प्रेषित पौलाने जाहीर केले की, “ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तिने आयुष्यक्रमण करावयास जे पाहतात, त्या सर्वांचा छळ करतील.” २ तिमथ्य ३:१२. असे जर आहे तर आज ख्रिस्ती लोकांचा विशेष छळ होताना का दिसून येत नाही ? याचे एकच कारण ते म्हणजे ख्रिस्ती मंडळ्या जगाच्या गोष्टींमध्ये जगा इतक्याच गुंतू लागल्या आहेत व त्यामुळे त्यांच्याविरुद्ध विरोध जागृत होत नाही हे कारण आहे. आपल्या आजच्या काळात जो धर्म सर्व सामान्यपणे मानला जात आहे तो ख्रिस्ताच्या व त्याच्या प्रेषितांच्या काळातील ख्रिस्ती धर्म श्रद्धेप्रमाणे शुद्ध आणि पवित्र नाही. पापाशी तडजोड करण्याच्या वृत्तिमुळे, देवाच्या वचनातील महान सत्यांच्या बाबतीत पराकोटीची बेफिकीरी बाळगल्यामुळे आजच्या ख्रिस्ती मंडळ्यात खरी धार्मिकता फारच थोडी आढळत असल्यामुळे या कारणामुळे ख्रिस्ती धर्म जगात लोक प्रिय झाल्यासारखा दिसतो. पहिल्या प्रथमच्या प्रेषितीय मंडळीत असलेल्या विश्वासाचे सामर्थ्याचे पुनरुज्जीवन होऊ द्या की छळाच्या वत्तिचेही संजीवन होईल व छळाच्या अग्निज्वाला पेटविल्या जातील. - ग्रेट कॉन्टरवर्सी ४८. ChSMar 196.2