येशूने उत्तर दिले, एक मनुष्य यरूशलेमाहून खाली यरीहोस जात असता लुटारूंच्या हाती सापडला, त्यांनी त्यांची वस्त्रे काढून घेवून त्याला ठोकही दिला, आणि अर्धमेला टाकून ते निघून गेले. मग एक याजक त्याच वाटेने सहज खाली जात होता; तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. तसाच एक लेवीही त्या ठिकाणी येवून त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. मग एक शोमरोनी त्या वाटेने चालला असता, तो होता तेथे आला, आणि त्याला पाहून त्यास त्याचा कळवळा आला; त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमास तेल व द्राक्षारस लावून त्या बाधिल्या, आणि त्याला आपल्या पाठाळावर बसवून उतार शाळेत आणिले, व त्याचा संभाळ केला. दुसऱ्या दिवशी निघते वेळेस त्याने दोन पावल्या काढून उतार शाळेच्या रक्षकाला देवून म्हटले, याचा संभाळ कर; आणि यापेक्षा जे काही अधिक खर्चशील ते मी माघारे आल्यावर तुला देईन. तर लुटारूच्या हाती सापडलेल्या इसमाचा शेजारी या तिघांतून तुझ्या मते कोण झाला ? तो म्हणाला, त्याजवर दया करणारा तो. येशूने त्याला म्हटले, तू जावून तसेच कर”लूक १०:२५-३७. COLMar 290.2
यहुदी लोकांतील प्रश्न “माझा शेजारी कोण आहे?‘‘ यामुळे सतत वाद चालत होता. शमरोनी व विदेशी यांच्या बाबत त्यांच्या मनात काहीच संशय नव्हता. कारण हे लोक त्यांना शत्रू व परकीय असे वाटत होते. आता त्यांच्या राष्ट्रांचे लोक व त्यांच्या समाजातील वेगवेगळया वर्गाचे वा जमातीच्या लोकांतील फरक वा विशेष भाग ही रेषा कोठे ओढावयाची? त्या याजकांनी, शास्त्री, वडील यांनी त्यांचा शेजारी कोण हयांना कसे वागवावयाचे होते? कारण ते स्वतः शुध्द करणे या विधींच्या चक्रांत गुरफटले होते. जो अज्ञानी व निष्काळजी समाज आहे. त्यांच्याशी सम्पर्क येणे म्हणजे त्यांच्यामुळे स्वत: अशुध्द होणे आणि शुध्दतेसाठी अविश्रांत श्रम करावे लागतील. म्हणून का त्यांनी शेजाऱ्याला अशुध्द असे समजावे काय ? COLMar 291.1
चांगला शमरोनी यांत ख्रिस्ताने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. ख्रिस्ताने दाखविले की आपला शेजारी म्हणजे तो काय आपल्या मंडळीचा सभासद वा आपल्या विश्वासाचा असावा असे नव्हे. त्यांचा संबंध वर्ग, रंग वा जमात अशा कोणत्याही प्रकारात नाही. आपला शेजारी म्हणजे ज्या व्यक्तिला मदतीची गरज आहे तो शत्रुने आपल्या शेजाऱ्याच्या आत्म्याला ठेचले वा जखमी केले तो आहे आपला शेजारी. जो कोणी परमेश्वराची मालमत्ता आहे तो आपला शेजारी आहे. COLMar 291.2
जो गृहस्थ कायदेपंडीत होता त्याने ख्रिस्ताला विचारलेल्या प्रश्नामुळे चांगला शमरोनी हा दाखला देण्यात आला. तारणारा शिक्षण देत असता, एक ठराविक वकील उभा राहून प्रभुला मोहात पाडून म्हणाला, ‘गुरूजी काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल? हा प्रश्न परूशी यांनी सुचविला होता. वकीलास व त्यांना आशा होती ते ख्रिस्ताला त्याच्या शब्दांत धरतील म्हणून त्याचे उत्तर लक्षपूर्वक ऐकत होते. पण तारणारा येशूने कोणताच वादविवाद केला नाही तर ज्याने प्रश्न केला त्यांजकडून येशूने उत्तर काढून घेतले. येशूने विचारले, “नियमशास्त्रांत काय लिहिले आहे’ तू काय वाचतोस ? येशू सिनाय पर्वतावरील नियमशास्त्र हलके समजतो म्हणून यहुद्यांनी येशूवर आरोप केले, पण येशूने तारणाचा प्रश्न म्हणजे परमेश्वराच्या आज्ञा पाळणे या मुद्यांकडे वळविला. COLMar 291.3
तो वरील (वकील) म्हणाला, ‘तू आपला देव परमेश्वर याजवर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तिने व पूर्ण बुध्दीने प्रिती कर‘‘ आणि ‘जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रिती कर’ ख्रिस्त म्हणाला, ठिक उत्तर दिलेस, हेच कर’ म्हणजे वाचंशील‘‘ लूक १०:२७,२८. COLMar 291.4
शास्त्री याला परूशी लोकांचा हुद्दा व कार्ये ही समाधानी वाटत नव्हती. शास्त्रलेखाचा खरा अर्थ काय म्हणून तो अर्थपूर्वक अभ्यास करीत होता. त्या गोष्टींत त्याला गोडी होती म्हणून त्याने प्रामाणिकपणे प्रश्न विचारला, “मी काय करावे?‘‘ नियमासाठी जे करावयाचे ते म्हणजे, सार्वजनिक सर्व विधी व धार्मिक नियम केले होते. त्याबाबत त्याला काही आदर नव्हता पण ज्या दोन महान तत्त्वांवर सर्व नियमशास्त्र व संदेष्टशास्त्र अवलंबून होते ते त्याने सांगितले. येशूने त्याच्या उत्तराची ख्याती केली म्हणून तो शास्त्री यांच्या बरोबरीला सोईस्कर असा उभा राहिला. जो नियमकर्ता त्याने त्याला जी पदवी वा शाबासकी दिली त्याबाबत ते काही दोष देऊ शकले नाहीत. COLMar 292.1
ख्रिस्त म्हणाला, “हेच कर, म्हणजे ‘वांचशील’ येशूने नियम-शास्त्राचे शिक्षण देतांना शिकविले की सर्व नियमांचे पालन करणे, यात परमेश्वराचे सामर्थ्य व ऐक्य आहे, एक आज्ञा पाळणे व दुसरी मोडणे यांत सामर्थ्य व ऐक्य नाही, कारण प्रत्येक आज्ञेत एक तत्त्व आहे. मानवाच्या जीवनाचा शेवट वा निर्णय संपूर्ण नियमशास्त्र पाळणे यावर अवलंबून आहे. COLMar 292.2
ख्रिस्ताला माहित होते की कोणीही स्वत:च्या शक्तिने नियमशास्त्र पाळू शकत नाही. त्या शास्त्री इसमाला अधिक स्पष्टपणे सत्य सापडावे म्हणून ख्रिस्त त्याला मार्गदर्शन करीत होता. केवळ ख्रिस्ताची कृपा व सद्गुण प्राप्ती याद्वारे तो नियमशास्त्र पाळू शकत होता. पतित मानवाच्या पापासाठी जे प्रायश्चित केले त्यावर विश्वास ठेवणे व परमेश्वर पूर्ण अंत:करणाने प्रिती करणे व स्वत:वर जशी प्रिती तशीच शेजाऱ्यावर प्रिती करणे. COLMar 292.3
त्या शास्त्रीला चांगले माहित होते की त्याने पहिल्या चार आज्ञाचे पालन केले नाही व दुसऱ्या सहा आज्ञांचेही पालन केले नाही. ख्रिस्ताचे शोधक शब्द त्याद्वारे त्याचा पालट झाला होता खरा पण पाप कबुली करणे ऐवजी तो निमित्त सांगण्याचा प्रयत्न करू लागला. सत्य कबुल करणे ऐवजी आज्ञापालन करणे किती अवघड आहे हे तो सांगणेचा प्रयत्न करीत होता. अशा प्रकारे तो त्याचा पालट टाळणेचा प्रयत्न करणे व लोकांच्या दृष्टीने तो किती समर्थनीय आहे हे ही दाखवित होता. येशूच्या शब्दावरून दिसून येत होते की त्याचे प्रश्न किती व्यर्थ होते, कारण त्या प्रश्नांची उत्तरे तो स्वत:च देत होता. तरीपण त्याने आणखी एक प्रश्न विचारला, “माझा शेजारी कोण आहे ?” COLMar 292.4
ख्रिस्ताने त्या लोकांशी पुनः वादविवाद करणे नाकारले. त्यांच्या प्रश्नाचे उत्तर येशूने त्याच्या स्मरणातील एका घटनेने दिले व ती घटना लोकांना माहित होती. तो म्हणाला, “एक मनुष्य यरूशलेमेहन खाली यरीहोस जात असता लुटारूंच्या हाती सापडला, त्यांनी त्याची वस्त्रे काढून घेऊन त्याला ठोकही दिला, आणि अर्धमेला टाकून ते निघून गेले.’ लूक १०:३०. COLMar 293.1
यरूशलेम ते यरीहोकडे प्रवास करीत असता लोकांना यहुदीयाच्या जंगलातून व अरण्यातून जावे लागत असे. रस्ता डोंगराच्या दऱ्या व खिंडीतून होता व त्या रस्त्यावर चोर, लुटमार करीत असत. त्याच रस्त्यावर त्या प्रवासी माणसाला धरले, मारले व त्यांचे सर्व काही लुबाडून घेतले व त्याला मृत्तावस्थेत टाकून ते निघून गेले. तो गृहस्थ घायाळ होवून पडला असतांना याजक त्या रस्त्याने आला ; त्यांनी त्या मनुष्याला भयानक स्थितीत पाहिले, तो त्याच्या रक्तात पडला होता, आणि याजकाने त्या इसमाला मदत न करीता निघून गेले, उलट ते “रस्त्याच्या दुसऱ्या कडेने निघून गेले‘‘ त्यानंतर लेवी मनुष्य आला. त्यांनी पाहिले त्या इसमाला काय झाले, व त्याच्या दुःखद परिस्थितीकडे पाहिले. लेवीला समजले की काय केले पाहिजे पण त्यांत ते भाग घ्यावयास तयार झाले नाहीत. आपण या रस्त्याने आलो नसतो तर बरे झाले असते म्हणजे असला प्रकार पाहावयास मिळाला नसता, त्या मनुष्यांचे दु:खही पाहिले नसते. बरे असो आपला त्याचा काय संबध असे म्हणून लेवी ही रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघून गेला.” COLMar 293.2
पण शोमरोनी, त्या रस्त्याने प्रवास करीत आला व त्याला तो दुःखित माणूस दिसला, आणि इतरांनी जे कार्य करणे नाकारले ते कार्य वा मदत तो शीमरोनी करूं लागला. त्या मनुष्याच्या जखमांना तो हळूवार व प्रेमळपणे औषधोपचार करू लागला “त्याला पाहून त्यांस त्याचा कळवळा आला’ त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमास तेल व द्राक्षरस लावून त्या बांधिल्या, आणि त्याला आपल्या पाठाळावर बसवून उतार शाळेत आणिले, व त्याचा संभाळ केला. दुसऱ्या दिवशी निघतेवेळेस त्याने दोन पावल्या काढून उतारशाळेच्या रक्षकाला देवून म्हटले, याचा संभाळ कर ; आणि यापेक्षा जे काही अधिक खर्चशील ते मी माघारे आल्यावर तुला देईन‘‘ लूक १०:३३३५. याजक व लेवी यांनी प्रीतीचा आव आणला पण शमरोनीचा पालट झाला होता हे दाखवून दिले. याजकाचे व लेव्याचे काम करण्याची त्याची लायकी नव्हती तरी आत्म्याने व कार्याद्वारे तो देवाच्या समागमात होता हे त्याने दाखविले. COLMar 293.3
ख्रिस्ताने नियमांतील तत्त्वाचा मुद्दा, जोरदारपणे, प्रत्यक्ष धडा या याद्वारे दिला आणि ते जे ऐकणारे होते त्यांनी ज्या कार्याची हेळसांड केली ते त्यांना दाखवून दिले. येशूचे शब्द त्या श्रोत्यांना खास शब्दांत होते; मोजके व योग्य शब्द होते म्हणून त्याच्या भाषणांत त्या लोकांना एकादी साधी चुक काढता येईना. शास्त्रीला तर येशूच्या भाषणांत काहीच वावगे दिसत नव्हते. ख्रिस्ताविषयी जी पूर्वतेढ होती ती नाहीशी झाली. पण शोमरोनी लोकांविषयी जी राष्ट्रीय नावड होती त्यावर शास्त्री विजय मिळवू शकला नाही. जेव्हा ख्रिस्त म्हणाला, “तर लुटारूंच्या हाती सापडलेल्या इसमाचा शेजारी या तिघांतून तुझ्या मते कोण झाला ? शास्त्रीने शोमरोनी हे नाव न घेता तो म्हणाला, “त्याजवर दया करणारा तो.‘‘ COLMar 293.4
त्यानंतर येशूने त्याला म्हटले, “तू जाऊन तसेच कर‘‘ लूक १०:३७ जे कोणी गरजु असतील त्यांना जावून तू कनवाळपणाने मदत करावी. अशा प्रकारे तुम्ही असे दाखवून द्याल की तुम्हीही संपूर्ण नियमशास्त्रांचे पालन करीत आहोत. COLMar 294.1
यहुदी व शोमरोनी यांच्यामध्ये मोठा भेदभाव म्हणजे धार्मिक विश्वासाबाबत होता. खरी उपासना म्हणजे काय हा प्रश्न होता. परूशी हे, शोमरोनी लोकांविषयी चांगले काही बोलत नव्हते पण त्यांच्यावर कटु शापाचे उच्चार करीत असत. यहदी व शोमरोनी यांच्यात इतके हाडवैर होते की, ख्रिस्ताने त्या शोमरोनी स्त्रीला पाणी पिण्यास मागितले ही नवलाची गोष्ट होती. ती म्हणाली, “आपण यहुदी असता मजसारख्या शोमरोनी स्त्रीजवळ प्यावयाला पाणी कसे काय मागता? (कारण यहुदी शोमरोनीबरोबर व्यवहार करीत नसतात.) योहान ४:९. जेंव्हा यहदी ख्रिस्तावर खुनीद्वेषी प्रवृत्ती खवळून येशूला धोंडेमार करूं पाहू लागले, येशूविरूध्द बोलणेसाठी त्यांना शब्द येईनात म्हणून ते म्हणाले, तू शोमरोनी आहेस व तुला भुत लागले आहे हे आम्ही खरे म्हणतो की नाही?’ योहान ८:४८. परमेश्वराने लेवी व याजक यांच्यासाठी जे काम करावयाचे ते त्यांनी करावयाचे टाळले आणि शोमरोनी त्यांचे देशबांधव असताना त्यांचा द्वेष करीत होते व त्यांच्यापासून अलग राहत होते. COLMar 294.2
‘जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रिती कर’ या आज्ञाची पूर्णता शोमरोनी याने केली होती. याद्वारे हे दिसून आले की त्याचा जे कोणी हेवा करीत होते. त्यांच्यापेक्षा हा शोमरोनी धार्मिक होता. आपला जीव धोक्यात घालून त्याने त्या दु:खीत माणसाला त्याच्या भावाप्रमाणे मदत केली. हा शोमरोनी ख्रिस्ताचा प्रतिनिधी झाला. आमचा तारणारा येशू याने जी प्रिती केली त्या प्रितीला मानवाच्या प्रितीची कधीच तुलना करीता येत नाही. जेव्हा आम्हांस जखमा होऊन आम्ही मरण पंथावर होतो तेव्हा ख्रिस्ताने आम्हांवर प्रिती केली. आम्हांस पाहून ख्रिस्त कधीही रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने गेला नाही, व आम्हांस तसेच पडू दिले नाही, आम्हांस तेथेच असाहाय्य व आशाहीन व नाशात पडू दिले नाही. ज्या ख्रिस्तावर स्वर्गीय देवदूतांची प्रिती होती अशा पवित्र, आनंदी, सुखी स्वर्गीयगृहांत ख्रिस्त स्वस्थ राहिला नाही. ख्रिस्ताने आमची ती एकमेव गरज पाहिली नाही, त्याने आपली बाजु घेतली व मानवी जीवनाशी तो समरूप झाला! तो शत्रूचेसुध्दा तारण व्हावे यासाठी मरण पावला. त्याचा जे वध करीत होते त्यांच्यासाठी ख्रिस्ताने प्रार्थना केली. ख्रिस्त स्वत:च्या उदाहरणाकडे बोट दाखवून त्याच्या अनुयायास तो म्हणतो, ‘तुम्ही एकमेकांवर प्रिती करावी म्हणून मी तुम्हास ह्या आज्ञा करीतो‘‘ “जशी मी तुम्हांवर प्रिती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रिती करावी‘‘ योहान १५:१७, १३:३४. COLMar 294.3
याजक व लेवी यांनी मंदिरात सेवा करावी म्हणून स्वत: परमेश्वराने त्यांची नेमणूक केली होती. त्या उपासनेत भाग घेणे म्हणजे सन्माननीय मानले जात होते, याजक व लेवी त्यांना तो सन्मान विशेष वाटत होता म्हणून रस्त्याच्या बाजूला पडलेल्या मनुष्याची सेवा करणे हे त्यांना अपमान असे वाटत होते. पण परमेश्वराने त्यांना संधी दिली होती ती म्हणजे सहबांधवाची सेवा करणे हे त्यांनी नाकारले वा टाळले. COLMar 295.1
सध्याही लोक तशीच चुक करीत आहेत. ते त्यांच्या सेवेचे दोन भाग करीतात. एका वर्गाचे लोक परमेश्वराच्या महान गोष्टीविषयींचे मार्गदर्शन केवळ परमेश्वराच्या आज्ञाद्वारे पाहात असतात; तर दुसऱ्या वर्गाचे लोक एका लहान आज्ञेत पाहतात: “जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रितीकर‘‘ या आज्ञेद्वारे पाहतात, याकडे दुर्लक्ष केले जाते. या कार्याचा भाग मनाची लहर, भावना वा बदल यावर अवलंबून आहे. यामुळे शीलास बंधन येते व ख्रिस्ताच्या धर्माचे प्रतिनिधित्त्व खोटे असे केले जाते. COLMar 295.2
जे पिडीत व अडचणीत लोक आहेत व अशा लोकांची सेवा करणे म्हणजे त्यांच्या मोठेपणास शोभत नाही. ज्या लोकांनी नि:स्वार्थी सेवा करीत असता त्यांची सर्व बाबींत हालअपेष्टा झाली त्या लोकांकडे पुष्कळजण वेगळया दृष्टीने व तिरस्काराने पाहतात. काहीजण दुसरी कारणे देवून गरीबाची मदत करणे याविषयी निष्काळजीपणा करीतात. काही जण त्याच्या विश्वासाप्रमाणे ख्रिस्त सेवेत कार्य करीतात व प्रभुचे कार्य उभारणे हा हेतु धरीतात. असे करीत असतांना त्यांना वाटत असते की ते फार महान कार्य करीत आहेत. असे कार्य करीत असता त्यांना गरजू व त्रस्त लोकांच्या काय गरजा आहेत हे पाहाणेसाठी त्यांना थांबता येत नाही वा वेळ नाही. ते जे महान कार्य करीतात असे जे त्यांना वाटते त्याप्रित्यर्थ ते गरीबांची पिळवणूक करीतात. गरीबांना कठीण परिस्थितीत ठेवतात, त्यांच्या गरजा पुरविणे याविषयी दुर्लक्ष करीतात. हे सर्व करीत असता त्यांना असे वाटत असते की ते ख्रिस्ताच्या महान कार्याची वाढ करीत असतात. COLMar 295.3
कित्येकजण त्याच्या भावास किंवा त्याच्या शेजाऱ्यांस कठीण परिस्थितीत मदत न करीता धडपडू देतील. कारण ते ख्रिस्ती म्हणवितात व त्यांच्या त्या स्वार्थीपणाच्या विश्वासांत ते ख्रिस्ताच्या प्रतिनिधी हे प्रभावीपणे कार्याने दाखवित नाहीत. कारण असे वरपांगी ख्रिस्ती हे ख्रिस्ताचे सहकामदार नाहीत, परमेश्वराच्या प्रितीचा प्रवाह त्यांच्या जीवनात कधी पाहता असा नाही, की तो प्रिती प्रवाह त्याच्या सहसोबत्याना मदत करील. त्यांच्या मुखातून निघणारी परमेश्वराची स्तुती व उपकार स्तुती ही कधीही गाईली नाही, उलट तिला प्रतिबंध केला गेला. परमेश्वराच्या पवित्र नामाची स्तुती ही त्याजपासून हिरावून घेतली गेली. ज्या ख्रिस्ताने त्या आत्म्यासाठी प्राण दिला त्या आत्म्याला ख्रिस्त सुवार्ता मिळाली नाही म्हणजे या तारणाबाबत तो हिरावला गेला, त्या आत्म्यास स्वर्गीय राज्यांत आणावे. अशी ख्रिस्ताची आतुरता त्या आत्म्यास हे ख्रिस्त आमंत्रण मिळू नये ही एक प्रकारची फसवेगिरी दगाबाजी नव्हे काय ? कारण त्या आत्म्याला ख्रिस्ताचे स्वर्गीय राज्यांत प्रवेश हे आमंत्रण दिले असते तर तो आत्मा सदासर्वकाळ स्वर्गात राह शकला असता. COLMar 296.1
आमच्या जीवनाचा पगडा याशिवाय परमेश्वराचे सत्य थोडासा पगडा पाडते परंतु आमच्या जीवनातील सत्याचा अनुभव यामुळे सत्याचा पगडा प्रभावी पडतो. केवळ धर्माचा प्रभाव जादा भासतो पण त्यात वजनदारपणा वा दर्जा नसतो. आम्ही ख्रिस्तांचे अनुयायी आहो असे हक्काने सांगू, परमेश्वराच्या वचनावर आमचा विश्वास आहे हे ही हक्काने सांगू; पण यामुळे आपल्या शेजाऱ्याला काही फायदा होणार नाही, तर या सर्वांचा आपल्या दररोजच्या जीवनांत किती उपयोग करीतो यावरून दिसून येईल. आमचा व्यवसाय श्रेष्ठ असेल पण त्यामुळे आमचे वा आमचा शेजारी यांचे तारण होणार नाही; तर त्यासाठी आम्ही ख्रिस्ती जीवन जगले पाहिजे. आमच्या सर्वश्रेष्ठ व्यवसायापेक्षा जेव्हा आम्ही चांगले व खरे जीवन जगत राहू त्याचा चांगला उपयोग होईल. COLMar 296.2
कोणत्याही स्वार्थीपणाने ख्रिस्ताच्या कार्याची सेवा करीता येत नाही. दरिद्री व पिडीताची सेवा करणे याच कारणास्तव प्रभुच्या कार्याचे प्रमुख कारण आहे. जे ख्रिस्ताचे अनुयायी आहेत त्यांच्या सेवेत ख्रिस्तासाठी प्रिती व सहानुभूतीने सेवा करणे अशी कळकळ अंत:करणात पाहिजे. ख्रिस्ताने आत्म्यांचे तारण व्हावे म्हणून स्वप्राण देवून मोल दर्शविले. त्या आत्म्यासाठी आमच्या ठायी सखोल प्रिती असली पाहिजे. कारण हे आत्मे इतर कोणत्याही अर्पणाहन अधिक मौल्यवान असे आहेत. जे गरजु लोक आहेत व जे अनोळखी ज्यांचा हक्क आहे अशा लाकांकडे दुर्लक्ष करून, बाहयतः महान कार्य म्हणून त्याकडे जाणे हया सेवेला प्रभुची मान्यता मिळणार नाही. COLMar 296.3
पवित्र आत्म्याद्वारे मानवी जीवनांत ख्रिस्ताच्या शीलाचे कलम लावणे हे पवित्रीकरण होय. सुवार्ता धर्म म्हणजे मानवी जीवनांत ख्रिस्त हा जीवंत, कार्यकारी व धार्मिक तत्त्वानुसार दिसला पाहिजे. ख्रिस्ताची कृपा मानवी स्वभावातून दिसणारी चांगली कृत्त्ये होय. सुवार्तेची धर्मतत्त्वे ही मानवी जीवनातील व्यवहारातून कधीही वेगळी वा अलग केली जात नाहीत. प्रत्येक ख्रिस्ती जीवनाच्या अनुभवात व कार्यात ख्रिस्ताच्या जीवनाचे प्रतिनिधीत्त्व दिसले पाहिजे. COLMar 297.1
देवभिरूपणाचा पाया प्रिती आहे. तुमचा व्यवसाय कोणत्याही असो तुमच्याठायी तुमच्या बंधुसाठी नि:स्वार्थी प्रिती नाही तर तुमच्या ठायी परमेश्वराप्रित्यर्थ शुध्द प्रिती नाही. आम्ही इतरावर प्रिती करणे या प्रयत्नाने आम्हास ही प्रिती प्राप्त होणार नाही. तर आमची गरज म्हणजे आमच्या ठायी ख्रिस्ताची प्रिती असणे. जेव्हा आमचा ‘स्व’ ख्रिस्तांत सामील होईल तेव्हा प्रितीचा झरा स्वयंप्रेरीत होईल. जेव्हा आमची प्रवृत्ती इतरांना मदत करणे व आशिर्वाद देणे अशी राहील तेव्हा आमचे ख्रिस्ती शील पूर्णतेस पोहचत जाईल. जेव्हा आमच्या ठायी स्वर्गीय सूर्यप्रकाश भरून जाईल आणि त्याची छटा आमच्या मुखप्रकाशात दिसली जाईल. COLMar 297.2
ज्या अंत:करणात ख्रिस्त राहातो तेथे प्रितीची उणीव भासणे ही अशक्य गोष्ट आहे. परमेश्वराने आम्हांवर प्रथमतः प्रिती केली म्हणून आम्ही परमेश्वरावर प्रिती करू, ख्रिस्ताने ज्या सर्व मानवासाठी प्राण दिला त्या सर्वावर आपण प्रिती करू. आपला मानवाशी सहवास आला तरच आपला परमेश्वराशी सहवास येतो; कारण जो प्रभु विश्वाच्या सिंहासनावर राज्यारूढ झाला आहे तो मानव व देव असा आहे. आपला ख्रिस्ताशी व मानवाशी संपर्क प्रितीरूपी सुवर्ण साखळीने जोडला गेला आहे. त्यामुळे ख्रिस्ताची दया व प्रिती ही आम्हामध्ये दिसून येईल. दुर्दैवी व गरजू लोकांनी आम्हाकडे यावे अशी आम्ही वाट पाहात राहणार नाही. आम्ही इतरांचे दु:ख व त्रास पाहाणे व नंतर मदत करणे यासाठी थांबणार नाही. ख्रिस्त जसा गरजू व पिडीतांना मदत करीत होता त्यांचे चांगले व्हावे हे कार्य करीत होता तद्वत आपण सहजपणे त्यांना मदत करीत जाऊ. COLMar 297.3
जेथे कोठे प्रिती व सहानुभूति कार्य करीते; जेथे कोठे मानवी हदय इतराना आशिर्वाद देणे व उध्दार करणे यासाठी प्रकट केले जाते तेथे परमेश्वराचा पवित्र आत्मा कार्य करीतो हे दिसून येते. ज्या लोकांना परमेश्वराच्या लिखित आज्ञाची कल्पना नाही असे विधर्मी लोक; ज्यांनी ख्रिस्ताचे नांव ऐकले नाही, असे लोक परमेश्वराच्या सेवकाशी प्रेमळपणे वागतात; त्यांच्या जीवाची पर्वा न करीता त्यांचे संरक्षण करीतात. त्यांच्या या कृतीमुळे परमेश्वराचे सामर्थ्य दिसून येते. त्यांच्या स्वभावाविरूध्द पवित्र आत्म्याने त्याना ख्रिस्त कृपा दिली, त्यांचा मुळचा क्रूर स्वभाव त्याऐवजी त्यांना शिक्षण नसताना ते परमेश्वराच्या सेवकांचे संरक्षक करीतात. ‘जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करीतो तो जगात येणार होता’ (योहान १:९) तो प्रकाश त्या लोकांत प्रकाशित होतो; आणि त्या प्रकाशाकडे जर त्यानी लक्ष दिले तर त्या लोकांना स्वर्गीय राज्याचा मार्ग दाखवून तिकडे नेले जाईल. COLMar 297.4
“ज्या देवाने जग व त्यांतले अवघे केले तो आणि एकापासून मनुष्यांनी सर्व राष्ट्र उत्पन्न करून त्यांनी सगळया भूपृष्ठावर राहावे असे त्याने केले... अशासाठी की त्यांनी देवाचा शोध करावा, म्हणजे चाचपडत, चाचपडत त्याला कसे तरी मिळवून घ्यावे. तो आपल्यातल्या कोणापासूनही दूर नाही”प्रे.कृ १७:२४-२७ .... मी पाहिले तो सर्व राष्ट्र, वंश, लोक व भाषा यापैकी कोणाच्याने मोजवला नाही असा, शुभ्र झगे परिधान केलेला व हाती झावळया असलेला, मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकऱ्यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला’ प्रकटी ७:९. COLMar 298.1
जे पतन पावलेले व त्रस्त झालेले त्यांचे समाधान करणे व त्यांचा उध्दार करणे यांत स्वर्गाचे गौरव आहे. ज्या ज्या मानवांच्या ठायी ख्रिस्त असेल, ते ते लोक ख्रिस्ताला प्रदर्शित करीतील. जे लोक जेथे कोठे कार्य करीतील तेथे ख्रिस्ताचा धर्म आशिर्वाद देईल. जेथे कोठे तो धर्म कार्य करील तेथे तो प्रकाशित होईल. COLMar 298.2
परमेश्वर त्याच्या कार्यात राष्ट्र, वंश व जमात ही पाहात नाही वा त्याला महत्त्व देत नाही. परमेश्वर सर्व मानवांचा निर्माणकर्ता आहे. परमेश्वराने मानवास निर्माण केले म्हणून मानव एका कुटुंबातील आहेत आणि तारणाद्वारे सर्वजण एकच आहेत. मानवाच्या ज्या ज्या आडभिती आहेत त्या सर्व पाडणे यासाठी ख्रिस्त आला; सर्वासाठी हे मंदिर उघड असे केले गेले; यासाठी की प्रत्येकास सरळ व मोकळेपणाने परमेश्वराशी संपर्क साधता येईल. परमेश्वराची प्रिती ही एवढी प्रकट, इतकी खोल,इतकी पूर्ण की ती सर्वत्र पोहचू शकते. ज्या पापी मनुष्याला सैतानाने त्याच्या मोहांच्या जाळयात गुरफटले असेल ते मोहाचे जाळे परमेश्वर उचलून पापी मनुष्याची सुटका करीतो आणि त्याला परमेश्वराच्या सिंहासनाजवळ नजीक नेतो, आणि त्याला आशिर्वादीत अभिवचनाचा इंद्रधनुष्य दाखवितो. COLMar 298.3
ख्रिस्तांत कोणी यहुदी नाही किंवा ग्रीक नाही, कोणी गुलाम वा स्वतंत्र असणे भेद नाही (गलती ३:२८) येशूमध्ये ख्रिस्ताच्या रक्ताने जवळ झाला आहा. (इफिस २:१३). COLMar 298.4
आमचे धार्मिक विश्वास वेगवेगळे असले आणि पिडीत, गरजु मानवांची हाक आली तर आपण त्यांच्या मदतीला जाऊन साहाय्य करावे. धार्मिक फरक आहेत म्हणून आपल्यात कटु भावना आहेत. तरी अशा परिस्थितीत आपण जर वैयक्तिक सेवा केली तर हे कटु विचार जावून सद्भावाने येतील. प्रेमळ सेवा केली म्हणजे मनातील पूर्व दराग्रह नाहीसे होतील आणि ते आत्मे परमेश्वरासाठी जिंकले जातील. COLMar 298.5
जीवनात दु:ख, अडचणी व त्रास येतील हे आपण गृहीत धरले पाहिजे. आम्ही श्रीमंत व गरीब यांच्या जीवनांतील सुखदुःखाचे सहभागी झाले पाहिजे. ख्रिस्त म्हणतो, “तुम्हांस फुकट मिळाले आहे, फुकट द्या‘‘ मत्तय १०:८. आम्हा सभोवार गरीब, जीवनात कष्टी लोक आहेत अशांना आम्ही उत्तेजक शब्द व साहाय्यक हातभार लावणे. आमच्या समाजात विधवा आहेत त्यांना सहानुभूती व मदतीची गरज आहे. जी अनाथ बालके आहेत त्यांना ख्रिस्ताचे अनुयायी यांनी परमेश्वरापासून ठेव म्हणून स्वीकार करावा. बहुधा अशा मुलाकडे दुर्लक्ष केले जाते. ती बालके अंगावर चिध्या, आकर्षक दिसणार नाहीत, अडाणी अशा परिस्थितीत असली तरी ती बालकें परमेश्वराची संपत्ति आहेत. परमेश्वराने त्याना मोल देवून विकत घेतले आहे आणि म्हणून ती बालके परमेश्वराच्या दृष्टीने आम्हाएवढी मोलाची आहेत. परमेश्वराच्या महान कुटुंबाचे ती बालकें सभासद आहेत आणि ती ख्रिस्ती आहेत त्यांच्या जीवनाविषयीची जबाबदारी कारभारी यांनी घेणे आहे. परमेश्वर म्हणतो, त्यांच्या जीवात्माचा जबाब मी तुझ्यापासून घेईन. COLMar 299.1
पाप हे सर्व दुष्टतेंत भारी असे आहे, आणि आम्ही त्या पापी मनुष्यावर दया करणे व त्याला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. पण सर्वांना आम्ही एकाच प्रकारे मदत करू शकत नाही. पुष्कळजण असे आहेत की ते त्याचा आत्मा भुकेला असला तरी ते दाखवीत नाहीत. अशा लोकांना प्रेमळ शब्दाने व दयाळूपणाने आठवण ठेवून मदत करणे. दुसरे काही असे आहेत की त्यांना मदतीची गरज आहे. पण ती गरज त्यांची त्यांना भासत नाही. त्यांच्या आत्म्याची किती दुरावस्था झाली ही त्यांना समजून येत नाही. लोकसमुदाय पापांत इतके खोलावर रूतले आहेत की, सार्वकालिक जीवनाची आवश्यकता व खरेपणा यांचा त्यांना विसर पडला आहे, मानव परमेश्वराच्या प्रतिमेचा आहे हे ते हरवून बसले आहेत व त्यांना त्यांच्या आत्म्याचे तारण करावयाचे आहे की नाही त्याचे त्यांना भान राहिले नाही. ते परमेश्वरावर विश्वास ठेवीत नाही व मानवावरही विश्वास ठेवीत नाहीत. अशा लोकांना नि:स्वार्थी प्रेमानेच आपण जिंकू शकतो. प्रथमतः आपण त्यांच्या जीवनांतील शारीरिक गरजांचा पुरवठा करणे. त्यांना खाऊ घालणे, त्याना स्नान घालणे व स्वच्छता शिकविणे व नीटनेटका पोषाख करावयास शिकविणे. तुमची नि:स्वार्थीपणाची सेवा ते जसजशी पाहात जातील; त्यानंतर तारणारा येशूची प्रिती त्यांना समजेल व ते सहजपणे विश्वास ठेवू शकतील. COLMar 299.2
पुष्कळजण असे आहेत की त्यांना त्यांची चूक दिसून येते व ते कसे वेडगळ वागतात याबाबत ते ओशाळतात. ते त्याच्या जीवनातील चुका व अपराध पाहतात व फार निराश होतात. अशा लोकांचा आपण धिक्कार करू शकत नाही. जेव्हा कोणी पाण्याच्या धारेविरूध्द पोहण्याचा प्रयत्न करीतो तेव्हा धारेची शक्ति त्याला मागे लोटत असते. अशावेळी मोठया भावाने साहाय्यक हात पुढे करून त्याला मदत करावी, पेत्राला जसे बुडत असताना वाचविले तसे वाचवावे. नंतर त्याला उत्तेजनाचे शब्द बोला; त्यामुळे त्याला आत्मविश्वास येईल व प्रितीचा उत्साह साहाय्यक होईल. COLMar 300.1
तुझा भाऊ निराश होवून अंत:करणात दु:खी आहे आणि तुम्हाला जशी बंधुप्रेमाची गरज होती तशी त्या बंधुलाही गरज आहे. अशक्त व कमकुवत असताना सहानुभूतीने गरज पुरविणार। अनुभवी मदतीची गरज आहे. आमच्या अशक्तपणात कशी मदत केली गेली. या ज्ञानामुळे गरजू भावाच्या कठीण परिस्थितीत आपण कशी मदत करणे हे आपण साहाय्य देऊ शकतो. परमेश्वराने ज्यावेळी आम्हाला गरज असताना साहाय्य केले त्या आम्ही एका दुःखी, पिडीत माणसाची मदतीची हाक ऐकून न ऐकलेसे करून त्याला कधीच ओलांडून जाऊ नये. COLMar 300.2
आमचा ख्रिस्ताशी संपर्क, जीवंत तारणारा येशू याजशी व वैयक्तिक सहवास, त्यामुळे आमचे मन, अंत:करण व आत्मा यांचा हलक्या स्वभावावर विजय प्राप्त होतो. जो भटकणारा गहस्थ त्याला सर्वसामर्थ्याचा हात त्याचा साहाय्यक याचा हात धरावयास सांगणे ; जो अद्वितीय मानवी देहांतील ख्रिस्त तो त्याजवर दया करील. परमेश्वराचे नियम व सामर्थ्य यावर विश्वास ठेवणे एवढे पुरेसे नाही ; ज्या वस्तूंना दया व मदतीची आरोळी ऐकू येत नाही कारण त्या निर्जीव आहेत. ज्या हाताने आपण हस्तादोलन करीतो तो हात प्रेमळ हवा व अंत:करण कोमल हवे. त्या मनुष्याचे मन व विचार परमेश्वरावर केंद्रित राहाणे, त्याच्या सान्निध्यात राहाणे व जो प्रेमळ परमेश्वर त्याजकडे सतत पाहात राहणे. आमच्या पापामुळे परमेश्वराचे अंत:करण किती कष्टी व दु:खी होते. याचा विचार करा, त्या स्वर्गीय पित्याचे हात पसरलेले व तो पिता सतत म्हणतो, “तथापि त्यांना जर माझ्याकडून संरक्षण हवे असेल तर त्यांनी माझ्याशी समेट करावा; होय त्यानी माझ्याशी समेट करायलाच हवा’ यशया २७:५. COLMar 300.3
तुम्ही या कामात भाग घेत असता. तुमच्या बरोबर काम करणारे अदृश्य सहकारी आहेत. शोमरोनी त्या जखमी माणसाला मदत करीत असताना स्वर्गीय देवदूत तेथे मदतीला होते. आपल्या सहबांधवाची सेवा करीत असताना ; जे कोणी परमेश्वराची सेवा करीत असतील त्याच्या सभोवार स्वर्गीय न्यायालयातील देवदूत उभे राहतील आणि तुम्हाला स्वत: ख्रिस्ताचे तुम्हास साहाय्य राहील. तो सर्व काहीची भरपाई करील आणि तुम्ही ख्रिस्ताच्या देखरेखीखाली काम करीत असताना तुम्ही महान कार्य कराल. COLMar 300.4
तुम्ही असे विश्वासूपणे कार्य केले म्हणजे त्याद्वारे इतरांचे हित होईल पण तुमचे सदासर्वकाळचे भवितव्यहि ठरले जाईल. जे कोणी ख्रिस्ताचा सोबती होतील त्या सर्वांचा उध्दार होईल, ख्रिस्त जसा पित्याशी एक आहे तसेच आपण ख्रिस्ताशी एक व्हावे. आमचा इतरांच्या दुःख, पीडा व त्रास याबरोबर संपर्क व्हावा म्हणजे आम्हास आमच्या स्वार्थी जीवनांतून बाहेर पडावे असे पाचारण ख्रिस्त आम्हास करू शकतो. याद्वारे आम्हांमध्ये ख्रिस्ताच्या गुणांची वृध्दी व्हावी; कृपाळू, दयाळू व प्रिती अशी तो अपेक्षा करीतो. आम्ही या कामाचा स्वीकार करीतो म्हणजे आम्ही त्याच्या सेवेचा स्वीकार करून त्याच्या शाळेत प्रवेश करीतो; आणि याद्वारे आम्ही परमेश्वराच्या स्वर्गीय राज्यात प्रवेश करीतो. आम्ही अशा गोष्टीचा नकार करीतो म्हणजे त्याच्या शिक्षणाचा नकार करीतो, आणि ख्रिस्ताच्या समक्षतेतून सदासर्वकाळ विभक्त होणे अशी आपण निवड करीतो. COLMar 301.1
“सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तू माझ्या मार्गाने चालून तुला मी सोपिवलेले सर्व सांभाळिले तर तू माझ्या मंदिरात न्याय करीशील व माझ्या अंगणाचे रक्षण करशील व येथे उभे असणाऱ्यांत तुझे जाणेयेणे होईल असे मी करीन’ (जखऱ्या ३:७). या पृथ्वीवरील कार्यात स्वर्गीय देवदूताबरोबर काम करणे याद्वारे आपण त्या देवदूताबरोबर स्वर्गात राहाणे याची तयारी करीत आहोत. ते सर्व वारशाने तारणप्राप्ती होत असलेल्यासाठी सेवा करावयास पाठविलेले असे परिचारक आत्मे नाहीत काय?”(इब्री १:१४) स्वर्गीय देवदूत कोणाचे स्वागत करतील तर जे लोक या पृथ्वीवर असताना असे जीवन जगले “सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास”(मत्तय २०:२८) या आशिर्वादीत सहभागीपणात आम्हास सार्वकालिक सुखात त्या प्रश्नाचे संपूर्ण उत्तर आहे. तो प्रश्न ‘माझा शेजारी कोण आहे ?” COLMar 301.2