही यहोवासमोर पूर्ण आज्ञा पाळणारे असे गणले जातो. COLMar 236.5
राजाने येवून पाहुण्यांची लग्नाच्या मेजवानीवेळी तपासणी केली. ज्यांनी आज्ञा पाळून लग्नाचा पोषाख घातला त्याचाच स्वीकार केला. अशाच प्रकारे सुवार्ता मेजवानीच्या वेळी केले जाणार आहे. प्रत्येकाला राजाच्या परीक्षेतून जावे लागेल आणि ज्यांनी ख्रिस्ताच्या धार्मिकतेचा पोषाख घातलेला असेल त्याचाच स्वीकार केला जाईल. COLMar 237.1
धार्मिकता म्हणजे योग्य ते करणे आणि प्रत्येकांच्या कृत्यांवरून त्याचा न्याय केला जाईल. आम्ही जे काही करितो त्यावरून आमचे शील ठरविले जाते. आपल्या कृतीवरून विश्वासाची परीक्षा केली जाते. COLMar 237.2
येशू ख्रिस्त फसविणारा नाही व पवित्र शास्त्राचा धर्म म्हणजे काल्पनिक धूर्त दंतकथा नाहीत एवढाच विश्वास ठेवून चालत नाही. या पृथ्वीवर सर्व मानवाचे तारण व्हावे यासाठी येशू हे नाव दिले असा आपण विश्वास धरू आणि असे असूनही आपल्या विश्वासाद्वारे आम्ही येशूला आमचा तारणारा असे स्वीकार करणार नाही. विश्वासाच्या सत्य तत्त्वांवर आपण विश्वास ठेवणे हे पुरेसे नाही. ख्रिस्ताच्या सत्यावर माझा विश्वास आहे एवढा कार्यभाग करणे आणि आपले नाव मंडळीच्या रजिस्टर पुस्तकात नोंद करणे एवढे पुरेसे नाही. त्याच्या आज्ञा पाळणारा इसम त्याच्या ठायी राहतो व तो त्या इसमाच्या ठायी राहतो. त्याने जो आत्मा आपल्याला दिला, यावरून आपणास कळते की तो, आपल्या ठायी राहतो‘‘ “आपण त्याच्या आज्ञा पाळिल्या म्हणजे आपण त्याला ओळखतो हे आपणास कळून येते’ १ योहान ३:२४, २:३ एखाद्याचा पालट झाला याचा हा खरा पुरावा आहे. आमचा हुद्दा कोणताही असो; आमच्या जीवनात ख्रिस्त जर प्रकट होत नाही तर आमचे जीवन व्यर्थ आहे. COLMar 237.3
अंत:करणात सत्याची लावणी केली पाहिजे. त्या सत्यामुळे मनावर नियंत्रण व सर्व व्यवहार प्रितीने चालले जातात. आपल्या संपूर्ण शीलावर परमेश्वराचा शिक्का मारला पाहिजे. आमच्या दररोजच्या जीवनात परमेश्वराच्या सत्य वचनाचा बिंदु व हेतु ही आणिली पाहिजेत. COLMar 238.1
जो कोणी परमेश्वराच्या स्वभावाचा अशभागी वा वाटेकरी होतो त्याचे जीवन परमेश्वराच्या महान व पवित्र आज्ञा यांचा दर्जा याबरोबर सुसंगत होईल. या आज्ञाच्या मोजमापाने परमेश्वर मानवाच्या कृत्त्यांचे मोजमाप करतो. न्यायनिवाडा समयी मानवाची परीक्षा या आज्ञाद्वारेच घेतली जाईल. COLMar 238.2
पुष्कळजण असे सांगतात की, ख्रिस्ताच्या मरणाने नियमशास्त्र हे रद्द केले; पण असे म्हणणे याद्वारे ते लोक ख्रिस्ताचे म्हणणे याला विरोध करितात ; नियमशास्त्र व संदेष्यांचे शास्त्र ही रद्द करावयास मी आलो असे समजू नका; रद्द करावयास नाही; तर पूर्ण करावयास आलो आहे... आकाश व पृथ्वी नाही तशी होतपर्यंत सर्व गोष्टी पूर्ण झाल्यावाचून नियमशास्त्राची एक मात्रा किंवा एक बिंदु नाहीसा होणार नाही‘‘ मत्तय ५:१७,१८ मानवाने ज्या आज्ञांचे उल्लंघन केले त्या आज्ञांचे प्रायश्चित करणे यासाठी ख्रिस्ताने वधस्तंभावरील मरण सहन केले. समजा, जर आज्ञात बदल केला असता वा त्या बाजूला केल्या असत्या तर ख्रिस्ताचे मरण याचे कारण नव्हते. येशूचे या पृथ्वीवरील जीवन याद्वारे आज्ञाचा सन्मान झाला. येशूचे मरण याद्वारे आज्ञांची स्थापना झाली. येशूने त्याचे जीवन अर्पण असे दिले, पण त्याद्वारे आज्ञा नाहीसा करणे हा हेतू नाही वा नव्हता, त्याद्वारे कमी प्रतीचा दर्जा असाही विचार नव्हता तर न्यायीपणा टिकून राहावा, नियमशास्त्र सर्वकाळसाठी आहे व नियमशास्त्र न बदलणारे आहे. COLMar 238.3
सैतानाने अशी ग्वाही दिली. मानवास परमेश्वराचे नियमशास्त्र पाळणे अशक्य आहे, आणि मानव त्याच्या स्वत:च्या सामर्थ्याने आज्ञांचे पालन करू शकत नाही. पण ख्रिस्त मानवी देहांत आला; आणि त्याने पूर्ण आज्ञापालन केले व हे पटवून दिले. मानवाने ख्रिस्ताच्या सामर्थ्याशी एक होवून जाणे म्हणजे परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करणे शक्य होईल. COLMar 238.4
“जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यास, म्हणजे त्याच्या नामावर विश्वास ठेवणाऱ्यास, त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला‘‘ योहान १:१२ हा अधिकार वा सामर्थ्याचा भाग मानवांत नाही. हा अधिकार वा सामर्थ्य हे परमेश्वराचे आहे. जेव्हा कोणी परमेश्वराचा स्वीकार करितो तेव्हा त्याला ख्रिस्तांत जगणे हा अधिकार वा सामर्थ्य प्राप्त होते. COLMar 238.5
परमेश्वराची इच्छा आहे की त्याच्या लेकरांनी परिपूर्ण असावे. नियमशास्त्र हे परमेश्वराच्या शीलाचे दर्शक आहे आणि नियमशास्त्र हे सर्व शीलाचे दर्जा मोजमाप आहे. परमेश्वर त्याच्या लेकरांवर शीलाचा एकमेव पूर्ण दर्जा देतो यासाठी की स्वर्गीय राज्यांत योग्य प्रकारच्या लोकांचा समावेश होईल. परमेश्वराच्या नियमाचे शील यांचे परिपूर्ण परिमाण म्हणजे या पृथ्वीवरील ख्रिस्ताचे जीवन होय. यानंतर जे कोणी परमेश्वरांची लेकरे म्हणून संबोधिले जातील. त्यांचा स्वभाव ख्रिस्ताच्या शीलासारखा होईल व ते परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करतील. स्वर्गीय कुटुंब बनण्यासाठी ज्या संख्येची आवश्यकता आहे ती संख्या पूर्ण करण्यासाठी परमेश्वर त्यांच्यावर विश्वास ठेवील. हे लोक ख्रिस्ताच्या धार्मिकतेचा पोषाख घालतील आणि त्याच्या गौरवाने प्रकाशित होतील, अशा लोकांना महान सार्वभौम राज्याच्या मेजवानीत सन्मानाने बसता येईल. ख्रिस्ताच्या रक्ताने पवित्र झालेला लोक समुदाय त्यांच्यात हे सामील होतील. COLMar 239.1
जो मनुष्य लग्नाचा पेहराव घातला नसतांना मेजवानीस आला तो म्हणजे सध्या जगात असलेले लोक त्यांचा तो प्रतिनिधी वा दर्शक आहे. ते लोक स्वत:स ख्रिस्ती म्हणवितात. सुवार्तेमुळे मिळणारे आशिर्वाद व संधी यावर ते हक्क सांगतात. पण त्यांच्या जीवनात शीलाचे परिवर्तन झाले पाहिजे ही गरज त्यांना भासत नाही. त्यांच्या जीवनात त्यांना ख्रिस्ताची गरज भासत नाही किंवा ते त्यांच्या जीवनात विश्वासाची कसोटी ही करीत नाहीत. त्यांच्या जीवनातील वंश परंपरा यावर त्यांनी जय मिळविला नाही; किंवा त्याच्या दुर्गुणावर जय मिळविला नाही. असे असूनही ते म्हणतात की ते स्वत: चांगले आहेत, आणि ख्रिस्तावर अवंलबून राहाणे याऐवजी ते स्वत:च्या गुणावर भिस्त ठेवतात. असे लोक वचन ऐकतात, ते ऐकून मेजवानीला येतात, पण त्यांनी ख्रिस्ताच्या धार्मिकतेचा पोषाख घातलेला नाही. COLMar 239.2
कित्येक जण ख्रिस्ती म्हणवितात ते केवळ मानवी नितिमान असे आहेत. ते ख्रिस्ताची देणगी नाकारतात ; ज्या देणगीमुळे त्यांना ख्रिस्ताचे प्रतिनिधी होणे हा सन्मान प्राप्त होतो व जगात प्रतिनिधी होणेची संधी आहे ती संधी ते नाकारतात. पवित्र आत्म्याचे कार्य हे त्यांना काहीच समजत नाही. ते वचनाप्रमाणे वर्तन करणारे नाहीत जे कोणी ख्रिस्ताबरोबर आहेत व जे लोक जग रितीप्रमाणे राहतात यांच्यातील फरक म्हणजे स्वर्गीय तत्त्वे असतात पण सध्या या दोन्ही गटाकडे पाहता काहीच फरक दिसत नाही. जे ख्रिस्ती लोक आहेत ते आता वेगळे ख्रिस्ती जीवन जगत नाहीत व विशिष्ट लोक नाहीत. या दोन्ही गटातील फरक दाखविणारी रेषा कुठे आहे हे दिसत नाही. लोक जगातील संवयीच्या आहारी पडत आहेत. या जगातील चालीरिती व स्वार्थीपणा याकडे लक्ष देतात. जगाने मंडळीत येवून परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करावयास हवे पण उलट मंडळी जगात जाऊन परमेश्वराच्या आज्ञांचा भंग करीत आहे. दररोज मडळीतील लोक जगिक गोष्टीकडे वळत आहेत. COLMar 239.3
अशा प्रकारे वागणारे लोक ख्रिस्ताच्या मरणाने तारण व्हावे अशी अपेक्षा करितात आणि उलट येशू ख्रिस्ताने जे नि:स्वार्थी जीवनाचा कित्ता दिला त्या प्रमाणे वागणे हे नाकारतात. परमेश्वराच्या मोफत कृपेची ते लोक स्तुती करतात; स्वत:ला ख्रिस्तीपणाचा पोषाखाने पांघरून घालणेचा प्रयत्न करितात; अशामुळे त्यांची पापें ही नाहीशी केली जातील व त्यामुळे त्यांचे दोष नाहीसे होतील; पण त्यांचे हे प्रयत्न परमेश्वराचे येणे होईल त्यावेळी व्यर्थ असे ठरतील. COLMar 240.1
ख्रिस्ताच्या धार्मिक पोषाखाखाली एकही पाप झाकले जाणार नाही. एखादा मनुष्य त्याच्या मनाने आज्ञाभंग करीत असेल; पण त्याने उघडपणे आज्ञाभंगाचे कृत्त्य केले नसेल, आणि जग अशा मनुष्याला मोठा प्रामाणिक व खरा समजत असतील. पण परमेश्वराची आज्ञा मनुष्याच्या गुप्त विचाराही पाहतात. प्रत्येक कृतिमागे कोणता हेतू आहे. त्याप्रमाणे न्याय केला जातो. जे काही कार्य केले ते जर परमेश्वराच्या आज्ञांच्या तत्त्वानुसार असेल तर ते न्यायनिवाडा समयी टिकून राहील. COLMar 240.2
परमेश्वर प्रिती आहे. परमेश्वराने त्याची ही प्रिती ख्रिस्ताच्या देणगीद्वारे प्रकट केली. जेव्हा, “देवाने जगावर एवढी प्रिती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याजवर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे’ (योहान ३:१६) आपल्याला सामर्थ्य व कर्तबगारी प्राप्त व्हावी म्हणून परमेश्वराने सारा स्वर्ग आम्हांसाठी दिला, यासाठी की सैतानाने आपला पराभव करून नये वा मागे हटवू नये पण परमेश्वराची प्रिती ही मानवाच्या पापाचे निमित्त ऐकले नाही; परमेश्वराने आदाम, काईन यांच्या पापाचे निमित्त ऐकले नाही, आणि अशाप्रकारे पापांचे निमित्त परमेश्वर कोणाही मानवाचे ऐकणार नाही. परमेश्वर आमच्या पापाकडे दुर्लक्ष वा कानाडोळा करणारा नाही किंवा आपल्या शीलाचे दोष झाकणार नाही. परमेश्वराची ईच्छा आहे की आपण त्याच्या सामर्थ्याने सर्व पापदोषांवर वर जय मिळविला पाहिजे... COLMar 240.3
जे कोणी ख्रिस्ताची धार्मिकता नाकारतात ते परमेश्वराचे पत्र व कन्या होणे यासाठी जे शील प्राप्त होते त्याचा नकार करतात. लग्नाच्या मेजवानीला हजर राहणेसाठी ज्यामुळे ते लायक होऊ शकतात त्याचाच ते नकार करतात. या दाखल्यात जेव्हा राजाने विचारले, “मित्रा, तू लग्नाचा पोषाख घातल्यावाचून येथे का आलास?‘‘ तेव्हा त्या मनुष्याने काही उत्तर दिले नाही. महान न्यायनिवाडयाच्या दिवशी असेच होईल. मनुष्य त्यांच्या पापांविषयी आता निमित्तें सांगू शकतील; त्याच्या स्वभावाच्या दोषाविषयी निमित्त देतील, परंतु त्या न्यायनिवाडा दिवशी ते कोणतेही निमित्त सांगू शकणार नाहीत. COLMar 240.4
ख्रिस्ताच्या नावाखाली उभारलेल्या मंडळया सध्या भरभराटीत व नावलौकिक अशा आहेत. परमेश्वराने आम्हास सत्याचा वाढता प्रकाश दिला आहे, प्रकट केला आहे. प्राचीन काळच्या लोकापेक्षा परमेश्वराने आम्हां सध्याच्या लोकांना अधिक चांगली संधी व सत्य प्रकट केले आहे. इस्त्राएल लोकांना जो महान सत्य प्रकाश दिला तो आम्हांस दिला एवढेच नव्हे तर ख्रिस्ताद्वारे आम्हांस तारण दिले अशी कित्येक साक्ष पुरावे वा उदाहरणे दिलेली आहेत. पूर्वी इस्त्राएल लोकांना चिन्ह व दर्शक म्हणून जे होते ते आता आपणास प्रत्यक्ष असे आहे. त्यांना केवळ जुना करार होता तर आता आपणास जुना करार व नवा करार हे दोन्ही आहेत. आम्हास तारणारा येशू याचे आश्वासन आहे ते असे की जो तारणारा क्रुसावर खिळला गेला, ज्याला परले गेले तो त्या योसेफ अरिमथाईकर याने ठेविलेल्या कबरेतून बाहेर आला व म्हणाला, “पुनरूत्थान व जीवन मीच आहे‘‘ (योहान ११:२५) आमचे ख्रिस्ताविषयीचे ज्ञान व ख्रिस्ताची प्रिती व त्याचे राज्य ही आम्हांमध्ये आहेत. गायन व संदेशाद्वारे आम्हास ख्रिस्त प्रगट केला जातो. अशाप्रकारे आम्हाला आध्यात्मिक उत्तम मेजवानी दिली जाते. लग्नाचा पोषाख बहुमोल अतुल्य किंमती देवून तो पोषाख प्रत्येक आत्म्यास मोफत दिला जातो. परमेश्वराचे संदेशवाहक यांच्याकरवी आम्हांस ख्रिस्ताची धार्मिकता दिली जाते, विश्वासाने नितिमत्व, परमेश्वराच्या वचनाद्वारे अतिमहान व बहमोल अभिवचनें दिली जातात, परमेश्वराशी मध्यस्थी ख्रिस्ताद्वारे मोफत प्राप्त होते, पवित्र आत्मा आमचे सांत्वन करितो, सार्वकालिक जीवनाचे खबीर आश्वासन स्वर्गीय राज्यात सदासर्वकाळ आम्हांस स्थापित करिते. परमेश्वराने आम्हांसाठी ही जी स्वर्गीय महान मेजवानी तयार केली त्यात सर्व काही पुरवठा केला आहे, काहीही कमी असे पडू नये अशी काळजी घेतली आहे, मग परमेश्वराने अजून काय करावयाचे राहिले आहे ? COLMar 241.1
स्वर्गात जे देवदूत सेवा करितात त्यांनी असे म्हटले आहे परमेश्वराने आम्हास जी सेवा करावयास सांगितली ती आम्ही केली आहे. आम्ही सैतानाच्या दूतांना पाठीमागे हाकलून लाविले. आम्ही मानवासाठी उज्वल प्रकाश पाठविला, ख्रिस्त येशूमध्ये परमेश्वराची प्रिती मानवात जागृत केली. मानवाची दृष्टि ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे आकर्षित केली. परमेश्वराचा एकुलता एक पुत्र त्याला त्यांच्या पापामुळे वधस्तंभी जावे लागले. यामुळे त्यांची अंत:करणे हळहळली. त्यामुळे त्यांचा पालट झाला. पश्चात्ताप व पालट यासाठी कोणत्या पायऱ्या आहेत हे ही त्यांना दिसून आले. सुवार्तेचे सामर्थ्य त्यांना समजले. परमेश्वराच्या प्रितीचा आस्वाद त्यांना समजला व त्यामुळे त्यांची अंत:करणे कोमल झाली. ख्रिस्ताच्या संपूर्ण शीलाचे सौदर्य त्यांना दिसून आले. परंतु पुष्कळांना ते सर्व व्यर्थ असे झाले. ते त्यांच्या संवयी व शील बदलणेस परमेश्वराला शरण गेले नाहीत. स्वर्गीय पोषाख घालून स्वर्गात जाणे यासाठी ते त्यांचा पृथ्वीवरील पोषाख काढून ठेवणेस तयार नव्हते. त्यांनी त्यांची अंत:करणे लोभास देवून टाकली होती. परमेश्वरावर प्रिती करणे यापेक्षा त्यांना जगातील सर्व गोष्टींवर जादा आवड वाटली. COLMar 241.2
अखेरचा निर्णय देणारा दिवस हा गांभीर्याचा असेल. प्रेषित योहानाला जो भविष्यात्मक दृष्टांत झाला त्यांचे वर्णन असे “नंतर मोठे पांढरे राजासन व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला; त्याच्या तोंडापुढून पृथ्वी व आकाश ही पळाली; त्याकरिता ठिकाण म्हणून सापडले नाही. मग मृत झालेल्या लहानथोरांना मी राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्यावेळी पुस्तकें उघडली गेली. तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले. ते जीवनाचे होते; आणि त्या पुस्तकांत जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ‘ज्यांच्या त्याच्या कर्माप्रमाणे’ ठरविण्यात आला.‘‘ प्रकटीकरण २०: ११, १२. COLMar 242.1
जेव्हा त्या न्यायसमयी मनुष्य सार्वकालिक जीवनाच्या दृष्टीने परमेश्वरापुढे उभा राहील त्या दिवसाची पहाणी ही दु:खदायक अशी असेल. मानवाचे जीवन आहे त्या स्थितीत प्रारंभापासून त्या न्याय दिवसापर्यंत सादर केले जाईल. जागतिक ख्यालीखुशाली, श्रीमंती व मानसन्मान ही सर्व त्यावेळी महत्त्वाची गणली जाणार नाहीत. त्या मानवाने ख्रिस्ताची धार्मिकता नाकारली यावर महत्त्वाचा विचार केला जाईल. त्यांनी सैतानाची फसवेगिरी याद्वारे त्यांचे शील खोटे असे केले, हे ते पाहतील. त्यानी जो पेहराव धारण केला त्यावर जो प्रथमतः फसविणारा त्याचा शिक्का त्यावर असेल. त्यानंतर त्यांच्या या निवडीचा काय परिणाम हा त्याना दिसून येईल. परमेश्वराच्या आज्ञांचा भंग करणे म्हणजे किती भारी हे ज्ञान त्यांना त्यावेळी समजून येईल. COLMar 242.2
त्यानंतर सार्वकालिक जीवनाची तयारी करणे यासाठी दुसरा कृपेचा काळ नसणार वा नाही म्हणून आम्ही जीवंत आहोत याच काळात आम्हास ख्रिस्ताच्या धार्मिकतेचा पोषाख घालावयाचा आहे. याच काळात जे कोणी परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करतील व त्यानुसार त्याचे शील तयार करतील अशा लोकांसाठी ख्रिस्त स्वर्गीय गृह तयार करावयास गेला आहे. COLMar 242.3
आमच्या जीवनातील कृपेच्या काळाचे दिवस झपाटयाने संपत आहेत, आणि शेवट नजीक येत आहे. आम्हाला असा इशारा दिला जातो, “तुम्ही आपणास संभाळा, नाहीतर कदाचित् गुंगी, दारूबाजी व संसाराच्या चिंता यांनी तुमची अंत:करणे जड होवून तो दिवस ‘पाशाप्रमाणे’ अकस्मात् तुम्हांवर येईल’ लूक २१:३४. संभाळा, दक्षता घ्या नाहीतर तुम्ही त्यावेळी तयार असणार नाही ; काळजी घ्या नाहीतर तुम्ही त्या दिवशी राजाच्या लग्नाच्या मेजवानीस लग्नाचा पेहराव नसलेले असे सापडू नये. ! COLMar 243.1
“यास्तव तुम्हीही सिध्द व्हा, कारण तुम्हास वाटत नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल‘‘ “आपण नग्न असे चालू नये व आपली लाज लोकांस दिसू नये म्हणून जो जागृत राहतो व आपली वस्त्रे राखितो तो धन्य‘‘ मत्तय २४ : ४४ प्रकटीकरण १६:१५. COLMar 243.2