Go to full page →

अध्याय १३—विजय DAMar 91

मत्तय ४:५-११; मार्क १:१२, १३; लूक ४:५-१३.

“मग सैतानाने त्याला पवित्र नगरात नेऊन मंदिराच्या कंगोऱ्यावर उभे केले, आणि त्याला म्हटले तू देवाचा पुत्र असलास तर खाली उडी टाक. कारण असे लिहिले आहे, - DAMar 91.1

“तो आपल्या दूतांस तुजविषयी आज्ञा करील,
आणि तुझ्या पायाला धोंड्याची ठेच लागू नये
म्हणून ते तुला हातावर झेलून धरतील.” DAMar 91.2

येशूला त्याच्याच शब्दात पकडले असे आता सैतानाला वाटले. देवाच्या मुखातून निघालेले शब्द कावेबाज कपटी शत्रू सादर करीत आहे. तो प्रकाशाचा दिव्यदूत असून त्याला देवाने वचन अवगत आहे आणि त्याचा अर्थही तो सांगू शकतो असे तो भासवितो. आपल्या विश्वासाच्या समर्थनात येशूने देवाच्या वचनाचा वापर केला त्याप्रमाणेच सैतानाने आपल्या फसवणुकीचा कैवार घेण्यासाठी त्याचा वापर केला. तो म्हणतो केवळ तो येशूचा इमानीपणा पाहात आहे आणि त्याच्या निश्चलतेबद्दल तो आता प्रशंसा करितो. उद्धारकाने देवावरील विश्वास जसा प्रगट केला तशाच विश्वासाचा आणखी एक पुरावा देण्यास सैतान आग्रह करितो. DAMar 91.3

परंतु ह्या मोहामध्ये सैतानाने अविश्वासाची गुप्त खोच घुसडली आहे. “तू देवाचा पुत्र असलास तर.” “जर’ ह्या शब्दाचा अर्थ सांगण्याचा ख्रिस्ताला मोह झाला होता परंतु तसे करण्यापासून त्याने स्वतःला आवरले. सैतानापुढे पुरावा सादर करण्यासाठी तो स्वतःचा जीव धोक्यात घालणार नव्हता. DAMar 91.4

ख्रिस्ताच्या मानवतेचा फायदा घेऊन त्याला अनुमान करण्यास भाग पाडावे असे सैतानाला वाटले. सैतान आग्रह करू शकतो परंतु पाप करण्यास जुलूम करू शकत नाही. स्वतः त्याला तो खाली टाकू शकत नव्हता म्हणून त्याने येशूला “खाली उडी टाकण्यास सांगितले. कारण देव त्यात अडथळा आणून त्याची सुटका करील. उडी टाकण्यासाठी सैतान बळजबरी करणार नव्हता. ख्रिस्ताने मोहाला संमती दिल्याशिवाय त्याच्यावर ते लादले जाणार नव्हते. जगातील कोणतीही शक्ती त्याला त्याच्या पित्याच्या इच्छेपासून ढळण्यास बळजबरी करू शकत नव्हती. DAMar 91.5

मोह घालणारा अधर्म करण्यास कदापीही जुलूम करू शकत नाही. आम्ही त्याला वश झाल्याशिवाय तो आमच्या मनावर ताबा प्रस्थापीत करू शकत नाही. आम्हावर सैतानाचे वर्चस्व येण्याअगोदर आम्ही त्याला प्रथम मान्यता दिली पाहिजे आणि ख्रिस्तावरील विश्वास सोडला पाहिजे. दिव्य प्रमाण अमलात आणण्यास जेथे जेथे आम्ही अपयशी होतो तेथे तेथे फसविण्यासाठी सैतानाला प्रवेशद्वार मोकळे होते. जेव्हा आम्ही फजीत होतो तेव्हा ख्रिस्ताची मानहानी करण्यास, त्याच्यावर ठपका ठेवण्यास त्याला संधि मिळते. DAMar 92.1

“तुझे रक्षण करण्यास तो आपल्या दूतांस तुजविषयी आज्ञा देईल” ह्या आश्वासनाचा उल्लेख करताना “त्याच्या सर्व मार्गामध्ये तुला राखील’ हा भाग सैतानाने गाळला होता. गाळलेल्या भागाचा अर्थ देवाने निवडलेल्या सर्व मार्गामध्ये असा आहे. देवाची आज्ञा अवमानण्याचे येशूने नाकारले. पित्यावरील पूर्ण विश्वास प्रगट करीत असतानाच त्याने स्वतःला अशा पेचात टाकू नये की त्यासाठी मरणातून त्याला सोडविण्यासाठी त्याच्या पित्याला मध्यस्थी करायला लागू नये. त्याचा बचाव करण्यासाठी त्याने देवाला भाग पाडू नये, परिणामी श्रद्धा आणि नम्रता याबाबतीत मानवाला आदर्श, उदाहरण होण्यास तो अपयशी ठरेल. DAMar 92.2

येशूने सैतानाला म्हटले, “आणखी असे लिहिले आहे की, प्रभु जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको.” इस्राएल लोक अरण्यातून जात असताना तहानेने व्याकूळ झाले होते आणि पाण्यासाठी मोशेजवळ मागणी करीत होते त्या वेळेस मोशेने हे उद्गार काढिले होते आणि म्हटले, “परमेश्वर आमच्यामध्ये आहे किंवा नाही?’ निर्गम १७:७. देवाने त्यांना अद्भुत रितीने वागविले होते. तथापि संकटात पडल्यावर ते साशंक होऊन त्याचे वास्तव्य त्यांच्याबरोबर असल्याच्या पुराव्याची ते मागणी करू लागले. अश्रद्धेने त्याची ते परीक्षा घेऊ लागले. सैतानसुद्धा येशूने तसेच करावे याविषयी आग्रही होता. येशू त्याचा पुत्र आहे ह्याची साक्ष देवाने अगोदरच दिली आहे; आणि आता तो देवपुत्र असल्याबद्दल पुरावा मागणे म्हणजे देवाच्या वचनाची कसोटी करणे होय. आश्वासन दिले नाही त्याची मागणी करणेही तसेच आहे. खरे पाहिले तर त्याद्वारे अविश्वास प्रगट होतो आणि त्याची कसोटी होते. तो आपले वचन पाळतो किंवा नाही हे पाहाण्यासाठी आम्ही देवाजवळ याचना करू नये, कारण तो ते तडीस नेईल, पूर्ण करील; तो आम्हावर प्रीती करितो हे सिद्ध करण्यासाठी नाही, परंतु तो आम्हावर प्रीती करितो म्हणून तो करील. “विश्वासावाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणाऱ्याने अशा विश्वास धरलि पाहिजे की तो आहे, आणि त्याजकडे धाव घेणाऱ्याला तो प्रतिफळ देणार होता.” इब्री ११:६. DAMar 92.3

विश्वास कोणत्याही अर्थी तर्क, संभव, अटकळ यांच्याशी संबंधीत नाही. केवळ अस्सल श्रद्धावंत तर्क किंवा संभव यापासून सुरक्षीत राहातो. सैतानाच्या दृष्टीने श्रद्धेची नक्कल (बनावट) तर्क आहे. तर्कसुद्धा आश्वासनावर हक्क सांगतो, परंतु त्याचा उपयोग सैतानाप्रमाणे स्वैरवर्तनासाठी निमित्त सांगण्यास करण्यात येतो. श्रद्धेने देवाच्या प्रेमावर विश्वास ठेवून त्याचे आज्ञापालन करण्यास आमचे आद्य मातापिता तयार झाले असते. परंतु त्यांच्या पापाच्या परिणामापासून त्याचे महान प्रेम त्यांना वाचवील असा अनुमान, तर्क करून त्यांनी त्याच्या आज्ञा उलंघिल्या. दया प्राप्त होणाऱ्या अटी पाळल्याशिवाय स्वर्गाची मेहेरनजर, कृपा होण्यास श्रद्धा विनंती करीत नाही. शास्त्रवचनातील अभिवचने आणि तरतूदी यांच्या पायावर अस्सल विश्वास, आधारीत आहे. DAMar 92.4

अविश्वास जागृत करण्यास सैतान जेव्हा अपयशी होतो तेव्हा तो आम्हाला अनुमान किंवा तर्क करायला लावण्यास यशस्वी होतो. केवळ तो आम्हाला मोहपाशात आटकवण्यास कारणीभूत होतो तेव्हा विजय त्याचा आहे हे त्याला समजते. देव आज्ञांकितांना राखून ठेवितो परंतु त्यापासून ढळणे म्हणजे सैतानाच्या भूमीवर साहस करणे होय. तेथे आमची खात्रीने फसगत होणार. उद्धारकाने आम्हाला आज्ञा केली आहे, “तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा.” मार्क १४:३८. भय, धोका, संकट यापासून बचाव चिंतन, मनन व प्रार्थना याद्वारे होईल आणि परिणामी अनेक पराभवापासून आम्ही वाचू. DAMar 93.1

तथापि मोहाचा हल्ला झाल्यास आम्ही अधैर्य होऊ नये. कसोटीच्या प्रसंगी देवाच्या मार्गदर्शनाविषयी आम्ही साशंक बनतो. परंतु आत्म्याने येशूला अरण्यात आणिले आणि सैतानाने त्याची परीक्षा केली. देवाची कसोटी आमच्या भल्यासाठी असते. इष्ट उद्देश साध्य करण्यात येतो. मोहाच्यावेळी येशूने देवाची अभिवचने ग्रहीत धरली नाहीत किंवा तो निराश झाला नाही. आपणही निराश होऊ नये. “देव विश्वासपात्र आहे, तो तुमची परीक्षा शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपाय करील, असे की तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे.” तो म्हणतो, “देवाला आभाररूपी यज्ञ कर; परात्परापुढे आपले नवस फेड; संकटसमयी माझा धावा कर; मी तुला मुक्त करीन आणि तू माझे गौरव करशील.’ १ करिंथ. १०:१३; स्तोत्र. ५०:१४, १५. DAMar 93.2

दुसऱ्या मोहावर येशूने विजय मिळविला, आणि आता सैतान आपला खरा रंग दाखवितो. परंतु तो दोन खुरांचा, वाघोळीच्या पंखाचा, अक्राळविक्राळ भयानक प्राणी असल्याचे दर्शवीत नाही. जरी तो भ्रष्ट झाला तरी तो पराक्रमी, शक्तीमान दूत आहे. बंडाचा मोहरक्या आणि ह्या जगाचा देव आहे असे तो उघड कबूल करितो. DAMar 93.3

नंतर सैतानाने त्याला एका मोठ्या उंच डोंगरावर नेऊन जगातील सर्व राज्ये व त्यांचे वैभव दाखविले. मंदिराने भरलेले नगर, संगमखरी दगडांचे राजवाडे, सुपीक शेती आणि फळांनी भरलेल्या बागा यांच्यावर सूर्यप्रकाश चमकत होता. अधमाच्या खूणा लुप्त झाल्या होत्या. अलिकडेच खिन्न आणि औदासिन्याचे चित्र येशूच्या डोळ्यापुढून गेल्यावर समृद्धी आणि DAMar 93.4

आमच्यासाठी त्याने पराभव आणि अनंतकालिक हानी होण्याचा धोका पत्करला. आम्ही आमचे मुकुट काढून त्याच्या चरणाजवळ ठेवू आणि गीत गाऊ, “वधलेला कोंकरा सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव व स्तुती ह्यांचा स्वीकार करण्यास योग्य आहे.’ प्रगटी. ५:१२. सौंदर्य यांचा देखावा त्याच्या डोळ्यापुढे आला. त्यानंतर ठकाचा आवाज कानी पडलाः “ह्या सर्वावरील अधिकार व ह्यांचे वैभव मी तुला देईन, कारण हे मला सोपून दिले आहे व माझ्या मनास येईल त्याला मी हे देतो. तू मला नमन करशील तर हे सर्व तुझे होईल.” DAMar 94.1

केवळ दुःख व व्यथा यांच्याद्वारे ख्रिस्ताचे कार्य सिद्धीस जाणार होते. त्याच्यासमोर हाल, कष्ट, संघर्ष, दुःखी जीवन आणि क्षुद्ध अपमानास्पद मरण ठाकले होते. पित्याच्या प्रेमापासून होणारा वियोग त्याने सहन केला पाहिजे. आता काबीज केलेला अधिकार त्याला देण्यास ठक तयार होता. सैतानाच्या अधिकाराला मान्यता घेऊन कदाचित ख्रिस्त भयप्रत भविष्यकाळापासून सुटका करून घेईल. परंतु तसे करणे म्हणजे संघर्षातील विजयावर पाणी सोडणे होय. देवपुत्रापेक्षा उच्च स्थान मिळविण्याच्या खटपटीत सैतानाने स्वर्गांत पाप केले. आता जर त्याचा वरचष्मा झाला तर बंडाचा विजय होईल. DAMar 94.2

जेव्हा सैतानाने ख्रिस्ताला म्हटले, जगातील वैभवाचे राज्य माझ्यावर सोपविले आहे व माझ्या मनास येईल त्याला मी हे देतो. ह्या बोलण्यातील काही भाग खरा आहे आणि फसवणूक करण्याच्या उद्देशासाठी त्याने तो वापरला. सैतानाची सत्ता (मुलूख) आदामापासून हिरावून घेतलेली होती, परंतु आदाम उत्पन्नकर्त्यांचा प्रतिनिधी होता. त्याचा स्वतंत्र अंमल नव्हता. पृथ्वी देवाची आहे आणि त्याने सर्व गोष्टी पुत्राच्या हवाली केल्या आहेत. ख्रिस्ताच्या अधिपत्याखाली आदामाला अंमल गाजवायचा होता. जरी आदामाने विश्वासघात करून सैतानाच्या हाती सत्ता दिली तरी ख्रिस्त यथान्याय हक्कदार राजा राहिला. म्हणून नबुखद्रेसर राजाला प्रभूने म्हटले, “मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व ते तो पाहिजे त्यास देतो.” दानी. ४:१७. देवाने परवानगी दिली तरच हिरावून घेतलेली सत्ता सैतान वापरू शकतो. DAMar 94.3

जेव्हा सैतानाने ख्रिस्ताला जगातील वैभव व राज्य देऊ केले होते तेव्हा ख्रिस्ताने हक्कदार राज्यपद सोडून सैतानाच्या अधिपत्याखाली मांडलिक म्हणून कारभार पाहावा असे सूचीत केले. यहूदी लोकांची आशा ज्या राज्यावर केंद्रित झाल्या होत्या ते हेच राज्य होते. ह्या जगाच्या राज्याची ते अपेक्षा करीत होते. ख्रिस्ताने ते त्यांना देण्यास अनुमती दिली असती तर त्यांनी त्याचा आनंदाने स्वीकार केला असता. परंतु पापाचा शाप त्याच्यावर होता. येशूने त्याला म्हटले, “अरे सैताना, निघून जा, कारण प्रभु तुझा देव याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर, असे लिहिले आहे.” DAMar 94.4

स्वर्गामध्ये बंड करणाऱ्याने ह्या जगातील राज्ये ख्रिस्ताला देऊ केली; परंतु त्याच्या आहारी तो जाणार नव्हता. धार्मिकतेचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी तो आला होता आणि त्या उद्देशापासून तो किंचीतही ढळणार नव्हता. तोच मोह सैतान मनुष्यावर आणितो आणि ह्या ठिकाणी त्याला ख्रिस्तापेक्षा चांगले यश मिळते. त्याचे वर्चस्व मान्य करण्याच्या अटीवर तो मानवाला ह्या जगाचे राज्य देण्यास तयार होतो. त्यांनी प्रामाणिकपणा सोडावा, सदसद्विवेक बुद्धीची उपेक्षा करावी आणि स्वार्थाचे लालन- पालन करावे. अशी त्याची अपेक्षा आहे. प्रथमतः तुम्ही त्याचे राज्य व धार्मिकता मिळविण्याचा प्रयत्न करा असे ख्रिस्त सांगतो; परंतु सैतान जवळ येऊन म्हणतो सार्वकालिक जीवनाविषयी काहीही सत्य असले तरी या जगात यशस्वी होण्यासाठी तुम्ही माझी सेवा केली पाहिजे. तुमचे कल्याण माझ्या हातात आहे. मी तुम्हाला धन संपत्ति, ख्यालीखुशाली, मानसन्मान आणि आनंद देऊ शकतो. माझा सल्ला घ्या. प्रामाणिकपणा किंवा स्वार्थत्याग अशा त-हेवाईक कल्पनेला बळी पडू नका. तुमच्यासाठी मार्ग तयार करीन. अशा प्रकारे जनसुमदायाची फसगत झाली आहे. स्वार्थी जीवन जगणाऱ्याबद्दल त्याला समाधान वाटते. जगाचे राज्य देण्याच्या आशेने त्यांना भुरळ घालत असतानाच त्यांच्यावर तो आपले प्रभुत्व गाजवितो. स्वतःचे नसलेले तो देण्याचा प्रयत्न करीत असतानाच ते त्याच्यापासून काढून घेण्यात येईल. त्याच्या मोबदल्यात देवाच्या पुत्रांच्या वारसाहक्काच्या बाबतीत तो त्यांची फसवणूक करितो. DAMar 94.5

येशू देवपुत्र असल्याबद्दल सैतानाने प्रश्न विचारला आहे. परंतु ते तो नाकारू शकला नाही. दुःखीत मानवतेमध्ये देवत्व एकदम चकाकत होते. आज्ञा नाकारण्याचे सामर्थ्य सैतानामध्ये नव्हते. मानहानी आणि क्रोध यामुळे आळेपिळे देऊन जगाच्या उद्धारकाच्या समक्षतेतून माघार घेण्यास त्याला भाग पाडिले. आदामाचा पराजय जसा पक्का (पूर्ण) होता तसेच ख्रिस्ताचा विजय नक्की आणि पूर्ण होता. DAMar 95.1

आम्ही मोहाला विरोध करून सैतानाला आम्हापासून निघून जाण्यास भाग पाडू. देवावरील दृढ विश्वास आणि नम्रता याद्वारे येशूने विजय संपादन केला आणि प्रेषिताद्वारे तो म्हणतो, “यास्तव देवाच्या अधीन व्हा, सैतानाविरूद्ध आडवे व्हा म्हणजे तो तुम्हापासून पळेल. देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल.’ याकोब ४:७, ८. सैतानाच्या सामर्थ्यापासून आम्ही स्वतः बचाव करू शकत नाही; त्याने मानवतेला जिंकले आहे, आणि स्वःसामर्थ्यावर जेव्हा आम्ही भिस्त ठेवतो तेव्हा आम्ही त्याचे भक्ष बनतो. परंतु “परमेश्वराचे नाम बळकट दुर्ग आहे, त्यात धार्मिक धावत जाऊन निर्भय राहातो.’ नीति. १८:१०. बळकट नामामध्ये दुर्बल व्यक्तीने आश्रय घेतल्यावर सैतान थरथर कापत त्याच्यापासून पळून जातो. DAMar 95.2

शत्रू पळून गेल्यावर येशू अगदी क्षीण होऊन पृथ्वीवर पडला. त्याचा चेहरा निस्तेज झाला होता. आमची मुक्तता होण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी हालअपेष्टातून जाणाऱ्या येशू ख्रिस्त अधिपत्याला स्वर्गातील दूत न्याहाळून पाहात होते. आमच्यावर येणाऱ्यापेक्षा अधिक तीव्र कसोटीला त्याने यशस्वीपणे तोंड दिले. मृत्यूछायेत पडल्यासारख्या देवपुत्राची त्यांनी सेवा केली. जेवण खाण्याद्वारे त्याला शक्ती आली. त्याच्या विजयामुळे सर्व स्वर्ग विजयी झाला ह्या पित्याच्या प्रेमळ संदेशाने आणि खातरीने त्याचे समाधान झाले. त्याचा जीव तरतरीत झाल्यावर मानवाविषयीची त्याची सहानुभूती पुन्हा कार्यशील झाली. सुरू केलेले कार्य परे करण्यासाठी तो लागला. सैतानाचा पूर्णशा नाश केल्याशिवाय आणि भ्रष्ट मानवतेचा उद्धार केल्याशिवाय तो थांबणार नव्हता. DAMar 95.3

उद्धार पावलेले उद्धारकाबरोबर देवाच्या राजासनासमोर उभे राहीपर्यंत आमच्या उद्धारासाठी द्यावी लागलेली किंमत स्पष्ट कळणार नाही. सार्वकालिक गृहातील वैभवाने जेव्हा आमची ज्ञानेंद्रिय अत्यानंदाने भरून जातील तेव्हा आम्हाला स्मरण होईल की आमच्यासाठी ख्रिस्ताने ह्या सर्वांचा त्याग केला. स्वर्गीय दरबारातून त्याला हद्दपारच करण्यात आले नाही तर आमच्यासाठी त्याने पराभव आणि अनंतकालिक हानी होण्याचा धोका पत्करला. आम्ही आमचे मुकुट काढून त्याच्या चरणाजवळ ठेवू आणि गीत गाऊ, “वधलेला कोंकरा सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव व स्तुती ह्यांचा स्वीकार करण्यास योग्य आहे.” प्रगटी. ५:१२. DAMar 96.1