Go to full page →

प्रकरण २२ वें - जगांत पण जगाचे नाहीं CChMara 156

खिस्ताच्या प्रतिमेप्रमाणे बनण्याऐवज जगाशी समरूप झालेले लोक आहोंत हा धोका मला दाखविण्यांत आला. आम्ही अगदीं सार्वकालिक जगाच्या तीरावर आलो आहोत पण आत्म्याचा शत्रु जो सैतान याचा आपल्याला काळाच्या ढगावरून अगदी दूर नेण्याचा हेतु आहे. सैतान देवाच्या आज्ञा पाळणारे व ढगावर बसून सामर्थ्याने व गौरवाने येणार्‍य ख्रिस्ताची वाट पाहाणाच्या लोकांवर नाना प्रकारांनी हल्ला करीत आहे. तो पुष्कळाना आत्म्याने जगिकरीत्या वागण्यास व त्यांतील रीतींचे अनुकरण करण्यास लावीत आहे. जे सत्याचें पालन करणारे आहेत अशा पुष्कळांच्या मनावर व अंत:करणावर जगिक वृत्तीचा पगडा बसवीत आहे हें पाहून मला धोका वाटला. त्यांच्यांत चैन व स्वार्थीपणाची आवड दिसून आली. पण खरा दैवीपणा व प्रामाणिकपणा अंगीं गेलेला नाहीं. 147 306: CChMara 156.1