जेथे शुभवर्तमान प्रसारक वैद्यकीय कार्याची गरज आहे अशी पुष्कळ स्थळे आहेत व अशा ठिकाणी शुवर्तमान प्रसाराचे बिजारोपण केले पाहिजे. आमच्या सॅनिटोरिम संस्था - (आरोग्यसंवर्धकालये) श्रेष्ठ व कनिष्ठ, श्रीमत व दरिद्री परिचय करण्याची साधने व्हावीत अशी ईश्वरी योजना आहे, ईश्वराच्या संदेशाकडे जगाचे लक्ष आकर्षित केले जावे अशा रीतिने त्या संस्थाचा कारभार करण्यांत यावा. CChMara 335.1
शारीरिक आणि आत्मिक सेवेची अशी जुळणी करण्यांत यावी कीं जे पीडित आहे त्यांनी स्वर्गीय वैद्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवावा. वैद्यकिय सेवक योग्य प्रकारची उपाय योजना करीत असतांना त्यांनी ख्रिस्ताच्या आरोग्यकारक कृपेसाठीसुद्धा प्रार्थना करावी म्हणजे तें आजार्यांच्या मनात विश्वासाची स्फूर्ति देऊ शकतील. जे आजारी आपल्या आजाराविषयी हताश झालेले असतील त्यांनाही होत असलेल्या उपचारांनी उत्तेजन प्राप्त होईल. CChMara 335.2
ह्या हेतूनेंच आमच्या सॅनिटरीयम-संस्था उघडण्यात आलेल्या होत्या. आमच्या विश्वासयुक्त प्रार्थनेच्या व योग्य प्रकारच्या औषधोपचाराने उत्तेजन देण्यांत यावे आणि योग्य प्रकारचे जीवन जगण्यास शिक्षण देण्यांत यावे. असल्या सेवेच्याद्वारे अनेकांचा धर्मपालट होऊन जाईल. आमच्या सॅनेटोरीयम वैद्यांनी आत्म्याच्या आरोग्याविषयी स्पष्ट संदेश द्यावा. CChMara 335.3