Go to full page →

वधस्तंभाचे गौरव MHMar 327

परमेश्वराचे मनुष्यावरील प्रेम हे वधस्तंभावर व्यक्त करण्यात आले याचे सर्व महत्त्व शब्दामध्ये सांगता यायचे नाही. या विषयी लेखणी लिहू शकत नाही आणि मानवी बुद्धी हे प्रेम सांगू शकत नाही. कालवरी वरील वधस्तंभ पाहून आम्ही एवढेच म्हणू शकतो की “देवाने जगावर एवढी प्रीति केली की त्याने आपला एकूलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याजवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे” (योहान ३:१६). ख्रिस्ताला आपल्या पापासाठी वधस्तंभावर टांगले. ख्रिस्त मृतांमधून जिवंत झाला आणि तो स्वर्गात चढला मुक्तिचे ज्ञान हेच आहे. आम्हाला हे शिकायचे आणि शिकवायचे आहे. MHMar 327.4