लूक १६:१९ -३१ यावर आधारीत
“श्रीमंत माणस व भिकारी लाजार” COLMar 189.1
“कोणी एक श्रीमंत मनुष्य होता, तो जांभळी व फार बारीक सुताची वस्त्रे घालीत असे, आणि प्रतिदिवशी थाटामाटाने ख्यालीखुशाली करीत कसे. त्याच्या दरवाजाजवळ लाजार नावाचा फोडांनी भरलेला एक दरिद्री टाकण्यात आला होता; त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा होती; आणि कुत्री येवून त्याचे फोड चाटीत असत. पुढे असे झाले की तो दरिद्री मेला, आणि देवदूतांनी त्याला अब्राहामाच्या उराजवळ नेवून ठेविले; श्रीमंतही मेला व त्याला पुरले. मग तो अघोलोकांत यातना भोगीत असता त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहाम व त्याच्या उराजवळ असलेला लाजार यास दुरून पाहिले. तेव्हा त्याने हाक मारून म्हटले, हे बापा अब्राहामा, मजवर दया करून लाजाराला पाठीव यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुचकळून माझी जीभ थंड करावी, कारण या जाळांत मी क्लेश भोगीत आहे. अब्राहाम म्हणाला, मुला, तुला आपल्या आयुष्यात आपले सुख भरून मिळाले; तसे लाजाराला दुःख भरून मिळाले, याची आठवण कर; आता याला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगीत आहेस; याशिवाय जे एथून तुम्हांकडे पार जावू पाहतात त्यास जाता येवू नये व तिकडून कोणी आम्हांकडे येवू नये म्हणून आमच्या व तुमच्यामध्ये मोठा दरा स्थापिलेला आहे. मग तो म्हणाला, तर बापा, मी विनंती करीतो, त्याला माझ्या बापाच्या घरी पाठीव; कारण मला पाच बंधू आहेत, त्यांनी तरी या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने त्यास साक्ष द्यावी. अब्राहामाने त्याला म्हटले, त्यांच्याजवळ मोशे व संदेष्टे आहेत त्यांचे त्यांनी ऐकावे. तो म्हणाला, हे बापा अब्राहामा, असे नाही; मेलेल्यामधून कोणी त्याजकडे गेला तर ते पश्चात्ताप करीतील. तेव्हा त्याने त्याला म्हटले, जर ते मोशाचे व संदेष्टयांचे ऐकत नाहीत तर मेलेल्यामधूनही कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही’ लूक १६:१९-३१. COLMar 189.2
श्रीमंत माणूस व लाजार या दाखल्यात ख्रिस्त हे दाखवितो की - मनुष्याने त्याच्या या जीवनात सार्वकालिक जीवनाचा निर्णय घेणे. या कृपेच्या काळात प्रत्येक मनुष्याला परमेश्वराची कृपा ही दिली आहे. पण जर मनुष्य त्यांची या आयुष्यातील संधी त्यांच्या स्वत:च्या ख्यालीखुशालीत खर्च करतील तर सार्वकालिक जीवन यापासून दुरावतील. यानंतर त्यांना दुसरा कृपेचा काळ दिला जाणार नाही. अशाप्रकारे त्यांनी त्यांच्या निवडीमुळे एक मोठा अशक्य दरा ते व परमेश्वर यांच्यामध्ये केला आहे. COLMar 190.1
ज्या श्रीमंताने परमेश्वराला त्याचा आश्रयस्थान केले नाही व ज्या गरीबांनी परमेश्वराला त्यांचा आश्रयदाता केले, त्यांच्यातील फरक या दाखल्याद्वारे दाखविला जातो. ख्रिस्ताने हे दाखविले की वेळ असा येत आहे की त्यावेळी या दोन्ही वर्गाच्या जीवनात उलट फरक दिसेल. जे कोणी जगिक मालमत्तेबाबत दरिद्री आहेत, तरी त्यांनी परमेश्वरावर विश्वास ठेविला व सर्व त्रास सहन करीत आहेत, अशा लोकांना, जे आता जगिक उच्च स्थानाचा मान घेतला पण त्यांनी परमेश्वराला त्यांचे जीवन समर्पित केले नाही. त्याच्याहन उच्च श्रेष्ठ मनाच्या हद्दयावर नेमिले जाईल. COLMar 190.2
ख्रिस्त म्हणाला,“कोणीएक श्रीमंत मनुष्य होता, तो जांभळी व फार बारीक सुताची वस्त्रे घालीत असे, आणि प्रतिदिवशी थाटामाटाने ख्यालीखुशाली करीत असे, त्याच्या दरवाज्याजवळ लाजार नावाचा फोडांनी भरलेला एक दरिद्री टाकण्यात आला होता ; त्या श्रीमताच्या मेजावरून खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा होती.” COLMar 190.3
अन्यायी न्यायासाठी या वर्गात या श्रीमत माणसाची गणना केली जात नव्हती. कारण त्या अन्यायी न्यायाधीशाने उघडपणे सांगितले की परमेश्वर व मनुष्य यास तो भीत नाही वा आदर देत नाही. हा श्रीमंत मनुष्य स्वत:ला अब्राहामाचा पुत्र वा संतान समजत असे. त्या श्रीमंताने लाजारास क्रूरपणे वागविले नाही वा तो असा घाणेरडा म्हणून त्याला घालवूनही दिले नाही. त्या श्रीमंताचे जाणे येणे हे थाटामाटाचे आहे हे पाहाणे यात त्या लाजारास जर समाधान वाटत असेल तर त्याने त्याला तेथे राहू दिले. पण तो बंधु त्रास भोगित आहे, त्याच्या गरजा अपुऱ्या म्हणून अडचणीत आहे तरी श्रीमंत मनुष्य त्याच्या स्वार्थीपणामुळे त्या लाजाराशी विचित्र वागत होता. COLMar 190.4
आजारी लोकांची काळजी घेणे यासाठी त्या काळी तेथे दवाखाने नव्हते. जे लोक त्रासात व अडचणीत असत अशा लोकांबाबत श्रीमंताना सांगितले जात असे कारण परमेश्वराने श्रीमंतानी आजारी व गरजू लोकांची काळजी घेवून त्यांना सहानुभूतीपूर्वक मदत करावयाची होती आणि अशा हेतूनेच तो भिकारी श्रीमंताच्या आश्रयास होता. लाजार याला मित्र नव्हते, गृह, पैसा व अन्नही नव्हते. अशा परिस्थितीत तो कसेतरी दिवस कंठीत होता, उलटपक्षी तो श्रीमंत माणूस याला कशाचीही उणीव नव्हती. जे त्रासातील लोक त्याना मदत करावयास या श्रीमताकडे सर्व काही होते पण तो स्वत:साठी जगला आणि सध्या जगात लोक असेच जीवन जगत आहेत. COLMar 190.5
आज आमच्या सभोवती कितीतरी लोक भूकेले, उघडेवागडे व गहहीन असे आहेत. अशा गरजू लोकांना मदत करणे यात निष्काळजीपणा करणे म्हणजे आम्ही किती मोठी चुक केली याचा जाब एके दिवशी द्यावा लागेल, हे ओझे आमच्यावर राहील. सर्व लोभीपणा हा मूर्तिपूजा गणला जावून आपण दोषी ठरले जाऊ. सर्व स्वीपणा हा परमेश्वराच्या दृष्टीने अपराध आहे. COLMar 191.1
परमेश्वराने त्याच्या मालमत्तेचा श्रीमंताला कारभारी असा केला आणि त्या श्रीमंताने जे कोणी लाजार यासारखे त्रस्त असणारे अशांची काळजी घ्यावयाची होती. परमेश्वराने त्याला आज्ञा केली होती, “तू आपला देव परमेश्वर याजवर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्तिने प्रिती कर‘‘ (अनुवाद ६ : ५)”तू आपल्या शेजा-यावर स्वत:प्रमाणे प्रेम ठेव, मी परमेश्वर आहे‘‘ लेवीय १९ : १८. हा श्रीमंत यहुदी होता आणि परमेश्वराच्या आज्ञांची त्याला चांगली माहिती होती. पण परमेश्वराने त्याला जी संपत्ती व दाने दिली त्याचा त्याला हिशोब द्यावा लागेल हे तो विसरला गेला. त्या श्रीमंतावर परमेश्वराचा विपुल आशिर्वाद झाला होता, पण त्याचा उपयोग त्याने स्वत:साठी केला; स्वत:च्या सन्मानासाठी केला, परमेश्वराच्या गौरवासाठी केला नाही. ज्या प्रमाणात त्याला संपत्तीचे, वरदान प्राप्त झाले होते त्याप्रमाणात त्याने मानवी उध्दारासाठी त्याचा उपयोग करावयाचा होता. ही परमेश्वराची आज्ञा होती पण त्या श्रीमंताने परमेश्वराच्या या आज्ञेचा कधीच विचार केला नाही. त्याने लोकांना पैसे कर्जाऊ देवून त्यांच्यापासून व्याज घेतले, पण परमेश्वराने त्याला जे काही दिले त्यावर त्याने परमेश्वराला व्याज दिले नाही. तो श्रीमत ज्ञानी व कलाकार होता पण त्याचा त्याने काही उपयोग केला नाही, परमेश्वराला या सर्वांचा हिशोब देणे आहे हे तो विसरला आणि त्याने त्याचे सर्व सामर्थ्य केवळ ख्यालीखुशालीत घालविले. श्रीमंताच्या सभोवर असणारी सर्व साधने करमणुकीची होती, त्याच्या मित्रांनी केलेली स्तुती व खुशामत ही सर्व स्वार्थीपणाची होती. तो श्रीमंत त्याच्या मित्राच्या सहवासात इतका गुंतला की परमेश्वराच्या कृपेची जी सेवा करावयाची ती तो अगदी विसरून गेला. परमेश्वराचे वचन समजणे ही संधी त्याला होती, व त्या वचनाप्रमाणे आचरण करणे ही वेळ व साधणे त्याजकडे होती, पण तो त्याच्या मित्राच्या सहवासामुळे ख्यालीखुशाली यात इतका गुंतला की तो सार्वकालिक परमेश्वर यास विसरून गेला. COLMar 191.2
या दोन इसमाच्या परिस्थितीत बदल होणेची वेळ झाली होती. लाजार दरिद्री दिवसेंदिवस त्याचा त्रास सहन करीत, शांत पडून होता. पुढे कालांतराने लाजार मरण पावला व त्याला पुरले गेले. त्याच्यासाठी शोक करावयास कोणीही आप्तजन नव्हते; पण त्याची ती सहनशील व त्रास यामुळे त्याने ख्रिस्तासाठी साक्ष दिली, त्याने विश्वासाची परीक्षा पूर्ण केली, पास झाला, लाजार मरण पावला व त्याला देवदूतानी अब्राहामाच्या उराशी नेले. COLMar 192.1
जे लोक ख्रिस्तात दुःख व त्रास सहन करीतात अशा लोकांचा प्रतिनिधी, लाजार आहे. जेव्हा कर्णा वाजेल तेव्हा कबरेतील लोक (ख्रिस्तांत मेलेले) ख्रिस्ताची वाणी ऐकतील व पुनरूत्थान होवून कबरेतून बाहेर येतील, त्यांना त्यांचे वेतन प्राप्त होईल; कारण त्यांचा परमेश्वरावरील विश्वास केवळ तत्त्व नसून खरेपणाचा विश्वास होता. COLMar 192.2
“श्रीमंतही मेला व त्याला पुरले. मग तो अधोलोकांत यातना भोगीत असता त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहाम व त्याच्या उराजवळ असलेला लाजार यास दुरून पाहिले. तेव्हा त्याने हाक मारून म्हटले, हे बापा अब्राहामा, मजवर दया करून लाजाराला पाठीव, यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुचकळून माझी जीभ थंड करावी, कारण जाळात मी क्लेश भोगीत आहे.’ लूक १६:२२-२६. COLMar 192.3
लोकांच्या मतानुसार ख्रिस्ताने दाखला सांगून त्या लोकांशी संपर्क साधला. मनुष्याचे मरण व पुनरूत्थान या काळात मनुष्याची बुध्दी ही जागृत असते असे तत्त्व त्या लोकांचे होते; आणि अशा मताचे लोक येशूचा दाखला ऐकत होते. येशूला त्या लोकांच्या भ्रामक कल्पना माहित होत्या आणि त्यानुसार येशूने दाखला सांगून त्यांच्यातील ही भ्रामक कल्पना काढून खरे सत्य काय हे या दाखल्याद्वारे सांगणे हा हेतू तयार केला. त्या लोकांचे परमेश्वराशी खरे नाते कोणते हे दिसावे यासाठी येशूने त्यांच्यापुढे आरसा धरला. मनुष्याला जे काही प्राप्त झाले आहे ते सर्व परमेश्वरापासून प्राप्त झालेले आहे, मानवाचा त्यावर काहीही हक्क नाही, हा प्रमुख विचार मानवाने लक्षात ठेवावा. असे जे जे दिले आहे त्याचा जर मानव गैरउपयोग करील तर तो गैरउपयोग करणारा मानव, एखाद्या गरीब, दरीद्री आणि पिडीत व पण जो परमेश्वराचे भय बाळगितो व विश्वास ठेवितो अशा मानवाहून तो अति दरीद्री होय. COLMar 192.4
ख्रिस्ताची इच्छा आहे की, जे कोणी येशूचा संदेश ऐकतात त्यांनी हे लक्षात ठेवावे की, मानवाचे मरण झाले त्यानंतर त्या मृत मानवास तारण प्राप्तीची संधी अशक्य आहे. COLMar 193.1
मनुष्याच्या मरणानंतर त्याला तारण प्राप्तीची संधी नाही हा मुद्दा येशूला त्याच्या श्रोतेजणास समजावा अशी त्याची इच्छा होती. “मुला‘‘ याचा प्रतिनिधी म्हणून अब्राहाम उत्तर देतो...... “तुला आपल्या आयुष्यात आपले सुख भरून मिळाले, तसे लाजाराला दु:ख भरून मिळाले, याची आठवण कर; आता हयाला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगीत आहेस ; याशिवाय जे येथून तुम्हाकडे पार जाऊ पाहतात त्यांस जाता येऊ नये व तिकडून कोणी आम्हाकडे येऊ नये म्हणून आमच्या व तुमच्यामध्ये मोठा दरा स्थापिलेला आहे‘‘ अशाप्रकारे स्पष्टीकरण याद्वारे दुसरा कृपेचा काळ याची अपेक्षा करणे हे आशाहीन व अशक्य आहे. मानवास दिलेले सध्याचे जीवन केवळ याच काळात मानवाने सार्वकालिक जीवनाची तयारी व मागणी वा विनंती करावयाची आहे. COLMar 193.2
आपण अब्राहामाचे पुत्र आहोत हा विचार श्रीमताने धिक्कारला नाही, आणि संकटसमयी साहाय्य मागणे याचा तो प्रतिनिधी आहे हे ही त्याला मान्य होते. त्याने विनवणी केली, “तर बापा-अब्राहामा, मजवर दया करावी’ अशा प्रकारे त्याने परमेश्वराला प्रार्थना केली नाही, तर अब्राहामास प्रार्थना केली‘‘ अशाप्रकारे त्याने अब्राहामास परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ मानले, आणि तारणासाठी त्याने त्याचा संबंध अब्राहामाशी जोडला. वधस्तंभावरील चोराने त्याची प्रार्थना ख्रिस्ताला सादर केली. तो (चोर) म्हणाला, “हे येशू, तूं आपल्या राजाधिकाराने येशील तेव्हा माझी आठवण कर‘‘ (लूक २३:४२) आणि त्याला लगेच प्रति उत्तर दिले, “मी तुला खचीत सांगतो आज (मी येथे वधस्तंभावर असे नम्रपणे दु:ख भोगीत असतां) तू मजबरोबर सुख लोकात असशील”(लूक २३:४२) पण त्या श्रीमंत गृहस्थाने अब्राहामाकडे प्रार्थना केली आणि त्याला उत्तर मिळाले नाही. केवळ खिस्तच उंचावला गेला व “आम्ही मनुष्यापेक्षा देवाला मानिले पाहिजे. ज्याला तुम्ही खांबावर टांगून मारिले त्या येशूला आमच्या पूर्वजांच्या देवाने उठविले; त्याने इस्त्राएलाला पश्चात्ताप व पापांची क्षमा ही देणगी द्यावी म्हणून देवाने त्याला आपल्या उजव्या हस्ते राजा व तारणारा असे उच्च केले. या गोष्टीविषयी आम्ही त्याचे साक्षी आहो”(प्रे.कृत्त्ये ५:२९-३१)”आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही; जेणेकडून आपले तारण व्हावयाचे असे दुसरे नाम आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही.‘‘ (प्रे.कृ. ४ : १२). COLMar 193.3
श्रीमंत मनुष्याने त्याच्या जीवनात त्याला स्वत:ला जे आवडेल ते करणे त्यात आयुष्य घालविले आणि सार्वकालिक जीवनासाठी त्याने काही केले नाही हे त्याला मरणानंतर दिसले त्याचा उपयोग नाही. त्याने कोणती चुक केली हे त्याला समजले व त्यामुळे त्याला त्याच्या भावांची आठवण झाली, कारण ते त्याच्याप्रमाणेच जीवन जगत होते; ते ही स्वत:साठी ख्यालीखुशालीचे जीवन जगत होते. म्हणून त्याने विनंती केली. तर बापा, मी विनंती करीतो, त्याला (लाजारास) माझ्या बापाच्या घरी पाठीव, कारण मला पाच बंधू आहेत; त्यांनी तरी या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने त्यांस साक्ष द्यावी. अब्राहामाने त्याला म्हटले, त्यांच्याजवळ मोशे व संदेष्टे आहेत त्यांचे त्यांनी ऐकावे. तो म्हणाला हे बापा अब्राहाम, असे नाही; मेलेल्यांमधून कोणी त्याजकडे गेला तर ते पश्चात्ताप करतील. तेव्हा त्याने त्याला म्हटले, जर ते मोशाचे व संदेष्टयांचे ऐकत नाहीत तर मेलेल्यामधूनही कोणी उठला तरी त्यांची खातरी होणार नाही.’ (लूक १६ : २७-३१). COLMar 194.1
त्या श्रीमंताने त्याच्या भावासाठी खास चमत्कार म्हणून मृतातून-लाजारास याला पाठवावे अशी विनंती केली, पण त्याला स्पष्टपणे उत्तर दिले की त्याच्या म्हणण्याप्रमाणे ही घटना केली तरी ते ऐकणार नाहीत, त्यांचा पालट होणार नाही. त्याच्या विनंतीमुळे परमेश्वरावर ठपका दिला गेला. श्रीमंत मनुष्य जणु काय असेच म्हणत होता, परमेश्वराने जर मला पूर्ण इशारा दिला असता तर मी अशा दु:खद परिस्थितीत आलो नसतो. त्याच्या अशा विनवणीस जणू काय अब्राहामच उत्तर देत आहे; तुझ्या भावांना पुरेपुर इशारा दिला आहे. त्यांना सत्यप्रकाश दिला आहे पण तो त्यांना दिसत नाही; त्यांना सत्य प्रगट केले, पण ते ऐकावयास तयार नव्हते. COLMar 194.2
“जर ते मोशाचे व संदेष्टयांचे ऐकत नाहीत तर मेलेल्यामधूनही कोणी उठला तरी त्यांची खातरी होणार नाही‘‘ यहुदी राष्ट्र यांचा इतिहास पाहू जाता वरील विधान सत्य झाले आहे. बेथानीच्या लाजारसाला मरण पावून चार दिवस झाले होते आणि येशूने त्या लाजरसाला मेलेल्यांतून उठवून चमत्कारांतील शिरोमणी चमत्कार केला. या अभ्युत चमत्काराद्वारे यहुदी लोकांना येशूने देवपणा दाखविला, पण यहुदी लोकांनी त्या चमत्काराचा धिक्कार केला. लाजारस मेलेल्यातून उठला व त्या चमत्काराचा धिक्कार केला. लाजार मेलेल्यातून उठला व त्या सर्वासमक्ष साक्ष दिली, पण या महान चमत्काराबाबत त्यांनी त्यांची मने कठीण केली व ते यहुदी येशूला व लाजारसालाही जिवे मारण्याचा प्रयत्न करू लागले. (योहान १२ : ९ -११) COLMar 194.3
मानवाचे तारण व्हावे याप्रित्यर्थ परमेश्वराने नियम व संदेष्टे प्रस्थापित केलेले प्रतिनिधी आहेत. ख्रिस्त म्हणाला, लोकांनी या दोन्हीकडे लक्ष द्यावे. परमेश्वराच्या वचनातील त्याच्या वाणीकडे ते लक्ष देणार नाहीत तर मेलेल्यांतून उठून जरी साक्ष दिली तरी ते त्याचे ऐकणार नाहीत. COLMar 194.4
जे कोणी मोशे व संदेष्टे यांचे ऐकतील त्यांना परमेश्वराने वरील जे दिले त्यापेक्षा अधिक साक्षीची गरज लागणार नाही; परंतु परमेश्वराने दिलेला प्रकाश जर लोकांनी नाकारला व त्यांना दिलेली संधी गमावली तर मेलेल्यांतून कोणी उठला व त्यांना सदेश सांगू लागला तर ते त्यांचेही ऐकणार नाहीत. अशा चमत्काराने त्याचा पालट होणार नाही ; कारण जे कोणी नियम व संदेष्टे यांचा नकार करतील म्हणजे त्यांना जो काही सत्य प्रकाश त्याचाही ते नकार करतील. COLMar 195.1
अब्राहाम व एके काळी असणारा श्रीमंत माणूस याचे संभाषण हे लाक्षणिक आहे. त्यातून बोधपर धडा घेणे म्हणजे प्रत्येक मनुष्याला त्याचे कर्तव्य पार पाडणे यासाठी पुरेपुर प्रकाश दिलेला आहे. त्या त्या मनुष्याला ज्या प्रमाणात संधी व प्रसंग मिळाले त्या त्या प्रमाणात त्याला जबाबदारी देण्यात आली. परमेश्वराने मनुष्याला जे काम करावयास दिले त्याबाबत पुरेशी कृपा व प्रकाश ही दिली गेली. जर एकादा मनुष्य त्याला दिलेले काम लहानसे आहे असे समजून त्यांत तो पराभूत झाला तर त्याला मोठे काम देणे म्हणजे तो त्यात अविश्वासू असा होईल; आणि त्याला दिलेले आर्शिवादांची वाढ करणे यात तो निष्काळजी होईल. ‘जो अगदी अल्प गोष्टीविषयी विश्वासु तो पुष्कळाविषयीही विश्वासु आहे आणि जो अगदी अल्प गोष्टीविषयी अन्यायी तो पुष्कळा विषयीही अन्यायी आहे’ लूक १६: १० जे कोणी मोशे व संदेष्टे यापासून ज्ञान प्राप्त घेऊ इच्छित नाहीत आणि अद्भुत चमत्काराची मागणी करीतात आणि जरी चमत्कार झाला तरी त्याचा पालट होणार नाही. COLMar 195.2
लाजार व श्रीमंत मनुष्य यांचा दाखला याद्वारे ते अदृश्यपणे या जगात दोन वर्गाचे प्रतिनिधी असे आहेत. जर धनसंपत्ती अन्यायाने प्राप्त केली असेल तर मग श्रीमंत असणे हे काय पाप नाही. तो श्रीमंत होता याबाबत त्याला दोष दिला नाही, पण त्याला जी धनसंपत्ती दिली गेली त्याचा उपयोग त्याने केवळ त्याच्या स्वार्थीपणात खर्च केली. त्याने त्या संपत्तीचा उपयोग चांगली कार्ये यासाठी जर केला असता तर त्याची धनदौलत परमेश्वराच्या सिंहासनाजवळ, ठेवा अशी झाली असती. जो मनुष्य अशाप्रकारे सार्वकालिक जीवनाची धन-संपत्ती मिळवू पाहतो तो मनुष्य मरणामुळे दरिद्री होऊ शकत नाही. पण जो मनुष्य त्याची संपत्ती केवळ स्वत:च्यासाठी साठा करून ठेवू पाहतो तो ती धनसंपत्ती स्वर्गाला नेऊ शकत नाही. कारण तो अविश्वासू कारभारी असे त्याने पटवून दिले आहे. त्याच्या सर्व आयुष्यभरात त्याला चांगले ते प्राप्त झाले पण तो परमेश्वराला विसरला, परमेश्वराशी त्याचे कर्तव्य हे ही विसरला. स्वर्गीय धनसंपत्ती प्राप्त करणे त्यात तो पराभूत झाला. COLMar 195.3
श्रीमंत मनुष्याला किती तरी संधी होती तो प्रतिनिधी आहे; आम्हाला जी संधी व प्रसंग प्राप्त होतो त्याचा आम्ही उपयोग करणे व आपली देणगी वाढविणे, त्यामुळे कार्याची वाढ विस्तृत होईल त्यासोबत आपले आध्यात्मिक जीवनही वाढत जाईल. तारणाचा हेतू म्हणजे पाप नाहीसे करणे. याशिवाय पापामुळे मानवाच्या आध्यात्मिक देणगीची वाढ खटली गेली. त्या आध्यात्मिक देणगीची वाढ करणे. भावी जीवनांत पैसे नेता येत नाहीत, तेथे पैशाची गरज नाही; पण स्वर्गीयगही ख्रिस्ताकडे आत्मे जिंकणे यासाठी चांगली कामे केली गेली. ते आत्मे स्वर्गाला नेता येतात. पण जे कोणी स्वार्थीपणाने प्रभुच्या देणगीचा स्वतःसाठी उपयोग करीतात, त्यांच्या सभोवार गरजु लोकांना हातभार लावीत नाहीत, परमेश्वराच्या या जगातील कार्याला मदत करीत नाहीत. याद्वारे ते निर्माणकर्ता परमेश्वर याचा अपमान करीतात. परिणामी, स्वर्गीय वहीत त्यांच्या नावापुढे अशी नोंद केली जाते; परमेश्वराच्या धनसपत्तीची चोरी केली”. COLMar 196.1
श्रीमताला, पैशामुळे सर्व काही होते पण ज्या धनसंपत्तीमुळे परमेश्वराशी त्याचा जमाखर्च योग्य असा नव्हता. तो असे जीवन जगत होता की जणु काय हे सर्व त्याचे एकटयाचेच असे आहे. परमेश्वराचे पाचारण आणि पिडीतांचे दु:ख याकडे त्याने दुर्लक्ष केले होते. पण त्याला अखेर परमेश्वराचे बोलावणे आले त्याकडे तो दुर्लक्ष करू शकत नव्हता. ज्या भागात व ज्या मालमत्तेवर तो कारभारो होता तेथून त्याला काढले गेले त्याचा त्याला प्रतिकार करीता आला नाही. एक श्रीमंत माणूस अगदी हताश दरिद्री केला गेला. स्वर्गीय राज्यात विणलेली ख्रिस्ताची धार्मिकतारूपी झगा त्याला कधी दिला नाही. जो भरजरी, मलमली मौल्यवान झगा घालीत असे तो आता उघडा पडला होता. त्याचा कृपेचा काळ संपला. त्याने या जगात काही आणले नाही व तो जगातून काही घेवून गेला नाही. COLMar 196.2
ख्रिस्ताने पडदा उचलला आणि हे दृश्य शास्त्री व परूशी, याजक व अधिकारी यांना दाखविले. जे तुम्ही जगातील मालमत्ता याविषयी श्रीमंत आहा आणि परमेश्वराच्या बाबतीत श्रीमंत नाही ते तुम्ही हे दृश्य पाहावे. तुम्ही या दृश्यावर विचार करणार नाही काय ? जे काही मानवी दृष्टीने सन्माननीय असे वाटते ते परमेश्वराला विटाळ असे आहे. ख्रिस्त विचारतो, “कारण मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपल्या जीवाचा नाश करून घेतला, तर त्याला काय लाभ? मनुष्याने आपल्या जीवाचा मोबदला काय द्यावा ? मार्क ८:३६,३७. COLMar 196.3