Go to full page →

हाच ख्रिस्त होता MHMar 328

“तो देवाच्या स्वरुपाचा असून ही देवाच्या बरोबरीचा असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वत:ला रिक्त केले. म्हणजे मनुष्याच्या प्रति रुपाचे होऊन दासाचे स्वरुप धारण केले आणि मनुष्य प्रकृतिचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येथपर्यंत त्याने आज्ञापालन करुन स्वत:ला लीन केले” (फिलिपैकरास २:६-८). MHMar 328.1

“तर दंडाज्ञा करणारा कोण ? जो मेला इतकेच नाहीतर मेलेल्यांतून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थही करीत आहे तो येशू ख्रिस्त आहे” (रोम ८:३४). ह्यामुळे ह्याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे, कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे.” (इब्री ७:२५). MHMar 328.2

कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूति वाटत नाही असा आपला प्रमुख याचक नाही तर सर्वप्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता. तरी निष्पाप राहिला.” (इब्री ७:२५). MHMar 328.3

ख्रिस्ताच्या वरदानाकरवीच आम्हांला प्रत्येक आशीर्वाद मिळत असतो. याच वरदानाकरवी यहोवाचा कधीही न चुकणारा आशीर्वाद आम्हांकडे वाहवत येतो. प्रत्येक फूल आणि त्याच्या नाजूक पाकळ्या व त्यांचा सुगंध हा आमच्या आनंदासाठीच असतो. सूर्यचंद्र त्याच्या करवीच बनविले गेले होते. आकाशाला सुंदर बनविण्यासाठी आकाशातील असंख्य ताऱ्यांपैकी असा एकही तारा नाही जो परमेश्वराने बनविला नाही. पावसाचा प्रत्येक थेंब आणि प्रकाशाचा प्रत्येक किरण जो या कृतघ्न जगाला प्रकाश देतो. ख्रिस्ताकरवी परमेश्वराचे प्रेम व त्याचे वर्णन व्यक्त करिते. आम्हांला प्रत्येक वस्तु त्याच परमेश्वराच्या पुत्राकरवी आम्हांला एक अवर्णनीय वरदान दिले जाते. त्याच्या त्या एकुलत्या एक पुत्राला वधस्तंभावर खिळ्यांनी ठोकले गेले. म्हणजे सर्व भल्या गोष्टी सृष्टीकडे येतील. MHMar 328.4

“आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले ह्यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे पाहा आणि आपण तसे आहोच ह्यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही कारण त्यांनी त्याला ओळखिले नाही.” (९ योहान ३:९). MHMar 329.1

“हे देवा तुझी आशा धरुन राहणाऱ्यांचे इष्ट काम करणारा असा तुझ्याशिवाय दसरा कोणी प्राचीकलापासून ऐकण्यात आलेला नाही. त्याचे नाव आलेले नाही. कोणी तो डोळ्यांनी पाहिला नाही.” (यशया ६४:४). MHMar 329.2