Go to full page →

सूज्ञतेचे उपचार : MHMar 182

आरोग्याची जेव्हा दीर्घकाळ हेळसांड होते तेव्हा त्याचे परिणाम शरीरावर रोगाच्या रुपाने निर्माण होतात. निसर्गाचे कार्य आहे की शरीराचा त्रास होता होईतो कमी करणे. स्वत:च्या वेदना व दु:ख कमी करण्याचा तोच प्रयत्न करतो जो एक पीडीत असतो. पहिली गोष्ट अशी की रोगाचे मूळ कारण शोधून काढणे आणि रोगाचे मूळ कारण नष्ट करण्याचे काम करणे. आरोग्य मूळ पदावर आणण्यासाठी जर योग्य तंत्राचा वापर केला नाही आणि विपरीत औषधांचा वापर केला तर आजार वाढू शकतो असंतुलितपणा किंवा अनियमितपणामुळे शरीराचे संतुलन बिघडले असते. प्रथम ते नियमित करावे. MHMar 182.1

खाण्यापिण्याचा असंयमपणा आणि इतर काही कारणामुळे आजारपण उत्पन्न होते आणि निसर्गनियमानुसार वागणूक नसेल तर त्याचे कार्य वाढते प्रथम ते ओझे कमी करावे. अनेक रोगांच्या बाबतीत सर्वात योग्य गोष्ट म्हणजे रुग्णाने एक किंवा दोन वेळचे जेवण घेऊ नये. म्हणजे थकलेल्या पाचन संस्थेला विश्रांती मिळेल. काही दिवस फळे खाण्याने मानसिक कार्य करणाऱ्यांना लाभदायक होते. काही वेळा पूर्णपणे भोजन वर्ण्य करावे. यानंतर हलक्या भोजनाने सुरुवात करावी. अशा नैसर्गिकपणाच्या उपचाराने रुग्णाची समस्या आपोआप कमी होते व नंतर नाहीशी होते. दोन तीन महिने थोडे थोडे खाण्याने रुग्णाची खात्री होईल की आत्मत्यागच निरोगी राहण्याचा मार्ग आहे. MHMar 182.2