अति घोर चुकीची दोन तत्त्वे म्हणजे १) रविवारचे पावित्र्य आणि २) जिवात्म्याचे अमरत्व या दोन तत्त्वाद्वारेच सैतानाने लोकांना त्याच्या ताब्यात ओढले आहे. पहिले तत्व पिशाच्च वादासाठी पाया घालते व दुसरे तत्व रोमच चर्चशी सहानुभेतिचा दुवा उत्पन्न करते. अमेरिकेचे प्रोटेस्टंट लोक हात लांबवून कोसभर दूर असलेल्या पिशाच्च वादाचा हात लांबवून रोमन सत्तेशी हस्तांदोलन करतील व या तिघांच्या एकजुटीच्या प्रभावाखाली हा देश रोमन चर्चच्या पावलावर पाऊल टाकून लोकांच्या विवेकाला व त्यांच्या धर्मविषयक हक्कांना कुचलून टाकील. ChSMar 196.3