त्या आळशी दासाविषयी केलेले विधान, “यास्तव हे हजार रूपये याजपासून घ्या, आणि ज्याच्याजवळ दहा हजार आहेत त्याला द्या’ (मत्तय २५:२८) विश्वासू कामदारास न्यायनिवाडयाच्या शेवटी वेतन मिळाले एवढेच नव्हे तर या जीवनात क्रमवार प्रायश्चित्त होत जाईल. ज्याप्रमाणे नैसर्गिक जीवनात घडते तद्वत आध्यात्मिक जीवनात घडते; ज्या शक्तिचा वा सामर्थ्याचा आपण उपयोग करीत नाही ती व ते कमकुवत होईल वा कुजून जाईल. सक्रियता हा जीवनाचा नियम आहे. आळस म्हणजे मरण आहे... ‘आत्म्याचे प्रकटीकरण एकेकाला उपयोग होण्यासाठी मिळते.”१ करिंथ १२:७ इतरांना आशिर्वाद देणे त्यामुळे त्यांच्या देणगीची वृध्दी होते. उलट त्यांचा उपयोग जर स्वत:साठी केला तर त्या देणग्या कमी होत जातात वा नाहीशा होतात किंवा अखेर त्या देणग्या काढून घेतल्या जातात. ज्याला देणगी दिली आहे आणि तिचा उपयोग इतरांना देणे यासाठी केला जात नाही तर त्याच्याजवळ अखेर काहीच राहणार नाही. तो मनुष्य अशा गोष्टीला सहमती देत आहे की त्याच्या संस्था कमी कमी होत जातील व शेवटी त्याच्या जीवाचा नाश करतील. COLMar 279.1
आपण स्वार्थीपणाचे जीवन जगणे व आपल्यासाठी सर्व काही कार्य करणे आणि त्यानंतर प्रभुच्या राज्यातील सुखाचा उपभोग घेणेसाठी जाणे असा विचार कोणीही करू नये. नि:स्वार्थीपणाची प्रिती त्या आनंदात ते भाग घेऊ शकले नाहीत म्हणून ते स्वर्गीय राज्यात प्रवेश यासाठी लायक नाहीत. स्वर्गात प्रितीचे वातावरण प्रसारीत असलेले त्यांना आवडत नव्हते. तेथील देवदूतांचे संगीत व वाद्यसंगीत यात त्यांना आनंद नव्हता. प्रकाशांचे शास्त्र हे त्यांच्या मनाला एक कोडे वाटणार. COLMar 279.2
न्यायाच्या महान दिवशी ज्यांनी ख्रिस्तासाठी काम केले नाही, जे असे कामात रेंगाळत राहिले, कोणतीही जबाबदारी घेतली नाही, स्वतः पुरताच विचार करीत राहिले, स्वत:चेच सुख पाहिले, या सर्वांना पृथ्वीचा न्यायाधीश दुष्ट लोकाबरोबर उभा करील व दुष्टांप्रमाणे त्यांनाही शिक्षा देईल. COLMar 279.3
पुष्कळजण ख्रिस्ती म्हणवितात पण परमेश्वर काय सांगतो त्याकडे दुर्लक्ष करतात आणि असे असून ते काही चुक वा पाप करीत नाहीत असे त्यांना वाटते. त्या लोकांना माहित आहे की, ईश्वरनिंदक, खनी, व्याभिचारी यांना शिक्षा ही ठरलेली आहे; पण त्यांच्यामते त्यांना धर्मसभांची सेवा आवडते. सुवार्ता संदेश ऐकणे यात त्यांना गोडी आहे, आणि यामुळे ते स्वत:ला ख्रिस्ती समजतात. जरी त्यांनी त्यांचे सारे आयुष्य स्वत:ची काळजी घेणे यासाठी खर्च केले, पण त्या अविश्वासू दासाला जे सांगितले ते ऐकून वरील ख्रिस्ती म्हणविणारे लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसेल. “ते हजार रूपये अर्थात दिलेली देणगी याजपासून घ्या”(मत्तय २५:२८) यहुदी लोकांप्रमाणे त्यांनीही त्यांना दिलेला आशीर्वाद याचा उपयोग केवळ त्यांच्या स्वत:साठीच केला व स्वत:च सुखी झाले. COLMar 279.4
पूष्कळजण स्वत:ला ख्रिस्ती कार्यातील कामात प्रयत्न करणे यापासून स्वत: निमित्त सांगत असतात. पण परमेश्वराने त्यांना असे कमी कर्तबगार केले काय ? कधीही नाही! ही कार्यक्षमता त्यांच्या आळशीपणामुळे व त्यांनी कार्य करणे बंद केले व त्यांनी अशी निवड केली म्हणून असे झाले. या त्यांच्या वर्तनाचा काय परिणाम हे त्यांना समजून ‘ते हजार रूपये अर्थात् ती देणगी याजपासून घ्या’ या प्रकारे ते असे करीत गेले त्यामळे पवित्र आत्म्याला ते खिन्न करीत गेले आणि पवित्र आत्मा हाच केवळ त्यांच्या जीवनात मार्गदर्शक व प्रकाश आहे. दुसरे भयानक वाक्य-शिक्षाः ‘हया निरूपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका.‘‘ (मत्तय २५:३०) स्वर्गाने असा शिक्कामोर्तब केला आणि ही निवड त्यांनी स्वत: सर्वकाळासाठी केली. COLMar 280.1