Go to full page →

कसे लपविले COLMar 65

सुर्वातेचा खजिना लपविला असे सांगितले जाते. जे स्वत:ला शहाणे समजतात, जे निरर्थक तत्त्वज्ञानाने दाभिक झाले आहेत अशा लोकांना सुवार्ता संदेशाचे सामर्थ्य व अद्भूत व तारणाची योजना ही समजू शकत नाहीत. पुष्कळांना डोळे असून दिसत नाही, कान आहेत पण ऐकू येत नाही, त्यांना बुध्दी आहे पण लपविलेली ठेव ओळखता येत नाही. COLMar 65.2

खजिना ठेवलेल्या ठिकानाजवळून मनुष्य जात असेल. झाडाच्या खाली खजिना लपवला आहे याची कल्पना नसता तो झाडाखाली विसावा घेईल. यहुदी लोक असेच होते. सत्याचा सोनेरी खजिना इब्री लोकांच्या हवाली केला होता. यहुदी अर्थव्यवस्थेवर तर स्वर्गीय शिक्का मोर्तबा केला होता व ती स्थापना स्वत: ख्रिस्ताने केली होती. दर्शक व चिन्हे या पडद्याने महान तारणाचे सत्य झाकले गेले होते आणि ही सर्व दर्शके व चिन्हे ख्रिस्ताकडे बोट दाखवित तो ख्रिस्त आला तेव्हा त्या यहदी लोकांनी ख्रिस्ताला ओळखले नाही. परमेश्वराचे लिखाण-वचन त्यांच्या हाती होते पण त्यांच्या एका वंशापासून दुसऱ्या वंशापर्यंत जी परपरेची रूढी चालू होती व शास्त्रलेखाचे स्पष्टीकरण ते स्वत:करीत असत असे असूनही येशू विषयीचे सत्य हे त्यांच्यापासून लपलेले होते. त्या लिखाणाचा पवित्र केंद्रबिंदू हरवला गेला. सर्व ज्ञानाचा खजिना त्यांच्यासाठी खुला केला होता तरीपण त्यांना तो समजला नाही. COLMar 65.3

परमेश्वर त्याचे सत्य मानवापासून लपवून ठेवित नाही. स्वतः मानव त्यांच्या कृतीमुळे ते लपवू पाहतात. ख्रिस्त हाच मसिहा आहे याबाबत यहद्याला कितीतर पुरावे दिले, त्याच्या शिकवणीद्वारे त्यांच्या जीवनात बदल व्हावयाचा होता. यहुद्यांना समजून आले, की जर त्यांनी ख्रिस्ताचा स्विकार केला तर त्याची नितीवचने, वंशपरंपरा, स्वार्थ व विधर्मी चालीरिती सोडणे भाग पडेल. जे सत्य अखंड व सार्वकालिक आहे ‘हे’ स्विकारणे यासाठी मनुष्याचा पालट झाला पाहिजे. या सर्वामुळे ते ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवणे या निर्णयास ते कधीच मान्य झाले नाहीत. जुन्या करारावर त्यांचा विश्वास असा ते आव आणीत असत आणि जुन्या करारात ख्रिस्ताचे चारित्र व स्वभावाची जी साक्ष होती ती ते नाकरीत होते. त्यांचा पालट याबाबत त्यांना भिती वाटत होती कारण त्यामुळे त्यांना त्यांच्या पूर्व पारंपर विचार कदाचित सोडावे लागतील. सुवार्तेचा खजिना मार्ग, सत्य व जीवन ही त्याच्यामध्ये होती पण स्वर्ग त्यांना देणगी देवू पाहात होती ती ते नाकारीत होते. COLMar 65.4

“... अधिकाऱ्यांतून देखील पुष्कळ जणांनी त्याजवर विश्वास ठेविला, परंतु आपण सभाबहिष्कृत होवू नये परूश्यांमुळे त्यांनी हे कबूल केले नाही‘‘ योहान १२:४२. यात असे आपण वाचतो. परूश्यांचा येशूविषयी पालट झाला होता की, येशू देवाचा पुत्र आहे पण त्यांचे जे ध्येय होते त्यानुसार कबुल करणे हे आड येत होते. स्वर्गीय खजिना पाहिजे असा त्यांचा विश्वास नव्हता, कारण ते जगिक खजिना याच्या पाठीस लागले होते. COLMar 66.1

सध्याही मानव पृथ्वीवरील धन-खजिना यांच्या पाठीस लागले आहेत. त्यांची मने स्वार्थी व जगिक ध्येयांनी भरली आहेत. जगातील धन,मान व सत्ता प्राप्त व्हावी यासाठी त्यांनी मानवी विचार, म्हणी, परंपरा व कार्यभाग ही परमेश्वराच्या आज्ञापेक्षा अधिक मान्य केली आहेत. COLMar 66.2

“दैहिक मनुष्य देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्विकारीत नाही, कारण त्या त्याला मुर्खपणाच्या वाटतात, आणि त्याच्याने त्या ओळखत नाहीत, कारण त्याची पारख आत्म्याच्या योगे होते.’ १ करिंथ २:१४. COLMar 66.3

आमची सुवार्ता आच्छादिलेली असल्यास ज्यांचा नाश होत आहे त्यांच्याठायी ती आच्छादिलेली आहे. त्यांच्याविषयी या युगाच्या देवाने विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने आधळी केली आहेत, यासाठी की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यावर प्रकाशू नये‘‘ २ करिथ २:३,४. COLMar 66.4