Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    जेवणाचा नियमितपणा

    ठराविक जेवण झाल्यावर पोटाला पांच तास स्वास्थ्य देण्यांत यावे. दुसर्‍य जेवणाच्या पूर्वी अन्नाचा कणसुद्धा पोटांत जाऊ देऊ नये मध्यंतरीच्या काळांत पोट आपले काम करून आणखी अन्न घेण्याच्या तयारीत राहील, 17CD 179; CChMara 299.1

    जेवणाच्या कामी नियमितपणा काळजीपूर्वक राखिला पाहिजे. दोन जेवणांच्यामध्ये काहीं एक खाऊं नये-मिठाई. शेंगा, फळें अगर कसल्याही प्रकारचा अन्नपदार्थ घेऊ नये. जेवणाच्या अनियमितपणामुळे पचनेंद्रियाचे आरोग्य बिघडते व प्रकृतीच्या शातवृत्तीच्या स्वास्थ्याला तो अपायकारक होतो. मुलें जेवायाला येतात तेव्हां पुढे मांडलेले चांगले अन्न नकोसे वाटते. जे हानिकारक आहे तिकडे त्यांची जीभ चटावलेली असतें. 18MH 384;.CChMara 299.2

    आम्ही आरामासाठी जातो तेव्हां पोटाने आपले काम केलेले असतें म्हणून त्याला व शरीराच्या अवांतर अवयवांना विश्राति पाहिजे असतें.CChMara 299.3

    अन्नासाठीं मूच्छ येते तेव्हां पचनक्रियेच्या अवयवांवर अतिशय ताण पडलेला असतो, असें पुष्कळ प्रकरणी आढळून आलेले आहे. जेवणानंतर पचनेंद्रियांना विसावा पाहिजे असतो, दोन जेवणांमध्ये कमीत कमी पाच-सहा तास लोटू द्यावेत. दिवसातून तीन जेवणापेक्षा दोनच केलेली बरी असें प्रयोगानंतर पुष्कळांना वाटलेले आहे. 19MH 304; CChMara 299.4

    दिवसांतून दोनच जेवणे घेण्याचा प्रघात प्रकृतीसाठी हितावह होतो, असें बहुधा आढळून आलेले आहे, तरी परिस्थितीमुळे कित्येकांना तिसर्‍य जेवणाची जरुरी वाटेल. तथापि त्यासाठी जें कांही घ्यावयाचे तें फार हलकें पचनक्रियेस अतिशय सुलभ होईल असेच असावें. 20MH 321;CChMara 299.5

    विद्यार्थीवर्गावर शारीरिक व मानसिक परिश्रमाने दुहेरी बोजा पडलेला पाहून तिसर्‍य जेवणाविषयीची हरकत पुष्कळांश कमी होतें. परंतु त्याच तें तिसरे जेवण भाजीभाकरीव्यतिरिक्त फळफळांचा साधा व हितकर फराळच असलेला बरा. 21CD 178;CChMara 299.6

    जेवण फार गरम अगर फार थंड असें घेऊ नये. थंड जेवण घेतल्याने पचनेंद्रियाच्या कार्यापूर्वी जठरांतील मौल्यवान् शक्तीकडून त्याला ऊब आणावी लागते. याच कारणामुळे थंड पेये अपायकारक असतात. तसेच मुबलक उष्ण पेयांनी अशक्तता येते. खरे पाहातां जेवणासह द्रवरुप पदार्थ जितके अधिक घ्यावेत तितके तें अन्न पचनासाठीं अधिक जड होतें कारण पचनकार्यापूर्वी प्रथम तें जलमय पदार्थ शोषून घ्यावे लागतात. फार मीठ वापरू नका; लोणची व मसालेदार पदार्थ टाळता येतील तितके टाळा, भरपर फळफळावळे घ्या म्हणजे जेवणाचे वेळीं पेय पदार्थांनी जी खळबळ होतें ती टाळता येईल. जेवण सावकाशपणे जेवावे व त्याचे चांगलें चर्वण करावे ह्याची जरुर आहे. कारण अन्नासह लाळ योग्य प्रकारे मिश्रित झाली पाहिजे म्हणजे पाचक द्रवाना कार्य करता येते. 22MH 305, 306;CChMara 299.7

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents