भाषण करणे ह्या देणगीचे सामर्थ्य काळजीपूर्वक वाढविले पाहिजे. परमेश्वरापासून सर्व काही प्राप्त झाले त्यात भाषण ही देणगी फार आशीर्वादीत अशी आहे. या भाषण देणगीद्वारे आपण इतराचा पालट करितो, या वाणीने आपण प्रार्थना करितो व परमेश्वराची स्तुति व गौरव करितो, व याच वाणीने आपण तारणारा येशूच्या प्रितीची घोषणा करितो. बर मग आपण या देणगीची किती विशेष करून शिक्षणाद्वारे वाढ करून चांगले कार्य या प्रित्यर्थ काळजी घेतली पाहिजे. COLMar 253.3
आपला आवाजाचा योग्य उपयोग व संस्कृत याकडे बुद्धिमान व ख्रिस्तीलोक फार दुर्लक्ष करितात. काहीजण इतक्या झपाटयाचे व घाईचे वाचतात तर काहीजण इतक्या हळू वाचतात व बोलतात की त्याचे काहीच कळत नाही. काहीजण घोगरा आवाजात, अस्पष्ट शब्द, काहीजण वरच्या आवाजात, काहीजण कर्कश आवाजात, तर कडक खडया आवाजात बोलतात अशाप्रकारे कानात कसे तरी होते. पवित्र शास्त्रांतील वचन, गायन व अहवाल व इतर रिपोर्ट समाजात असे वाचले जातात की ते समजत नाहीत व त्यांच्यातील भावार्थ वाटत नाही उलट सर्व अहिताचे असे होते. COLMar 253.4
अशा प्रकारची दुष्टता दुरूस्त झाली पाहिजे. पवित्रशास्त्र या मुद्यावर चांगली माहिती देते. एज्राच्या काळात लेवी लोक शास्त्र लेखाचे वाचन करीत होते. तेव्हा असे म्हटले आहे, “त्यांनी तो ग्रंथ तो देवाच्या शास्त्राचा ग्रंथ, स्पष्टिकरणासह वाचून दाखविला. वाचले तेवढे लोकास चांगले समजले.‘‘ नेहम्या ८:८. COLMar 253.5
सर्वांनी जर चिकाटीने प्रयत्न केला तर त्यांना बुद्धिकौशल्याने चांगले पूर्ण उच्चारात स्पष्ट शब्दांत पूर्ण आवाजात, बिनचुक व प्रभाव पडेल. अशा पध्दतीने वाचता व बोलता येईल. आम्ही असा प्रयत्न करीत गेलो तर आपली कर्तबगारी फार वाढेल व आपण ख्रिस्तासाठी प्रभावी कामदार होऊ. COLMar 254.1
प्रत्येक ख्रिस्ती मनुष्याने ख्रिस्ताची अमोल ठेव ही इतरांना समजून सांगावयाची आहे; त्यासाठी ख्रिस्ती मनुष्याचे भाषण हे पूर्ण असे असावे. ख्रिस्ती मनुष्याने परमेश्वराचे वचन असे हितकारक रितीने सांगावे की ऐकणाऱ्यांनी वचनाचे गौरव करावे. मानवी संदेशवाहक यास परमेश्वर बाधा आणित नाही. स्वर्गीय संदेशाचा प्रवाह मानवाद्वारे मानवाकडे जाणे याबाबत परमेश्वर मानवास साधारण व कमी प्रतीचे समजत नाही, आणि अशी परमेश्वराची योजनाही नाही. COLMar 254.2
आमच्या जीवनाचा आदेश ख्रिस्त याकडे आपण पाहावे; आम्ही पवित्र आत्म्याचे साहाय्य यासाठी प्रार्थना करावी, आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने प्रत्येक अवयव हा प्रशिक्षणाने प्रभु सेवेसाठी परिपूर्ण केला जावो. COLMar 254.3
विशेषत: जे कोणी व्याख्यानमालेत संदेश देतात त्यांच्याबाबत हे खरे आहे. प्रत्येक शिक्षक व पाळक यांनी हे लक्षात ठेवावे की ते लोकांना जो संदेश देतात त्यांत सार्वकालिक जीवनाचा समावेश आहे. ते जे बोलतात त्याचा निकाल न्याय निवाड्याच्या शेवटच्या दिवशी दिसून येईल. ज्या प्रकारे संदेश दिला व त्याचा इतर लोकांनी स्वीकार केला किंवा नकार केला हे समजून येईल. हे लक्षात घेणे यासाठी आम्ही जो संदेश देऊ तो लोकांना समजेल अशा शब्दात देणे, त्याचा लोकांच्या मनावर पगडा बसला पाहिजे. याशिवाय आमचे शब्द हळू, स्पष्ट, गंभीर व कळकळीचे असावेत, म्हणजे संदेशाचे महत्त्व समजून येईल. COLMar 254.4
प्रत्येक ख्रिस्ती कार्यात योग्य संस्कृती व प्रभावी भाषण यांचा उपयोग दिसला पाहिजे, यांचा प्रवेशगृहात व मानवी जीवनाच्या प्रत्येक व्यवहारात केला जातो. आम्ही मंजुळ आवाजात, शुध्द व व्याकरण शुध्द भाषेत बोलावे, आपले शब्द दयाळु व सभ्य भाषेत असावेत. गोड व दयाळु वाणीचे शब्द जणू काय दहिंवर वा हलकीशी पावसाची सर असे भासावे. ख्रिस्ताविषयो पवित्रशास्त्र सांगते, त्याची वाणी कृपेची व ओठांतून येणारे शब्दही ध्येयाचे होते यासाठी की — “दुःखिताना त्याच्या दुःखाप्रसंगी कसे बोलावे हे समजून घे.‘‘ स्तोत्र ४५:२. आणि प्रभु आम्हास सांगतो की, “तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रूचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजावे’ (कलस्सै ४:६). “तुमच्या तोंडावाटे.... तर गरजेप्रमाणे आध्यात्मिक उन्नतिकरिता जे काही उपयुक्त तेच मात्र निघो, यासाठी की तेणेकरून ऐकऱ्यांस कपादान प्राप्त व्हावे.”(इफिस ४:२९). COLMar 254.5
आम्ही इतरांच्या जीवनात सुधारणा वा चकांची दुरूस्ती करणे हे करीत असता आपल्या शब्दांची आपण काळजी घेतली पाहिजे. आपले शब्द चांगले वापरले तर जीवनदायी होतील व घातक वा वाईट वापरले तर ते मरणदायी होतील. जो मानव दु:खी अंत:करणाचा झाला असेल अशा मनुष्याला सल्ला देणे वा त्याची कान उघडणी करणे वा दोष देणे यासाठी काही लोक कडक शब्दांचा वापर करीतात त्यामुळे त्या मनुष्याची सुधारणा होणे याऐवजी तो उध्दट होतो. अशा अविचारी सल्ल्यामुळे पवित्र आत्मा निघून जातो व अपराधी मनुष्य बंडखोर वृत्तीचा होतो. जे कोणी सत्य तत्त्वांचा सल्ला देऊ पाहतात त्यांना स्वर्गीय प्रितीचे तेल हवे. हरएक परिस्थितीत सल्ला देणे वा दोष दाखविणे हे सर्व प्रेमळ शब्दांत बोलणे. यामुळे आमच्या शब्दाने सुधारणा होईल, लोकांना संताप वाटणार नाही. ख्रिस्त, त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे शक्ति व सामर्थ्य ही देईल. हे ख्रिस्ताचे कार्य आहे. COLMar 255.1
ज्या शब्दांत सल्ला नाही असा एकही शब्द बोलू नये. वाईट शब्द बोलू नयेत. क्षुल्लक गोष्टीवर बोलू नये, रागाने मनात झुरत राहू नये किंवा दुष्ट सुचना देऊ नयेत. अशा प्रकारे सल्लामसलतीचे कार्य ख्रिस्ताचे अनुयायी यांनी करू नये. प्रेषित पौल म्हणतात, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने सल्ला देणे, “तुमच्या तोंडावाटे कोणतेही अमंगल भाषण न निघो‘‘ इफिस ४:२९. भ्रष्टाचार व्यवहार म्हणजे केवळ दुष्ट शब्द बोलणे असेच नव्हे, जो धर्मयुध्द व पवित्र आहे त्याविरूध्द ज्या भावना प्रगट करू त्यात अविचारी सूचना देणे आणि वाईटास आश्रय देणे. जर अशा गोष्टीला वेळीच आळा घातला नाही तर त्यामुळे महान पाप होणेची शक्यता आहे. COLMar 255.2
प्रत्येक कुटुंबाने व प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तिने दुष्ट वा वाईट भाषण करणे यापासून स्वत: अलिप्त राखले पाहिजे हे त्याचे कर्तव्य आहे. जर का अशा प्रकारे मूर्खपणाचे भाषण करणारी टोळी जर जमली तर आपण शक्यतो भाषणाचा विषय बदलणे. परमेश्वराच्या कृपेने आम्ही हळूच एक शब्द वा विषय सुचविणे की त्यामुळे भाषणाचा ओघ साहाय्यक विषयाकडे वळला जाईल. COLMar 255.3
आईबापांनी त्यांच्या लेकरांना योग्य विषयावर योग्य बोलणे हे शिक्षण देणे, मुलांना त्यांच्या जीवनासाठी संस्कृतीचे शिक्षण देणेच उत्तम ठिकाण म्हणजे गृहजीवन आहे. लेकरांनी लहानपणापासून आई-वडीलांना व इतरांना सन्मानाने, आदराने व प्रेमळपणाने बोलणे. मुलांना शिक्षण द्यावे की त्यांनी केवळ, सभ्य, सत्य व शुध्द भाषण मुखावाटे काढणे. आई-वडीलांनी असे शिक्षण ख्रिस्ताच्या शाळेत दररोज घेणे. यामुळे ते त्यांच्या मुलामुलींना शिक्षण विधी व उदाहरण याद्वारे देतील. ‘सद्भाषण यांनी तुझे शिक्षण युक्त असू दे’ आई-वडीलांची ही सर्वात महान व मोठी जबाबदारी आहे. यासाठी की विरोध्याला आपल्याविषयी काही वाईट बोलण्यास जागा नसल्यामुळे लाज वाटावी”तीत २:८. आई-वडीलांची ही सर्वांत महान व मोठी जबाबदारी आहे. COLMar 255.4
आम्ही ख्रिस्ताचे अनुयायी या दृष्टिने आमचे बोलणे हे, इतरांना त्यांच्या ख्रिस्ती जीवन मार्गावर साहाय्यक व उत्तेजन असे झाले पाहिजे. आम्ही जे काही करितो त्यापेक्षा आमच्या जीवनातील मौल्यवान् अनुभवाचे अध्याय याविषयी आपण जास्त बोलणे. आम्ही परमेश्वराची कृपा व दया याविषयी जास्त बोलावे आणि ख्रिस्ताची अतुल्य प्रितीचा खोलवर अनुभव याविषयी बोलावे. आपल्या शब्दांत परमेश्वराची स्तुति व उपकारस्तुतीचे शब्द असावेत. जर आपल्या मनी-ध्यानी व अंत:करणात परमेश्वराची प्रिती असेल तर ती आपल्या शब्दात व भाषणात दिसून येईल. जे काही आमच्या आध्यात्मिक जीवनात येते ते आम्ही इतरांना सांगणे हे कठीण भासणार नाही. महान विचार, उच्च ध्येय, सत्याची चांगली माहिती, नि:स्वार्थी हेतू, पवित्रता व धार्मिकता ही शब्दरूपी फळे यात व अंत:करणात आहे ते शीलात दिसून येईल. जेव्हा आमच्या शब्दांद्वारे ख्रिस्ताला अशा प्रकारे प्रगट केले जाईल, तेव्हा त्याचा पगडा पडून आत्मे जिंकणेसाठी एक प्रभावी सामर्थ्य साधन होईल. COLMar 256.1
ज्या लोकांना ख्रिस्ताची माहिती नाही त्यांना आपण ख्रिस्ताविषयी बोलले पाहिजे. ज्याप्रमाणे ख्रिस्त बोलला असता तसे आपण बोलावे. ख्रिस्त जेथे कोठे होता. सभास्थानांत, रस्त्याकडेला, बोटीत असताना परूशी लोकांची मेजवानी केली वा जकातदाराशी बोलताना त्यावेळी त्या त्या लोकांना सार्वकालिक जीवनाविषयी बोलला. निसर्गातील वस्तुगण, दररोजचे जीवन यावरून येशू सत्याशी सांगड घालून बोलत असे. लोकांची अत:करणे येशूकडे आकर्षित झाली होती, कारण त्याने आजाऱ्यांना बरे केले, पिडीतांचे समाधान केले, त्यांची लेकरे मांडीवर व हातावर घेऊन त्यांना आशीर्वाद दिला होता. जेव्हा येशू बोलू लागला तेव्हा लोकांचे लक्ष त्याच्याकडे खिळून राहात असे, आणि त्याचे शब्द काही लोकांना जीवनदायी जीवन असे होते. COLMar 256.2
अशाच प्रकारे आमचेही झाले पाहिजे. आम्ही जेथे कोठे असू वा जाऊ तेथे आपण लोकांना तारणारा येशू विषयी कसे काय सांगणे ही संधी वा प्रसंग पाहाणे. आम्ही ख्रिस्ताचे अनुकरण करणे म्हणजे लोकांना मदत करणे, याद्वारे लोकांची अंत:करणे उघडली जातील. हे एकाएकी घडू शकत नाही तर स्वर्गीय प्रितीने युक्त होऊन आपण लोकांना सांगू शकतो की, तो लाखात मोहरा आहे”आणि “तो सर्वस्वी मनोहर आहे’ गीतरत्न ५:१०,१६. आपल्या सर्वश्रेष्ठ दानाचा या सेवेसाठी उपयोग करू शकतो. हे दान भाषा कौशल्य आम्हाला यासाठी दिले की आपण ‘ख्रिस्त हा पापक्षमा करणारा आहे हे सांगणे. COLMar 256.3