मत्तय १३:४५,४६ यावर आधारीत
“आणखी स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांचा शोध करणाऱ्या कोणीएका व्यापाराऱ्यासारीखे आहे, त्याला एक अति मौल्यवान मोती आढळल्यावर त्याने जावून आपले सर्वस्व विकले आणि ते विकत घेतले” मत्तय १३:४५-४६. COLMar 74.1
तारणारा येशू याची तारणदायी प्रिती हया आर्शिवादाची तुलना अमोल मोती याबरोबर केली आहे. या धडयाचे स्पष्टीकरणासाठी कोणी व्यापारी मौल्यवान मोती मिळाला म्हणजे तो त्याचे सर्वस्व विकून तो मोती विकत घेतो, हा दाखला सांगितला. तो मौल्यवान मोती स्वत: ख्रिस्त आहे. त्याच्या ठायी पित्याचे सर्व गौरव आहे, त्रैकत्वाचे सर्वस्वी त्याच्याठायी आहे. ख्रिस्ताठायी पित्याचे तेजस्वी गौरव व व्यक्तित्व आहे. परमेश्वराची सुर्वगुण संपन्नता ख्रिस्ताच्या स्वभावात आहे. पवित्र शास्त्राचे प्रत्येक पान त्याच्या (येशूच्या) गौरवाने चमकते. ख्रिस्ताची धार्मिकता तेजस्वी व आकाशातील आहे, ती शुध्द आहे, ती शुभ्र मोती आहे, त्यात कोणताही दोष व डागही नाही. ही परमेश्वराची देणगी यात कोणताही मानव त्याचे कलाकौशल्य यांची भर घालू शकत नाही. ती देणगी दोषविरहीत आहे. आम्हास “ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुध्दीचे सर्व निधी गुप्त आहेत.”कलस्सै २:३ “ख्रिस्त आम्हासाठी “त्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहा, तो देवापासून आपल्याला ज्ञान, नितीमत्व, पवित्रीकरण व पापविमोचन असा झाला”१ करिंथ १:३० मानवी जीवासाठी या जगात व येणाऱ्या भावी जगात जे काही लागेल, ते सर्व काही ख्रिस्तात प्राप्त होईल. आपला तारणारा येशू हा मौल्यवान मोती आहे आणि त्याच्याशी सर्व गोष्टीची तुलना केली तरी त्या कमीच भरतील. COLMar 74.2
“तो (ख्रिस्त) स्वकीयाकडे आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्विकार केला नाही.”योहान १:११. परमेश्वराचा प्रकाश या जगातील अंधारात प्रकाशला, आणि “तरी अंधाराने त्याचे ग्रहण केले नाही’ योहान १:५. या स्वर्गीय देणगी विषयी सर्वच लोक असे वागले नाहीत. या दाखल्यातील व्यापारी म्हणजे सत्याची आवड असलेले लोक होत. वेगवेगळया राष्ट्रात देवभिरू लोक, विचारवंत लोक त्यांच्या वाङमयातून, शास्त्रीय विज्ञान व धर्म व तोही विदेशी जगात आहेत तरी त्यांना त्यांच्या आध्यात्मिकतेसाठी थोडेसे ज्ञान प्राप्त होते. यहुदी लोकातही अशा प्रकारचे लोक होते आणि त्यांना तसेच ज्ञान प्राप्त झाले नाही. बाहयात्कारी शिष्टाचाराचा धर्म यांत त्यांना समाधान वाटत नव्हते, तर ज्यामध्ये आध्यात्मिकता व उध्दार आहे अशाच धर्माची त्यांना गरज होती. ख्रिस्ताचे शिष्य अशाच वृत्तीचे होते. हबशीषंढ व कर्नेल्य याच विचाराचे होते. ते प्रार्थना करून आतुरतेने वाट पाहत होते की, त्यांना असा स्वर्गीय प्रकाश मिळावा आणि जेव्हा त्यांना ख्रिस्त प्रकट केला तेव्हा त्यांनी ख्रिस्ताचा आनंदाने स्विकार केला. COLMar 75.1
या दाखल्यात मोती हे देणगीचे दर्शक नाही. व्यापाऱ्याने त्याचे होते नव्हते ते विकले व किंमत देवून मोती विकत घेतला. पुष्कळ या विचारावर प्रश्न विचारतात, ख्रिस्त पवित्र शास्त्रांत देणगी असा आहे मग किंमतीचा प्रश्न येतो कुठे ? ख्रिस्त हा देणगी आहे पण जे कोणी ख्रिस्ताला त्यांचे सर्वस्व देतात म्हणजे आत्मा, जीवन व देह ही बिनशर्थ त्याला समर्पण करीतात. आम्ही ख्रिस्ताला वाहन दिले पाहिजे. ख्रिस्ताने आम्हांस जे काही आज्ञापिले ते आपण स्वखुशीने आज्ञापालन करून जीवन जगावे. आम्ही जे काही आहोत, आमचे सर्व दान व सर्व कलाकौशल्य ही सर्व प्रभुपासून आहेत आणि ही सर्व त्याच्या सेवेसाठी खर्च केली पाहिजेत. जेव्हा आम्ही असे समजून आमचे सर्वस्व त्याला वाहून देतो, तेव्हा ख्रिस्त सर्व स्वर्गीय ठेव वा खजिना व स्वतः आमच्यासाठी असा आहे. अशा प्रकारे आम्हांस तो मौल्यवान मोती प्राप्त होतो. COLMar 75.2
तारण ही मोफत देणगी आहे तरीही ती देणगी आपण विकत घेतली पाहिजे व विकत दिली पाहिजे. परमेश्वराच्या खरेदी केंद्रावरील व्यवहारात हा मौल्यवान मोती याची खरेदी पैक्यावाचून व मौल्यावाचून सौदा करा. या प्रकारे स्वर्गीय खरेदी केंद्रावर सर्वाना खरेदी करीता येते. “पाहा, मी तुजपुढे दार उघडून दिले आहे. प्रभु सांगतो, ते कोणाच्याने बंद करवत नाही‘‘ त्या दाराच्या आतून व दारापाशी वाणी ऐकू येते व ती म्हणते “या’ तारणार। येशू प्रेमळ वाणीने व कळकळीने आम्हांस आमंत्रित करीतो. हया करीता मी तुला मसलत देतो की धनवान व्हावे म्हणून ते अग्नीने शुध्द केलेले सोने मजपासून विकत घे,’ प्रकटी ३:८,१८. COLMar 75.3
ख्रिस्त सुवार्तेचा आशिर्वाद सर्वांना प्राप्त होऊ शकतो. श्रीमताप्रमाणे गरीबानाही सुवार्तेची खरेदी करीता येते, तरीपण जगातील कितीही संपत्ती दिली तरी सुवार्ता आशिर्वादखरेदी करीता येत नाही. आम्ही ख्रिस्ताच्या आज्ञाचे स्वखुशीने आज्ञापालन करणे व ख्रिस्ताने आम्हास खरेदी केले आहे हे समजून ख्रिस्ताला समर्पण करणे. शिक्षण आम्ही कितीही उच्च पदवीधर झालो तरी त्यामुळे आम्ही ख्रिस्ताच्या सान्निध्यात येवू शकत नाही. परूशी लोकांना प्रत्येक प्रकारची ऐहिक व आध्यात्मिक अनुकूल परिस्थिती होती, आणि ते अभिमानाने सांगत होते. आम्ही “धन मिळविले आहे. व मला (आम्हांस) काही उणे नाही असे तू म्हणतोस, पण तू कष्टी, दीन, दरिद्री, अधळा व उघडा वाघडा आहेस.”प्रकटी ३:१७. ख्रिस्ताने, त्यांना तो मौल्यवान मोती देऊ केला. पण तो परूश्यानी नाकारला, आणि येशू त्यांना म्हणाला, “जकातदार व कसबिणी तुमच्यापुढे देवाच्या राज्यात जातात.’ मत्तय २१:३१. COLMar 76.1
आम्हाला तारण प्राप्त करून घेता येत नाही, तर आपण त्याचा शोध केला पाहिजे असा शोध करणे की ते तारण प्राप्त व्हावे. यासाठी जगातील सर्व कामे सोडून चिकाटीने केवळ तारण प्राप्तीसाठी झटत राहणे. COLMar 76.2
आम्ही, अमोल मोती शोधणे अवश्य आहे पण त्याचा शोध जगाच्या व्यापार पेठेत व जगिक पध्दतीने करावयाचा नाही. आम्ही त्याची खरेदी सोने रूपे हे देवन खरेदी करू शकत नाही. कारण तो मोती परमेश्वराच्या मालकीचा आहे. ऐहिक वा आध्यात्मिक याद्वारे तारणाचा लाभ होईल ती कल्पना काढून टाका. परमेश्वराला स्वखुशीने आज्ञापालन हवे. परमेश्वर म्हणतो तुम्ही तुमची पापे सोडून द्या. ख्रिस्त सांगतो, जो विजय मिळवितो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्याजवळ बसू देईन, मी ही तसा विजय मिळवून आपल्या पित्याजवळ त्याच्या राजासनावर बसलो.”प्रकटी ३:२१. COLMar 76.3
काहीजण सतत स्वर्गीय मोती शोधीत असतात. पण त्यांच्या जीवनातील घातक सवयी त्या, ते सोडीत नाहीत. ते ‘स्व’ ला मरण देत नाहीत. यासाठी की त्यांच्याठायी ख्रिस्ताने जगावे. यामुळे त्यांना तो स्वर्गीय मोती कधीच सापडत नाही. त्यांच्या जीवनातील अपवित्र ध्येय व जगिक गोष्टीबाबतची त्यांची आवड हे ते सोडत नाहीत. ते ख्रिस्ताचा वधस्तंभ घेवून स्वार्थत्याग व समर्पण ही जी ख्रिस्ताची वाट आहे तीवर ते चालत नाहीत. ते जवळ जवळ ख्रिस्ती आहेत पण पूर्ण ख्रिस्ती नाहीत. ते ख्रिस्त राज्याच्या जवळ आहेत पण ते स्वर्गीय राज्यात प्रवेश करू शकत नाहीत. जवळ जवळ तारण पावलेले पण पूर्णपणे तारण पावलेले नाहीत, याचा अर्थ बहुतेक तारण झालेले म्हणजे संपूर्ण हरवलेले अर्थात तारण न झालेले. COLMar 76.4
व्यापारी मौल्यवान मोती शोधतो. हा दाखला यात प्रमुख दोन भावार्थ आहेत. मानव स्वर्गीय राज्याचा शोध करीतात. हा एक भाग तर दुसरा भाग ख्रिस्त त्याचे हरविलेल्या लोक याना शोधीत आहे. ख्रिस्त हा स्वर्गीय व्यापारी अमोल मोत्याचा शोध करीत आहे, हरवलेल्या मानवात त्यास अमोल मोती दिसतो. मानव हा पापाने दोषी व नाशवंत झालेला, त्यात ख्रिस्ताला तारणाची शक्यता व आशा दिसते. ज्या मानवाची अंत:करणे सैतानाचे रणांगण झाले आहे, त्या मानवाची ख्रिस्ताने प्रितीने सुटका केली, असे मानव ख्रिस्ताला पतन पावलेले यांच्याहून अधिक मौल्यवान असे वाटले. परमेश्वराने मानवाकडे दुष्ट, पापी व टाकाऊ असे पाहिले नाही, मानवाकडे पाहता ख्रिस्तातील तारणदायी प्रिती या दृष्टीने मानव पुढे काय होईल असे पाहिले. ख्रिस्ताने सर्व विश्वाची धन संपत्ती एकत्रित केली. यासाठी की मानव हा अमोल मोती विकत घेता यावा. येशूला तो मानव-मोती मिळाला. त्यानंतर तो, त्याच्या मुगुटात पूर्ववत बसविला. “कारण ते त्याच्या देशात मुकूटावरील रत्नाप्रमाणे उंच स्थानी शोभतील‘‘ जखऱ्या ९:१६. “मी नेमीन त्या दिवशी ते माझा खास निधी होतील.”मलाखी ३:१७. COLMar 77.1
ख्रिस्त आमचा अमोल मोती आहे, आणि तो स्वर्गीय खजिना आम्ही संपादन करणे ही आमची संधी आहे आणि याच ध्येयावर आम्ही जोर देणेची सध्याची गरज आहे. या अमोल मोतीची किंमत किती आहे हे आम्हांस पवित्र आत्म्याद्वारे प्रगट केले जाते. पवित्र आत्म्याने जे सामर्थ्य प्राप्त होते त्याच समयी स्वर्गीय खजिना शोधला जातो व सापडला जातो. ख्रिस्ताच्या समयी सर्वानी सुवार्ता ऐकली पण त्यांची अंत:करणे खोटया शिकवणीने आंधळी झाली होती आणि तो नम्र गौरवी गालीली शिक्षक येशू त्यांना दिसला नाही. ख्रिस्ताचे स्वर्गारोहण झाले आणि मध्यस्थीचे कार्यासाठी राजासनारूढ झाला हे, पवित्र आत्म्याच्या वर्षावाने प्रसिध्द केले. पन्नासाव्या दिवशी पवित्र आत्मा दिला. तारणाऱ्या येशूच्या पुनरूत्थानामुळे सामर्थ्य किती महान याची सर्वत्र साक्ष त्यांनी लोकांची मने आंधळी केली होती. त्याच्या मनात ख्रिस्ताचा स्वर्गीय प्रकाश पडला. आता त्याना ख्रिस्त हा, “त्याने इस्त्राएलाला पश्चात्ताप व पापांची क्षमा ही देणगी द्यावी म्हणून देवाने, त्याला आपल्या उजव्या हस्ते राजा व तारणारा असे उच्च केले. या गोष्टीविषयी आम्ही त्याचे साक्षी आहो’ प्रे.कृ. ५:३१. ख्रिस्तासभोवार स्वर्गीय वैभव होते असे त्यांनी पाहिले आणि जे कोणी त्यांच्या बंडाळीपासून माघार घेतील अशा लोकांसाठी अलोट संपत्ती ख्रिस्ताच्या हातात अर्थात ताब्यात आहे असे दिसले. स्वर्गीय पित्याचा एकुलता एक जो येशू त्याचे वैभव शिष्यांनी लोकांना दाखविले त्यामुळे तीन हजार लोकांचा पालट झाला. ते लोक किती पापी व दोषी आहेत हे त्यांना दाखविले व ख्रिस्त त्यांचा तारणारा व मित्र आहे हे पटवून दिले. ख्रिस्ताला उंचावले, ख्रिस्ताचे गौरव केले, हे सर्व पवित्र आत्म्याने प्रेरीत झालेले लोक यांनी केले. विश्वासकांना दिसून आले की ख्रिस्ताला मानवासाठी किती अपमानाने वागविले, त्याने दुःख सोशिले आणि मानवाचे मरण पत्करले. यासाठी मानवास सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. येशूच्या या सेवेवर त्यांनी विश्वास ठेविला. पवित्र आत्म्याद्वारे लोकांनी ख्रिस्ताचे सामर्थ्य, वैभव पाहिले व मग लोकांनी हात पुढे केले व येशूला म्हणाले, आम्ही हे सर्व विश्वासाने स्विकारतो. COLMar 77.2
यानंतर पनरूत्थान पावलेला तारणारा येश याची ही सवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यांत गेली. मंडळीत लोक सामील होणेसाठी चहदिशेने येवू लागले. विश्वासकांचा पालट झाला. ख्रिस्ती लोकांबरोबर पापी लोक येवून तो अमोल मोती शोधू लागले. अशाप्रकारे भविष्याची पूर्णता झाली, “त्या दिवशी त्यातला निर्बल दाविदासमान होईल. अर्थात त्यांचा अग्रगामी परमेश्वराच्या दिव्यदूतासमान होईल‘‘ जखऱ्या १२:८. प्रत्येक ख्रिस्ती मनुष्याला त्याच्या बांधवात आदरातिथ्य व प्रिती ही दिसून आली. एकच गोडी चालू राहिली. सर्वाच्या मनात एकच ध्येय कार्य करीत होते. सर्वजण एकसुत्री मनाने काम करीत होते. विश्वासकांचे एकच ध्येय होते ते म्हणजे ख्रिस्ताचे शील प्रकट करणे व ख्रिस्ताच्या राज्याच्या विस्तारासाठी कार्य करणे. “तेव्हा विश्वास धरणाऱ्यांचा समुदाय एकदिलाचा व एकजीवाचा होता. प्रेषित मोठया सामर्थ्याने प्रभु येशूच्या पुनरूत्थानाविषयी साक्ष देत होते, आणि त्या सर्वांवर मोठी कृपा होती”प्रे.कृ. ४:३२,३३”.... आणि तारण प्राप्ति झालेल्या इसमाची प्रभू प्रतिदिवशी त्यांच्यात भर घालीत असे‘‘ प्रे.कृ. २:४७. ख्रिस्ताच्या सामर्थ्याने सर्व मंडळी सजीव झाली, कारण त्यांना तो अमोल मोती सापडला. COLMar 78.1
या घटनांची पुनरावृत्ती व्हावयास पाहिजे व ती ही अधिक सामर्थ्याने झाली पाहिजे. पन्नासाव्या दिवशी पवित्र आत्म्याचा जो वर्षाव झाला तो अगोटीचा आरंभीचा पाऊस होय पण नंतर शेवटी येणारा पाऊस याहून अधिक असा येईल. आमची मागणी व आम्ही त्याचा स्विकार करणे यासाठी पवित्र आत्मा आमची वाट पाहात आहे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ख्रिस्ताचे संपूर्ण गौरव पुन्हा: एकवार दाखविले जाईल. मानवास, अमोल मोती याचे महत्त्व काय व किती आहे हे समजून येईल, आणि प्रेषित पौल याजबरोबर ते म्हणून शकतील, “तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभु, याजविषयींच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो, त्याच्यामुळे मी सर्व वस्तुंची हानी सोशिली आणि त्या केरकचरा अशा लेखतो, यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा‘‘ फिलिप्पै ३:७,८. COLMar 78.2