आमचा वेळ हा परमेश्वराचा आहे. आमचा प्रत्येक क्षण परमेश्वराचा आहे आणि आम्ही या वेळेचा उपयोग परमेश्वराचे गौरव करणे यासाठी करणे ही आपली गंभीर जबाबदारी आहे. परमेश्वराने आम्हास जी दाने दिली आहेत त्यापैकी वेळ या दानाचा परमेश्वर कडक हिशोब घेणार आहे. COLMar 259.3
वेळेचे महत्त्व हे आपण मोजतो त्याहून अधिक आहे. ख्रिस्ताने प्रत्येक क्षणाला महत्त्व दिले. तद्वत आम्हीही महत्त्व द्यावे. जीवनाचा खेळ करू नये ते फार अल्प असे आहे. आपणास या आयुष्यातील कृपेच्या काळात सार्वकालिक जीवनासाठी तयार करावयाची आहे. इतर बाबीत व्यर्थ वेळ खर्च करणे यासाठी वेळ नाही ; स्वत:च्या ख्याली खुशालीत वेळ खर्च करणेस वेळ नाही, पापात गुरफटून राहणेस वेळ नाही. आपल्या भावी जीवनासाठी, अमर जीवनासाठी आम्हास या आयुष्यातच आतापासूनच आपल्या शीलाची उभारणी केली पाहिजे. जो तपासणीचा न्यायनिवाडा त्यासाठी आपणास आतापासून आपले शील तयारीत ठेविले पाहिजे. COLMar 259.4
मानव जीवन जगतात न जगतात तोच मरण येवून मानवी सतत कष्टमय जीवनाचा अंत होऊ लागला आणि त्या कष्टमय जीवनात सार्वकालिक जीवनाच्या खरा अर्थ समजत नाही तर ते जीवन व्यर्थ होय! जो मनुष्य त्याचा वेळ काम करणे यात घालवितो. त्याला वेळेचे महत्त्व समजते व तो मनुष्य स्वर्गीय गृह व अमर जीवनास लायक ठरला जातो आणि असा मनुष्य त्याच्या जन्माचे सार्थक करितो. COLMar 260.1
आम्ही आपल्या वेळेची बचत करावी. पण जो वेळ वाया खर्च केला तो कधीही परत संपादन करिता येत नाही. आम्ही एक तासही गेला तरी तो परत मिळविता येत नाही. आपला जो वेळ आहे त्याचा चांगला उपयोग करणे याद्वारे आपण आपल्या वेळेची बचत करू शकतो ; आणि विशेषत: परमेश्वराची जी तारणाची योजना आहे त्यात आपण परमेश्वराबरोबर सह-कामदार होवून काम करणे याद्वारे तर फार मोठी वेळेची बचत होते. COLMar 260.2
अशा प्रकारे कामे करावयाची म्हणजे आपल्या शीलाचे परिवर्तन करणे, असा मनुष्य परमेश्वराचा पुत्र वा कन्या होतो, राजकीय घराण्यातील सभासद स्वर्गीय राज्याचा पुत्र होतो. तोच देवदूतांचा योग्य सोबती होतो. COLMar 260.3
आता आपण आपल्या सहबांधवाच्या तारणासाठी सेवाकार्य करणेची वेळ आहे. काहींना असे वाटते की त्यांच्याजवळ पैसे आहेत ते ख्रिस्ताच्या कार्यासाठी देणे एवढे केले म्हणजे त्यांचा कार्यभाग झाला असे त्यांना वाटते; पण त्यांचा असलेला अमोल वेळ ते वैयक्तिक सेवा करणे ही संधी दवडली जाते. पण ज्यांना शक्ति व आरोग्य आहे त्यांनी परमेश्वराच्या सेवेसाठी वेळ आहे तोवर संधीचा उपयोग करून कार्य करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. सर्वांनी ख्रिस्तासाठी आत्मे जिंकणे हे कार्य करावे. पैसे देणे म्हणजे हे कार्य झाले त्याची जागा घेऊ शकत नाही. COLMar 260.4
सार्वकालिक जीवनावर काय परिणाम होईल हे प्रत्येक क्षणाला भयप्रद असे दिसते. आम्हाला तत्कालीन सेवेसाठी पाचारण येताच आपण सज्ज असले पाहिजे यालाच मिनिट मानव म्हणतात. एखाद्या गरजु मनुष्याला सार्वकालिक जीवनाविषयी बोलणे ही संधी आता आहे ती पुनः कधी फिरून येणार नाही. परमेश्वर त्या मनुष्याला कदाचित म्हणेल, “आज रात्री तुला देवाज्ञा होईल‘‘ (लूक १२:२०) आणि आमच्या निष्काळजीपणामुळे तो मनुष्य तयार झाला नाही. मग त्या महान न्यायनिवाडा दिवशी आम्ही परमेश्वराला आमचा हिशोब कसा काय देणार ? COLMar 260.5
आम्ही आमचे जीवन जगिक व ऐहिक गोष्टीत घालविणे यासाठी आपले जीवन याहून मौल्यवान आहे, आमच्या जीवनाचा हा गाडा याची चिंता करणे व काळजी घेणे या गोष्टीची तुलना सार्वकालिक जीवनाचे मोल या बरोबर करू जाता; जगिक सर्व काही क्षुल्लक असे आहे. तरीपण परमेश्वराने आम्हास या जीवनातील कार्य करणेसाठी पाचारण केले आहे. आपल्या कामात कर्तबगार असतो तो आपल्या धार्मिक उपासनेत समर्पित असतो तो दोन्ही गोष्टींत समान आहे. पवित्रशास्त्र आळशीपणाला पसंती देत नाही. आपल्या या जगाला मोठी पीडा म्हणजे आळस आहे. प्रत्येक पुरूष वा स्त्री यांचा खरा पालट झाला असेल तर ते कर्तबगार कामदार होतील. COLMar 261.1
आम्ही वेळेचा योग्य उपयोग करण्यावर आपली बुध्दी व संस्कृतीची वाढ होणे अवलंबून आहे. आपण दरिद्री आहोत म्हणून आपल्या बुध्दीची वाढ करणे ही थांबवू नये. आपण हलक्या जमातीचे वा कठीण परिस्थिती आहे हे अडखळण म्हणून शिक्षण घेणे थांबवू नये. आपण प्रत्येक क्षणाक्षणाचा उपयोग करून संग्रह वाढविणे. आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा मारीत बसतो तो वेळ, सकाळी बिछान्यांत आळसात पडून राहणे, बसमध्ये प्रवास करणे, रेल्वेने प्रवास करणे किंवा स्टेशनवर थांबून राहावे, हॉटेलात भोजनासाठी थांबणे, काही लोकांची वाट पाहत बसणे, अशा सर्व प्रसंगी आपण एक पुस्तक जर वाचवणेसाठी हाताशी ठेविले; तर ते वाचन करून किती फायदा होईल. आपण एखाद्या निर्णयावर विचार करणे, उद्योगाची योजना करणे, वेळेची बचत करणे अशामुळे आपली ज्ञानवाढ होऊन आपल्या मनाला एक शिस्त लागेल त्यामुळे आपणास कोणत्याही हद्दयावर अधिकारपणे व उपयोगी सेवा करता येईल. COLMar 261.2
शिस्त, विचार व कार्यक्षमता या सवयी जीवनात आणणे हे प्रत्येक ख्रिस्ती मनुष्याचे कर्तव्य आहे. काम कसलेही असो तर ते करणे यात अव्यवस्थितपणा व हळू काम करणे असा स्वभाव नसावा. जेव्हा एकाद्याला काम दिले आणि ते काम जर झाले नाही याचे कारण म्हणजे त्या कामात तन-मन-खर्च केले नाही जर का एखादा काम हळू करीत असेल आणि ते काम फायदेशीर नसेल तर त्याने त्याच्या कामाविषयीचे दोष सुधारून घ्यावेत. त्याने त्याच्या कामाची योजना करावी म्हणजे वेळेची चांगली बचत होईल व कामही फायदेशीर होईल. जर कामाची पध्दत व कसब याचा उपयोग केला तर ज्या कामाला दुसऱ्याला दहा तास लागतील तेच काम कसबी मनुष्य पाच तासात करील. काहीजण घरगुती कामात नेहमी गुंतलेलो असता याचे कारण ते वेळेची बचत करणे यासाठी योजना आखत नाहीत. काहीजण छोटया कामात हळू काम करणे व दिरंगाई यामुळे जणु मोठे काम होते असे दाखवितात. पण त्यांनी जर मनात घेतले तर अशा वाईट सवयी पासून ते दूर होतील. त्यांनी त्यांच्या कामात एक ठराविक ध्येय ठरवावे. हाती घेतलेले काम याला किती वेळ लागेल हे ठरवावे व नंतर त्या वेळात ते काम संपविणेचा प्रयत्न करणे. आम्ही अशा प्रकारे मनोवृत्ती केली तर हात काम करण्यात चतुराई दाखवतील. COLMar 261.3
ज्या मनुष्याच्या जीवनात निश्चयाची कमतरता व सुधारणा ऐवजी मनाचा हेका पूर्ण करणे तो चकीचे कार्य करीत असतो; किंवा त्यांनी जर त्यांच्या जीवनातील गणांची शिक्षणाद्वारे सुधारणा केली तर तो मनुष्य त्याच्या दानाचा सेवेत फारच उत्तम उपयोग करू शकतो. अशा सुधारक मनुष्याला सर्वत्र कोणत्याही कामासाठी मागणी केली जाते. त्यांच्या कार्याचे मोलही केले जाते. COLMar 262.1
पुष्कळ मुलीमुले त्यांच्या जीवनातील वेळ व्यर्थ खर्च करतात, तोच वेळा त्यांनी त्यांच्या घरातील आई-बाप यांची प्रेमळपणे काळजी घेणे यात खर्च करावा. सध्या इतर जी कामे इतर लोक करितात त्या कामाची जबाबदारी तरूणांनी त्यांच्या खांद्यावर घेतली पाहिजे. COLMar 262.2
ख्रिस्ताने जीवन लहानपणापासून जीव लावून काम करणे असे होते. येशूने स्व:हित कधी पाहिले नाही. येशू हा परमेश्वराचा पुत्र होता तरी या पृथ्वीवर असताना येशूने त्याचा बाप जोसेफ याच्या हाताखाली सुताराचे काम केले. त्याचे काम उत्तम असे होते. येशू या जगात शीलाची उभारणी करणे यासाठी आला होता, त्या दृष्टीने त्याचे प्रत्येक काम परिपूर्ण असे होते. जसा तो परमेश्वराच्या सामर्थ्याने शीलाची उभारणी करीत होता. तद्वत तो जगातील प्रत्येक काम पूर्णपणे करीत असे. येशू आपला कित्ता नमुना आदर्श आहे! COLMar 262.3
आई-बापांनी त्यांच्या मुलांना वेळेचे महत्त्व हे शिक्षण दिले पाहिजे. त्यांना हे शिक्षण दिले पाहिजे की असे कार्य करावे की त्यामुळे परमेश्वराचा सन्मान होईल व मानवास आशीर्वाद प्राप्त होईल अशी सेवा करणे ही मौल्यवान ठरेल. COLMar 262.4
आपल्या मुलांनी काहीही करू नये यासारखे दुसरे भयंकर पाप आई-बापाच्या हातून होत नाही. लेकरांना अगोदर आळशीपणा आवडतो, त्यानंतर ते टाळाटाळ करीत राहतात व पुढे निरूपयोगी स्त्री-पुरूष होतात. यानंतर ते प्रौढ होतात व जीवनासाठी उत्पन्न मिळणेचा प्रयत्न करितात पण काम करण्यात आळस, काम दिरंगाईने करणे तरीपण वेतन मात्र बरोबर हवे अशी अपेक्षा करितात. मग वरील प्रकारे लोकांचा वर्ग व जे लोक विश्वासूपणे कार्यभाग करितात या दोन वर्गात फार मोठा फरक आहे. COLMar 262.5
लोकांच्या सवयी आळशी, निष्काळजीपणा ही कामातून धार्मिक जीवनातही येतात व त्यामुळे ते परमेश्वराच्या सेवेसाठी कर्तबगार कामदार म्हणून स्वीकारले जात नाहीत. कित्येकजण, जर त्यांच्या कामात विश्वासू असते तर ते जगाला आशीर्वाद असे झाले असते पण त्यांच्या आळशीपणामुळे त्यांनी स्वत:चा नाश करून घेतला. काम नाही व जीवनात खंबीर ध्येय नाही त्यामुळे त्यांच्यापुढे हजारों मोहांचे दार खुले आहे. वाईट मित्रांची संगत व वाईट संवयी जडतात त्यामुळे मन व आत्मा यांची स्थिती खालावत जाते; एवढेच नव्हे तर त्याचे हे जीवन व भावी जीवन यांचा नाश होतो. COLMar 263.1
आम्ही जीवनातील कोणत्याही कामात स्वतः कार्य करू त्याविषयी आम्हास परमेश्वराचे वचन असे शिकविते; “आस्थेविषयी मंद नसणारे; आत्म्यांत उत्सुक; प्रभुची सेवा करणारे‘‘ (रोम १२:११)”जे काही तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्चुन कर ;’ (उपदेशक ९:१०) प्रभुपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हांस मिळेल हे तुम्हास माहीत आहे; प्रभु ख्रिस्त याची चाकरी करा‘‘ (कलस्से ३:२४). COLMar 263.2