Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    पवित्रशास्त्राकडे बोट करून मनुष्याला दाखविणें

    लिहिलेले संदेश नवीन प्रकाश देण्यासाठी नसून अगोदरच प्रगट झालेले प्रेरणेचे सत्य अंत:करणावर स्पष्टरित्या उमठावे म्हणून दिलेले आहेत. देवाच्या वचनांत देवाशीं कर्तव्य स्पष्टपणे दाखविले आहे, तरी आपणापैकी फारच थोडेजण या दिलेल्या प्रकाशाप्रमाणे चालत आहेत. अधिक सत्य दर्शविलेले नाही, पण देवाने अगोदरच दिलेले सत्य या संदेशाद्वारे सोपे केले आहे. त्याच्या स्वत:च्या मार्गाने त्याद्वारे त्यांच्या मनावर परिणाम होण्यास, त्यांना जागृत करण्यास दिले आहेत. अशासाठीं कीं त्यांना कांही निमित्त सांगता येऊ नये. देवाच्या वचनाचा दर्जा कमी करण्यासाठी हें संदेश दिलेले नसून त्याकडे लोकांचे लक्ष वेधविण्यास व उंचावण्यास दिले आहेत. अशासाठीं सत्याचा सुंदर साधेपणा सर्वांच्या मनावर ठसावा. 25T 665;CChMara 145.2

    संदेशाचा आत्मा पवित्रशास्त्राची जागा घेण्यासाठी दिलेला नव्हता. कारण पवित्र शास्त्र म्हणते कीं, देवाचे वचन हाच दर्जा असून त्याद्वारे सर्व शिकवण व अनुभव यांची कसोटी लागली पाहिजे. यशया म्हणतो, “धर्म-शास्त्र व संदेश याकडे पाहा. याप्रमाणे तें न बोलले तर त्याच्याकरता प्रभात समय नाही.” यशया ८:२०. 3GG Introduction, P. VIl;CChMara 145.3

    बंधु क्ष, देवाच्या वचनाशिवाय संदेशाच्या लेखाद्वारे देवाने दिलेला प्रकाश हा अधिक प्रकाश दिलेला आहे असें दिसण्यासाठी खटपट करून स्वत:च्या मनाचा गोंधळ करून घेतो. याद्वारें आपल्या वचनाकडे आपल्या लोकांचे लक्ष वेधवावे. असें देवाला योग्य वाटले. अशासाठी त्याना वचनाचा स्पष्ट समज मिळावा. देवाच्या वचनाद्वारे गोंधळून गेलेले मन प्रकाशित करण्यास पुरेसे आहे व ज्यांना तें समजून घेण्याची इच्छा आहे त्यांना तें समजावे. तथापि जे देवाच्या वचनाचा अभ्यास करतात तें त्या वचनाच्या शिक्षणाविरुद्ध वागताना आढळून येतात. याकरता पुरुषांना, स्त्रियांना कांही निमित्त सांगता येऊ नये म्हणून देव स्पष्ट व नक्की संदेश देऊन देवाच्या वचनाकडे त्यांना आणतो म्हणजे त्याप्रमाणे चालण्यास दुर्लक्ष केलेल्या देवाच्या वचनाकडे आणतो. देवाचे वचन साधारण तत्त्वांत इतकें विपुल आहे कीं त्याकडून जीविताच्या योग्य संवया लावतां येतात, सर्वसाधारण व व्यक्तिवाचक संदेश या तत्त्वांकडे त्यांचे लक्ष वेधविण्याकरता योजिले आहेत.CChMara 145.4

    मी मौल्यवान् पवित्रशात्र घेतले व मंडळीकरिता दिलेल्या सल्ल्याने तें वेष्ठिले होतें. मी म्हणते, अशा सर्व बाबी मिटविल्या आहेत. जी पापें त्यांनी घालवून दिली पाहिजेत ती दर्शविण्यात आली आहेत. त्यांना जो सल्ला तो त्यांना येथे सापडेल. तो त्याच्याकरतां इतराना दिलेला होता. कानूवर कानू, नियमावर नियम देण्यास देवाला आनंद झाला आहे.CChMara 145.5

    पण या संदेशात वास्तविक काय आहे हें तुम्हांपैकी फार थोड्यांना माहीत आहे. तुम्हांला शास्त्राची माहिती नाहीं. जर तुम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास केला असतां व त्याद्वारे पवित्रशास्त्राचा दर्जा मिळविण्याची इच्छा बाळगून ख्रिस्ती तत्त्वे मिळविली असती तर तुम्हांला या संदेशांची गरज नसती. देवाच्या प्रेरित ग्रंथांशी संबंध ठेवण्यास तुम्ही निष्काळजीपणा केल्यामुळे त्यानें तुम्हांला साधे व नक्की संदेश देण्याचे योजिले. संदेशाच्या वचनाकडे तुमचे लक्ष लावून त्याचे पालन करण्यास व तुमची जीविते त्यांतील शुद्ध व उच्च शिक्षणाद्वारे जगण्यास देवाने योजिले आहे. 45T 663-665;CChMara 145.6

    मला असें दाखविण्यांत आलें कीं, संदेशाच्या पुस्तकांवर अविश्वास दाखविल्याकडून देवाचे लोक प्रकाशाला पारखे झाले आहेत. अविश्वासामुळे त्यांचे नेत्र झाकले आहेत अशासाठीं कीं, त्यांना त्यांची खरी स्थिति समजू नये. देवाच्या आत्म्याचे संदेश त्याच्यासाठीं नसून त्यांची त्यांना पर्वा नाहीं असें त्यांना वाटते. अशाना देवाच्या कृपेची व आत्मिक ज्ञानाची फार मोठी गरज आहे अशासाठीं कीं, त्यांना आत्मिक ज्ञानाची उणीव शोधता यावी.CChMara 146.1

    जे सर्व सत्यापासून बहकले आहेत तें आपल्या मार्गाविषयौँ कारण देतात व सदेशावर विश्वास नाहीं असें दर्शवतात, प्रश्न असा आहे कीं, देवाला नापसंत असणार्‍य मूर्तीला तें वश होणार आहेत किंवा त्याच्या चुकीच्या मार्गात चालून ज्या गोष्टींत त्यांना आनंद वाटतो त्या गोष्टींची नापसंती दाखविण्यास देवाने दिलेला प्रकाश नाकारणार आहेत ? सोडवावयाचा प्रश्न ह कीं, मी स्वत:चा नाकार करून जे संदेश माझी पापें दर्शविण्याकरता देवाने दिले आहेत त्यांचा स्वीकार करावा.CChMara 146.2