Go to full page →

शुभवर्तमानाचे मूळ कार्य CChMara 335

जेथे कोठे आम्हांला सेवेसाठी पाचारण होईल त्या मुलुखांतील लोकांचा जर नैतिक दर्जा आम्हांला वाढवायचा असेल तर त्यांच्या शारीरिक सवयाची दुरूस्ती करण्यास आम्ही प्रारंभ केला पाहीजे. CChMara 335.4

शुवर्तमान मिशनरी वैद्यकीय कार्याने मानवाने दु:खपरिहार होतें. शुभवर्तमानाचे हें आघाडीचे कार्य होय. हें क्रियाशील शभवर्तमान असून ख्रिस्ताची करूणा व्यक्त केली जाते. अशा सेवेची फार मोठी गरज आहे. व तिच्यासाठी जग हें उघडे क्षेत्र आहे. वैद्यकीय सेवेचे महत्व पटून नवीन क्षेत्रे त्वरीत उघडली जावात अशी सदिच्छा ईशचरणी आहे. अशाने प्रभूच्या पद्धतीप्रमाणे सेवाकार्य होईल. आजाच्याना बरे केले जाईल. आणि गरीब व दु:ख सहन करणारी मानवजात आशीर्वादित होईल. CChMara 335.5

पुष्कळसे कलुषित ग्रह, फार खोट्या आस्था आणि अनूचित धर्मभावना यांना तुम्हांला तोंड द्यावे लागेल. परंतु तुम्हांला कल्पनाही येणार नाही अशी मंडळी देव स्वदेशी व परदेशी सत्याचे बिजारोपण करण्यासाठी तयार करीत आहे आणि देवाचा संदेश त्यांच्यापुढे सादर केल्यावर तें आनंदाने उड्या मारतील. CChMara 335.6

जसा बाहूचा शरीराशी संबंध असतो तसाच वैद्यकीय मिशनरी सेवेचा संबंध ख्रिस्ती सेवेशी असतो. असें मला नेहमीच सांगण्यांत आलेले आहे. सत्याची घोषणा करणे आणि रोगी व निरोगी यांची प्रगति करणे या दोहोंच्या संघटनेला शुभवृत्त कार्य म्हटले आहे. हें तर शरीर होय, वैद्यकीय मिशनरी कार्य बाहू व सर्वांवर अधिपत्य चालविणारा ख्रिस्त हा मस्तक होय. या प्रकारे वस्तुस्थिति मला दर्शविण्यात आलेली आहे. तुम्ही आपल्या हाती असलेल्या सुखसोयीप्रमाणे वैद्यकीय मिशनरी सेवेचा प्रारंभ करा. त्याद्वारे शास्त्राभ्यासाचा मार्ग खुला होईल. आपल्या आजार्‍यची शुश्रुषा कशी करावी हें दाखवून देण्याची संधि स्वर्गीय पिता तुम्हांस देईल. आजार्‍यांच्या उपचारासंबंधी तुम्हांस जी माहिती आहे ती व्यवहारात आणा. याप्रकारे दु:खभार नाहीसा होईल आणि भुकेलेल्या आत्म्याना जीवनी भाकर देण्याची तुम्हांला संधि मिळेल, CChMara 336.1