Go to full page →

अध्याय १७—औषधांचा प्रयोग MHMar 181

कारणाशिवाय कोणताही आजार येत नाही. आरोग्य नियमांकडे दुर्लक्ष केले तर आजाराल निमंत्रण देण्याचा मार्ग तयार होतो. अनेक लोक आपल्या माता पित्यांच्या पापांची फळे भोगत असतात. परंतु ते आपल्या माता पित्यांच्या कर्माचे जबाबदार नसतात. परंतु त्यांचे कर्तव्य हे आहे की आपल्या आरोग्यासाठी योग्य काय आणि अयोग्य काय हे निश्चित करायचे आहे. आपल्या आई वडीलांच्या चुकीच्या सवयींपासून बाजूला होऊन आपल्या आरोग्यास हितकारक असणाऱ्या सवयी लाऊन घ्याव्यात. MHMar 181.1

बहुतेक लोक आपल्याच चुकीच्या कामामुळे दुःख भोगतात. ते आप लेखाने पिणे, आणि अयोग्य सवयींमुळे आरोग्याच्या नियमांचा अनादर करतात. निसर्ग नियमांचे उल्लंघन करण्याचा परिणाम निश्चितच त्यांच्यासमोर येतो आणि आजारामुळे त्यांना होणारे त्रास पाहू त्यांचे आप्त स्वत:च्या चुकांकडे दुर्लक्ष करुन देवालाच दोष देतात. परंतु त्यांच्यावर येणारे दुःख व आजार याला परमेश्वर जबाबदार नाही... MHMar 181.2

परमेश्वराने आपणास जीवन शक्ति दिली आहे. त्याने आपल्या शरीराची रचना अशाप्रकारे केली आहे की शरीर रोगांचा प्रतिकार करु शकते. परंतु त्याला काही मर्यादा आहेत. शरीराती इंद्रिये एकमेकांचे ताळतंत्र ठेवत असते व तसे होणे आवश्यक आहे. कारण आपल्या जीवन शक्तिला एक मर्यादा आहे. जर आपण सावधगिरी बाळगून आपली जीवनशक्ती सुरक्षित ठेवतो. तर उचित आरोग्य प्राप्ती होईल. यामुळे शरीरातील कोमल इंद्रिये सुद्धा सुरक्षित राहतील. परंतु आपल्या वाईट सवयींमुळे आपली जीवन शक्ति अधिक प्रमाणात खर्च होऊ लागली तर नाडी तंत्राला इतर इंद्रियापासून उधार शक्ति घ्यावी लागते. भविष्यासाठी सुद्धा शक्ति राखून ठेवलेली असते तिचा वापर अशाक्तपणात करण्यात येतो. जेव्हा शरीराला एखादी जखम होते तेव्हा इतर सर्व इंद्रिये किंवा शरीर व्यवस्था मदतीसाठी धाऊन जातात. शरीर दुखावल्यामुळे सर्व इंद्रिये प्रभावित होतात. आपले शरीर नैसर्गिकपणे अनेक अत्याचार सहन करते जस मद्यपान, धुम्रपान व तंबाखू यांचे दुष्परिणाम दूर करण्याचा प्रयत्न करते. शरीरात काही बिघाड झाल्यास रोगाला प्रतिकार करण्याच्या हेतुने शरीर तापते किंवा इतर काही प्रतिक्रिया शरीरावर दिसून येते. MHMar 181.3