Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
मोक्षमार्ग - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्याय ५ वा.—आत्मनिवेदन

    “तुम्हीं आपल्या सार्‍या हृदयानें मला शोधाल तेव्हां तुम्ही हुडकाल व पावाल,”1इर्मया२९:१३. असें देवाचें वचन आहे. स्वभावत:च आपण ईश्वरापासून दुरावलेले आहोंत. “अपराधांनी व पापाग्‍नी मेलेलें” “सर्व मस्तक दु:खी व सर्व हृदय रोगी आहे; त्यांत कांहीं आरोग्य नाहीं,” असें आपलें वर्णन पवित्र आत्म्यानें केलें आहे. सैतानाच्या पाशांत पूर्णपणें अडललेलें व “त्यानें आपल्या इच्छेस वश होण्यासाठीं धरलेलें.”2 एफ२:१. ३. यशाय१:५,६. असे आपण आहोंत आपणांस बरें करण्याची व त्याच्या पाशांतून मुक्त करण्याची ईश्वरी इच्छा आहे, परंतु असें होण्यास ज्याअर्थी आपनांमध्यें सर्वस्वीं पालट होणें जरूर आहे, व आपला स्वभाव नवीन बनणें जरूर आहे, त्याअर्थीं आपण त्यास पूर्णपणें शरण गेलें पाहिजे.WG 39.1

    आजपर्यंत जितक्या लढाया झाल्या त्या सर्वात “स्व” च्या विरुद्ध केलेली लढाई अतिशय महत्त्वाची आहे. ईश्वराच्या इच्छेला स्वार्पण करणें व त्याला सर्वस्वी शरण जाणें ह्या गोष्‍टीला बराच झगडा करावा लागतो; परंतु आत्म्याला पवित्रपणा प्राप्‍त होण्यापूर्वी त्यानें ईश्वराला शरण गेलें पाहिजे.WG 40.1

    अंधदृष्‍टीनें केलेलें आत्मसमर्पण व अविचारानें केलेलेम आत्मसंयमन यांच्या पायावर उभारलेलें असें सैतानानें भासविल्याप्रमाणें देवाचें राज्य नाहीं. तें आपल्या बुद्धिस व सद्सद्विचारशक्‍तीस पटणारें आहे. उत्पन्न केलेल्या प्राण्यास त्यानें पाचारण केलें आहे. कीं “याहो, आपण विवाद करुं.”1यशाय१:१८. त्यानें निर्माण केलेल्या प्राण्यांच्या इच्छाशक्तीवर तो जुलूम करीत नाहीं व नाखुषीनें व बुद्धिपुर:सर न केलेल्या आत्मनिवेदनानें मनाचीं अगर शीलाची वाढ होण्यास प्रतिबंध होऊन तें मनुष्याला ठराविक गति दिलेलें एक यंत्रच बनवील. परंतु अशा प्रकारचा ईश्वराचा इरादा नाहीं. सकलसृष्‍टिचा मुगुटमणि जो मनुष्यप्राणी त्यास शक्य त्या उच्च स्थितीस पोहोंचवावें अशी त्याची इच्छा आहे, त्यानें मनुष्यापुढें उच्च स्थितीचें चित्र ठेविलें असून आपल्या कृपेनें त्यास तें प्राप्‍त करून द्यावें अशी त्याची इच्छा आहे. ईश्वरी इच्छेनें कार्य आपणांमध्यें व्हावें व त्यासाठीं आपण स्वतांला त्यास वाहून घ्यावें म्हणून तो आपणांस बोलावीत आहे. पापाच्या गुलामगिरीपासून मुक्‍त होऊन देवपुत्रांच्या वैभवयुक्‍त स्वतंत्रतेचा लाभ घेंणें हें आपल्या इच्छेवर अवलंबून आहे.WG 40.2

    आत्मनिवेदन करावयाचें म्हणजे ज्या गोष्‍टीमुळें ईश्वरापासून आपण दूर राहूं त्या सर्व गोष्टींचा त्याग करणें होय; ह्याविषयीं तरक प्रभु यानें म्हटलें आहे, “तुम्हांतील जो आपल्या सर्वस्वाचा त्याग करीत नाहीं त्याच्यानें माझा शिष्य होववत नाहीं.”1लुक१४:३३. जी जी गोष्‍ट आपल्या अंत:करणाला ईश्वरापासून दूर करील त्या त्या गोष्टीचा आपण त्याग केला पाहिजे. द्रव्यलोभ ही एक सैतानाची आपनांस बद्ध करणारी सोन्याची बेडीच आहे. कीर्ति व ऎहीक सन्मान हेंच ज्याचें दैवत अशा लोकांचा दुसरा एक वर्ग आहे. आणखी कित्येक असे आहेत, कीं सुखस्वार्थ व अंगचोरपणा हेंच त्यांचें ब्रीद ! अशा लोकांचें वर्ग साफ नाहीसे करून टाकिले पाहिजेत. अर्धे ईश्वराचे व अर्धे जगाचें असें आपणांस होतां येत नाहीं. ईश्वराचे असे पूर्ण असल्याशिवाय आपण त्याची लेंकरें नव्हेत. कित्येक असे आहेत, कीं ते ईश्वराचे नियम पाळण्यास, उत्तम शील बनविण्यास, व मुक्ति मिळविण्यास स्वतांच्याच प्रयत्नांवर विसंबून राहून देवाची सेवा करण्याचा बाणा बाळगणारे आहेत. ख्रिस्ती प्रीतीच्या थोर ज्ञानानें त्यांचें अंत:करण उचंबळून येत नाही, परंतु ईश्वरानें लावून दिलेली जीं कर्तव्यें आहेत तीं करण्याचा ते प्रयत्न करितात, जणूंकाय ह्याद्वारें स्वर्गप्राप्ति होईल. अशा प्रकारच्या धर्म कुचकामाचा आहे. ख्रिस्‍ताचें वास्तव्य ज्या वेळीं अंत:करणांत होतें त्या वेळीं त्याच्या प्रीतीनें त्याशी झालेल्या दळणवळणाच्या आनंदानें आत्मा इतका भरून जातो, कीं तो व ख्रिस्‍त हीं दोन्ही एकरुपच होऊन जातात, व केवळ त्याचेच ठिकाणीं ध्यान असल्यामुळें त्याचें “स्व” त्व अजीबात नाहीसें होऊन ख्रिस्तप्रेम हाच त्याच्या कृत्यांचा झरा होतो. ज्यांस ईश्वराविषयीं उत्कट प्रेम वाटत असतें, ते त्यास कमींत कमी असेम देण्याची इच्छा करीत नाहींत. तर त्यास जितकें जास्‍त देता येईल असेंच पहात असतात. मोठ्या औत्सुक्यानें ते सर्वस्व अर्पण करीतात व ज्या गोष्टीचा शोध ते करीत असतात त्या गोष्‍टीच्या महत्वाच्या मानानें ते आपली कळकळ दाखवितात, अशा अगाध प्रेमाशिवाय ख्रिस्ती कामगिरी म्हणजे निव्वळ बडबड, पोकळ आचार व ओंझें लादलेलें एक संकटच होय.WG 40.3

    ख्रिस्ताला सर्वस्व अर्पण करणें हा सर्वात मोठा स्वार्थत्याग आहे. असेम तुम्हांस वाटतें काय ? “ख्रिस्‍तानें मजसाठीं काय दिलें आहे” हे तुम्हीं स्वतांलाच पुसा. त्या देवाच्या पुत्रानें आपल्या तारणासाठीं जीव, प्रेम, दु:खसहनशीलता वगैरे सर्व काहीं दिलें आहे. इतक्या मोठ्या प्रेमाला पात्र नसलेले जे आपण त्या आम्हाला आपलीं अंत:करणें त्यापासून दूर राखणें संभवेल काय ? आपल्या आयुष्यांत क्षणोंक्षणीं त्याच्या कृपेनें प्राप्‍त होणार्‍या सुखाचे वाटेकरी आपण होत आहों, व ह्याच कारणास्तव ज्या अज्ञानापासून व दु:खापासून आपला बचाव झाला आहे त्याचा अनुभव आपणांस पूर्णपणें घडून येत नाहीं. ज्याला आमच्या पापांनी छिन्नविच्छिन्न केलें, त्याकडेच मात्र आम्ही पहावें, परंतु त्याच्या प्रेमाकडे व त्यानें केलेल्या आत्मयज्ञाकडे दुर्लक्ष करावें काय ? वैभवयुक्त प्रभूच्या झालेल्या अपमानाच्या दृष्‍टीनें बराच झगडा करून व नीच स्थिती पत्करून मात्र आपणांस सार्वकालीका जीवन प्राप्‍त होईल म्हणून आपण कुरकूर करावी काय ?WG 42.1

    ईश्वर आमचा स्वीकार करीलच अशी हमी दिल्याशिवाय पश्चात्तापी व लज्जित अंत:करणानें त्याजकडे जाण्याची आम्हांस काय जरूरी आहे, असा प्रश्न अंत:करणांत ताठा असलेले बरेच लोक विचारीत असतात. ह्या त्यांच्या प्रश्नास उत्तर म्हणून मी त्यांस ख्रिस्‍ताकडे बोट दाखवितों. तो निष्पाप-नव्हे ह्याहिपेक्षां जास्‍त असून ईश्वराचा ज्येष्‍ठ पुत्र होता, परंतु मनुष्यजातीकरीतां देवानें त्याला पाप असें केलें. “तो अपराध्याशीं मोजलेला होता; आणि त्यानें बहुतांची पापें साहिली, आणि अपराध्यांसाठी मध्यस्‍थी केलीं”1यशाय५३:१२.WG 42.2

    आपण सर्वस्व द्यावयाचें म्हणजे काय द्यावयाचें ? तर मलीन झालेलें अंत:करण शुद्धीकरणासाठीं, त्याच्या स्वताच्या रक्तानें तें स्वच्छ करण्यासाठीं, व त्याच्या अनुपमेय प्रेमानें आपलें तारण होण्यासाठीं द्यावयाचें आहे. अशी स्थिती असतांही सर्वस्व अर्पण करणें मनुष्याच्या जिवावर यावें आं ! “जिवावर येतें” हे शब्द ऎकावयास व लोहावयासहि मला खरोखर लाज वाटते !WG 42.3

    आपल्या योग्य त्या फायद्यासाठीं जी गोष्‍ट राखून ठेवणें इष्‍ट आहे तिचा आपण त्याग करावा असें ईश्वराचें म्हणणें नाहीं. तो जें जें म्हणून कांहीं करतो त्या सर्वात त्याचा हेतु आपल्या लेकरांचें कल्याण व्हावें हाच असतो. ज्यांनीं ख्रिस्‍ताला पत्करिलें नाहीं त्यास ते स्वतां मिळवितील त्यापेक्षां विशेषच अधिक देण्याचा त्याचा इरादा आहे हें त्यांनींजाणण्याची त्याची इच्छा आहे. मनुष्य जेव्हां ईश्वराविरुद्ध विचार करितो व वागतो तेव्हां तो स्वताला अधिक अपाय करून घेतो, व आपल्या आत्म्याविरुद्ध अति मोथा अन्याय करितो. सर्वाहून अधिक असेम कल्याण कशांत आहे हें ज्यास माहीत आहे, व जो आपण उत्पन्न केलेल्या प्राण्यांच्या कल्याणाचीच योजना करीत असतो अशा त्या ईश्वरानें मना केलेल्या प्राण्यांच्या कल्याणाचीच योजना करीत असतो अशा त्या ईश्वरानें मना केलेल्या मार्गात खरा आनंद सापडणें असंभवनीय आहे. ईश्वरी आज्ञेच्या उल्लंघनाचा मार्ग म्हणजे दु:खाचा मार्ग होय.WG 43.1

    आपलीं लेकरें दु:ख सोशीत असतां तें पाहण्यांत ईश्वराला आनंदा होतो अशा तर्हेची विचारसरणी चुकीची आहे. सर्व स्वर्ग मनुष्याच्या सुखासाठीं कळकळ बाळगीत आहे. आपल्या स्वर्गीय पित्यानें उत्पन्न केलेल्या कोणत्याहि प्राण्याला आनंदरुप गृहांत शिरण्यास तो बंदी करीत नाहीं. ज्यांच्या योगानें दु:ख व निराशा हीम प्राप्‍त होतील व ज्या आपणांस सुखाच्या स्वर्गाचा दरवाजा बंद करितील अशा गोष्‍टींपासून अलिप्‍त राहण्यास ईश्वराची इच्छा आपणांस सांगत आहे. मनुष्येम ज्या स्थितींत असतील त्या स्थितींत त्यांच्या गरजा, त्यांच्या उणीवा व त्यांचे दोष यासहवर्तमान त्यांस स्वीकारावयास जगाचा तारक तयार आहे. जे लोक त्याचें जूं आपल्या मानेवर घेउन त्याचें ओझें वाहतात, त्यांस तो आपल्या रक्तानें पापापासून शुद्ध करुन थोर प्रकारचें तारण देईल, इतकेंच नव्हें,तर ज्या गोष्‍टींविषयी त्यांचें अंत:करण भुकेलें असेल, त्या गोष्‍टी त्यांस देऊन तें तृप्‍त करील. जीवनाच्या भाकरीसाठीं जे त्याकडे येतात त्या सर्वास शांतता व विश्रांति द्यावी हा त्त्याचा हेतु आहे. जें अत्यूच्च सुख आज्ञाभंग करणारास कधींहि प्राप्‍त होणार नाहीं त्या सुखाच्या मार्गास नेणारीं जीं कर्तव्यें असतील तीच मात्र आपण करावीं अशी त्याची इच्छा आहे. अंत:करणांत ख्रिस्ताचें वास्तव व वैभवाची आशा हेंच आत्म्याचें खरें व आनंदाचें जिणें आहे.WG 43.2

    मी स्वतां पूर्णपणें देवाच्या स्वाधीन कसें व्हावें याविषयीं पुष्कळजण शोध करीतात. त्याला वाहून घेण्यास तुम्ही इच्छितां खरें, परंतु तुम्ही नैतिक सामर्थ्यानें दुर्बल असून संशयरूप गुलामगिरींत रुतून गेलेले आहांत व पापी आयुष्यक्रमाच्या जदलेल्या संवयीच्या ताब्यांत सांपडलेली तुमची वचनें, तुमचें निश्चय हीं वाळूच्या दोरासारखी आहेत. तुमचे विचार, तुमच्या उर्मी, तुमच्या आवडी ह्यांस तुम्हांस ताब्यांत ठेवतां येत नाहीं. मोडलेल्या वचनांनीं व करारांनीम आत्मविश्वास डळनळून जातो, व त्यामूळें ईश्वर आपला स्वीकार करणार नाहीं. तुमच्या इच्छाशक्‍तीचें सामर्थ्य किती आहे हेंच काय तें समजण्याची तुम्हांस आवश्यकता आहे. ही इच्छाशक्‍ति म्हणजे मनुष्यस्वभावांतील सत्ता करणारी, सर्व गोष्टीचा निर्णय करणारी व बर्‍यावाईटांतून पसंतीनुरूप ग्रहण करणारी शक्ति होय. प्रत्येक बाब या इच्छाशक्तिच्या योग्य कार्यावर अवलंबून असते. ईश्वरानें मनुष्यांस चांगल्यावाईटाची निवड करून मनास वाटेल तें ग्रहण करण्याचें सामर्थ्य दिलें आहे; व त्या सामर्थ्याचा उपयोग करण्याचें काम त्यांचें आहे. अंत:करणाच्या आवडी ईश्वरार्पण करीतां येत नाहींत, परंतु त्याची सेवा करण्याचें पसंत करणें हें तुम्हांस करिता येतें. तुमची इच्छा त्याला देतां येतें. तुमची इच्छा त्याच्या स्वाधीन राहील. तोच तुमच्या आवडीनावडींचें केंद्र होऊन राहील, व तुमचें विचार त्याशीं अनुरुप असे होतील.WG 44.1

    चांगुलपणाची व पवित्रपणाची आशा ही चांगली खरी, परंतु ती तितक्यावरच जर थांबले तर तिचा कांहींएक उपयोग नाहीं. असें असेल तरWG 44.2

    पुष्कळ लोक ख्रिस्ती होण्याची नुसती आशा धरून बसण्यांतच आपले जन्म व्यर्थ घालवितील. सबब आशेबरोबर आपली इच्छा ईश्वरार्पण करण्याचें कामही त्यांनीं नेटानें चालविलें पाहिजे.WG 45.1

    मनुष्याच्या इच्छेस चांगलें वळण मिळाल्यानें अंत:करणांत सर्वस्वीं पालट होतो, व हें चांगलें वळण त्यानें आपली इच्छा ख्रिस्‍तार्पण केल्याशिवाय प्राप्‍त होणें नाहीं. ती एकदां ख्रिस्‍तार्पण केली म्हणजे स्वभावांत स्थिरता प्राप्‍त होण्यासाठीं ईश्वरीसामर्थ्य अंत:करणावर कार्य करीतें, व तुमच्या आयुष्यक्रमास नवीन दिशा प्राप्‍त होते.WG 45.2

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents