Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
मोक्षमार्ग - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय ७ वा.—शिष्यत्वाची पारख

    “जर कोणी ख्रिस्तांत आहे, तर तो नवी उत्पत्ति आहे, जुनें तें होऊन गेलें, पहा, तें नवें झालें.”1२करिंथ५:१७.WG 53.1

    अंत:करणाचा पालट होण्याच्या बाबतीत त्याचा निश्चित काल, ठिकाण यांचा अगर त्याच्या घडणार्‍या क्रियांचा यथायोग्य रितीनें पत्ता लागणें मनुष्यांस कदाचित अशक्य असेल, परंतु एवढ्यावरूनच त्याचा पालट झाला नाहीं, असें सिद्ध होत नाहीं. ख्रिस्तानें निकदेमसास म्हटलें “वारा पाहिजे तिकडे वाहतो, आणि त्याचा शब्द तूं ऎकतोस, तरी तो कोठून येतो व कोठें जातो, हें तुला कळत नाहीं; जो कोणी आत्म्यापासून जन्मला तो तसाच आहे.”2योहान३:८. ज्याचे परिणाम आपण उघड रीतीनें पाहतों, व आपणांस ते भासतात, अशा अदृश्य वार्‍याप्रमाणें मनुष्याच्या आत्म्यावर कार्य करीत असलेला ईश्वरी आत्मा आहे. चर्मचक्षूंस अदृश्य परंतु मनुष्यास नवीन दशा प्राप्‍त करून देणारें असें तें सामर्थ्य त्याच्या आत्म्याच्याठायीं नवीन जीवन उत्पन्नकरून त्यास ईश्वरी स्वरूपाप्रमाणें बनवून सोदतें. ईश्वरी आत्म्याचें हें कार्य अदृश्य रीतीनें चालत असतां त्याचे परीणाम मात्र दृग्गोचर होतात. ईश्वरी आत्म्याच्या कार्यामुळें अंत:करणास नाविन्य प्राप्‍त झालें असेल, तर त्या गोष्‍टीची सत्यता मनुष्याच्या आयुष्यक्रमावरून पटेल. आपल्या अंत:करणाचा पालट करण्याच्या व ईश्वराशीं आपली एकतानता करून घेण्याच्या बाबतींत आपणांस कांहीं एक करतां येणें नाहीं. आपल्यावर ईश्वरीकृपा आहे अगर नाहीं हें पाहण्यास आपण स्वतांवर अगर आपल्या सत्कृत्यांवर भरवंसा ठेवता कामा नये, तर आपला आयुष्यक्रमच तें दाखवील. आयुष्यक्रमांतील फरक आप्ल्या शीलांत, जडलेल्या संवयींत व व्यासंगांत नजरेस येईल, व आपण पूर्वी कसे होतों व आज कसे आहों ह्यामधील भेद उघड करून दाखवीत. प्रसंगानुसार केलेली सत्कृत्यें अगर दुष्कृत्यें ह्यावरून शील व्यक्‍त होत नाहीं, तर वारंवार केलेले उच्चार व आचार यांवरून तें व्यक्त होतें.WG 53.2

    ख्रिस्‍ताच्या सामर्थ्याव्यतिरिक्त मनुष्याच्या कृति केवळ बाह्यात्कारी चांगल्या असतील ही गोष्‍ट नाकबूल करितां येत नाहीं. कारण वजनदारपणाची आवड व लोकमान्यतेची हाव ही सुव्यवस्थित आयुष्यक्रम बनविण्यास कारणीभुत होतील, व स्वाभिमानामुळें दुष्कृत्य करण्यापासून असा मनुष्य कदाचित परावृत्त होईल; आपमतलबी अंत:करणाचा मनुश्य उदारपणाचीं कृत्यें करील. तर मग आम्हीं कोणाच्या बाजूनें आहोंत, हें काय साधनांनीं ठरवावयाचें ?WG 54.1

    अंत:करण कोणाजवळ आहे ! आपले विचार कोणाबरोबर आहेत ? कोणाशीं संभाषण करणें आपणांला आवडतें ? आपलें उत्कट प्रेम व आपला थोर उत्साह हीं कोनाजवळ आहेत ? आपण ख्रिस्‍ताचे असलों, तर आपले विचारहि त्याच्याबरोबर असतील, व आपले सुविचार त्याचेच असतील . आपणांजवळ जें काम्हीं आहे तें त्यालाच वाहीलेलें आहे असें होईल. त्याचीच प्रतिमा आपण व्हावें ही इच्छा होईल, त्त्याच्याच आत्म्यानें आपन श्वासोच्छवास करूं, त्याच्याच इच्छेप्रमाणें सर्व कांहीं करूं व सर्व बाबतींत त्यास संतोष देऊं.WG 54.2

    ख्रिस्‍तात जे लोक नव्यानें जन्म पावतात त्यांच्याठायी “प्रीति, आनंद, शांत, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासुपणा, सौम्यता ईंद्रियदमन.”1गलती५:२२,२३. हीं फळें दृष्‍टोत्पत्तीस येतात. असे लोक आपल्या ऎहिक वासनांप्रमाणें चालत नाहींत, तर देवाच्या पुत्राच्या ठायीं पूर्ण श्रद्धायुक्‍त होत्साते त्याच्याच पावलांस अनुसरतात, त्याच्या शीलाचाच विचार ते करतात, व तो ज्याप्रमाणें पवित्र आहे, त्याप्रमाणें तेहि आपणांस पवित्र करतात. एके वेळी ज्या गोष्‍टी त्यांस एकदा प्रिय होत्या त्यांचा आंता ते द्वेष करू लागतात. गर्विष्‍ट व स्वयमंद असेल तो सौम्य व अंत:करणानें नम्र होतो. पोकळ डौली व अभिमानी असेल, तो गंभीर व नम्र होऊन जातो. दारुबाज असेल तो दारु न पिणारा होईल, दुराचरणी असेल, तो पवित्र होईल. जगांतील शुष्क चालीरीति व पोकळ डामडौल ह्यांचा तो त्याग करील. ख्रिस्‍ती मनुष्य “बाह्य शोभा” प्राप्‍त करून घेण्याची खटपट करणार नाहीं, तर “जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीनें बहुमूल्य त्यानें, म्हणजे अंत:करणांतील गुप्‍त मनुष्यपणानें जी अविनाशी शोभा”1१पेत्र३:३,४. ती प्राप्‍त करून घेण्याचा प्रयत्‍न करील.WG 54.3

    शीलामध्यें सुधारणा घडून आली नसेल, तर तो पश्चात्तापाचा खरा पुरावा नाहीं. आपलें वचन पुन्हा पाळील, व जे हरण केलें आहे, तें परत देईल, आपलीं पापें कबुल करील, ईश्वर व बंधुवर्गावर प्रेम करील, तर पापी मनुष्य मरणांतून निघून आपण जीवनंत आलों आहों अशी त्यानें खात्री बाळगावी.WG 55.1

    चुकीस पात्र व पापी असे आपण अंत:करणांत प्रेमाचा पाझर फुटुन ओझें हलकें वाटूं लागतें; कारण ख्रिस्तानें घातलेलें जूं हलकें असतें. अशावेळीं कर्तव्याम्त आनंद व स्वर्थत्यागाम्त सुख वाटू लागतें. व पूर्वी जो मार्ग अंधकारमय वाटत होता तोच आतां न्यायीपणाच्या सूर्यकिरणांमुळें प्रकाशमय भासतो.WG 55.2

    ख्रिस्‍तांतील शिलाचें सौदर्य त्याच्या शिष्याच्याठायीं दिसून येईल व ईश्वराच्या इच्छेप्रमाणें चालण्यांतच त्याला आनंद होतो. ईश्वरावर प्रेम, त्याचें वैभव प्राप्‍त होण्याची उत्कट इच्छा, हींच आपल्या प्रभूच्या आयुष्यक्रमास वळण देणारीं सामर्थ्ये होतीं. त्याच प्रेमामुळें त्याच्या सर्व कार्यांस शोभा येऊन त्यांस थोरपणा आला होता. अशा प्रकारचें प्रेम ईश्वरी होय, व तें ईश्वरार्पण न केलेल्या अंत:करणांतच तें सांपडतें. “त्यानें पहिल्यानें आम्हांवर प्रीति केली, म्हणून आम्ही प्रीति करतों.”2१योहान४:१९. ईश्वरी प्रसादानें नव्या झालेला अंत:करणांत प्रेम हेंच कर्माचें मूळ असून तें शील बदलतें; त्याच्या नैसर्गीक उर्मीवर सत्ता करून मनोविकारांस आपल्या ताब्याम्त ठेवितें, व शत्रुत्वास आपल्या स्वाधीन करून घेऊन त्याच्या आवडी थोर प्रकारच्या करितें. अशा रीतीनें आत्म्याच्याठायीं वागवलेलें प्रेम आयुष्यक्रम सुखकर करून सर्व प्रकारें शुद्ध अशा सामर्थ्याचा पाऊस पाडितें.WG 55.3

    देवाच्या लेकरांनीं व विशेषत: जे त्याच्या कृपेवर विश्वास ठेवण्यास नुसतेच आलेले आहेत, त्यांनी दोन प्रकारच्या चुका न होऊं देण्याविषयीं सावधगीरी ठेवावी. पैकीं, पहिलीचा उल्लेख पूर्वी केलेलाच आहे. म्हणजे ईश्वराशीं एकमतानता प्राप्‍त होण्यासाठीं स्वतां केलेल्या गोष्टीवर विश्वास ठेऊन त्यांवर नजर देणें, ही होय. ईश्वरी नियमांचें पालन करण्याच्या बाबतींत स्वताम्च्या कृत्यांनीं पवित्र होण्याचा प्रयत्‍न करणारे लोक केवळ अशक्य अशा गोष्‍टी शक्य करून दाखविण्याचा प्रयत्‍न करतात. ख्रिस्‍ताशिवाय जें सर्व कांहीं मनुष्य करतो, तें आपमतलबानें व पापानें दूषित झालेलें असतें. जिच्या योगानें आपण पवित्र होऊं, ती केवळ एका ख्रिस्ताचीच कृपा विश्वासाच्याद्वारें आपणांस पवित्र करते.WG 56.1

    ह्या पहिल्या चुकीच्या विरुद्ध परंतु तितकीच भयंकर अशी दुसरी चूक म्हटली म्हणजे ख्रिस्‍तावर विश्वास ठेवल्यानें ईश्वरीनियमांचें पालन करण्यापासून आपण मुक्त होतों, व ज्याअर्थी केवळ विश्वासानें मात्र आपणांस ख्रिस्ताच्या कृपेचें भागीदार होता येतें, त्याअर्थी आपल्या तारणाप्रीत्यर्थ कार्यावर नजर देण्याचें कांहीं एक कारण नाहीं अशी समजूत.WG 56.2

    परंतु ह्याठिकाणीं पहा, कीं आज्ञाधारकत्व म्हणजे केवळ बाह्यात्कारी दुसर्‍याच्या इच्छेस मान देणें नव्हें; तर प्रेमळ अंत:करणानें केलेली सेवा. ईश्वरीनियम म्हणजे त्याच्या शीलाचें प्रगटीकरण, व प्रेमाचें--उदात्त तत्त्वाचें--दृश्य असें स्वरूप होय, व म्हणून तो स्वर्गावरील व पृथ्वीवरील त्याच्या साम्राज्याचा पाया आहे. जर आपलीं अंत:करणें ईश्वराशीं सादृश्य पावतील अशीं बनविलीं, व आत्म्यांत प्रेमवृक्षाचें बीज लाविलें, तर आपल्या आयुष्यक्रमांत ईश्वरीनियम शेवटास जाणार नाहींत काय ? मनुष्याच्या अंत:करणांत प्रेमवृक्षाचें बीज लावलें जातें, व त्यास उत्पन्न केलें त्या परमेश्वराच्या प्रतिमेवरहुकूम तो बनविला जातो, तेव्हां “मी आपले नियम त्यांच्या हृदयांत घालीन, आणि ते त्याच्या मनावर लिहिन.”1इब्री१०:१६. हा शास्त्रवचनाचा नवा करार पूर्ण होतो. आणि जर ते नियम अंत:करणावर लिहिले तर ते आयुष्यक्रमास योग्य वळण देणार नाहींत काय ?WG 56.3

    आज्ञापालन म्हणजे सेवा, व प्रेमळतेंचें स्वार्पण हींच शिष्यत्वाचीं खरीं लक्षणें आहेत. “देवावर प्रीति करणें म्हणजे आपण त्याच्या आज्ञा पाळणें हेंच आहे.” “मला त्यांचे ज्ञान आहे असें म्हणुन जो त्याच्या आज्ञा पाळीत नाहीं, तो लबाड आहे, त्यांत सत्य नाहीं.”2योहान्न५:३; २:४. जिच्यायोगानें ख्रिस्‍ताच्या कृपेचे आपण भागीदार होतों, ती एकच गोष्‍ट म्हणजे श्रद्धा ही होय. ती मनुष्याला आज्ञापालनाच्या जबाबदारीतून सोदविण्याच्याऎवजी त्यास आज्ञापालनास समर्थ करतें.WG 57.1

    स्वेच्छेच्या आज्ञापालनानें मुक्ति मिळत नाहीं कारण ती ईश्वराची परंतु फुकट मिळणारी देणगी आहे. परंतु आज्ञापालन हें श्रद्धेचें फळ आहे. “तुम्ही जाणतां, कीं तों पापें हरण करावीं म्हणून प्रगट झाला, त्याच्याठायीं पाप नाहीं. जो कोणी त्याच्याठायीं राहतो, तो पाप करीत नाहीं.”3१योहान्न३:५,६. परिक्षा आहे ती ह्याच ठिकाणी. आपण ख्रिस्तांत राहिलों, व ईश्वराचें प्रेम आपणांत वास्तव्य करीत असेल, तर आपल्या भावना, आपले विचार, आपली कृत्यें ही त्याच्या पवित्र नियम शास्त्रांतील आज्ञांत दर्शविल्याप्रमाणें त्याच्या इच्छेशीं अनुरूप अशी होतील. “लेकरांनो, कोणी तुम्हांस बहकांवू नये. जसा तो धार्मिक आहे, तसा धर्मानें वागणाराहि धार्मिक आहे.”4योहान्न३:७. सीना डोंगरावर ईश्वरानें दिलेल्या दहा आज्ञांत सांगितलेल्या पवित्र नियमांच्या उच्च प्रमाणानें नीतिमत्त्वाची व्याख्या ठरविली जाते.WG 57.2

    ईश्वराच्या आज्ञा पाळण्यापासून मनुष्यांस मुक्‍त करणारा ख्रिस्‍तांतील विश्वास म्हणुन ज्यांस म्हणतात तो खरा विश्वास नव्हे, तर तो खोटा आहे. “कृपेनेंच विश्वासाच्या द्वारें तुमचें तारण झालें आहे.”5इफिस२:८. परंतु “विश्वासाला जर क्रिया नाहींत, तर तो जात्याच निर्जीव आहे.”6याकोब२:१७. पृथ्वीवर येण्यापूर्वी येशूनें स्वतांविषयीं म्हटलें होतें, “हें माझ्या देवा, तुझा मनोदय साधायाला मी इच्छितों, आणि माझ्या अंतर्यामांत तुझें नेमशास्‍त्र आहे.”1गीत४०:७. त्याच्या स्वर्गारोहणाच्यापूर्वी थोडा वेळ अगोदर तो म्हणाला “मी आपल्या बापाच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतींत राहतों.”2योहान्न१५:१०. शास्त्रांत सांगितलें आहे, “आणि आम्ही त्याच्या आज्ञा जर पाळतों, तर त्यावरून आम्ही जाणतों कीं आम्हांस त्याचे ज्ञान आहे. मी त्यामध्यें राहतों, असें म्हणणार्‍यानें तो चालला तसें स्वत:ही चाललें पाहीजे,” “कारण ख्रिस्तानेहि तुम्हांसाठीं सोशिलें, तुम्ही त्याच्या पावलास अनुसरावें म्हणुन तुम्हांकरीता कित्ता घालून ठेविला आहे.”3१योहान्न२:३-६; १पेत्र. २:२१WG 57.3

    सार्वकालिक जीवनाच्या अटी--आपल्या प्रथम पूर्वजांच्या पतनापूर्वी एदेन बागांत अगदीं जशा होत्या तशाच, म्हणजे ईश्वरी नियमांचें पूर्ण पालन, पूर्ण नीतिमत्त्व - पूर्वी जशा होत्या तशाच त्या आता आहेत. ह्यापेक्षा कमी दर्जाच्या अटीवर जर सार्वकालिक जीवन दिलें असतें, तर सर्व जगाचें सुखास धोका आला असता व पापास त्याच्या दु:ख व हालापेष्‍टांच्या परिवारासह सर्वकाळ मोकळा मार्ग झाला असता.WG 58.1

    पतनापूर्वी आदामास ईश्वरी नियमांचें पालनानें नीतिमत्त्वाचें शील बनविणें शक्य होतें. परंतु तसें करण्यास तो चुकला, व म्हणून त्याच्या पापानें आमचा स्वभाव नीच दशेस आला व आमचें आम्हांस नीतिमान होतां येईनासें झालें. आपण पापी, अपवित्र असल्यामुळें आपणां स्वतांस ईश्वराचा पवित्र नियम पूर्णपणें पाळता येत नाहीं. ईश्वरी नियमांचे परिपालनाचे हक्कांस मिळवितां येण्याजोंगें आमचें स्वतांचें नीतिमत्व नाही, परंतु ख्रिस्तानें आम्हांसाठीं यांतून पार पाडण्याचा मार्ग तयार केला आहे. आयुष्यक्रमातिल ज्या परिक्षाम्स व मोहास आपणांस तोंड द्यावयाचें असतें, त्याच परिक्षाम्च्या व मोहांच्य आयुष्यक्रम चालविला, तो आम्हांसाठीं मरण पावला, व त्यानें आमचीं पापें पत्करून आम्हांस नीतिमत्व दिलें. तुम्ही आपणांला त्याला वाहून घ्याल व त्यास तुमचा तारणारा म्हणुन स्वीकराल, तर तुमचें जिणें पापी असतांहि केवळ त्याच्याचमुळें तुम्ही नीतिमान ठराल. तुमच्या शिलाऎवजी ख्रिस्ताचें शील उभे राहतें व जणूं काय तुम्हीं पाप केलेंच नव्हतें अशा स्थितींत ईश्वर तुमचा स्वीकार करतो, इतकेंच नव्हें, तर ह्याहिपेक्षां जास्त म्हणजे प्रभु ख्रिस्त अंत:करणाचा पालट करतो. विश्वासानें केवळ तो तुमच्या अंत:करणांत वास करितो. त्याजबरोबरचा हा संबंध तुम्ही विश्वासानें व त्याच्या इच्छेस सर्वदा वाहून घेण्यानें राखावयाचा आहे; व जोपर्यंत तुम्ही असें करीत राहाल, तोपर्यंत तो तुमच्या अंत:क्रणांत त्याच्या सदिच्छेप्रमाणें करण्याचें कार्य करील. म्हणून तुम्ही असें म्हणावें, कीं “देहांत जें माझें जिणें आहे, तें ज्या देवाच्या पुत्रानें मजवर प्रीति केली, व आपणांला मजकरिता दिलें त्यावरील विश्वासात आहे.”1गलती२:२०. म्हणून प्रभु ख्रिस्त आअलुआ शिश्यांस म्हणतो, “बोलणारे तुम्हीं नाहीं, तर तुमच्या बापाचा आत्मा हाच तुम्हांमध्यें बोलणारा आहे.”2मत्तय१०:२० प्रभु ख्रिस्त तुमचेठायीं कार्य करीत असतां तोच (ख्रिस्ताचा) आत्मा व तीच कृत्यें--नीतिमत्वाचीं व आज्ञापालनाची--तुमचेठायीं दिसून येतील.WG 58.2

    बढाई मारतां येण्याजोगें असें आपणांजवळ स्वतांचें कांहींएक नाहीं. स्वतांस थोर मानावयास आपणांस कांहीं कारण नाहीं. आपणांस दिलेल्या ख्रिस्ताच्या नीतिमत्त्वांत व आपणांमध्यें कार्य करणार्‍या ख्रिस्ताच्या आत्म्यानें घडवून आनलेल्या क्रियेंतच अशा मानण्यास आपणांस जागा आहे.WG 59.1

    श्रद्धेविषयी आपण बोलतों, तेव्हां एक फरक लक्षांत ठेवण्यासारखा आहे. श्रद्धेहून अगदीं भिन्न असा एक प्रकारचा विश्वास आहे. ईश्वराचें व त्याच्या सामर्थ्याचें अस्तित्व, त्याच्यावचनाची सत्यता ह्या गोष्‍टी सैतान व त्याचे अनुयायी यांसहि नाकबूल करितां येत नाहीं. शास्‍त्रांत सांगितलें आहे, कीं “भुतेंही विश्वास धरितात व कांपतात.”3 याकोब२:१०.. परंतु ही कांहीं श्रद्धा नव्हें, जेथें ईश्वराच्या वचनावर नुसता विश्वासच नव्हें, तर त्याच्य इच्छेस मान देणें, अंत:करण त्यास वाहून घेणें, त्याचीच आवड धरणें हीं आहेत त्यास श्रद्धा--प्रेम करणारी व आत्म्यास पवित्र करणारी-असें म्हणतात. अशा श्रद्धेनें अंत:करणाचा ईश्वरी स्वरूपांत पालट होतो. आणि जें अंत:करण त्याच्या न पालटलेल्या अशा स्थितींत ईश्वरी नियमांच्या अंकित नसतें, व तें तसें असणें शक्यहि नाहीं, तेंच आतां पालटलेल्या स्थितींत त्याच्या पवित्र आज्ञांचें पालन करण्यांत आनंद मानितें व गीतकर्त्याबरोबर “तुझें शास्त्र मी केवढें प्रिय मानितों ? सारा दिवस तें माझ्या ध्यानाचें आहे.”1गीत११९:९७. व ईश्वरी नियमांचें नीतिमत्त्व आपलेठायीं पूर्ण होतें, म्हणजे आपण “देहाप्रमाणें नव्हें तर आत्म्याप्रमाणें चालणारे”2रोम८:४. असें होतों.WG 59.2

    ख्रिस्ताचें क्षमा करणारें प्रेम ओळखणारे व खरोखर ईश्वराची लेंकरें होंण्याची इच्छा बाळगणारे असें कांहीं असतात, परंतु त्यांस आपलें शील असावें तसें नाहीं, व आपलें जिणें अपराधाचें (पापाचें) आहे असा अनुभव येतो, व ते आपल्या अंत:करणाचा पवित्र आत्म्यानें पालट केला आहे किंवा नाहीं ह्याबद्दल साशंक असतात. अशा लोकांस माझें सांगणें आहे, कीं बाबानों, असे हताश होऊन माघार घेऊं नका. आपल्या कोतेपणामुळें व अपराधांमुळें प्रभु ख्रिस्‍ताचे पायाशीं आपणांस वारंवार लोटांगण घालावें लागेल. आपणांस केवळ निराश व्हावयाचें नाहीं. शत्रुनें जरी आपणांवर पगडा बसविला असला, तरी ईश्वरानें आपणांस सोडलें नाहीं व आपला नाकारही केला नाहीं; खरोखरच नाहीं. ख्रिस्त हा देवाच्या उजवीकडे बसून आपणांसाठीं मध्यस्थी करीत आहे. प्रिय प्रेषित योहानानें म्हटलें आहे, “तुम्ही पाप करुं नये. म्हणून हें मी तुम्हांस लिहितों. जर कोणीं पाप केंलेंच तर धार्मिक असा जो येशू तो बापाजवळ आमचा कैवारी आहे.”3१योहान्न२:१. “बाप स्वतां तुम्हांवर प्रीति करतो”4योहान्न१६:२७. हे आपल्या प्रभु ख्रिस्ताचे शब्द विसरुं नका. बापाकडे तुम्हांस परत आणण्याची व स्वताम्ची शुद्धता व पवित्रपणा हीं तुमचें ठायी प्रतिबिंबित झालेली पाहण्याची त्याची इच्छा आहे. तुम्ही मात्र त्यास आपणांला वाहुन घ्याल, तर ज्यानें तुमचेठायीं चांगलें काम करण्याचें पत्करलें आहे असा प्रभु ख्रिस्त तें आपला दिवस येईपर्यंत तसेंच चालू ठेवील. अधिक उत्कठेंनें प्रार्थना करा, व पूर्णपणें विश्वास ठेवा. आपल्याच सामर्थ्यावर आपला विश्वास नाहीं, तर त्या तारकाच्या सामर्थ्यावर विश्वास नाहीं, तर त्या तारकाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेऊं या, व आपल्या देहाचें आरोग्य जो प्रभु ख्रिस्त त्याची स्तुति करूं या.WG 60.1

    जसजसे अधिक तुम्ही ख्रिस्ताजवळ येता, तसतसे आपण अधिक अपराधी आहों, असें तुमच्या नजरेस येतें; कारण तुमची दृष्‍टी अधिक स्वच्छ होईल, व प्रभूच्या पूर्ण अशा स्वभावाशीं अगदीं विरुद्ध असणारा तुमचा कोतेपणा ठळठळीतपणें तुमच्या दृष्‍टीस पडेल. सैतानाच्या मोहाचें सामर्थ्य नष्‍ट होऊन देवाच्या आत्म्याचें सामर्थ्य तुम्हांस जागृत करीत आहे हा ह्या गोष्‍टीचा पुरावा आहे.WG 61.1

    ज्या अंत:करणास आपल्या पापीपणाची ओळख पडत नाहीं, त्या अंत:करणांत ख्रिस्तीविषयीं अढळ प्रेम वास करीत नाहीं. ख्रिस्ताच्या कृपेनें बदललेला आत्मा त्याच्या दैवी शीलाची वाखाणणी करील. परंतु आपण जर स्वतांची नीतिभ्रष्‍टता पाहनार नाहीं, तर ख्रिस्‍ताचें सौंदर्य व त्याची उत्कृष्‍टता हीं आपल्या नजरेस येणार नाहींत हाहि एक बिनचुक पुरावा आहे.WG 61.2

    जसजसे आपण स्वतांस कमी लेखूं. तसतशी आपल्या तारकाच्या अमर्याद पवित्रतेची व सौंदर्याची आपण अधिकाधिक तारीफ करूं आपल्या पापीपणाचें दृश्य झालेलें स्वरूप आपणांस त्या प्रेम करणार्‍या ईश्वराकडे नेईल. आणि आपल्या दुर्बलतेची साक्ष पटविणारा आत्मा जेव्हां ख्रिस्तामागून जाईल तेव्हां तो आपलें सामर्थ्य त्याच्या नजरेस आणील, आपल्या गरजांची जाणीव जसजशी आपनांस त्याच्याकडे व त्याच्या वचनाकडे नेईल, तसतसे त्याच्या शीलाविषयीं आपलें विचार अधिक होत जातील व पूर्णपणें त्याचें स्वरूप आपल्याठायीं प्रतिबिंबित होईल.WG 61.3