Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    परिचय

    खिस्ताला भेटण्याची तयारी करणे

    जे गृह तयार करण्यासाठी येशू गेला आहे त्या गृहाकडे आपणांस घेऊन जाण्याची जी वेळ आहे त्या वेळेची सेवंथ-डे-अॅडव्हेंटिस्ट लोक मोठ्या आतुरतेने वाट पहात आहेत. त्या स्वर्गीय गृहात कोणत्याही प्रकारची निराशा, दु:ख, पाप, भूक, गरिबी, आजार किंवा मृत्यु नसणार. विश्वासणार्‍य करीता मिळणाच्या अशासंधीविषयी प्रेषित योहान विचार करीत असतां म्हणाला, “आपणांस देवाची मुलें हें नाव मिळाले यांत पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे तें पाहा......, आणि आपण आता देवाची मुलें आहों. आणि आपण पुढे काय होऊ हें अजून प्रगट झाले नाही. तरी आपल्याला हें माहीत आहे कीं, तो प्रगट झाल्यास आपण त्यासारिखे होऊं ” १ योहान ३:१,२. CChMara 7.1

    शीलाने येशूसारखे होणे हें देवाचे आपल्या लोकांसाठी ध्येय आहे. अगदी आरंभापासून देवाची हीच योजना होती कीं आपल्या प्रतिरूपाप्रमाणे निर्माण केलेल्या मानवी कुटुंबातील सभासदांनी देवी शील वाढवावे. हें साध्य होण्यासाठी आपल्या एदेनांतील मूळ आईबापांनी ख़िस्ताकडून व दूताकडून प्रत्यक्ष शिक्षण घ्यावयाचे होतें पण मनुष्याने पाप केल्यावर स्वर्गीय व्यक्तीशी या बाबतीत कधीही मोकळेपणाने बोलता आलें नाही.CChMara 7.2

    मनुष्याला मार्गदर्शनाशिवाय सोडू नये म्हणून देवाने आपल्या लोकांना आपली इच्छा प्रगट करण्यासाठी दुसरे मार्ग शोधिले. त्या मार्गापैकी एक प्रमुख मार्ग म्हटला म्हणजे भविष्यवाद्याद्वारे .... म्हणजे त्यांनी देवाचे संदेश त्याच्या लोकांस द्यावे अशी त्यांची इच्छा होती, तें स्त्री पुरूष होत. इस्त्राएलांना देवाने स्पष्ट करून सांगितलें कीं, “तुमच्यामध्ये कोणी संदेष्टा असल्यास मी त्यास दृष्टातांत प्रगट होतो आणि स्वप्नांत मी त्याशी भाषण करतो.” गणना १२:६. CChMara 7.3

    देवाचा असा हेतु आहे कीं, त्याच्या लोकांनी, ज्या काळांत तें राहतात व ज्या काळांत तें राहतील त्या काळाचा समज व ज्ञान याविषयीची माहिती व प्रकाश त्यांना मिळावा. “प्रभु परमेश्वर आपले सेवक संदेष्टे यांस कळविल्याशिवाय काहीच करीत नाही.” आमोस ३:७. याकडून प्रकाशाची मुलें म्हणविणाच्या (१ थेस्स ५:५) देवाच्या लोकांची जगांतील लोकांशी तुलना होतें. CChMara 7.4

    भविष्यवाद्याचे काम भविष्य वर्तविण्यापेक्षा अधिक आहे. देवाचा भविष्यवादी मोशे, ज्याने पवित्रशास्त्रांतील सहा पुस्तके लिहिली त्यानें भविष्यकाळांत काय घडणार याविषयी फारच थोडे लिहिले आहे. होशयाने त्याच्या काळाचे विस्तृत वर्णन केले आहे. एका संदेष्ट्याच्या हस्ते परमेश्वराने इस्राएलास मिसर देशातून बाहेर आणिले, दुसर्‍य संदेष्ट्याच्या हस्ते त्यांचे रक्षण करविले. होशया १२:१३.CChMara 7.5

    भविष्यवादी स्वत: नियुक्त नसतो. त्याच्या सोबत्यांनी त्याला निवडलेला नसतो. भविष्यवादी होण्याची व्यक्तिवाचक निवड, जो मनुष्याचे हृदय पाहूं शकतो व जाणू शकतो त्या परमेश्वराच्या हातांतच आहे. एक महत्त्वाची बाब आहे कीं, देवाच्या लोकांच्या इतिहासांत पुरुष व स्त्रिया यांना देवानेच आपल्यासाठी बोलण्यास निवडले.CChMara 8.1

    संदेष्टे म्हणून ज्या स्त्रि- पुरुषांना देवाने पवित्र दृष्टांतात जे प्रगट केले आहे तेवढेच त्यांनी दळणवळणाचे साधन या नात्याने व्यक्त केले आहे व लिहिले आहे. देवाच्या मौल्यवान् वचनाचा त्याच्या संदेशांत समावेश होतो. या भविष्यवाद्याद्वारे मानवी कुटुंबातील सभासदास, ख्रिस्त व त्याचे दूत आणि संतान व त्याचे दूत यांमधील मनुष्याच्या आत्म्याबद्दल चाललेला लढ्याविषयी ज्ञान होताच मार्गदर्शन केले आहे. आम्हांलासुद्धा या जगाच्या अखेरच्या काळांतील लढ्याविषयी आणि त्याच्या कामाची काळजी घेण्याविषयी व त्याला भेटायला थांबलेल्या जमावातील स्त्रीपुरुषांच्या शीलाची पूर्णता करण्याच्या साधनसामुग्रीत तो मार्गदर्शन करीत होता. CChMara 8.2

    पवित्रशास्त्रांतील शेवटले लेखक प्रेषित यांनी शेवटल्या काळांतील घडामोडीचे चित्र रेखाटले आहे. पौलाने कठीण दिवसाविषयी लिहिले, पेत्राने थट्टेखोर लोकांविषयी इशारा दिला व म्हटले कीं शेवटल्या काळांत आपल्याच वासनाप्रमाणे चालणारे येवून म्हणतील कीं, “त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे?” मंडळी या काळांत लढा देत आहे. कारण योहानाने “सैतानाला अवशिष्ट लोकांबरोबर लढाई करावयास जातांना पाहिलें.” CChMara 8.3

    पवित्रशास्त्रांतील लेखकांना दिसले कीं, येशूच्या आगमनावरून त्याच्या लोकांना विशेष प्रकाश व मदत देण्याची योजना होती.CChMara 8.4

    पौल म्हणतो कीं, ख्रिस्ताच्या येण्याची आतुरतेने वाट पाहणारी मंडळी ही अॅडव्हेंटिस्ट मंडळी होय. ती कोणत्याही कृपादानांत उणी पडणार नाही. (१ करिंथ १:७,८) कारण ती एकत्र झालेली, पूर्ण वाढलेली व संदेशाच्या आत्म्याची देणगी व उत्तम मार्गदर्शक यांनी आशीर्वादित केलेली असणार. कारण तिच्यांत प्रेषित, भविष्यवादी, सुवार्तिक, पाळक व शिक्षक आढळणार. (इफिस ४:११) CChMara 8.5

    प्रेषित योहान शेवटल्या काळांतील सभासदांना “अवशिष्ट मंडळी” असें संबोधितो. कारण तें देवाची आज्ञा पाळतात, (प्रगटी, १२:१७) या प्रकारे तो मंडळीला आज्ञा पाळणारी मंडळी म्हणतो. या अवशिष्ट मंडळींत साक्षी म्हणजे संदेशाचा आत्माहि असणार. (प्रगटी १९:१०) CChMara 8.6

    यावरून स्पष्ट दिसते कीं, देवाच्या योजनेत सेवंथ-डे अॅडव्हेंटिस्ट मंडळी म्हणजे भविष्यांतील मंडळी, जेव्हां अस्तित्वांत आली तेव्हां तिच्यांत संदेशाचा आत्मा होता. अनेक शतकांपूर्वी विशेष गरजेच्या वेळी देव आपल्या लोकांशी बोलला तद्वतच कठीण व युद्धाच्या कांही काळांत , पृथ्वीच्या शेवटल्या दिवसांतील आपल्या लोकांशी देवाने बोलावे हें किती रास्त आहे. CChMara 8.7

    भविष्यांतील ही सेवंथ-डे अॅडव्हॅस्टि मंडळी भविष्यांत नमूद केल्याप्रमाणे अस्तित्वात आली. शंभर वर्षांपूर्वी आम्हांमध्ये एक वाणी ऐकू आली. ती ही, “देवाने मला पवित्र दृष्टांतात दाखविले आहे.” CChMara 8.8

    हें गर्वोक्तीचे शब्द नसून, देवाने आपल्या वतीने बोलण्यास पाचारण केलेल्या एका सतरा वर्षे वयाच्या तरुणीचे शब्द होतें. सत्तर वर्षांच्या विश्वासूपणे केलेल्या सेवेद्वारे ही वाणी आम्हांला मार्गदर्शन करीत, सुधारणा करीत व शिक्षण देत आली आहे. तीच वाणी, देवाची निवडलेली सेविका श्रीमती ई. जी. व्हाईट यांच्या अस्खलित लिखाणाद्वारे तयार झालेल्या हजारो पृष्टांद्वारे आज ऐकिली जात आहे.CChMara 9.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents