Go to full page →

सूर्यप्रकाश वायु विजन आणि तपमान MHMar 168

रुग्ण लवकर बरा व्हावा यासाठी अनेक उपाय योजना करता येतात ज्या खोलीमध्ये रुग्णाला ठेवले आहे ती खोली मोठी असावी तेथे भरपूर सूर्यप्रकाश असावा. त्याखोलीमध्ये स्वच्छ इषाखेळती राहावी घरातील ज्या खोलीमध्ये अशा प्रकारची सुविधा आहे तेथे रुग्णाला ठेवावे. अनेक घरांमध्ये प्रकाशाची योग्य व्यवस्था नसते. तेथे खेळती हवासुद्धा नसते आणि अशा प्रकारची खोली मिळणे काही वेळा कठीणच असते. परंतु अनेक प्रयत्न करुन अशा प्रकारची खोली उपलब्ध करावी रुग्णासाठी ते अति फायद्याचे असते. रुग्णाच्या खोलीमध्ये दिवसरात्र स्वच्छ ताजी हवा असावी व सूर्यप्रकाशही हवा. MHMar 168.1

शक्य होईतो रुग्णाच्या खोलीमध्ये असणारे उष्णतामान समान असावे तेथे थर्मामिीटरची व्यवस्था असावी. जे लोक रुग्णाची काळजी घेतात. त्यांची झोप पुरी होत नाही. रात्रीच्या वेळी रुग्णाची काळजी घेण्यासाठी झोपमोड होते. त्यांनी बहुतेक थंडी वाजते म्हणून खोलीतील तापमान एकसारखे असणे आवश्यक आहे. रुग्णाला त्यामुळे त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी. MHMar 168.2