शुभवर्तमान प्रसाराच्या क्षेत्रात मिशनरी संघातर्फे चाललेले वैद्यकीय कार्य ही एक आघाडीची सेवा होय. पुष्कळशा गृहांमध्ये सत्याचा प्रवेश होण्यासाठी तो एक मोकळा मार्ग आहे. देवाच्या लोकांनी अव्वल दर्जाचे वैद्यकीय मिशनरी व्हावयाचे आहे. आत्मिक व शारीरिक गरजा निवारण्याचे काम त्यांना शिकून घ्यावयाचे आहे. ज्ञानाने आणि व्यवहरांत प्राप्त झालेल्या अनुभवाने आजाच्यांची सेवा करिताना आमच्या सेवक वर्गाने अत्यंत निर्भेळ नि:स्वार्थपणा दाखवयास पाहिजे आहे. घरोघरी जातांनी अनेक आत्म्याशी त्याचा सबध येईल. ज्यांच्या कानावर कदापिही शुभवर्तमान पडले नाही अशा अनेकांनी त्याचा सबंध येईल. आरोग्य सुधारणेची तत्त्वे दर्शविल्याद्वारे आमच्या शुभवर्तमान प्रसाराच्या कार्याविषयी कलुषित असलेली मने निवळली जातील. वैद्यकीय सेवाकार्याचा मूळ उत्पादक आमचा महान् वैद्य हा जे कोणी या वेळी सत्याची घोषणा करीत आहेत त्या सर्वांना आशीर्वाद संपन्न करील. CChMara 334.1
सुवार्तेच्या सनदेमध्ये शारीरिक रोग मुक्ततेचा समावेश केला आहे. ख्रिस्ताने आपल्या शिष्यास जेव्हां सेवाकार्यासाठी प्रथमच रवानगी केली तेव्हां त्यानें त्यास आज्ञापले कीं, “जात असतां असा उपदेश करा कीं, स्वर्गाचे राज्य जवळ आलें आहे. रोग्यात बरे करा. मेलेल्यास उठवा, कुष्ठ्यास शुद्ध करा, भूते काढा, तुम्हांस फुकट मिळाले, फुकट द्या.” मत्तय १०:७,८. CChMara 334.2
दैवी सनदेची दुरुस्ती करण्याची गरज नाही सत्य प्रगट करण्याच्या ख्रिस्ताच्या पद्धतीत दुरूस्ती करावी लागत नाही. आत्म्यांनी सत्यांत कसे आनंदीत रहावे याविषयी ख्रिस्ताने शिष्यास व्यवहारिक पाठ दिलेले होतें. थकलेले भागलेले, ओझ्याखाली दडपलेले, जुलमात सापडलेले अशांनी तो सहानुभूतीने वागे. भुकेलेल्यांस तो अन्न देई, आजार्यस तो बरे करी, सत्कार्यात तो निरंतर गुंतलेला असें जनहित साधून आपल्या प्रेमळ भाषणाने व मायाळू कर्तबगारीने त्यानें लोकांस शुभवर्तमानाचा अर्थ विदित केला. CChMara 334.3
मानवांच्या तर्फे करावयाचे ख्रिस्ताचे कार्य पुरे झालेले नाही. तें आजवर चालूं आहे त्याचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनीही याच पद्धतीने शुभवार्ता द्यावयाची आहे आणि जे हरपलेले व निराश पावत आहेत त्यांना त्याचे दर्याद्र प्रेम करावयाचे आहे. गरजवंत आहेत अशानी नि:स्वार्थीपणे वागून शुभवर्तमानाची सत्यता उदाहरण घालून व्यक्त करावयाची आहे. नुसताच उपदेश करण्यापेक्षा यांत पुष्कळ अधिक काम आहे. जे कोणी ईश्वराच्या नामांत पुढे येऊन सरसावतील अशांकडेच जगताला शुभवर्तमान गाजविण्याचे कार्य देवाने सोपविले आहे. तें ख्रिस्ताचे सहकामकरी असून जे नाशाच्या अगदी तोंडाशी आहेत. अशाना त्याची जिव्हाळ्याची व दर्याद्रप्रीती त्यांनी दाखवायची आहे. देव आपल्या कार्यासाठी हजारों लोकांना पाचारण करीत आहे. ज्यांना सत्याची तात्पुरती ओळख आहे अशांना उपदेश करण्यासाठीच नव्हें तर ज्यांनी दयेची सुवार्ता कदापिही ऐकलेली नाही अशाना त्यांनी सावधगिरीची सूचना द्यावयाची आहे. आम्यासाठी अत्यंत आस्थेने भरलेल्या मनाने काम करा. मिशनरी वृत्तीने वैद्यकीय सेवा करा. अशाप्रकारे तुम्हांला लोकांच्या अंतर्यामाचा सहवास घडेल व सत्याची करण्याचा मार्ग सिद्ध केला जाईल. CChMara 334.4