Go to full page →

शास्त्रव्यापी खिस्त CChMara 155

क्रूशी दिलेला तारणारा व सार्वकालिक जीवन याविषयींचे ख्रिस्ताचे सामर्थ्य लोकांना सांगितलें पाहिजे. आम्ही त्यांना दाखविले पाहिजे कीं, नवा करार जितका प्रकट सामथ्र्यांने युक्त आहे तितकाच जुना करार सामर्थ्ययुक्त आहे. नवा करार नवीन धर्म सांगत नाही. जुना करारहि नव्या कराराने आपली जागा पटकावली आहे असें सांगत नाहीं. नवा करार हा जुन्या कराराचे प्रगटीकरण व प्रगति आहे. CChMara 155.1

हाबेलाचा ख्रिस्तावर विश्वास होता आणि पेत्र व पौल यांचे जितक्या खर्‍या रीतीने तारण झाले आहे तितक्या खर्‍या रीतीने त्याचेही तारण झाले आहे. आवडता शिष्य योहान हा येशूचा जितका खरा प्रतिनिधी होता तितकाच खरा प्रतिनिधि हनोख हा होता. हनोख देवाबरोबर चालला आणि देवाने त्याला नेले, त्याला येशूच्या द्वितीयागमनाचा संदेश दिलेला होता. “आदामापासून सातवा पुरुष हनोख देवाबरोबर चालला आणि देवाने त्याला नेले. त्याला येशूच्या द्वितीयामनाचा संदेश दिलेला होता. “आदामापासून सातवा पुरुष हनोख यानेहि संदेश दिला. तो म्हणाला, पाहा प्रभु आपल्या हजारो पवित्र जनासह येत आहे व न्याय करावयास येत आहे.” (यहुदा ४ ओवी) या काळांत जे राहात आहेत त्यांच्यासाठी हनोखाने दिलेला सदेश व त्याचे स्वर्गाला जाणे हा खात्री करून देणारा संदेश आहे. मथुशलेह व नोहा हें धार्मिकांचे पुनरुत्थान होणार हा संदेश सामर्थ्याने देऊ शकतात याचा पुरावा हा आहे. CChMara 155.2

जो देव हनोखाबरोबर चालला तो तारक प्रभु येशू ख्रिस्त होता. आता जसा तो जगाचा प्रकाश आहे तसाच त्यावेळी होता. त्या काळांत जे होतें तें जीवनाच्या मार्गाचे शिक्षण मिळण्यासाठी शिक्षकाशिवाय नव्हते कारण नोहा व हनोख ख्रिस्ती होतें. लेवीच्या पुस्तकात सुवार्ता दिली आहे. त्यावेळी जसे नक्की आज्ञापालन हवे होतें तसेच आताहि आहे. म्हणून या वचनाचे महत्त्व आहे हें समजून घेणें किती अगत्याचे आहे. CChMara 155.3

प्रश्न विचारण्यात येतो; मंडळींत उणीवतेचे कारण काय? त्याला उत्तर हें आहे: “आम्ही आमची मने देवाच्या वचनापासून काढून घेतो. देवाचे वचन आत्म्यासाठी अन्नाप्रमाणे सेवक केले व त्याचा मान करून तें वेगळे आहे असें दर्शविले तर पुष्कळ साक्षींची गरज नाही. पुन: पुन: देण्यांत आलेल्या संदेशाची गरज पडणार नाहीं. पवित्रशास्त्रांतील सोपी शिकवण स्वीकारून त्याप्रमाणे वागण्यात येईल. 156T 392, 393 CChMara 155.4

*****