Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    दानीएल हा पवित्र जीविताचा नमुना

    दानीएलाचें जीवित हें पवित्र केलेल्या जीवितांचे एक प्रेरणादायक उदाहरण आहे. याकडून सर्वांना धडा मिळतो व विशेषेकरून तरुणांना धडा शिकायला मिळतो. देवाच्या मागण्यांची कडक मान्यता ही मनाच्या व शरीराच्या आरोग्यासाठी फायद्याची आहे. नैतिक व बौद्धिक कार्याचा उच्च दर्जा गाठण्यासाठी देवापासून शक्ति वे शहाणपण मागणे अगत्याचे आहे व आयुष्यातील सर्व सवयांत कडक नियमितपणा राखणेहि अगत्याचे आहे. ८CChMara 97.4

    दानीएलाचें जितकें अधिक निर्दोषी आचरण दिसून आलें तितक्या अधिक प्रमाणात त्याच्या शत्रूनी त्याचा द्वेष केला. तें दुष्टाईने भरले होतें कारण त्यांना त्याच्या नैतिक आचरणात किंवा त्याच्या रोजच्या कार्यात त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यासारखे त्यांना कांही आढळून आलें नाही. तेव्हां तीं मनुष्यें म्हणाली, या दानीएलाविरुद्ध काहीं निमित्त काढता येणार नाही, मात्र त्याच्या देवाच्या नियमासंबंधाने त्याच्याविरुद्ध काहीं निमित्त काढता आलें तर येईल.” (दानी. ६:५.) CChMara 97.5

    या ठिकाणी किती चागला धडा सर्व ख्रिस्ती लोकांसाठी दिलेला आहे. मत्सरी लोकांचे डोळे दररोज दानीएलाकडे लागून राहिले होतें. त्यांच्या द्वेषामुळे तें त्याच्यावर कडक पाळत ठेवून होतें. तरी एक शब्द किंवा एक कृति त्याच्या जीवितांत चुकीची आहे असें तें दर्शवू शकले नाहींत. तरीहि त्यानें पवित्रीकरणाची ग्वाहि दिली नाही; पण त्यानें जें खरें व योग्य आहे तेच केले व तो समर्पणाचे व विश्वासूपणाचें जीवित जगला. CChMara 98.1

    राजानें फर्मान काढले. दानीएलाला त्याच्या शत्रूच्या घाताचा हेतु कळला, पण तो। कोणत्याही क्षुल्लक बाबींत बदलत नाहीं. तो शांत रीतीनें आपलें रोजचे काम करतो आणि प्रार्थनेच्या वेळीं तो आपल्या खोलीकडे जातो व आपल्या खिडक्या यरुशलेमाकडे उघड्या ठेवून तो स्वर्गीय देवाची प्रार्थना करतो. याद्वारें तो निर्भयपणे जाहीर करतों कीं, जगांतील कोणतीही सत्ता तो व त्याचा देव यामध्ये येऊ शकत नाही व कोणाची प्रार्थना करावी व कोणाची करूं नये हें सागू शकत नाहीं. तत्त्वनिष्ठ थोर पुरुष ! आज तो जगापुढे ख्रिस्ती धैर्य व निस्सीम भक्ति याचे प्रशसनीय उदाहरण म्हणून उभा राहतो. तो मनापासून देवाकडे वळतो व जरी त्याला माहीत आहे कीं, त्याच्या भक्तीसाठी भरणाची शिक्षा आहे तरी तो आपलें अंत:करण देवाकडे लावतो.CChMara 98.2

    “मग राजाने हकूम सोडला व त्यांनी दानीएलाला धरून सिहाच्या गुहेत टाकले. आता राजा दानीलाला म्हणाला, तू सतत तुझ्या देवाची भक्ति करतोस तर तो तुझी सुटका करील.” (ओवी १६)CChMara 98.3

    दुसर्‍य दिवशी सकाळीं राजा सिहाच्या गुहेकडे गेला आणि म्हणाला, “दानीएला, जिवत देवाच्या सेवका, ज्या देवाची तूं नित्य सेवा करतोस तो तुला सिंहाच्या गुहेतून सोडविण्यास शक्तिमान आहे काय ?” (ओवी २०). या भविष्यवाद्याने उत्तर केले. “हें राजा चिरायु हो. माझ्या देवाने आपल्या दूतास पाठवून सिंहाची तोंडे बंद केली आहेत. त्यांनी मला कांही इजा केली नाहीं. त्याच्या दृष्टीने व हें राजा, तुझ्यासमोर मी निर्दोष असल्यामुळे मी काहीं पातक केलं नाहीं.”CChMara 98.4

    “मग राजाला त्याच्याबद्दल फार मोठा आनंद वाटला व त्यानें आज्ञा केली कीं, दानीएलाला गुहेतून बाहेर काढावे. मग दानीएलाला गुहेतून बाहेर काढले व त्याला कोणत्याही प्रकारची इजा झालेली आढळून आली नाही. कारण त्याचा त्याच्या देवावर विश्वास होता.” (ओव्या २२,२३) अशा प्रकारे देवाच्या सेवकाची सुटका झाली.CChMara 98.5

    त्याच्या शत्रूनी त्याच्या नाशाकरता धातलेले जाळे त्याच्या स्वत:च्या नाशाला कारणीभूत झाले. राजाच्या आज्ञेवरुन त्या गुहेत टाकण्यात आलें व तत्क्षणी त्या रानटी पशूनी त्यांना खाऊन टाकले.CChMara 98.6

    सत्तर वर्षांच्या गुलामगिरीचा काळ संपण्याची वेळ जशी जवळ येत चालली तसे दानीएलाचे मन यिर्मयाच्या भविष्याकडे मोठ्या प्रमाणात लागून राहिलें.CChMara 98.7

    दानीएल स्वत:ची निस्सीम भक्ति देवापुढे मिरवीत नाही. स्वत: शुद्ध व पवित्र आहे असें म्हणण्याएवजी हा सन्माननीय भविष्यवादी स्वत:ला त्या पापी इस्राएलापैकी एक गणतो. देवाने त्याला दिलेले शहाणपण जगांतील थोर पुरुषांपेक्षा श्रेष्ठ प्रतीचे होतें. ज्या प्रकारे दुपारच्या सूर्याचा प्रकाश एखाद्या अधुक ताच्यापेक्षा तेजस्वी असतो त्याप्रमाणे त्याचे ज्ञान सर्वोत्कृष्ट होतें. त्याच्या ओठातून बाहेर आलेली प्रार्थना देवाने पसंत केली. अगदी खर्‍य नम्रतेने, अश्रु गाळीत व अंत:करण विदारून तो स्वत:साठी व आपल्या लोकांसाठी प्रार्थना करतो. तो आपला आत्मा देवापुढे खुला करतो व आपली अपात्रता कबूल करून प्रभूचा मोठेपणा व ऐश्वर्य कबूल करतो.CChMara 99.1

    दानीएल प्रार्थना करीत असतां गाब्रीएल दूत स्वर्गातून खालीं येतो व तुझ्या प्रार्थना ऐकण्यात आल्या आहेत असें सांगतो व त्यांचे उत्तरहि देण्यांत आलें आहे असें म्हणतो. भविष्यकाळांतील रहस्य दानीएलाला समजण्यासाठी चातुर्य व समंजसपणा देण्यासाठी या महान दृताला हुकूम देऊन पाठविलेले असतें. याप्रकारे अगर्दी कळकळीने सत्य समजण्यासाठी प्रार्थना करीत असतो दानीएलाला देवाने पाठविलेल्या निरोप्याच्या सहवासात आणण्यात आलें.CChMara 99.2

    त्याच्या प्रार्थनेला उत्तर म्हणून दानीएलाला व त्याच्या लोकांना आवश्यक असलेला प्रकाश व सत्य ही फक्त प्राप्त झाली असें नव्हें; पण भविष्यकाळांतील महान् घटनेचा देखावा दिसला व जगाचा तारणारा यांच्या आगमनाचा देखावाही दिसला. जे पवित्र झालेले आहेत असें म्हणतात पण पवित्रशास्त्र शोधण्याची इच्छा बाळगीत नाहींत किंवा पवित्रशास्त्राचे सत्य स्पष्ट कळण्यासाठी प्रार्थनेत देवाशीं झोंबी खेळत नाहींत त्यांना पवित्रीकरण काय आहे हें कळत नाहीं.CChMara 99.3

    दानीएल देवाबरोबर बोलला. स्वर्ग त्याच्यापुढे उघडला गेला, पण श्रेष्ठ मानमरातब त्याला जो देण्यांत आला तो त्याच्या कळकळीच्या प्रार्थनेचा व नम्रतेचा परिणाम होय. जे मनापासून देवाच्या वचनावर विश्वास ठेवतात त्यांना त्याच्या इच्छेच्या ज्ञानाची तहान व भूक लागेल. देव सत्याचा कर्ता आहे तो न समजणाच्या गोष्टी स्पष्ट करतो आणि प्रकट केलेले सत्य समजण्यास व आकलन होण्यास शक्ति पुरवितो.CChMara 99.4

    जगाच्या तारणार्‍यानें प्रगट केलेली महान् सत्यें, जे गुप्त ठेवीप्रमाणे त्यांचा शोध करतात त्यांच्यासाठी आहेत. दानीएल वृद्ध मनुष्य होता. त्याचे आयुष्य विधर्मी राजाच्या मोहक दरबारांत गेले होतें. त्याचे मन महान् साम्राजाच्या व्यवहाराने दबून गेले होतें. तरी या सर्व गोष्टीपासून अलिप्त राहन तो आपले मन देवापुढे द:खी करतो. त्याच्या प्रार्थनेचे उत्तर म्हणून जे शेवटल्या काळांत राहाणार आहेत त्यांच्यासाठी स्वर्गीय दरबारातून प्रकाश पाठविण्यात येतो. तर मग केवढ्या आवेशाने आम्ही देवाचा शोध केला पाहिजे ! अशासाठीं कीं, स्वर्गीय सत्य समजण्यासाठी त्यानें आम्हांला समज द्यावा.CChMara 99.5

    दानीएल हा परात्मपर देवाचा समर्पित सेवक होता. त्याचे आयुष्य श्रेष्ठ अशा कार्यानी आपल्या धन्याच्या सेवेसाठी भरले होतें. त्याच्या शीलाची शुद्धता व अढळ एकनिष्ठा ही त्याच्या नम्रवृत्तीवरून व पश्चातापावरुन समतोल झाली होती. पुन: आम्ही म्हणतों कीं, दानीएलाचे जीवित हें खर्‍या पवित्रीकरणाचे प्रेरणायुक्त उदाहरण आहे. 9SL 42-52;CChMara 99.6