Go to full page →

आहार MHMar 214

आहाराला जोडून असणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये पवित्र व उपवित्राच्यामध्ये विशेष अंतर ठेवले होते. “त्यांचा देश तुमचे वचन होईल, ज्यात दुधा-मधाचा प्रवाह वाहत आहेत असा देश तुमच्या ताब्यात देईन असे मी तुम्हाला सांगितले आहे. तुम्हांला इतर राष्ट्रांपासून मी परमेश्वर तुमचा देव आहे म्हणून तुम्ही शुद्ध व अशुद्ध पक्षी यांच्यातील भेद पाळावा. आणि जो कोणताही पशु-पक्षी अथवा जमिनीवर रांगणारा प्राणी मी अशुद्ध ठरवून तुमच्यापासून दूर ठेविला आहे. त्याच्या योगे तुम्ही स्वत:स अमंगळ करु नये.” (लेवीय २०:२४-२५). MHMar 214.3

त्यांच्या चारी बाजूला मूर्तिपूजकांकरवी खाण्यात येणाऱ्या अनेक पदार्थ स्वतंत्र रुपात खाल्ले जात असत. हे पदार्थ खाण्यास इस्राएल लोकांना मनाई केले होते. दुसऱ्यांपासून वेगळे राहण्यासाठी हा आदेश मनमानी नव्हता. कारण जे पदार्थ खाण्यासाठी मनाई केले होते ते आरोग्यासाठी हानीकारक होते आणि म्हणून ते अशुद्ध ठरविले होते. हा धडा हे शिकवितो की हानीकारक भोजनाचा वापर अपवित्र करतो. जो शरीराला भ्रष्ट करतो तो आत्माही भ्रष्ट करतो. अशुद्ध पदार्थ खाणारा परमेश्वराशी संपर्क करणारा अयोग्य असतो. अशुद्ध भोजनाचे महत्त्व आणि त्याचे सेवाकार्य अयोग्य करते. MHMar 215.1

जे अनुशासन रानामध्ये केले होते ते वचनदत राष्ट्रामध्येसुद्धा योग्य सवयांचा विकास करण्यासाठी चालू ठेवण्यात आले. लोकांना शहरातील गर्दीमध्ये एकत्र ठेवले नाही तर प्रत्येक कुटुंबामध्ये त्यांच्या स्वत:च्या जमिनी होत्या. म्हणजे त्या करवी सर्वांसाठी नैसर्गिक आरोग्यवर्धक आणि भेसळ नसले आशीर्वाद मिळतील. ज्या कनानी लोकांना इस्त्राएलांनी देशातून नाहीसे केले होते त्यांच्या निर्दयी इच्छामुळे यहोवा म्हणाला. MHMar 215.2

“ज्या राष्ट्रांना मी तुमच्या पुढून घालवून देणार आहे त्यांच्या चालीरीतीचे तुम्ही अनुकरण करु नये त्यांनी असली सर्व कृत्ये केली म्हणून मला त्यांच्या तिटकारा आला आहे.” (लेवीय २०:२३). आणि कोणतीही अमंगळ वस्तु आपल्या घरी आणू नको. आणशील तर तूहि तिच्याप्रमाणे नाशास पात्र ठरशील तिचा अगदी वीट मान व तिचा पूर्णपणे अव्हेर कर कारण त्या नाशास पात्र ठरलेली वस्तु आहे. ( अनुवाद ७:२६). MHMar 215.3

त्यांच्या रोजच्या जीवनातील त्यांच्या बोलण्यामध्ये इस्त्राएल लोकांना पवित्र आत्म्याकरवी ठरविलेले धडे शिकविले गेले होते. MHMar 215.4

“तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करितो हे तुम्हांस ठाऊक नाही काय ? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करितो तर देव त्याचा नाश करील. कारण देवाचे मंदिर पवित्र आहे तेच तुम्ही आहा.” (१ करिंथ ३:६-१७). MHMar 215.5