ख्रिस्ताच्या दाखल्यातील शिक्षणात जे तत्त्व आहे तेच येशूच्या या जगातील कार्यात दिसते. याद्वारे येशूचे दैवी जीवन व शील हे आपणास समजले जाईल. यासाठी ख्रिस्ताने मानवी देह धारण केला आणि आम्हामध्ये वस्ती केली. दैवत्व मानवी रूपात प्रकट केले, अदृश्य गौरव दृश्यमश मानवी देहरूपांत दिसले. मनुष्यास जे ठाऊक नव्हते ते, त्यास ठाऊक असलेल्या गोष्टीद्वारे शिकता आले, स्वर्गीय गोष्टींचे शिक्षण पृथ्वीवरील गोष्टीद्वारे प्राप्त झाले, मानवी रूपात परमेश्वर प्रगट झाला. तसेच “ख्रिस्ताच्या शिक्षणाद्वारे‘‘ जे अगम्य ते ज्ञात गोष्टीपासून शिकविले गेले, स्पष्ट केले, या पृथ्वीवर लोकांना ज्या परिचयाच्या वस्तु त्यापासून मानवास दैवी सत्याचे शिक्षण दिले गेले. COLMar 6.1
पवित्र शास्त्र म्हणते, “ह्या सर्व गोष्टी येशूने दाखल्यांनी लोकसमुदायास सांगितल्या... यासाठी की संदेशाच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे... मी आपले तोंड उघडून दाखले देईन, जगाच्या स्थापनेपासून जे गप्त ते प्रकट करीन‘‘ मत्तय १३:३४,३५. आध्यात्मिक गोष्टींचा माध्यम नैसर्गिक गोष्टी होत. निसर्गाच्या गोष्टी आणि त्याच्या (येशू) श्रोतेजणांचे जीवनी अनुभव यांचा संबंध सत्य व पवित्र शास्त्र यांच्याशी जोडला गेला. अशा प्रकारे ख्रिस्ताचे दाखले याद्वारे नैसर्गिक राज्यापासून आध्यात्मिक राज्याशी जोडले जातात व एकेक दाखला म्हणजे एकेक कडी जोडून सत्य साखळी बनते. त्यामुळे मानव व परमेश्वर, पृथ्वी व स्वर्ग ही जोडली जातात. COLMar 6.2
निसर्गातून येशू शिक्षण देत असता त्याच्या हाताने जे निर्माण केले त्या निर्मितीमध्ये जे सामर्थ्य व गुणधर्म त्याने घातले त्याविषयी येशू बोलत होता. या निर्मितीच्या आरंभीची पूर्णता यात परमेश्वराच्या विचारांची प्रतिमा आहे. आदाम व हव्वा यांना त्यांचे घर एदेन बाग येथे परमेश्वराच्या ज्ञानाची माहिती निसर्गात सर्वत्र मिळत होती. ज्ञान दृग्गोचर होत होते व अंत:करणात त्याचा स्विकार केला जात होता, निसर्ग व परमेश्वर यांच्यामध्ये अशा प्रकारे दळणवळण चालत होते. त्या पवित्र जोडप्याने परमेश्वराच्या पवित्र नियमांचा आज्ञाभंग केला तेव्हाच निसर्गात परमेश्वराचे तेज होते ते नाहीसे झाले. पृथ्वी ही विभक्त झाली आणि पापाने विटाळली गेली असे असूनही जे सौंदर्य आहे ते अजूनही दिसून येते. परमेश्वराचा उदात्त हेतू अद्यापि तसाच आहे, आम्ही जर निसर्गाचा योग्य अभ्यास केला तर निसर्ग निर्माता परमेश्वराविषयी साक्ष देतो, हे आम्हास समजेल. COLMar 6.3
ख्रिस्ताच्या काळात वरील हेतू लोकांच्या मनातून लुप्त झाले होते. परमेश्वराच्या कार्याचा मानवास विसर पडला होता. मानवाच्या पापाने, निसर्गाच्या सौंदर्यावर पडदा टाकला आहे, निसर्गाद्वारे परमेश्वराचे प्रगटीकरण करणे याऐवजी निसर्ग कार्याने परमेश्वरास झाकण्याचा प्रयत्न चालविला आहे. “त्यांनी (मानव) देवाच्या सत्याचा असत्याशी मोबदला केला आणि त्याला सोडून उत्पन्न केलेल्या पदार्थाची भक्ति व सेवा केली, तो उत्तन्नकर्ता युगानुयुग धन्यवादित आहे‘‘ आमेन. कारण देवाला ओळखीत असूनही त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही व त्याचे आभार मानिले नाहीत, तर ते आपल्या पोकळ कल्पनानी शून्यवत् झाले आणि त्यांचे गूढ मन अंध:काराने व्याप्त झाले.‘‘ रोम १:२५, २१ अशाप्रकारे झस्त्राएल यांनी परमेश्वराचे शिक्षण याऐवजी मानवांचे शिक्षण दिले. केवळ निसर्गाबाबत असे केले नाही तर सर्व अर्पणाचे शिक्षण व परमेश्वराचे शिक्षण यांच्याद्वारे परमेश्वराचे प्रगट करणे याऐवजी ही सर्व परमेश्वरावर झाकण अशी केली गेली. COLMar 7.1
जे काही सत्याला अधुकपणा आणत होते ते येशूने दूर केले. पापामुळे निसर्गावर जो पडदा आला होता तो येशूने दूर केला, सर्व उत्पत्ती कार्याद्वारे आध्यात्मिक वैभव-गौरव आहे हे दृष्टीस आणून दिले. येशूची निसर्गाद्वारे शिकवण व पवित्र शास्त्रांतील शिकवण याद्वारे नवीन प्रगटीकरण केले. COLMar 7.2
येशूने सुंदर भूकमले तोडून मुले व तरूणांच्या हाती दिली, त्या सर्वानी पित्याच्या गौरवाने तेजस्वी झालेला येशूचा चेहरा ती तरूण मंडळी पाहात असता येशूने त्यांना बोधपर धडा दिला, “रानातील भूकमळे कशी वाढतात हे लक्षात आणा, ती कष्ट करीत नाहीत व कातीत नाहीत, तरी मी तुम्हास सांगतो की शलमोन देखील आपल्या सर्व वैभवांत त्यांतल्या एकासारिखा सजला नव्हता. जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत पडते त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर अल्पविश्वासी, तो विशेषकरून तुम्हांस पोषाख घालणार नाही काय?‘‘ मत्तय ६:२८-३०. COLMar 7.3
डोंगरावरील प्रवचनात वरील संदेश इतरांना दिला त्यावेळी मुले व तरूणही होते. त्या लोक समुदायातील स्त्री-पुरूषांच्या जीवनात काळजी, चिंता, निराशा व दुःख ही होती, अशांना वरील सदेश सांगितला. येशू आणखी म्हणाला, “यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, असे म्हणत काळजी करीत बसू नका. कारण ही सर्व मिळवावयास विदेशी लोक खटपट करीतात. या सर्वाची गरज तुम्हांस आहे हे तुमच्या स्वर्गीय पित्यास ठाऊक आहे. येशूने आपले हात त्या लोकसमुदायाकडे पसरून म्हणाला,“तर तुम्ही प्रथम त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळवावयाची खटपट करा, म्हणजे याबरोबर तीही सर्व तुम्हांस मिळतील‘‘ मत्तय ६:२८-३३. COLMar 7.4
अशाप्रकारे रानातील भूकमले व गवत याविषयी दिलेला संदेश लोकांना उलगडून सांगितला. आम्ही निसर्गातील फुले व हिरवळ पाहत असता येशूचा वरील संदेश मनात बाळगणे. येशूचे शब्द आम्हांस आश्वासन देतात व त्यामुळे परमेश्वरावरील विश्वास भक्कम केला जातो. COLMar 8.1
सत्याविषयी येशूचे विचार विशाल होते, त्याची शिकवण सर्वकाळासाठी होती, सत्याचे स्पष्टीकरण करावे यासाठी सर्व निसर्गाचा उपयोग केला गेला. दररोज दिसणारे दृश्य याचा आध्यात्मिक सत्याशी संबंध जोडला अशा प्रकारे निसर्गाचे दृश्य यावर प्रभुचे दाखले यांचा पोषाख घातला. COLMar 8.2
आपल्या सुरूवातीच्या कार्यामध्ये ख्रिस्त जे काही बोलला ते अगदी साध्या सोप्या भाषेत होते अशासाठी की त्याच्या श्रोत्याना ते समजावे व त्यांना तारणासाठी शहाणे केले जावे. परंतु बऱ्याच अंत:करणात त्या बीजाने मूळ धरले नव्हते व ते सुकून गेले होते. यासाठी ख्रिस्त म्हणाला होता — “यास्तव मी त्यांच्याबरोबर दाखल्यांनी बोलतो; कारण ते पाहत असता पाहत नाहीत, आणि ऐकत असता ऐकत नाहीत व त्यांना समजतार्ह नाही....... कारण हया लोकांचे अंत:करण जड झाले आहे. ते कानानी मंद ऐकतात, आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत.”मत्तय १३:१३-१५. COLMar 8.3
मानवात चौकस बुध्दी निर्माण व्हावी यासाठी येशूने जागृती केली. जे लोक निष्काळजी असतील त्याच्या अत:करणांवर सत्याचा ठसा उमटला जाईल. दाखलेद्वारे शिक्षण देणे हे लोकप्रिय होते. या शिक्षण पध्दतीचा सन्मान करावा व त्याकडे लक्ष द्यावे असे केवळ यहुदी लोकांनाच नव्हे तर इतर राष्ट्रांनाही येशूने सांगितले. दाखले याशिवाय शिक्षणाची दुसरी प्रभावी पध्दत येशू वापरू शकला नाही. जर त्याच्या (येशू) श्रोतेजणात परमेश्वराच्या सत्याच्या ज्ञानाची, येशूचे शब्द जर त्यांना चांगले समजावयाचे असतील तर येशू त्याला जे जिज्ञासूपणे प्रश्न विचारीत असत त्यांना स्पष्टीकरण द्यावयास सज्ज होता. COLMar 8.4
येशू आणखी सत्य सांगणेसाठी सज्ज होता पण लोकांची तयारी नव्हती वा त्यांना तसा समज नव्हता. याच कारणास्तव येशूने दाखले यारूपाने लोकांना शिक्षण दिले. येशूने त्याचे शिक्षण व जीवनांत दृश्य यांचा संबंध जोडला. मानवाचे अनुभव व निसर्ग यांच्याशी संबंध जोडला. येशूने लोकांचे लक्ष वेधून घेतले व त्यांच्या मनावर ठसा उमटविला. नंतर त्यांनी जेव्हा त्या वस्तू पाहिल्या तेव्हा येशूचे स्पष्टीकरण त्यांच्या स्मरणात लगेच आले, यासोबत येशूचे शब्द त्यांना आठवले. ज्यांची मने पवित्र आत्म्यासाठी खुली होती, त्यांना येशू तारणारा याच्या शिकवणीचा अर्थ अधिक अधिक समजत गेला. जे गूढ होते ते उकलले गेले व जे समजणे कठीण होते ते अगदी स्पष्ट उदाहरण असे पुढे आले. COLMar 8.5
येशूने प्रत्येक अंत:करणासाठी मार्ग पाहिला. येशूने वेगवेगळी स्पष्टीकरणे दिली त्याद्वारे सत्य अनेक प्रकारांनी प्रकट केले. त्यामुळे सत्य अनेक श्रोत्यांना आवडले गेले. सभोवारच्या सृष्टी सौदर्यातून व जीवनातून उदाहरणे घेतली त्यामुळे लोकांना ती आवडली गेली. जे कोणी तारणारा येशू याचे ऐकत असत त्यांना वाटत नव्हते की येशूने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. नम्र लोक, पापी लोक जेव्हा येशूचे ऐकत तेव्हा त्याच्या शिकवणीत सहानुभूतीचे व दयाळू शब्द ऐकावयास मिळत असत. COLMar 9.1
यास्तव मी त्यांच्याबरोबर दाखल्यांनी बोलतो; कारण ते पाहत असता पाहत नाहीत, आणि ऐकत असता ऐकत नाहीत व त्यांना समजतही नाही. यशयाचा संदेश त्यांच्याविषयी पूर्ण होत आहे, तो असा की,.... कारण हया लोकाचे अंत:करण जड झाले आहे, ते कानानी मंद ऐकतात, आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत‘‘ मत्तय १३:१३-१५ COLMar 9.2
येशूने दाखले रूपाने शिक्षण दिले त्याचे आणखी कारण होते. येशू सभोवर जे लोक जमलेले असत त्यांच्यामध्ये शास्त्री, परूशी, याजक, वडीलजण, हेरोदिय, अधिकारी, जगिक नावलौकिक आवडीचे, पूर्वतेढ असलेले, अभिमानी मनुष्य होती. याहून अधिक म्हणजे येशूच्या शिकवणींत कुठे दोष सापडतो याकडे त्यांचे लक्ष होते. त्या लोकांचे गुप्तहेर येशूच्या मागे रात्रंदिवस असत व त्याचे भाषण ऐकत. यासाठी की त्याच्याबाबत दोष सापडतांच त्याला दोषी ठरवून त्याला कायमचा दोषी ठरविणे म्हणजे त्याला कोठेही बोलता येणार नाही, कारण आता त्याच्या मागे सर्वजण लागले होते. येशू तारणारा यास या लोकांचा कावा माहीत होता म्हणून त्याने सत्य दाखले रूपाने शिकविले यासाठी येशू ठायी दोष सापडू नये व सान्हेद्रिय पुढे येशूविरूध्द खटला चालविता येऊ नये, दाखले रूपात येशूने जे ढोंगी व मोठया हुद्दयावर होते त्यांची दुष्ट कृत्ये दाखवून दिली व लाक्षणिक भाषेचा सत्याला पेहराव घातला. हाच मुद्दा येशूने त्यांना उघड शब्दात सांगितला असता तर त्या लोकांनी हे ऐकून येशूच्या सर्व सेवेची समाप्ती केली असती. येशूने गुप्तहेरांना टाळले. दाखले रूपात चुकांच्या स्पष्ट प्रकट केले व जे प्रामाणिक अंत:करणाचे त्यांना दाखले रूपाने सत्य समजले व त्यानी फायदा करून घेतला. परमेश्वराने जे काही निर्माण केले आहे त्याद्वारे सत्य, कृपा ही स्पष्ट अशी केली गेली. निसर्गाद्वारे व मानवाच्या जीवनातील अनुभव यामुळे परमेश्वराविषयीची माहिती प्राप्त झाली “त्याचे (परमेश्वर) अदृश्य गुण म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवत्त्व ही निर्मिलेल्या पदार्थावरून ज्ञात होऊन सृष्टीच्या उत्पति कालापासून स्पष्ट दिसत आहेत, यासाठी की त्यांनी निरूत्तर व्हावे‘‘ रोम १:२० COLMar 9.3
“उच्च शिक्षणाची’ स्थापना येशूचे दाखले रूपी शिक्षण याद्वारे केली जाते. येशूने मानवासाठी अतिखोल विज्ञान खुले केले असते. विज्ञानाच्या क्षेत्रात अभ्युत संशोधनासाठी जी शेकडो वर्षे खर्च करावी लागली ती कमी लागली असती. शास्त्रज्ञाने सूचना देऊन, विचारास चालना देऊन शेवटच्या काळात अधिक संशोधन झाले असते. पण येशूने तसे केले नाही. येशूने, मानवाच्या चौकस वृत्तीचे समाधान व्हावे असे काही केले नाही, येशूने त्याच्या सर्व शिक्षणाद्वारे मनुष्याचे मन परमेश्वराच्या मनाशी संपर्क येईल असे केले. मानवाने परमेश्वराविषयी जे तत्त्वज्ञान आहे याकडे मानवाचे लक्ष वेधले नाही इतरांनी परमेश्वराचे कार्य वा परमेश्वराचे वचन याबाबत दुसरा मानव काय म्हणतो याकडे पाहू नका, परमेश्वरांचे जे उत्पत्ति कार्य त्याकडे पाहा, परमेश्वराचे वचन पाहा व परमेश्वराची समक्षता जाणून घ्या. COLMar 10.1
ख्रिस्ताने अवातर वा बिनाधार तत्त्वज्ञान याचा उल्लेख केला नाही, तर जेणेकडून मानवाच्या शीलाचे पोषण होईल, जेणेकडून परमेश्वराचे ज्ञान समजणेसाठी मानवाची बुध्दी विशाल होईल व जेणेकरून मानवाने चागली कृत्ये करावी अशी कर्तबगारी त्यांच्या अंगी येईल. ज्या सत्याद्वारे मानवाचे शील त्याच्या जीवनासाठी योग्य व हितकारक होईल व मानवाशी सार्वकालिक जीवन प्राप्त होईल अशा सत्याची येशूने शिकवण दिली. COLMar 10.2
इस्त्रायल लोकांच्या जीवनात परमेश्वराच्या आज्ञा व त्याचे विधी यांचे शिक्षण ख्रिस्ताने दिले. येशू म्हणाला, “आणि त्या तूं आपल्या मुलाबाळांच्या मनावर ठसीव आणि घरी असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता, त्याविषयी बोलत जा. त्या आपल्या हाताला चित्रा दाखल बाध आणि आपल्या दोन्ही डोळयांच्या मधल्या भागी कपाळपट्टी म्हणून लाव. आपल्या दाराच्या बाहयावर व आपल्या फाटकावर त्या लिही”अनुवाद ६:७-९. त्याच्या शिक्षणामध्ये त्याच्या आज्ञाचे कसे पालन करावे हे येशूने दाखवून दिले. नियम व तत्त्वज्ञान यांचे, परमेश्वराचे राज्याचे गौरव व महत्त्व कसे दाखवावे हे येशूने शिकविले. जेव्हा परमेश्वर इस्त्राएल लोकांना त्याचे खास प्रतिनिधी म्हणून प्रशिक्षण देत होता, तेव्हा त्यांना टेकडया व खोरे येथे रहावयास घरे दिली. इस्त्राएल लोकांचे गृहजीवन व धार्मिक सेवाकार्ये यावेळी त्यांचा संबंध निसर्ग व परमेश्वराचे वचन यांच्याशी सतत होता. अशाच प्रकारे ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना सरोवराकाठी, डोंगराच्या पायथ्याशी, शेतामध्ये व वनराईत शिक्षण दिले. यासाठी की येशू निसर्गाद्वारे जे शिक्षण देत होता ते त्याना तेथे पाहावयास मिळत होते. अशा प्रकारे ते ख्रिस्ताविषयी शिकत असता, त्यांना प्राप्त झालेले ज्ञान त्यांनी सहकार्याने ख्रिस्ताच्या कार्यात उपयोगी आणले. COLMar 10.3
अशा प्रकारे उत्पत्ति कार्याद्वारे आपण उत्पन्नकर्ता-परमेश्वर याचा परिचय करून घ्यावा. निसर्ग हे मानवास मोठे शालेय पुस्तक आहे, या पुस्तकाचा पवित्र शास्त्राशी निकट संबंध जोडणे व पवित्र शास्त्राच्या शिकवणीद्वारे जे लोक परमेश्वराच्या कळपापासून बहकले आहेत त्यांना मार्गदर्शन व परमेश्वराचे शील प्रकट करणे. परमेश्वराच्या कार्याचा आपण अभ्यास करीत असता पवित्र आत्मा याच्याद्वारे मनाचा पालट होईल. हा जो पालट होईल तो युक्तिवादाने नव्हे, आपल्या मनाला परमेश्वराचे कार्य दिसून येईल, आपल्या डोळयास उत्पत्ति कार्याची महती दिसेल, कानाला परमेश्वराची वाणी ऐकू येईल व या सृष्टी कार्यातील सखोल अर्थ समजला जाईल, उदात्त व आत्मिक लिखित पवित्र शास्त्राचा अंत:करणावर परिणाम होईल. COLMar 11.1
निसर्गातील हे धडे सरळ व शुध्द आहेत म्हणून यांची किंमत उत्कृष्ट गणली जाते. या निसर्गापासून सर्वानी बोधपर शिक्षण घेतले पाहिजे. या निसर्गाचा विशेष भाग म्हणजे मानवास पापा पासून व जगिक मोहापासून दूर करणे व शुध्दता, शांति व परमेश्वर यांच्या सान्निध्यात नेणे. बहुधा विद्यार्थ्यांची मने मानवाचे तत्त्वज्ञान व तर्कशास्त्र यात गुंतून राहतात व अशा अभ्यासाला विज्ञान व तत्त्वज्ञान अशी पदवी दिली जाते. विद्यार्थ्यांचा निसर्गाशी निकट संबंध आणला पाहिजे. या अभ्यासाद्वारे त्यांना समजून येऊ द्या की उत्पत्ति कार्याचा व ख्रिस्ती धर्माचा एकच परमेश्वर आहे. निसर्ग व आध्यात्मिक यात सुसंगतपणा आहे हे शिक्षण दिले पाहिजे. या दृष्टीकोनातून ते जे काही हाताने कार्य करीतील वा जे काही डोळयाने पाहतील त्याद्वारे त्यांचे शील संवर्धनास मदत झाली पाहिजे. अशा प्रकारे त्यांचा बौध्दिक विकास होईल, त्याचे शील बळकट होईल व त्यांचे संपूर्ण जीवन कर्तबगारीचे होईल. COLMar 11.2
ख्रिस्ताचे दाखले रूपाने शिक्षणाचा हेतू व शब्बाथ याचा हेतू या दोन्हीत साम्य आहे. परमेश्वराने शब्बाथ हा उत्पत्तिस्मारक असा दिला. उत्पत्ति कार्याद्वारा परमेश्वर हा निर्माता आहे हे समजून घ्यावे. शब्बाथ दाखवितो की, उत्पत्ति कार्याचे सौदर्य पाहता त्यांत व त्याहून अधिक परमेश्वराचे गौरव दिसावे. या हेतूस्तव येशूने त्याच्या शिक्षणाचे अमोल धडे व निसर्ग सौंदर्य यांची सांगड घातली. इतर सहा दिवसापेक्षा शब्बाथ या पवित्र दिवशी परमेश्वराने निसर्गात किती संदेश लिहीला आहे याचा अधिक अभ्यास करावा. येशूने जे जे दाखले कोठे कोठे शिकविले तेथे तेथे जाऊन आपण त्यांचा अभ्यास करावा. येशूने हे दाखले शेतांत, हिरवळ वनराईत, उघडया आकाशात, ललकणारे गवत व फुले अशा स्थळी दिले. आम्ही जो जो निसर्गाच्या अंतरी जातो तो तो ख्रिस्त त्याची समक्षता आमच्या सान्निध्य येते व आमच्या अंत:करणास शांति व प्रितीचा संदेश बोलतो. COLMar 11.3
ख्रिस्ताने त्याची शिकवण केवळ शब्बाथ दिवसाशी संघटित केली असे नव्हे, तर आम्ही सहा दिवस श्रम करीतो त्यावेळी ही संदेश दिला जातो. जो नांगर हाकतो व पेरणी करीतो त्यांनाही ख्रिस्त त्याचे ज्ञान देवू करीतो. नांगरणे व पेरणी करणे व कापणी करणे या सर्व उदाहरणाद्वारे ख्रिस्त प्रत्येकाच्या अंत:करणांत कृपेचे कार्य याविषयी स्पष्टीकरण करीतो. अशा प्रकारे प्रत्येक हितकारक कामात व प्रत्येक मानवी संबंधात आम्ही एक विशेष धडा शिकणे अशी येशूची इच्छा आहे. आम्ही अशा प्रकारे दररोज काम करीत गेलो तर आम्ही परमेश्वरास विसरणार नाही, उलट याद्वारे आम्हांस सतत निर्माता व तारणारा ख्रिस्त याची सतत आठवण राहील. परमेश्वराचा विचार हा सोन्याचा धागा आमच्या घराची व धंद्याची काळजी यामध्ये गुफला जाईल. परमेश्वराचे गौरवी तेज सर्व निसर्गावर चमकत राहील. आम्ही अशा प्रकारे स्वर्गीय सत्याचे सतत नवीन धडे शिकत राहू व परमेश्वराच्या तेजात वाढून त्याच्या स्वरूपाचे भागीदार होऊ आणि अशा प्रकारे “तुझी सर्व मुले परमेश्वरापासून शिक्षण पावतील आणि ज्या स्थितीत ज्याला पाचारण झाले त्या स्थितीत तो देवाजवळ (परमेश्वर) राहो‘‘ यशया ५४:१३, १ करिंथ ७:२४. COLMar 12.1