Go to full page →

भोजन : MHMar 168

परिचारीकेच्या शुश्रूषेमध्ये अति महत्त्वाची भूमिका असते. रुग्णाच्या भोजनाची व्यवस्थित काळजी तिने घ्यावी. कमी पोषणाचे भोजन त्याला देऊ नये किंवा कठीण अन्नही देऊ नये जे पचनास कठीण जाईल कारण आजारपणामध्ये रुग्णाची पचनसंस्था कमजोर झालेली असते. त्याला लवकर थकवा येतो. लक्षात ठेवा की रुगणला तयार केलेले जेवण रुचकर असावे व त्यामध्ये पौष्टीकताही असावी. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की भोजनाची मात्रा व गुणवता ही रुग्णाच्या आवश्यकतेनुसारच असावी. दीर्घ आजारपणानंतर रुग्ण बरा झाल्यावर पाचन संस्थेची शक्ति हळूहळू बळकट होत असते ती पुर्ववत होण्यास वेळ लागतो. जास्त प्रमाणात भूक लागू लागते. अशावेळी भोजनामध्ये चुक होऊ शकते व यामुळे परिणाम गंभीर होऊ शकतो. MHMar 168.3