Go to full page →

प्रकरण १४ वें - देवाचें घर (मंदिर) CChMara 114

विश्वासू नम्र आत्म्याला पृथ्वीवरील देवाचे घर में स्वर्गाचे द्वार आहे. स्तुतीचे गायन, प्रार्थना व ख्रिस्ती प्रतिनिधीने सांगितलेले शब्द या सर्व गोष्टी वरील मंडळीकरितां लोक तयार करण्याचे साधन आहे. अशा थोर भक्तींत भ्रष्टकारक गोष्टींचा समावेश होणार नाहीं. CChMara 114.1

कुटुंबाचे पवित्रस्थान घर आहे. एकांत ठिकाण किंवा विसाव्याकरितां आबराई असें व्यक्तिवाचक भक्तिसदन होय पण मंदिर हें मंडळीचे सभास्थान भक्तीसंबधाने ज्या पद्धत आहेत त्याविषयी निष्काळजीपणा करुं नये व देवाची स्तुति करण्याच्या बाबतींत मनुष्याने आपली पराकाष्ठा करावी व तसे करण्यास त्यांचे सोबती असें असावेत कीं साधारण गोष्टीपासून पवित्र गोष्टींचा फरक आपल्या मनात दाखवतील. ज्याना दैवी गोष्टीचे सर्व विचार बळकट करण्यासाठी उत्तम सोबत आहे त्यांना उत्तम योजना, श्रेष्ठ विचार व महत्त्वकांक्षा असतात. ज्यांना मंदिर आहे तें सर्वांत आनंदीत लोक होतें तें श्रेष्ठ असोत किंवा हलके असोत, शहरांत असोत अगर डोगरांतील ओबडधोबड गुहेत असोत, एकाद्या साध्या झोपडीत असोत किंवा जगलात असोत जर तें त्याच्या प्रभूसाठी उत्तम ठिकाण शोधतील तर तो आपल्या समक्षतेने तें ठिकाण पवित्र करील व तें सैन्याच्या प्रभूला पवित्र ठिकाण होईल. CChMara 114.2