Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    मिसेस इ.जी.व्हाईट यांचे जीवन चरित्र व कार्य

    एलन जी. हार्मन आणि तिची जुळी बहीण या, अमेरिकेतील इशान्य बाजूच्या प्रदेशांतील गोरहॅम, मेन या ठिकाणी १८२७ च्या नोव्हेंबर २६ तारखेस जन्मल्या. नऊ वर्षांची असतांना तिच्या वर्गातील अविचारी वर्गसोबत्याने तिला दगड मारून जखमी केले. अशा प्रकारे तोंडावरील भयंकर जखमेमुळे तिचा अंत झाला असतां पण ती थोडक्यांत वाचली व अशा दुर्बलावस्थेत तिला पडून राहावे लागले. तिला शाळेला जाता येईना.CChMara 16.2

    अकरा वर्षांची असतांना तिने आपले अंत:करण देवाला दिले. त्यानंतर लवकरच तिचा समुद्रात बुडून बाप्तिस्मा झाला व मेथाडिस्ट मंडळींत तिला मिळवून घेतले; आपल्या कुटुंबातील इतर सभासदांबरोबर पोर्टलैंड मेन येथील अॅडव्हेंटिस्ट सभांना ती हजर राहिली. विल्यम मिलर व त्यांचे सहकारी यांनी दिलेल्या ख्रिस्ताच्या द्वितीयागमनाच्या संदेशाचा पूर्णपणे स्वीकार केला व ख्रिस्ताच्या द्वितीयागमनाची ती वाट पाहूं लागली.CChMara 16.3

    १८४४ च्या डिसेंबर महिन्याच्या एके सकाळी ती दुसर्‍य चार स्त्रियांबरोबर प्रार्थना करीत असतां तिच्यावर देवाचे सामर्थ्य आलें. पहिल्यानें ती पृथ्वीवरील गोष्टीपासून वेगळी झाली. नंतर लाक्षणिक प्रगटीकरणांत देवाच्या नगराकडे अॅडव्हेंटिस्ट लोक चाललेले व विश्वासणाच्याचे प्रतिफळ तिने पाहिलें, भीत भीत व कांपत कापत या १७ वर्षे वयाच्या मुलीने सर्व हकीकत व येणारे दृष्टांत पोर्टलँड येथील सोबतीच्या विश्वासणार्‍यांना सांगितलें. मग संधि मिळेल त्याप्रमाणे तिने मेन वे जवळच्या संस्थानांतील अॅडव्हेंटिस्ट जमावाला दृष्टांत सांगितला. CChMara 16.4

    १८४६ च्या ऑगस्ट महिन्यात, एलन हार्मन इचा जेम्स व्हाईट या तरुण अॅडव्हेंटिस्ट पाळकाशी विवाह झाला. पुढच्या ३५ वर्षांत मिसेस व्हाइट यांचे आयुष्य आपल्या नवर्‍यबरोबर अखंड सुवार्तेच्या कार्यात, तिचा नवरा ऑगस्ट ६, १८८१ मध्ये मरेपर्यंत गुंतले गेले. ती दोघे सर्व अमेरिकेत सुवार्ता गाजवीत व लिखाण करीत पेरीत व बांधणी करीत, संघटना करीत व कार्याची व्यवस्था पाहात प्रचार करीत होती. CChMara 16.5

    वेळ आणि कसोटी यावरून एल्डर आणि मिसेस व्हाईट व त्यांचे सहकारी यांनी किती विस्तारपूर्वक व भक्कम पाया घातला व किती चांगल्या रीतीने व विचाराने त्यांनी बांधणी केली हें सिद्ध होतें. त्यांनी शब्बाथ पाळणार्‍य अॅडव्हेंटिस् लोकांत प्रकाशनाच्या कार्याची १८४९ तें १८५० पासून सुरुवात केली. शेवटल्या ५० वर्षांत मंडळीची संघटना मंडळींच्या आर्थिक बाबीसह वाढविली. याचा कळस १८६३ त से. डे. अॅडव्हेंसिस्ट लोकांचे जनरल कॉन्फरन्स स्थापन करण्याने झाला. मध्यंतरीच्या ६० साली आमच्या वैद्यकीय कार्याची सुरवात झाली व ७० सालाच्या आरंभी आमच्या संस्थेच्या शैक्षणिक कार्याची स्थापना झाली. १८६८ त वार्षिक कॅपच्या सभा भरविण्यास सुरुवात झाली व १८७४ त से. डे. अॅडव्हेंसिस्ट संस्थेने आपला पहिला मिशनरी पाठविला.CChMara 16.6

    या सर्व बाबींचे मार्गदर्शनात आपल्या लोकांना देवाने दिलेला तोंडी व लेखी सल्ला मिसेस व्हाईट यांच्याद्वारे मिळाला. CChMara 17.1

    पहिले बहतेक दृष्टांत खाजगी पत्राद्वारे लिहिण्यात आलें होतें व ‘हल्लीच्या काळासाठी सत्य,’ यो आमच्या पहिल्या प्रकाशनांतील लेखाद्वारे देण्यांत आलें होतें. १८५१ त मिसेस व्हाईट यांचा “ख्रिस्ती अनुभव व मते यांचा आराखडा’ या नावाचे ६४ पानांचे पहिले पुस्तक छापण्यांत आलें. CChMara 17.2

    १८५५ तें “मंडळींकरिता साक्ष’ या नावाच्या अनेक हस्तपत्रिका छापण्यांत आल्या. याकडून वेळोवेळी देवाने द्यावयाचे शिक्षण व सुधारणा आपल्या लोकांना आशीर्वाद देण्यास, कान उघाडणी करण्यास व मार्गदर्शन करण्यास शक्य झाले. या माहितीसाठी सतत येणार्‍य मागण्या पुर्‍या करण्यासाठी १८८५ मध्ये याची चार पुस्तके व १८८९ तें १९०९ मध्ये अस्तित्वात आलेले दुसरे ग्रंथ मिळून नऊ ग्रंथ “मंडळींकरिता साक्षीचे’ ग्रंथ या नावाने पुन: छापिले गेले. CChMara 17.3

    व्हाईट कुटुंबात चार मुले जन्मली. वडील मुलगा हेन्री १६ वर्षांचा होईपर्यंत जगला. सर्वांत लहान मुलगा हरबर्ट हा तीन महिन्यांचा असतांनाच वारला. मधले एडसन व विल्यम या नावाचे दोन मुलगे मोठे होऊन से.डे. अॅ. संस्थेत कर्तबगार कामगार झाले. CChMara 17.4

    जनरल कॉन्फरन्सच्या विनंतीला उत्तर म्हणून मिसेस व्हाईट १८८५ च्या उन्हाळ्यांत युरोपला गेल्या. तेथें त्यांनी नवीन सुरु झालेल्या कार्याला बळकटी आणीत दोन वर्षे घालविली व स्वीत्झरलंडमधील बासेल या ठिकाणी त्या राहूं लागल्या आणि युरोपच्या दक्षिण, मध्य व उत्तर भागांतील सर्व मंडळींच्या सार्वजनिक सभांना हजर राहून सभासदांना त्यांनी भेटी दिल्या.CChMara 17.5

    चार वर्षे अमेरिकेत राहिल्यानंतर ज. कान्फरन्सच्या विनंतीला मान देऊन त्या वयाच्या ६३ व्या वर्षी आस्ट्रेलियाला गेल्या. तेथें नऊ वर्षे राहून कामाची सुरुवात करून शैक्षणिक व वैद्यकीय कार्याची वाढ केली. १९०० सालांत मिसेस व्हाईट अमेरिकेला परतल्या व पश्चिमेकडील भागांत त्यांनी घर केले. त्या ठिकाणाचे नाव सेंट हेलेना, कॅलिफोर्निया असें असून त्या ठिकाणी १९१५ त मरेपर्यंत त्या राहिल्या.CChMara 17.6

    मिसेस व्हाईट यांची अमेरिकेतील ६० वर्षांची मोठी सेवा व परदेशांतील १० वर्षांच्या सेवेच्या काळांत त्यांना सुमारे २००० दृष्टांत देण्यांत आलें. त्याद्वारे त्यांनी व्यक्तिवाचक सल्ला देणे, मंडळ्या, सभा आणि जनरल कान्फरन्सद्वारे या मोहीमेची मोठी वाढ करण्यांत खटपट केली. ज्यांना संदेश देण्याचे कार्य त्यांच्याकडे होतें, तें केव्हाह थांबले नाही.CChMara 17.7

    त्यांचे लिखाण सुमारे १ लक्ष पानांचे वर आहे. त्यांच्या लेखणीद्वारे लोकांना वेगवेगळे संदेश व्यक्तिवाचक भेटीद्वारे, संस्थेच्या मासिकांतील लेखांद्वारे व त्यांच्या पुष्कळ पुस्तकांद्वारे देण्यांत आलें. त्यांतील लिखाणांचा, पवित्रशास्त्राचा इतिहास, रोजचे ख्रिस्ती जीणे, आरोग्य, शिक्षण, सुवार्ताप्रसार व दुसरे व्यावहारिक विषय यांच्याशी संबंध आहे. त्यांच्या ४६ पुस्तकांपैकी कांही पुस्तके जगांतील मुख्य भाषेंत छापली आहेत व लाखो प्रती विकण्यात आल्या आहेत. CChMara 17.8

    वयाच्या ८१ व्या वर्षी मिसेस व्हाईट यांनी १९०९ मध्ये भरलेल्या जनरल कॉन्फरन्सला हजर राहण्यासाठी खंड सोडण्याची ही शेवटली वेळ होती. त्यांच्या आयुष्याची शेवटली ६ वर्षे वाङ्मयाची पूर्णता करण्यासाठी खर्च केली. आयुष्याच्या अगदी शेवटी मिसेस व्हाईट यांनी पुढील शब्द लिहिले आहेत. “माझा जीव राहो किंवा जावो माझे लिखाण सतत बोलेल आणि त्याचे कार्य शेवटपर्यंत पुढे जाईल.” CChMara 18.1

    आपल्या तारणाच्यावरील विश्वासाने व धैर्याने त्या १९१५ च्या जुलै १६ ला स्वगृही मृत्यू पावल्या व बॅटलक्रिक, मिचिंगनमधील ओक हील कबरस्तानात त्याचा नवरा व लेकरे यांच्या बाजूला त्यांना पुरले.CChMara 18.2

    त्यांच्या सोबतीची कामगार मंडळी व कुटुंबातील सभासद यांच्याकडून त्या एक भक्तीशील, उत्साही माता व उदार आणि कधीं न थकणारा धार्मिक कामदार असा त्यांचा आदर करण्यांत आला त्यांनी मंडळींत कधीही अधिकारी म्हणून काम केले नाही. मंडळी व त्या स्वत: असें समजत असत कीं देवापासून मिळालेला संदेश देणाच्या त्या निरोप्या होत्या. त्यांच्याकडे पाहण्यास त्यांनी कधीहि सांगितलें नाही व आर्थिक लाभासाठी व नावलौकिकासाठी त्यांनी कधीहि आपल्या देणगीचा उपयोग केला नाही. त्यांचे जीवित व त्यांची सर्व मालमत्ता ही सर्व देवांच्या कार्यासाठी वाहन दिली होती.CChMara 18.3

    त्यांच्या मृत्युसमयी “इंडिपेडेंट” नावाच्या एका साप्ताहिकाचा संपादक १९१५ ऑगस्ट २३ च्या अंकात त्यांच्या फलदायी जीविताविषयी पुढील अभिप्राय व्यक्त करतो, “त्यांची आपल्या दृष्टांतावर निस्सीम श्रद्धा होती त्यांचे जीवित अगदी त्याबरहुकूम होतें. त्यांनी कधीं आत्मिक गर्व केला नाही. घाणेरडी द्रव्यप्राप्ति करून घेतली नाही. त्या लायक भविष्यवाद्याचे कार्य करीत जीवन जगल्या.” CChMara 18.4

    त्यांच्या मरणापूर्वी कांही वर्षे मिसेस व्हाईट यांनी एकविश्वस्त मंडळ स्थापन केले. त्यांत मंडळींचे प्रमुख पुरुष असून त्यांच्यावर त्यांच्या वाङ्मयाच्या छपाईची व संरक्षणाची काळजी सोपविली होती. वॉशिंग्टन डी. सी. मधील जनरल कान्फरन्सच्या आफिसात हें मंडळ ई. जी. व्हाईटच्या पुस्तकांत इंग्रजीत प्रकाशन करते व इतर भाषेंत सर्व किंवा कांही अंशी प्रकाशन करण्यास उत्तेजन देत. त्यांनी आणखी मिसस व्हाईट यांच्या सल्यानुसार जुळतील अशी मासिके व पत्रके यांचा ग्रंथसंग्रह प्रकाशित केला आहे हा ग्रंथ या मंडळीच्या अधिकाराने छापला जातो.CChMara 18.5