Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    कुटुंबांतील प्रत्येक सभासदासाठीं जागा

    पुरुष व स्त्रिया प्रसंगानुसार सत्य दाबून टाकण्याच्या कार्यात गुंतू शकतात व तें सत्याचीही घोषणा करुं शकतात या आणीबाणीच्या वेळी ते कार्यात आपली जागा घेऊ शकतात व प्रभू त्यांच्याद्वारे कार्य करील. जर तें कर्तव्याला जागृत राहिले व देवाच्या आत्म्याच्या वजनाखालीं काम करूं लागले तर यावेळी पाहिजे असलेली स्वत:ची मालकी मिळवू शकतील. तारणारा या स्वार्पण करणार्‍य स्त्रीयांवर आपल्या चेहर्‍यचा प्रकाश पाडील व त्याकडून त्यांना पुरुषांपेक्षा अधिक सामर्थ्य प्राप्त होईल. त्या कुटुंबातील मनुष्यें करुं शकणार नाहींत तें काम त्या करुं शकतील. तें कार्य म्हणजे अंत:करणात जाऊन भिडणारे कार्य होय व पुरुष जेथे पोहचू शकत नाहींत तेथें आत्म्याच्या जवळ त्या येऊ शकतात त्यांच्या कामाची गरज आहे. सुज्ञ व नम्र स्त्रिया आपल्या कुटुंबांतील लोकांना सत्याचे स्पष्टीकरण देण्याचे चांगले काम करुं शकतात. अशा प्रकारे स्पष्ट केलेले देवाचे वचन आपले खमिराचे कार्य करील व त्याद्वारे सर्व कुटुंबांचा पालट होईल. 139T 128, 129;CChMara 57.6

    सर्वजण काहीतरी करुं शकतात. स्वत:बद्दल सबब सांगण्यांत कांही म्हणतात, “माझें घरकाम, माझी मुलें याकरिता पैसा व वेळ लागतो.” आई-बापांनो, मुलें तुम्हांला मदतगार असावीत. तुमची शक्ति व सामर्थ्य वाढवून तुमच्या धन्यासाठी कार्य करता यावें. प्रभूच्या कुटुंबांतील मुलें ही लहान सभासद आहेत. त्यांना देवाला वाहून देण्याच्या बाबतीत मार्गदर्शन करावे कारण ती उत्पत्तीद्वारे व उद्धाराद्वारे त्याची आहेत त्याची शारीरिक, मानसिक व आत्मिक शक्ति त्याच्यापासून आहे असें त्यांना शिकवावे. नि:स्वार्थी सेवेत वेगवेगळ्या कार्यात मदत करण्यास त्यांना शिकवावें तुमच्या लेकराना अडखळण होऊ देऊ नका. तुम्हांबरोबर लेंकराना शारीरिक व आत्मिक ओझे घेण्यास शिकवावे. इतरांना मदत करण्याकडून तें स्वत:चा आनंद व उपयुक्तता वाढवू शकतात. 147T 63;CChMara 58.1

    ख़िस्ताकरिता आमचे काम घरांतील कुटुंबात सुरू करायचे आहे. तरुणाचे शिक्षण मागें दिले त्यापेक्षा वेगळ्या स्वरुपाचे पाहिजे. त्यांचे कल्याण त्यांनी केलेल्या कार्यापेक्षा अधिक कार्याची मागणी करतें. यापेक्षा महत्त्वाचे मिशनरी काम नाही. ज्यांचा पालट झाला नाहीं. त्यांच्यासाठी स्वत:च्या उदाहरणाने आईबापांनी आपल्या लेकरांना शिकवावे. लेंकराना असें शिक्षण द्यावे कीं, तें म्हाताच्या व पिडलेल्या लोकांना सहानुभूति दाखवितील आणि जे त्रासात आहेत त्यांचा त्रास कमी करण्यास झटतील. मिशनरी कामात तत्पर राहाण्यास त्यांना शिकवावें. आणि त्यांच्या लहानपणापासून इतरासाठी केलेला स्वनाकार व अज्ञ त्याच्या मनावर बिंबवावा, अशासाठी कीं तें देवाबरोबर कामदार बनतील. 156T 429;CChMara 58.2