Go to full page →

आपल्या उपदेशाप्रमाणें पाळकानें स्वत: वागावें CChMara 113

तुम्ही सर्वांनी आपल्या भाषणात सर्वदा चौकस असावे. देवाने तुम्हांला या पृथ्वीवर ख्रिस्ताचे प्रतिनिधी म्हणून त्याच्याऐवजी पाप्याचा देवाशीं समेट करण्यासाठी विनती करण्यास बोलाविले आहे काय? हें फार श्रेष्ठ व गंभीर कार्य आहे. जेव्हां तुम्ही व्यासपीठावर बोलायचे थांबवितां तेव्हां तें काय नुकतेच आरंभीले आहे असें समजावे. सभा संपली म्हणजे तुम्ही आपल्या जबाबदारींतून मुक्त झाला असें समजू नका पण आत्म्याच्या तारणासाठी तुमचे समर्पण पुढे चालूं ठेवा. इतरांना माहित असलेले व वाचलेले असें जिवंत पत्र तुम्हीं बनले पाहिजे. CChMara 113.1

सौख्याचा विचार करायचा नाहीं. विश्रांतीबद्दल विचारपूस करायची नाहीं. आत्म्याचे तारण करण्याचे कार्य अति महत्त्वाचे आहे. या कार्याकरतांच ख्रिस्ताच्या सुवार्तेचा सेवक बोलावण्यांत आला आहे. त्याच्या सभेतील चांगले कार्य त्यानें चालूं ठेवून दैवी भाषण व चौकसपणाचा गुण याद्वारें त्यानें आपला धंदा मंडित करावा. CChMara 113.2

तुम्ही जे इतरांना सांगता त्याप्रमाणे वागले पाहिजे. कधीही स्वत:वर घेतलें नाहीं असें कार्याचे ओझे स्वत:वर घ्यावे व ख्रिस्ताच्या प्रत्येक सेवकाने जबाबदारीचा भार घ्यावा. खाजगी प्रयत्नाद्वारे हातातील कार्य मुक्रर करा. हल्लींच्या सत्याविषयींच्या चतुर भाषणात गुंतून जा. जे. हजर असतात त्यांच्या मनाची खात्री करून सत्याची बाब व्यवहारिकरत्या तुमच्या सहवासांत येणार्‍यांच्या बाबतींत देवाला भिऊन लागू करा. 142T 705, 706 CChMara 113.3

*****