Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    निवडलेल्यांदेखील फसविण्याचा प्रयत्न

    देव आणि निसर्गयाविषयींच्या वितंडवादाने जगांत संशयवादाचा पूर आलेला आहे व यामुळे पतित शत्रुला स्फूर्ति येत आहे. तो स्वत: पवित्र शास्त्राचा अभ्यासू आहे आणि जनतेला जिव्हाळ्याचे आहे तें सत्य तो ओळखून आहे. जगावर काय यावयाचे आहे त्याच्यासाठीं सिद्ध होण्याकरीता जी महान् तत्त्वे दिलेली आहेत त्यापासून मानवाचे मन कसे परावृत्त करावे याविषयीचे सैतान अभ्यास करीत आहे.CChMara 351.5

    १८४४ चा प्रसंग निघून गेल्यावर धर्मवेडेपणाची हरतर्‍हेची लाट आम्हांपुढे उसळली. निषेधपर बातमी मला देण्यांत आली व संचारवाद धारण करणारे जे होतें त्यांतून काहींना कळविण्यास सांगितली होती. CChMara 351.6

    * ह्या शिक्षणाची मुलभूत पाया असा आहे कीं देव प्रत्येक ठिकाणी व प्रत्येक गोष्टींत सवारीत असतो- संग्रहकCChMara 352.1

    देवनिंदक शिक्षणानंतर पापीष्ट व्यवहार चालूं लागतात तें तर लबाडांच्या पित्याचे भ्रष्टकारक आमिष असतें व त्याचा परिणाम अशुद्धतेत समाधान मानणार्‍यने पश्चाताप न करावा असा होतो.CChMara 352.2

    होऊन गेलेला अनुभव परत पुढे येईल नंतर सैतानाच्या खोट्या धर्मसमजुती नवी नवी स्वरूपे धारण करितील. मनोवेधक व खुशामतीच्या त-हेने चुका सादर करण्यांत येतील. प्रकाशाची सुशोभित वस्त्रे घालून खोटी तत्त्वे देवाच्या लोकांपुढे मांडण्यात येतील. याप्रमाणे वास्तविक जे निवडलेले आहेत अशाना शक्य होईल तर सैतान फसविण्याचा प्रयत्न करील. अत्यंत भ्रष्टकारक दडपणे आणण्यात येतील मनांवर मोहीनी घालण्यात येईल. CChMara 352.3

    मानवी अंत:करणे जलप्रलय काळाच्या पूर्वी होती तशाच प्रकारच्या हर एक भ्रष्टतेने अंत:करणे दास्यावस्थेत आणिली जातील. निसर्गाला देवाच्या ठिकाणी अग्रस्थान द्यावे, मानवी इच्छेला बेफाम मोकळे रान द्यावे आणि देव-निंदकाच्या विचार मसलतीने वागावे ह्या साधनानी सैतान आपले कांही विशिष्ट हेतु साधीत असतो. त्याच्या योजना साध्य करण्यासाठी तो आपल्या मानसिक शक्तीने मनावर दडपण आणील. देवाशी प्रत्यक्ष कांही एक सहवास न करिता तो आपल्या फसव्या वजनाने मानवाना केवळ धार्मिकतेचे स्वरूप देईल. हा एक सर्वात अत्यंत खेदकारक विचार मनात येतो. ज्याप्रमाणे आदाम व हवा यांनी बरे व वाईट ज्ञानाच्या झाडाचें फळ खाल्ले, त्याप्रमाणेच आजसुद्धा पुष्कळजण फसव्या चुकांच्या अन्नावर जगत आहेत.CChMara 352.4

    आपल्या मूळ आईबापाशी बोलविण्यासाठी स्वत:ला झाकून ठेवून सर्पाच्या स्वरूपात जसा सैतान पुढे गेला तसाच तो आज खोट्या कल्पनावादाचा आकर्षक पोषाख चढवून कार्यसिद्धी करीत आहे. वास्तविकत: जी प्राणघातक चूक आहे तिची साधनसूत्रे मानवी अंत:करणात तो रोवून टाकीत आहे. जे कोणी देवाच्या स्पष्ट वचनाला सोडून मनोरंजक खोट्या गोष्टीकडे बळतात त्यांच्या मनावर सैतानाचे मोहक वजन पडेल. जे अतिशय प्रकाशसंपन्न आहेत अशांनाच सैतान अत्यंत दक्षतेने आपल्या जाळ्यात गुंतविन्याचा प्रयत्न करतो. त्याला ठाउक असतें कीं जर त्यांना फसविता आलें तर तें त्याच्या कह्यात राहून पापाला धार्मिकतेचे स्वरूप देऊन पुष्कळांना कुमार्गात नेतील. CChMara 352.5

    माझे सर्वाना सागणे आहे सावध राहा; प्रकाशाचा दूत म्हणून सैतान ख्रिस्ती सेवाकाच्या प्रत्येक मेळाव्यांत व प्रत्येक मंडळीमध्ये सभासदांनी आपल्या बाजूचे व्हावे म्हणून हिंडत फिरत आहे. देवाच्या लोकांना सावधगिरीचा इषारा द्यावा अशी मल आज्ञा झाली आहे, “फसू नका; देवाचा उपहास व्हावयाचा नाही.” गलती ६:७.CChMara 352.6