Go to full page →

स्वच्छता MHMar 214

वैयक्तिक स्वच्छतेच्या आवश्यकतेप्रमाणे प्रभावीपणे शिकविण्यात येत असे. सीनाय पर्वताजवळ एकत्र येऊन परमेश्वराच्या मुखातून त्याच्या आज्ञाच्या घोषणा ऐकण्या अगोदर लोकांना आज्ञा दिली होती की त्यांनी आपली वस्त्रे व शरीर स्वच्छ करावीत. या निर्देशाचे पालन न करणारे लोकांवर मृत्युदंड देण्यात येत असे. परमेश्वराच्या उपस्थितिमध्ये कोणीही अपवित्र असू नये. ते सहन करण्यात येत नसे. MHMar 214.1

रानातील प्रवास काळामध्ये इस्त्राएल लोक सतत मोकळ्या हवेत राहात होते. बंद घरामध्ये राहणाऱ्यांच्या अपेक्षेने मोकळ्या हवेमध्ये राहणाऱ्यांमध्ये अशुद्धता नगन्य होती. परंतु त्यांच्या छावणीच्या आत व बाहेर काटेकोरपणे स्वच्छता ठेवली जात असे. छावणीच्या आत किंवा बाहेर कोणत्याही प्रकारचा कचरा टाकण्याची अनुमति नव्हती. यहोवा म्हणाला, “कारण तुझा देव परमेश्वर तुझा बचाव करण्यासाठी आणि तुझे शत्रु तुझ्या हाती देण्यासाठी छावणीत फिरत असतो. म्हणून तू आपली छावणी पवित्र ठेवावी; नाहीतर तुझ्यामध्ये एखादा अनुचित प्रकार पाहून तो तुझ्यापासून निघून जाईल.” (अनुवाद २३:४). MHMar 214.2