मत्तय १३:३१,३२,मार्क ४:३०-३२, लूक १३:१८,१९ यावर आधारीत
‘त्याने (येशू) त्यांस आणखी एक दाखला दिला की स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे, तो कोणी एका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लाविला, तो सर्व दाण्यामध्ये बारीक आहे, तरी वाढल्यावर भाज्यापेक्षा मोठा होऊन त्योच असे झाड होते की, “आकाशातील पाखरे, येऊन त्याच्या फाद्यांत वस्ती करीतात”मत्तय १३:३१,३२ COLMar 45.1
लोक समुदाय ख्रिस्ताची शिकवण ऐकत असता त्यांच्यामध्ये पुष्कळ परूशी होते. हे जे लोक ख्रिस्ताची शिकवण ऐकत होते त्यांच्यापैकी किती थोडके जण ख्रिस्ताला मासिहा म्हणून मान्य करीत होते. ते स्वतः प्रश्न विचारीत होते की हा शिक्षक म्हणवीत नाही मग हा इस्त्राएलाचा जागतिक उध्दार कसा करणार ? कारण याच्याजवळ धन, सत्ता वा मान्यता नाही मग हा नवीन राज्याची स्थापना कशी काय करणार ? ख्रिस्ताने त्याचे विचार जाणून घेतले व त्यांना उत्तर दिले: परमेश्वराच्या राज्याची तुलना आम्ही कशाबरोबर करावी? किंवा आम्ही त्या राज्याची तुलना कशाबरोबर करावी? स्वर्गीय राज्याची तुलना करावयास या पृथ्वीवर असे काही नाही. ख्रिस्ताबरोबर कोणत्याही सरकारी सोसायटीचे साम्य होऊ शकत नाही. ख्रिस्त म्हणाला, “ते राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो जमिनीत पेरल्यावर, जरी तो पृथ्वीवरील सर्व बीयाहून बारीक आहे. तरी तो उगवून वाढल्यावर सर्व वनस्पतीपेक्षा मोठा होता, त्याला फांद्या फुटतात आणि त्याच्या छायेत आकाशातील पाखरे येवून वस्ती करीतात‘‘. COLMar 45.2
परमेश्वराने बीयांतील अंकात जे जीवन घातले ते तत्त्वानुसार वाढत जाते. ही वाढ कोणत्याही मानवी शक्तिवर अवलंबून राहत नाही. ख्रिस्ताच्या राज्याविषयी असेच आहे. हे राज्य नवीन असे आहे. ख्रिस्ताच्या राज्याची तत्त्वे, जगिक राज्याच्या तत्त्वाहून वेगळी आहेत. पृथ्वीवरील राज्ये मानवी सत्तेवर चालतात, ते त्यांची सत्ता लढाईने चालवितात, पण नवीन राज्याचा अस्थापक शांतीचा अधिपती आहे. या पृथ्वीरील राज्याचे दर्शक हिंस्त्रक प्राणी आहेत. हे पवित्र आत्म्याद्वारे दाखविले गेले, पण “ख्रिस्त हा, पाहा, जगाचे पापहरण करणारा, देवाचा कोंकरा”योहान १:२९. येशू ख्रिस्ताच्या कारभारास कोणताही क्रूर प्रकार वापरून लोकांच्या सद्विवेकावर बळजबरी करणे, असे नाही. जगिक राज्ये ज्या प्रकारे स्थापन होतात त्याचप्रकारे यहदी लोकांना वाटत होते परमेश्वराच्या राज्याची स्थापना व्हावी. धार्मिकतेची स्थापना करणे यासाठी ते बलात्कारी मापन सूत्रे वापरीत होते. ते वेगवेगळया योजना व चालीरिती शोधीत होते. पण ख्रिस्ताने तत्त्वाची स्थापना केली. सत्य व धार्मिकता यांची स्थापना केली. सत्य व धार्मिकता यांची स्थापना केली त्यामुळे चुका व पाप यास प्रतिविरोध केला. COLMar 45.3
येशू हा दाखला सांगत असता, जवळपास मोहरीचे झाड दिसले असावे, सभोवरचे पीकांतून मोहरीचे झाड वाऱ्यामुळे झुलत असावे. त्या झाडाच्या या फांदीवरून त्या फांदीवर पक्षी उडत व गातही असावेत. हे मोहरीचे झाड जरी मोठे आहे तरी त्याचे बी सर्व बीयात बारीक असे आहे. प्रथमत: कोवळे मुळ फुटले, ते भक्कम होते नंतर अंकुर फुटला आणि शेवटी मोठे झाड झाले वा होते. तद्वत ख्रिस्ताचे राज्य हे प्रथमतः अगदी साधे व लीन सुरूवातीचे दिसते. या स्थितीत इतर पृथ्वीवरील राज्यांशी तुलना करू जाता अगदी लहान कार्य दिसते. येशूच्या अनुयायांना हे महान सत्य म्हणजे राज्याची सुवार्ता गाजविणे यात देवाचे सामर्थ्य दिले आहे. या राज्याची वाढ किती झपाटयाने झाली, त्याचा पगडा हा किती अफाट व सर्वत्र झाला. जेव्हा ख्रिस्ताने हा दाखला सांगितला त्यावेळी थोडेसे गालीली शेतकरी या राज्याचे प्रतिनिधी होते. त्या लोकांचे दारिद्रय, त्यांची अल्पसंख्या ही वारंवार सांगितली जात होती आणि म्हणून असे साधे मासे धरणारे लोक येशूचे अनुयायी यांचे अनुयायी कोणी होत नव्हते. पण या मोहरीच्या बीयापासून झाड वाढून त्याने सर्व जग व्यापून टाकावयाचे होते. या पृथ्वीवरील साम्राज्याने लोकांची मने वैभवी गोष्टी सांगतील पण त्या साम्राज्याचा अंत होताच, ख्रिस्ताचे सार्वभौम राज्य स्थिरावले जाईल, ते राज्य बलिष्ठ व सर्वसमर्थ असे होईल. COLMar 46.1
कृपेच्या कार्याची सुरूवात अंत:करणात प्रथमत: लहानशी असते. एकादा शब्द बोलला जातो. अंत:करणात एक प्रकाश किरणांची ज्योत दिली जाते. एक प्रभावी पगडा पाडला जातो आणि यामुळे नवीन जीवनाची सुरूवात होते, आणि या सुरूवातीचा पुढे होणारा परिणाम याचे मोजमाप कोण करू शकेल ? COLMar 46.2
मोहरीचा दाणा यात ख्रिस्ताचे राज्य याचा विस्तार एवढेच नव्हे तर प्रत्येक घटनेला कशी कशी वाढ होत गेली याचीही माहिती दिली. कारण परमेश्वराच्या मंडळीस प्रत्येक काळात परमेश्वराचे खास सत्य व खास कार्य करावयाचे आहे. जे सत्य जगातील ज्ञानी व शहाणे यांच्यापासून लपवून जे लेकराप्रमाणे साधे व नम्र अशा लोकांना प्रगट केले आहे. यासाठी त्यांनी स्वार्थत्याग करणे. त्यांनी परिश्रम करून विजय प्राप्त करणे असे कार्य करणारे मध्यस्थ फार थोडे आहेत. अशा लोकांना जागतिक मंडळी व जागतिक किर्तीचे लोक विरोध करीतात व त्यांचा धिक्कार करीतात. बातिस्मा करणारा व येशूची घोषणा करणारा हा एकटा विरोधक म्हणून उभा राहून यहुदी लोकांची दांभिकता व गर्व ही दाखवून दिली. जे कोणी युरोपला प्रथमतः सुवार्तिक म्हणून गेले त्यांचे पाहा. पौल व सीला यांचे मिशन कार्य किती अंधुक, किती आशाहीन होते, हे दोन तंबू विणकरी व त्याचे सोबत योबासाहून जहाजाने फिलीप्पै एथे गेले. वृध्द पौल’ हातात बेडया घातलेला व कैसराला ख्रिस्ताची सुवार्ता सांगताना, पाहा. गुलामाची टोळी व शेतकरी याचा धार्मिक लढा रोमी बादशहाशी तो पाहा. दुसरा धर्म सुधारक पाहा -मार्टीन लूथर याचा लढा सर्व जगाची प्रमुख व ज्ञानाचे आगर पाहा तो मार्टीन लूथर परमेश्वराचे वचनाने खंबीरपणे पोप व रोमचा बादशहा यांच्याशी झुंज देत होता व याने जाहीर केले. मी पवित्रशास्त्र या आधारावर खंबीर उभार आहे, मला त्याशिवाय काही करीता येत नाही. परमेश्वर माझे साहाय्य आहे. तो पाहा जॉन वेस्ली. ख्रिस्त व त्याची धार्मिकता हे गाजवीत होता तर इतर लोक शिष्टाचार पालन, भावनाप्रधान व नास्तिकपणा यात गुंग झाले होते. अशा लोकांचे ओझे ज्यांचे मनावर होते. ते लोक पाहा, त्यांना कळकळीने ख्रिस्ताच्या प्रितीचा संदेश लोकांना विनवणी करीत होते. उपदेशकाचा संदेश ऐका. हे तरूणा, खाली बैस. विधर्मी लोकांचा पालट करावा असे जेव्हा परमेश्वरास वाटेल, त्यावेळी परमेश्वर ते कार्य तुमच्या व माझ्याशिवाय करणार आहे.‘‘ COLMar 47.1
या पिढीमध्ये धार्मिक विचाराचे महान पुढारी यांनी ज्या लोकांनी शेकडो वर्षापुर्वी सत्याचे बी पेरले. त्याचे पुतळे उभारले व त्याचे गौरव केले. सध्या या महान कार्यापासून जी वृध्दी व भरभराट होत आहे. अशा कामापासून काही जण माघार घेतात. एवढेच नव्हे तर त्या कार्याची पायमल्ली करीत नाहीत काय ? जुन्या आरोळीची पुर्नरचना केली जाते. देव (परमेश्वर) मोशाबरोबर बोलला आहे हे आम्हांस ठाऊक आहे, हा (ख्रिस्त हा प्रत्येक संदेश वाहकांत असतो) कोठला आहे हे ठाऊक नाही; योहान ९:२९. प्रारंभीच्या काळात, सध्या जे खास सत्य आहे याचा शोध, जे धर्म अधिकारी होते यांना सापडले नाही, तर जे स्त्री पुरूष साधे शिक्षण व ज्ञान याद्वारे ते परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवणारे होते. त्यांच्याद्वारे खास सत्याचा शोध लागला. COLMar 47.2
बंधुजनहो, तुम्हांस झालेले पाचारण पाहा, तुम्हांमध्ये संसारदृष्टया ज्ञानी, समर्थ, कुलीन असे फार नाहीत, तरी ज्ञान्यास लाजवावे म्हणून देवाने (परमेश्वर) जगातील जे मुर्खपणाचे ते निवडिले, आणि बलवानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बल ते निवडीले आणि जगातील जे कुलहीन, धिक्कारलेले व शून्यवत अशांना देवाने याकरीता निवडीले की जे आहे ते त्याने निरर्थक करावे.”(१ करिथ १:२६-२८), “यासाठी की तुमचा विश्वास मानवी ज्ञानाने नव्हे तर देवाच्या (परमेश्वर) सामर्थ्याने असावा.”(१ करिंथ २:५). COLMar 48.1
या शेवटच्या पिढीत हा मोहरीच्या दाणा हा दाखला याचा संदेश एक इशारा व विजयाची पूर्णता म्हणून गाजविला जाईल. त्या लहान बीयापासून मोठे झाड तयार होईल. हा अखेरचा संदेश इशारा व कृपा म्हणून प्रत्येक राष्ट्र, वंश, भाषा व लोक यांस सांगावयास सार्वकालिक सुवार्ता “(प्रकटी १४:६-११), “विदेशी लोकांतून आपल्या नामाकरीता लोक काढून घ्यावे म्हणून देवाने त्यांची भेट कशी घेतली”(प्रे.कृ.१५:१४)”आणि त्याच्या तेजाने पृथ्वी प्रकाशित झाली.‘‘ (प्रकटी १८:१). COLMar 48.2