लूक १२:१३ —२१ यावर आधारीत
द्रव्यलोभ व श्रीमंत मूर्ख मनुष्याचा दृष्टांत - COLMar 183.1
“लोकसमुदायातील कोणी एकाने त्याला म्हटले, गुरूजी, मला आपल्या वतनाचा विभाग द्यावा म्हणून माझ्या भावाला सांगा. तो त्याला म्हणाला, गृहस्था, मला तुम्हांवर न्यायाधीश किंवा वाटणी करणारा कोणी नेमिले? आणखी त्याने त्यांस म्हटले, ‘संभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा; कोणाला पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही. त्याने त्यांस एक दाखला सांगितला, कोणी एका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले, तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की, “मी काय करूं? कारण माझे उत्पन्न साठवावयास मला जागा नाही. मग त्याने म्हटले, मी असे करीन, आपली कोठरे मोडून मोठी बांधीन; आणि तेथे मी आपले सर्वधान्य व माल साठवीन. मग मी आपल्या जीवाला म्हणेन, हे जीवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका पुष्कळ माल ठेविलेला आहे, विसावा घे, खा, पी, आनंद कर; परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मुर्खा, आज रात्री तुला देवाज्ञा होईल, तेव्हा जे काही तू सिध्द केले आहे, ते कोणाचे होईल? जो कोणी आपणासाठी द्रव्यसंचय करीतो व देव विषयक बाबतीत धनवान नाही तो तसाच आहे’ लूक १२:१३-२१. COLMar 183.2
ख्रिस्त शिक्षण देत असता नेहमीप्रमाणे येशू सभोवती शिष्य जमले असता तेथे इतर लोकही आले. शिष्यांना ज्या गोष्टींना लवकरच तोंड द्यावे लागेल त्या दृश्याविषयी त्यांना बोलत होता. येशने त्यांना जे सत्य सांगितले ते सत्य शिष्यांनी लवकरच लोकांना सांगावयाचे होते; आणि त्यामुळे शिष्यांना जगाचे अधिपतीच्या पुढे उभे राहावे लागेल याला कारण सत्याशी झगडणे हे कारण होईल आणि या कारणामुळे शिष्यांना कोर्टातील सरकारी अधिकारी व राजे यांच्यापुढे उभे राहावे लागेल. शिष्यांना जे ज्ञान लागेल त्याची शाश्वती येशूने दिली कारण असे ज्ञान दुसरे कुठूनही मिळणार नव्हते. येशूच्या शब्दाने लोकसमुदायाची अंत:करणे पालटली, पण त्याच शब्दाने येशूचे शत्रु घोटाळयात पडले, आणि शिष्यांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची साक्ष तेथे दिसून आली. COLMar 183.3
पण तेथे असे काही लोक होते की त्यांना त्या स्वर्गीय दानाची वा कृपेची इच्छा केवळ त्यांच्या स्वार्थपणासाठीच होती. सत्य हे किती प्रकाशित केले जाते हे त्यांनी पाहिले तेव्हा ते ख्रिस्ताच्या अद्भुत सामर्थ्याने चकित झाले. शिष्यांना अभिवचन दिले होते, की सरकारी अधिकारी व न्यायाधीश याजपुढे बोलावयास त्यांना समज वा ज्ञान दिले जाईल, हे त्यांनी ऐकले. मग येशू, त्या लोकांना त्यांच्या जगिक फायद्यासाठी त्याचे सामर्थ्य त्याना देऊ शकेल का? COLMar 184.1
“लोकसमुदायातील कोणी एकाने त्याला म्हटले, गुरूजी, मला आपल्या वतनाचा विभाग द्यावा म्हणून माझ्या भावाला सागा‘‘ वतनाची वाटणी कशी करावी हे परमेश्वराने मोशेद्वारे सांगितले आहे (अनुवाद २१: १७) पित्याच्या सर्व मालमत्तेची वाटणी करीत असताना समान भाग करून ज्येष्ठ पुत्राला दुप्पट वाटणी देणे व बाकी लहान भावांनी समानतेने घेणे. वरील मनुष्याला वाटले त्याच्या भावाने त्याला फसविले असावे म्हणून तो येशूकडे विनवणी करीत आहे. कारण अशाप्रकारे त्याला न्याय मिळून योग्य वाटणी मिळेल. ख्रिस्ताने जे सांगितले ते त्या मनुष्याने ऐकले आणि ही गोष्ट त्याला पटली; शात्री व परूशी याचा किती गभीर धिक्कार केला हे ही ऐकले असे शब्द जर त्याच्या भावाला सांगितले तर तो त्याच्या भावाचा वाटा देण्यास कधीच माघार घेणार नाही. COLMar 184.2
ख्रिस्ताने जे पवित्र शिक्षण दिले होते त्यांत या गृहस्थाने त्याच्या स्वार्थीपणाचा प्रश्न विचारला. त्याने त्याच्या स्वार्थाच्या गोष्टीकडे पाहिले आणि यात प्रभु मदत करील तेव्हाच त्याची कर्तबगारी दिसून येईल आध्यात्मिक गोष्टींचा त्याच्या ठायी प्रारंभही झाला नव्हता. आपल्या पित्याच्या वतनाचा हिस्सा त्याला मिळणे हाच त्याचा मुख्य विषय होता. येशू गौरवी राजा, स्वर्गात सर्वसंपन्न असून तो आम्हांसाठी दीन दरिद्री झाला यासाठी की, मानवास स्वर्गीय प्रितीचा खजिना प्राप्त व्हावा. पवित्र आत्मा त्याला विनवीत होता की त्याने स्वर्गीय वारसा हक्क प्राप्त करावा ; “सदाजीवी आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मळ व न कोमेजणारे वतन मिळण्यासाठी.” १ पेत्र १:४ त्याने ख्रिस्ताच्या सामर्थ्याचे चमत्कार पाहिले होते. त्या महान येशू शिक्षकाला, त्याच्या मनातील प्रमुख गोष्ट बोलण्याची त्याला आता संधी मिळाली. व्यापारी रूपकाप्रमाणे त्याची नजर पृथ्वीवरील नाशवंत गोष्टीकडे होती. त्याला जो गौरवी मुगुट प्राप्त होईल त्याकडे त्याची नजर नव्हती, शिमोन जादुगाराप्रमाणे, त्याने परमेश्वराची देणगी ही केवळ जगिक प्राप्तीसाठी उपयोगी करणे असाच विचार केला. COLMar 184.3
या पृथ्वीवरील तारणारा येशू यांचे काम संपुष्टात येत होते. येशू या पृथ्वीवर त्याच्या कृपेचे राज्य प्रस्थापित करावयास आला होता. त्याची पूर्णतः करावयास केवळ काही महिने शिल्लक राहिले होते. येशूला जे महान कार्य करावयाचे होते त्यापासून त्याला परावृत्त करून स्वार्थापायी त्यांच्या जमिनीचा वाद मिटविणे यात त्याचा वेळ घेतला गेला. परंतु येशूने त्याला त्याच्या कार्यापासून परावृत्त होऊ दिले नाही. येशूने उत्तर दिले, “गृहस्था, मला तुम्हांवर न्यायाधीश किंवा वाटणी करणारा कोणी नेमिले?” COLMar 185.1
जे खरे ते येशू त्या मनुष्याला सांगू शकला असता. त्या वादातील सत्य काय हे येशूला माहित होते; परंतु त्या भावांचे भांडण होणे याचे कारण म्हणजे ते दोघेही स्वार्थी होते. या कारणास्तव येशू म्हणाला की अशा लोकांचा वाद मिटविणे हे माझे काम नाही. येशू दुसऱ्या हेतुस्तव आला होता. सुवार्ता संदेश सागणे व लोकांमध्ये सार्वकालिक टिकाऊ अशांकडे जागृती करणे यासाठी आला. COLMar 185.2
जे कोणी येशूच्या नावाने सुवार्ता सांगतात त्याच्यासाठी ख्रिस्ताने या वादात एक धडा दिला आहे. जेव्हा येशूने बारा जणास पाठविले तेव्हा तो म्हणाला, “जात असता असा उपदेश करा की, स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. रोग्यास बरे करा, मेलेल्यांस उठवा, कुष्ठास शुध्द करा; भुते काढा, तुम्हांस फुकट मिळाले आहे, फुकट द्या‘‘ मत्तय १०: ७, ८. त्यांनी लोकांची जगिक भांडणे मिटविणे यात भाग घ्यावयाचा नव्हता. त्याचे काम म्हणजे लोकांनी परमेश्वराशी समेट करणे हे होते. या कार्यात ते लोकांना आशिर्वाद असे होते. पाप व त्याची शिक्षा यावर केवळ एकच उपाय म्हणजे ख्रिस्त! समाजावर पापाने जो शाप आला त्यावर एकच उपाय म्हणजे ख्रिस्त कृपेची सुवार्ता हा आहे. श्रीमंत लोक गरीबांवर अन्याय करीतात त्यामुळे गरीब श्रीमंताचा द्वेष करीतात या दोघांच्या स्वभावाचे कारण त्यांचा स्वार्थीपणा हे आहे; आणि हा स्वार्थीपणा जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ख्रिस्ताला शरण जाणे. आमचे स्वार्थी हदय घेऊन आम्हास नवीन प्रेमळ हदय केवळ येशूच देऊ शकतो. यासाठी जे ख्रिस्ताचे सेवक असतील त्यांनी पवित्र आत्म्याच्या साहाय्याने सुवार्ता सांगणे आणि येशूने मानवाच्या हितार्थ जसे कार्य केले तसे आम्हीही करावे. यानंतर याचा परिणाम हा मानवी उध्दारासाठी होईल, त्यात त्यांना आशिर्वाद प्राप्त होईल, आणि कोणी मानवाने केला नाही. इतका उध्दार व कार्यसिध्दीचा कार्यभाग होईल. COLMar 185.3
येशूने, त्या मनुष्याला प्रश्न विचारला त्याच्या मुळाशी घाव घातला व या सारखे जे वाद होते त्यावरही याचा परिणाम म्हणून येशू म्हणाला, “संभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा; कोणाला पुष्कळ संपत्ति असली तरी ती त्याचे जीवन होते असे नाही. COLMar 186.1
“त्याने त्यास एक दाखला सांगितला: कोणी एका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले. तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की, मी काय करू ? कारण माझे उत्पन्न साठवावयास मला जागा नाही. मग त्याने म्हटले, मी असे करीन, आपली कोठरे मोडून मोठी बांधीन, आणि तेथे मी आपले सर्व धान्य व माल साठवीन. मग मी आपल्या जिवाला म्हणेन, हे जिवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका पुष्कळ माल ठेविलेला आहे; विसावा घे, खा, पी, आनंद कर; परत् देवाने त्याला म्हटले, अरे मुर्खा, आज रात्री तुला देवाज्ञा होईल; तेव्हा जे काही तू सिध्द केले आहे, ते कोणाचे होईल? जो कोणी आपणासाठी द्रव्य संचय करीतो व देवविषयक बाबतीत धनवान नाही तो तसाच आहे” COLMar 186.2
श्रीमंत मूर्ख मनुष्याचा दाखला यात ख्रिस्ताने हे दाखविले की जे कोणी आपले सर्वस्व जग आहे असे समजतात त्यांचा मूर्खपणा दाखविला. या श्रीमंत मनुष्याला सर्व काही परमेश्वरापासून मिळाले. त्याच्या जमिनीवर सूर्याचा प्रकाश पाडला गेला, कारण सूर्य हा धार्मिक व अधार्मिक यांच्यावर उगवतो व सूर्य प्रकाश देते. बरे व वाईट या दोघावरही पाऊस पडतो. परमेश्वराने पीक उगवू दिले, वाढू दिले व पीक विपुल आले. त्या श्रीमंत गृहस्थास इतके पीक आले की, त्याला काळजी वाटली की आता या पीकाचे काय करावे. कोठरे तर धान्याने भरली होती, जादा धान्य ठेवणेसाठी जागा नव्हती. यावेळी त्याने परमेश्वराचा विचार केला नाही, कारण परमेश्वरापासून ही सर्व कृपा प्राप्त झाली होती. परमेश्वराने त्याला त्याच्या मालमत्तेचा कारभारी बनविले आहे आणि म्हणून त्याने धान्यांतून गरजू लोकांची मदत करणे हे त्याचे कर्तव्य होते. परमेश्वराच्या वतीने धर्मकार्य करणे ही आशिर्वादीत संधी त्याला होती. पण त्याने केवळ स्वत:चाच विचार केला, स्वत:चेच सुख पाहिले. COLMar 186.3
या श्रीमंत मनुष्याच्या लक्षात आणून दिले की, गरीब, अनाथ, विधवा, दुःखीत व पिडीत लोक यांचाही विचार करावा; त्यांच्या साहाय्याने तुमच्या धान्याचा उपयोग होईल. अशी किती तरी ठिकाणे आहेत. त्याच्याकडे जे जादा उत्पन्न होते त्यांचा उपयोग किती तरी घरातील गरजा भागविणेस मदत झाली असती, कितीतरी भूकेले तृप्त झाले असते; कितीतरी उघडे त्यांना वस्त्र पांघरणेस मिळाले असते, कित्येक लोकांना आनंद झाला असता, अन्न व वस्त्रासाठी जे प्रार्थना करीत होते त्यांना प्रत्युत्तर मिळाले असते, अशाप्रकारे कित्येकांची स्तुती स्वर्गापर्यत पोहचली असती. परमेश्वराने गरजवंताची प्रार्थना ऐकली व त्यानुसार परमेश्वराने त्याच्या कृपेने तरतूद केली. (स्तोत्र ६८ : १०) श्रीमंत मनुष्याला विपुल आशिर्वाद देवून त्याद्वारे पुष्कळांसाठी विपुल संग्रह पुरविला. पण त्या श्रीमंताने गरजवंताच्या विनवणीकडे दर्लक्ष केले व त्याच्या चाकरास म्हणाला, “मी असे करीन ; आपली कोठरे मोडून मोठी बाधीन, आणि तेथे मी आपले सर्व धान्य व माल साठवीन. मग मी आपल्या जिवाला म्हणेन, हे जीवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका पुष्कळ माल ठेविलेला आहे ; विसावा घे, खा, पी, आनंद कर.” COLMar 186.4
जी जनावरे मरून जातात त्यांच्यापेक्षा या मनुष्याचे ध्येय हे अधिक नव्हते. तो असे जीवन जगत होता की, जणू काय परमेश्वर नाही, स्वर्ग नाही, मानवासाठी भावी वा भविष्यात जीवन हे नाही; जे काही होते त्याचेच होते त्यात परमेश्वर व मानव यांचा काहीच भाग नव्हता. असे त्याला वाटत होते. स्त्रोतकर्ता याने या मनुष्याबाबत लिहिले, “मूढ आपल्या मनात म्हणतो, देव नाही, स्तोत्र १४: १. COLMar 187.1
त्या मनुष्याने ते स्वत:साठी व त्याचे जीवन स्वत:साठीच होते. त्याने पाहिले की आपल्या जीवनासाठी भावी काळात पुरेल उरेल एवढा साठा आहे, तो साठा जपून ठेवणे व त्याचा उपयोग घेणे एवढेच त्याला दिसत होते. इतरापेक्षा तो स्वत:ला भाग्यवान समजत होता आणि आपण किती हशार व कर्तबगार कारभारी आहोत. याचे त्याला भूषण वाटत होते. तेथील नागरिक त्याला त्याच्या कामगिरीबद्दल वाहवा करीत होते ; तो एक समृध्द नागरिक मानीत असत. कारण, “तू आपले बरे करून घेतले म्हणजे लोक तुझा स्तुतीपाठ गातात‘‘ स्तोत्र ४९: १८. COLMar 187.2
“परंतु या जगाचे ज्ञान देवासमोर (परमेश्वर) मूर्खपण आहे’ १ करिंथ ३ : १९ श्रीमंत मनुष्य त्याच्या जीवनासाठी सुखाचे दिवस पाहात असता, परमेश्वर दुसरी वेगळी योजना आखीत होता. या अविश्वासू कारभारी श्रीमंताला संदेश दिला जातो, “अरे मुर्खा, आज रात्री तुला देवाज्ञा होईल “ही जी मागणी केली ती काय परत पैशाने विकत घेता येत नाही. त्याने जी संपत्ति साठविली त्यामुळे शिक्षा ही काय स्थगित करिता येत नाही. त्याने त्याचे सर्व आयुष्य खर्च करून जे काही प्राप्त केले होते ते एका क्षणात त्याला निरर्थक झाले. “तेव्हा जे काही तू सिध्द केले आहे, ते कोणाचे होईल ? त्याची ती अफाट शेती व ती मोठमोठी कोठरे ही सर्व त्याजपासून घेतली गेली. “तो धन साठवितो, पण ते कोणाच्या हाती लागेल हे त्याला ठाऊक नाही.”स्तोत्र ३९: ६. COLMar 187.3
त्याने जे प्राप्त करून घेतले नाही तेवढेच सुरक्षित राहिले. तो स्वार्थी जीवन जगता असता त्याने देवाच्या प्रितीचा नकार केला, ही प्रिती त्याच्यापासून वाहत जावून त्याच्या बंधू वर्गापर्यंत पोहचली असती. अशाप्रकारे त्याने जीवनाचा नकार केला. कारण परमेश्वर देव प्रिती आहे, आणि प्रिती हे जीवन आहे. या श्रीमंताने आध्यात्मिक जीवनाऐवजी पृथ्वीवरील ऐहिक गोष्टीची निवड केली आणि त्याचाही शेवट त्या पृथ्वीवरील ऐहिक संपत्ती बरोबर नाहीसा होणार, “मनुष्य प्रतिष्ठित असून त्याला अक्कल नसली, तर तो नश्वर पशुसारखा आहे. स्तोत्र ४९:२०. COLMar 187.4
“यासाठी की जो कोणी स्वत:साठी धनसंचय साठवितो तो परमेश्वराच्या कार्यात श्रीमंत नाही‘‘ हे चित्र वा दृश्य सर्वकाळासाठी आहे. प्राचीन काळचे बाबोलोन लोकासारखे तुम्ही स्वार्थीपणे केवळ योजना करू शकता, तुम्ही संपत्ती साठवू शकता; तुम्ही उंच व भव्य इमारती बांधू शकता; पण तुमचा नाश करावयास येणारा दूत याला बधन म्हणून तुम्ही उंच तट व भक्कम दरवाजा केव्हाही बांधू शकत नाही. बेलशस्सर राजाने त्याच्या राजवाडयात मेजवानी केली आणि “त्यांनी द्राक्षारस पिऊन सोने, रूपे, पितळ, लोखंड, काष्ठ व पाषाण यापासून घडलेल्या दैवतांचे स्तवन केले “पण एका अदृश्य हाताने भिंतीवर नाशाचे शब्द लिहिले, आणि शत्रुच्या सैन्याचे धावणे राजवाडयाच्या दरवाजापाशी ऐकले आणि विरूध्द पक्षाचा राजा सिंहासनावर बसला “त्याच रात्री खासद्यांचा राजा बेलशस्सर याचा वध झाला‘‘ (दानीएल ५ : ३०). COLMar 188.1
स्वार्थी जीवन जगणे म्हणजे नाश पावणे. लोभीपणा म्हणजे सर्व काही स्वत:ला पाहिजे यामुळे आपण आपला आत्मा जीवन सुखापासून अलिप्त करितो. स्वार्थी जीवन जगणे ती सैतानी वृत्ती आहे. इतरांचे चांगले व्हावे यासाठी स्वार्थत्याग करणे व मदत देणे ही, ख्रिस्ताची वृत्ती आहे. “ती साक्ष हीच आहे की देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आणि हे जीवन त्याच्या पुत्रामध्ये आहे. ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभले आहे ; ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही. त्याला जीवन लाभले नाही‘‘ १ योहान ५ : ११, १२. COLMar 188.2
‘आणखी त्याने त्यास म्हटले, संभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा; कोणाला पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही” COLMar 188.3