Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    “तुझी इच्छा असली तर मला शुद्ध कर”

    पूर्व भागामध्ये जितके रोग दिसून येत होते त्यामध्ये कुष्ठ रोग सर्वात भयानक असा रोग होता आणि त्याच्या संसर्गिक गुणामुळे सर्वात शूर असणारी व्यक्तिसुद्धा भयाने थरथर कापत असे. यहूदियामध्ये याबबत एक गोष्ट प्रचलित होती ती म्हणजे पाप्यावर परमेश्वराचा न्याय प्रगट होणे. म्हणून याला “प्रहार” किंवा “परमेश्वराचा उगारलेला हात’ असेही म्हटले जात असे. या भयंकर रोगाची मूळे खोलवर गेलेली आणि यावर उपचार नसलेला हा रोग जीवघेणा असतो आणि हा रोग पापाच्या चिन्हरूपी दाखविण्यात येत असे आणि ज्या वस्तुला हा रुग्ण स्पर्श करील ती वस्तु अपवित्र मानली जात असे. त्याच्या श्वासाने हवा दूषित होत असे. मृतलोकंप्रमाणे अशा रोग्याला मनुष्यांपासून अति दूर ठेवले जात असे. जर एखाद्या व्यक्तिला कुष्ठरोगाची लागण झाली तर त्याला याजकाकडे जाऊन दाखवावे लागत असे. म्हणजे याजक ठरवित असे की त्याला कुष्ठरोग आहे किंवा नाही. ते सांगत असे. त्याला जर कुष्ठरोग झाला आहे असे सिद्ध झाल्यास आपल्या परिवारापासून दूर राहावे लागत असे. इस्त्राएल मंडळीपासून त्याला दुसऱ्या कुष्ठरुग्णामध्ये मरण्यासाठी सोडले जात असे. इतकेच नाही परंतु राजा आणि इतर सरकारी लोकांना सुद्धा या अवस्थेमधून सुटका होत नसे. राजाला सुद्धा रोग झाल्यास आपले राज्य सोडून कुष्ठरोग्यांमध्ये राहण्याची वेळ येत असे. MHMar 34.1

    आपले मित्र व परिवारातील लोकांना सोडून या व्याधिच्या शापाने ग्रस्त झालेला रुग्ण या सर्व गोष्टी त्याला सहन कराव्या लागत असत. त्याला आपल्या रोगाविषयी स्वत:च इतरांना सांगणे भाग पडत असे. आपली कपडे फाडून इतरांना “अशुद्ध-अशुद्ध” असे ओरडून सावधगिरीचा इशारा द्यायचा असतो. यामुळे लोक त्याच्यापासून दूर निघून जात असत. यामुळे या भयानक रोगाच्या संसर्गापासून स्वत:चा बचाव करीत असत. स्वत:च्या घरापासून बेघर झालेला हा रुग्ण एकटाच दुःखाने “अशुद्ध-अशुद्ध” असे ओरडत असे आणि त्याच्याकडे तुच्छतेने पाहात लोक दूर पळून जात असत. अशाप्रकारे घृणास्पद जीवन त्याच्या वाट्याला येत असे.MHMar 34.2

    ख्रिस्ताच्या सेवा कार्यामध्ये अशाप्रकारचे अनेक रोगग्रस्त लोक होते. यापैकी एका कुष्ठरोग्याला जर त्याच्या हृदयात येशू विषयी विश्वास निर्माण झाला, तर तो रोगयुक्त होऊ शकतो, परंतु येशूपर्यंत कसे पोहोचायचे ? त्याला कसे शोधायचे ? त्याला दंडित केलेल्या दुःखदायक एकाकीपणाच्या जीवनामध्ये हताश झालेला रुग्ण येशूला कसे भेटणार ? त्याच्यासमोर तो कसा जाईल ? आणि ख्रिस्त त्याला कसे बरे करणार ? करणार किंवा नाही की तो सुद्धा याजकाप्रमाणेच लोकांपासून दूर शापग्रस्त म्हणून राहण्याचा इशारा देईल ?MHMar 35.1

    तो या सर्व गोष्टींचा विचार करीत होता ज्या त्याला येशूविषयी सांगण्यात आल्या होत्या. ख्रिस्ताला सहाय्य मागण्यासाठी आलेली कोणतीही व्यक्ति निराश होऊन परत जात नाही असे त्याने ऐकले होते. या अभागी व्यक्तिने येशू ख्रिस्ताला शोधण्याचा प्रयत्न केला. त्याचा तसा दृढनिश्चय होता. शहरातून दूर घालवून दिलेला हा रोगी डोंगरावरील पायवाटेवर येईल तेव्हा येशू गावापासून दूर डोंगरावर हिरवळीवर लोकांना शिकवित असे. समस्या तर अनेक होत्या, परंतु त्याची मात्र हीच एक आशा होती.MHMar 35.2

    दूरवर उभे राहून तो येशूच्या हलणाऱ्या ओठातून निघणारे शब्द ऐकतो. त्याने पाहिले की येशू आपले हात रोग्यांवर ठेवत आहे. त्याने पाहिले की अंध, लंगडे, लुळे, पक्षाघात आणि अनेक रोगी त्याच्या स्पर्शाने बरे होत आहेत आणि परमेश्वराची स्तुति करताना तो पाहतो. त्याच्या विश्वासामध्ये जीव येतो ते जवळ जवळ जातो. त्याची वचने ऐकणाऱ्यांच्याही जवळ जातो. अगदी गर्दीजवळ जातो. त्याच्यावर लावलेले निर्बंध, लोकांची सुरक्षा त्यांच्या प्रतिक्रियेचे भय या सर्व गोष्टी त्याच्यामधून निघून जाता. ते केवळ रोगमुक्त होण्याच्या धन्य आशेविषयीचा विचार करतो.MHMar 35.3

    त्याचा तर घृणायुक्त तमाशा झालेला असतो. रोगाने त्याच्यावर जोरात हल्ला केला आहे. सडत चाललेल्या त्याच्या शरीरामुळे तो भयानक दिसत आहे. त्याला पाहतात लोक मागे पळाले. कुष्ठरोग्याच्या भयाने लोक एकमेकांवर पडू लागला. काही लोकांनी त्याला येशूकडे येण्यासाठी विरोध करु लागले. रोग्याने त्यांचे काही ऐकले नाही किंवा त्यांना पाहिले नाही. त्यांच्या घृणेविषयी त्याच्या मनावर मुळीच परिणाम झाला नाही. तो तर केवळ देवाच्या त्या पुत्राकडे पाहात होता आणि केवळ त्याचीच वाणी ऐकत होता. कारण येशू मृतांनाही जिवंत करणारा होता.MHMar 35.4

    येशू जवळ येऊन त्याने स्वत:ला येशूच्या पायाजवळ झोकून दिले आणि म्हणाला “जर तुझी इच्छा असेल तर तुम्हाला शुद्ध करु शकतोस.” (मतय ८:२) येशूने उत्तर दिले माझी इच्छा आहे की तू शुद्ध हो (मत्तय ८:३) आणि त्याने आपला हात त्याच्यावर ठेवला आणि लागलेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. त्याच्यामध्ये परिवर्तन झाले. त्याचे रक्त स्वच्छ निरोगी झाले, त्याच्या नाडीमध्ये चैतन्य आले. त्याच्या स्नायूपेशी बळकट झाल्या. त्याच्या अस्वभाविक त्वचेवरील डाग नाहीसे झाले. त्याची त्वचा बालकासारखी झाली. MHMar 36.1

    जर याजकाला कुष्ठरोगी बरा झाल्याचे समजले तर प्रभूविषयी त्यांचा घृणायुक्त स्वभावामुळे एक पक्षपाती निर्णय येऊ शकतो. येशूची इच्छा होती की, इतर कोणाला सांगण्या अगोदर मंदीरामध्ये जाऊन याजकाला दाखव. जाताना अर्पणे घेऊनच जा.MHMar 36.2

    अर्पण स्वीकारण्या अगोदर याजकाने तो बरा झाला आहे किंवा नाही याची चाचणी करुन खात्री करुन घ्यायची आवश्यकता असते. मगच तो पूर्णपणे शुद्ध झाल्याचे जाहीर करण्यात येत असे. त्या कुष्ठरोग्याची तपासणी करण्यात आली. ज्या याजकाने त्याला समाजामधून निघून जाण्याचा आदेश दिला होता तोच याजक तो शुद्ध झाल्याचे ही जाहीर करु शकत होता. बरा झालेला कुष्ठरोगी पुन्हा आपल्या कुटुंबिय व समाजामध्ये त्याचा स्वीकार करण्यात आला. त्याने जाणले होते की आरोग्यदायी जीवनाचे वरदान अति मौल्यवान असते. त्याने पुन: पुरुषत्व प्राप्त होण्याचे आणि परिवारात स्वीकृति करण्याचा आनंद व्यक्त केला. कोणाला सांगू नको म्हणून येशूने त्याला सूचित केले होते, परंतु तरीही तो स्वत: बरे झाल्यास सर्वत्र सांगत सुटला. कारण तो आपला आनंद रोखू शकला नाही. ज्याने त्याला रोगमुक्त केले त्याची स्तुती व प्रशंसा केल्यावाचून त्याला चैन पडले नाही.MHMar 36.3

    जेव्हा तो येशूकडे आला होता तेव्हा रोगाने भरला होता. रोगाचे विष त्याच्या शरीरभर पसरले होते. शिष्यांनी त्या रुग्णास येशूला स्पर्श न करण्यासाठी प्रयत्न केले होते. कारण रोग्याने एखाद्याला स्पर्श केल्यास तोही अशुद्ध होत असे. परंतु त्याला स्पर्श केल्याने येशू अशुद्ध झाला नाही. तर त्या रोग्याचाच आजार बरा झाला. पापाला ही कुष्ठ रोगासारखेच संबोधले जात असे. पापसुद्धा मानवामध्ये खोलवर रुतून बसले आणि त्यामुळेच मृत्यु येतो त्यातून सुटका कोणीही करु शकत नाही. “तुम्ही अधिकाधिक शिक्षा का भोगता. तुम्ही अधिकाधिक बंड का कराल, सर्व मस्तक व्यथित झाले आणि संपूर्ण अंत:करण म्लान झाले आहे. पायाच्या तळव्यापासून मस्तकापर्यंत काहीच धड नाही. परंतु जखमा, चेंचरलेले व पुवळलेले फोड आहेत. ते कोणी पिळून काढीत नाही. मलमपट्टी करीत नाही, कोणी तेलाने नरम करीत नाही.” (यशया १:५-६). परंतु येशू जेव्हा मानवामध्ये राहायला आला तेव्हा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष दिसून आला नाही. त्याची उपस्थिती पाप्यांसाठी रोग निवारण करणारी सामर्थ्य होती. जो त्याच्या पायाजवळ पडेल आणि म्हणेल की, “तुझी इच्छा असेल तर मला शुद्ध कर” आणि त्यालाही उत्तर मिळेल की “माझी इच्छा आहे की शुद्ध हो.”MHMar 36.4

    रोगमुक्त करण्याच्या काही उदाहरणामध्ये येशूने त्यांच्या विनंतीला लगेच उत्तर दिले नाही, परंतु कुष्ठरोग्याला मात्र ताबडतोब बरे केले व तो शुद्ध झाला. जेव्हा आम्ही जागीक आशीर्वाद मागतो तेव्हा त्याचे उत्तर उशीराने येऊन शकते. किंवा परमेश्वर आम्हांला दुसरे काहीतरी देतो, परंतु आपण पापापासून सुटका मागतो तेव्हा असे होत नाही. परमेश्वराची इच्छा आहे की आम्हांला पापापासून मुक्त करुन त्याची मुले बनावे आणि एक पवित्र जीवन जगण्यासाठी आमचे सहाय्य करावे. “आपल्या देव पित्याच्या इच्छेने आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आमच्या पापाबद्दल स्वत:ला दिले.” (गलती १:४). आणि “त्याच्यासमोर येण्यास जे आपल्याला धैर्य आहे ते ह्यावरुन की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपल्याला देईल आणि आपण जे काही मागतो ते तो ऐकतो आणि हे आपल्याला ठाऊक आहे. म्हणून ज्या मागण्या आपण त्याच्या जवळ केल्या आहेत. त्या आपल्याला मिळाल्या आहेत हे ही आपल्याला ठाऊक आहे. (१ योहान ५:१४-१५). येशूने अशा लोकांना पाहिले की जे पिडलेले त्रासलेले आणि चिंतेमध्ये असणारे त्यांच्या आशांची निराशा झालेले आणि संसाराच्या आनंदाबरोबरच आत्म्याची तहान विझविण्याचा प्रयत्न करणारे असले होते. त्यांना शांती देण्याच्या हेतुने येशून त्यांना जवळ बोलाविले, परिश्रम करणाऱ्यांना आपल्या मृदू आवाजामध्ये त्याने त्यांना बोलाविले. “मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर ह्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जिवास विसावा मिळेल. (मत्तय ११:२९).MHMar 37.1

    शा शब्दाकरवी येशू समस्त मानव जातीशी बोलतो मग कोणी त्याला ओळखो किंवा नाही. सर्वजण थकलेले आणि भाराक्रांत आहेत. सर्वजण अशा ओझ्याखाली दबून गेले आहेत. केवळ ख्रिस्तच त्यांचे ओझे हलके करु शकतो. सर्वात अवजड ओझे जे आमच्यावर आहे ते पापाचे आहे आणि जर हे ओझे आपण एकटेच वाहत आहोत तर हे ओझे आम्हांला दाबून टाकील, परंतु निष्पाप येशूने आमचे स्थान घेतले. “आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याजवर लादिले. ‘” (यशया ५३:६)MHMar 38.1

    आमचे दोष त्याने स्वत:वर घेतले आणि तोच आमच्या थकलेल्या खांद्यावरील ओझे स्वत:वर घेईल, तो आम्हांला विश्रांती देईल. चिंता आणि दुःखाचे ओझेही तो स्वत:वर घेईल. आपले सर्व ओझे त्याच्यावर टाकण्यासाठी तो आम्हांस निमंत्रण देतो. कारण तो आम्हांला त्याच्या स्वत:च्या हृदयामध्ये घेऊन फिरतो. आमच्या घराण्याचा मोठा भाऊ परम प्रधान परमेश्वराच्या सिंहासना जवळ आहे. तो प्रत्येक त्या आत्म्याकडे पाहतो जो त्याला आपल्यासमोर ठेऊन आपल्या मुक्तिदात्याच्या रूपामध्ये पाहतो. तो अनुभवाने समजू शकतो की मानवाची कमतरता काय आहे, आमची आवश्यकता काय आहे. आपल्या मोहाच्या शक्ति कोठे आहेत कारण “कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलते विषयी त्याला सहानुभूति वाटत नाही असा आपला याजक नाही तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता. तरी निष्पाप राहिला. (इब्री ४:१५). देव आपल्या सर्व लटपटणाऱ्या मुलांना पाहात आहे. तुम्ही परीक्षेत आहात काय ? तो तुमची सुटका करील. तुम्ही अशक्त आहात काय ? तो तुम्हांला शक्ति देईल. तुम्ही अज्ञानी आहात काय ? तो तुम्हांला ज्ञान देईल. तुम्ही दुर्लक्षित आहात काय ? तो तुम्हाला प्रकाशात आणील. तो बरे करील. परमेश्वर “तो तारे मोजतो’ आणि तरीही “भग्नहृदयी जनांना तो बरे करीतो, तो त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधितो (स्तोत्र संहिता १४७:३)MHMar 38.2

    आपल्या चिंता आणि कठीण अवस्था कोणत्याही असोत देवासमोर मोकळ्या करा. तुमच्या आत्म्याला सहनशक्ति मिळेल. तुमची समस्या आणि निराशा निवारण होण्याचा मार्ग मोकळा होईल. आपण स्वत:ला जितके जास्त स्वत:ला दुर्बल आणि असहाय समजू तितकी अधिक त्याची शक्ति आणि सहाय्य मिळेल. जितके अधिक ओझे आपल्यावर असल्याचे जाणवेल तितके अधिक येशू आपले ओझे हलके करील व आपणास विश्रांती मिळेल.MHMar 38.3

    परिस्थितिमुळे मित्र वेगळे होतात. आपल्यामध्ये व त्यांच्यामध्ये अथांग समुद्र वाहू लागतो, परंतु कोणतीही परिस्थिती किंवा कोणताही दुरावा आपणास आपल्या उद्धार कापासून दूर करु शकत नाही. आम्ही कोठेही असो कसंही असो तेथे तो आमच्या सहाय्याकरीता आपल्या उजव्या हाताशी आहे. तो आपणास प्रोत्साहन देतो, सामर्थ्य पुरवितो व आम्हास स्थिर करतो. आमचा प्रभु मातेच्या प्रेमापेक्षाही अधिक प्रेम करतो, आपले संरक्षण करतो. त्याच्या प्रेमामध्ये विश्रांती घेणे आणि असे म्हणा की, “मी त्याच्यावर विश्वास ठेवतो कारण त्याने माझ्यासाठी त्याने त्याचे जीवन दिले.” हे आमचे भाग्य आहे. मानवाचे प्रेम बदलू शकते, परंतु प्रभुचे प्रेम बदलू शकत नाही. जेव्हा आम्ही मदतीसाठी त्याचा धावा करतो तेव्हा तो आपल्याला वाचविण्यासाठी धाऊन येतो व सुरक्षा देतो. MHMar 39.1

    “कारण पर्वत दृष्टीआड होतील, टेकड्या ढळतील, परंतु माझी तुजवरची दया ढळणार नाही. माझा शांतीचा करार हलणार नाही असे तुजवर करुणा करणारा परमेश्वर म्हणतो.’” (यशा ५४:१०)MHMar 39.2

    ते ऐकून येशू तेथून तारवात बसून निघाला आणि अरण्यात ऐकांती गेला हे ऐकून लोक समुदाय पाहिला. तेव्हा त्यांचा त्याला कळवळा आला व त्यांच्यातील दुखणेकऱ्यांस त्याने बरे केले.” (मत्तय १४:१३-१४).MHMar 39.3

    *****