मत्तय १८:२१-३५ यावर आधारीत
कृतघ्न चाकराचा दृष्टांत - COLMar 175.1
“तेव्हा पेत्र त्याजकडे येऊन म्हणाला, प्रभुजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करू, सात वेळा काय ? येशूने त्याला म्हटले, सात वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर सातांच्या सत्तर वेळा. यामुळे स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे, त्या राजाला आपल्या दासापासून हिशेब घ्यावा असे वाटले आणि तो हिशेब घेऊ लागला तेव्हा एक कोटी रूपयांच्या देणेदाराला त्याजकडे आणिले. त्याच्या जवळ फेड करावयास काही नसल्यामुळे त्याच्या धन्याने हकूम केला की तो, त्याची बायको व मुले यांस व त्याचे जे काही असेल ते विकून फेड करून घ्यावी. तेव्हा त्या दासाने त्याच्या पाया पडून म्हटले, मला वागवून घ्या, म्हणजे मी आपली सर्व फेड करीन. तेव्हा त्या दासाच्या धन्याला दया येऊन त्याने त्याला मोकळे केले, व त्याचे ते देणे सोडीले. तोच दास बाहेर गेल्यावर ज्याच्याकडे त्याचे पंचवीस रूपये येणे होते असा त्याचा एक सोबतीचा दास त्याला आढळला, तेव्हा तो त्याला धरून त्याची नरडी आवळून म्हणाला, तुजकडे माझे येणे आहे ते फेडून टाक. यावर त्याचा सोबतीचा दास त्याच्या पाया पडून गयावया करून म्हणाला मला वागवून घे, म्हणजे मी तुझी फेड करीन; पण त्याचे न ऐकता त्याने जाऊन ते देणे तो फेडीपर्यंत त्याला बंदिशाळेत घालून ठेविले. तेव्हा घडलेला हा प्रकार पाहन त्याच्या सोबतीचे दास फार दुःखी झाले, आणि त्यांनी येऊन सर्व वर्तमान आपल्या धन्याला स्पष्ट सांगितले, तेव्हा त्याच्या धन्याने त्याला बोलावून म्हटले, अरे दुष्ट दासा, तू मला विनवणी केल्यावरून मी ते सर्व देणे तुला सोडीले; जशी दया मी तुजवर केली तशी दया तू ही आपल्या सोबतीच्या दासावर करावयाची नव्हती काय? मग त्याच्या धन्याने त्याजवर रूष्ट होवून तो सर्व देणे फेडीपर्यंत त्याला यातना करणाऱ्यांच्या हाती दिले. जर तुम्ही प्रत्येक आपापल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही, तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणेच तुम्हांविषयी करील.”मत्तय १८: २१ -३५. COLMar 175.2
पेत्राने, येऊन ख्रिस्ताला प्रश्न विचारला, “प्रभुजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करू, सात वेळा काय ?”शास्त्रींचे क्षमा करणेचे प्रमाण तीन वेळा असे मर्यादीत होते. पेत्राला वाटले आपण ख्रिस्ताची शिकवण असा विचार मनात घेऊन म्हणाला, सात वेळा क्षमा करावी कारण सात हा पूर्णपणे दर्शक आहे. पण ख्रिस्ताने शिकविले की आपण क्षमा करणे याबाबत कंटाळा करू नये. ख्रिस्त म्हणाला, “सात वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर साताच्या सत्तर वेळा.‘‘ COLMar 176.1
यानंतर येशूने दाखवून दिले की क्षमा करण्याची खरी भूमिका काय असावी व आपल्या मनात क्षमा न करणे यामुळे कोणता धोका येतो हे ही सांगितले. येशूने त्याच्या दाखल्यात सांगितले कोणी एका राजाचा कारभार काही अधिकारी पाहात होते. हे अधिकारी त्या राज्यातील अर्थव्यवस्था पाहात असता अलोट पैशाचा व्यवहार करीत होते. राजाने त्या अधिकाऱ्याचा हिशोब तपासणी करावयास सांगितली, तेव्हा एका अधिकारी मनुष्याला राजासमोर आणले आणि सांगितले याजकडे एक कोटी रूपयांची अफरातफर आहे आणि त्याच्याजवळ एवढी रक्कम द्यावयास काही नाही म्हणून राजाने नियमाप्रमाणे हुकूम केला की त्याचे जे असेल नसेल ते सर्व विकून पैशाची भरपाई करा पण तो अधिकारी इसम भयभीत झाला, त्याने राजाचे पाय धरले व म्हणाला, “मला वागवून घ्या, म्हणजे मी आपली सर्व फेड करीन. तेव्हा राजाला त्याची दया आली, त्याला मोकळे केले व त्याचे सर्व देणे माफ केले.’ COLMar 176.2
“तोच दास बाहेर गेल्यावर ज्याच्याकडे त्याचे पंचवीस रूपये देणे होते असा त्याचा एक सोबतीचा दास त्याला आढळला, तेव्हा त्याला छळ करून देणे मागू लागला. तेव्हा देणेकरी म्हणाला मला वागवून घे, म्हणजे मी तुझी फेड करीन पण त्याचे न ऐकता त्याला पंचवीस रूपयासाठी बंदीशाळेत टाकले. हे सर्व वर्तमान धन्याला सांगितले. तेव्हा धन्याने त्याला बोलाविले व म्हटले तू त्याची गय केली नाही. पंचवीस रूपयेसाठी आणि मी तुला एक कोटी रूपये सोडीले. तर आता तुला मीही बंदिशाळेत टाकितो. माझे सर्व कर्ज फेडीपर्यत आणि तसे त्याला बंदिशाळेत टाकले. COLMar 176.3
या दाखल्यातील ज्या बारीक गोष्टी सांगितल्या आहेत त्याचा आपल्या आध्यात्मिक गोष्टीशी काही संबंध नाही. त्या गोष्टीमुळे आपले मन बाजुला जावू देऊ नये. या दाखल्यात महान सत्य स्पष्ट केले आहे त्याकडे आपले विचार लागले पाहिजेत. COLMar 177.1
राजाने कर्ज माफ केले याचे दर्शक म्हणजे आमच्या सर्व पापांची स्वर्गीय क्षमा केली. राजा हे ख्रिस्ताचे दर्शक त्याला त्या दासाची दया आली व सर्व कर्ज माफ केले. त्या दासाचे मनुष्याने आज्ञाभंग केला हा त्याच्यावर आरोप होता. मानव पापी झाला त्यामुळे त्याला तारणाची गरज भासली, त्या मानवाच्या तारणास्तव ख्रिस्ताने देवपणास मानवी देहाचे पांघरून घातले व त्याचे (ख्रिस्त) धार्मिक जीवन अधार्मिक मानवाच्या तारणासाठी वधस्तंभी मरण सोसून दिले. मानवाच्या पापासाठी ख्रिस्ताने त्याचा प्राण दिला, ख्रिस्ताने स्वत:हून दिला व त्याच्या रक्ताने मानवासाठी पापक्षमा ही मोलाने घेतली. कारण परमेश्वर दयानिधी आहे, ज्याजजवळ उध्दारदाने विपुल आहेत. COLMar 177.2
आमचा जो पापी बंधु त्याजकडे आम्ही दया दाखवावी या दृष्टीने पाहाणे यासाठी ही भूमिका आहे. “प्रियजनहो, जर देवाने आपल्यावर अशा प्रकारे प्रिती केली तर आपणही एकमेकांवर प्रिती केली पाहिजे.’ १ योहान ४ : ११ “ख्रिस्त म्हणतो, तुम्हांस फुकट मिळाले आहे, फुकट द्या’ मत्तय १०:८. COLMar 177.3
या दाखल्यात कर्जदाराने कर्ज फेडीसाठी मुदत मागणीची विनवणी केली त्यावेळी वचन दिले, “मला वागवून घ्या, म्हणजे मी आपली सर्व फेड करीन‘‘ हे वाक्य धन्याने दयाळू पणाने रद्द केले म्हणजे त्याचे सर्व कर्ज माफ केले. आणि यानंतर धन्याने जशी दया केली याचा कित्ता गिरवावा म्हणून संधी दिली. हा दास बाहेर आला तेव्हा त्याला त्याचा एक सोबतीचा दास भेटला व त्याजकडून थोडे कर्जाचे पैसे येणे होते. प्रथमतः धन्याने एक कोटी कर्ज माफ केले आणि आता सोबतीच्या दासाला केवळ पंचवीस रूपये माफ करावयाचे होते. पण पहिला दास, दुसऱ्या दासाला दयाळूपणे नव्हे तर क्रूरपणे वागवू लागला. त्या दासाने त्याजकडे विनवणी केली मला वागवून घ्या, मी आपले सर्व देणे फेडीन, पूर्वी राजाकडे याही दासाने विनवणी केली होती पण त्या दुसऱ्या दासाची विनवणी मान्य केली नाही. ज्याला तूर्तच क्षमा केली होती त्याने दयाळ होऊन क्षमा करावयाची होती. त्याला जशी दया दाखविली तशी त्याने त्या दुसऱ्या दासाला दाखविली नाही. मला वागवून घ्या ही विनवणी त्याने ऐकली नाही. हा अपकारिक मनुष्य केवळ त्याचे पंचवीस रूपये एवढेच मनात धरून वागणूक करीत होता. त्या लहान रकमेसाठी शिक्षा ठोठावणे एवढेच त्याला समजले आणि त्याची किती मोठी रक्कम माफ केली त्यामुळे जन्माची कैद बंद झाली हे तो विसरला. COLMar 177.4
आज कितीतरी लोक अशा प्रकारचा स्वभाव दाखवितात. जेव्हा दुसऱ्या दासाने पहिल्या दासाकडे दयेसाठी विनवणी केली व ती त्याने मान्य केली नाही तेव्हा त्याला किती मोठे कर्ज माफ केले ही जाणीव त्याने ठेविली नाही. त्यावेळी तो किती हताश झाला होता. त्याला स्वत:ची सुटका व्हावी असे वाटत होते. तो म्हणाला, “मजवर दया करा, मी तुमचे सर्व कर्ज फेडीन‘‘ तद्वत् आज कित्येक लोक त्यांच्या कृत्त्याद्वारे परमेश्वराच्या कृपेची फेड करू पाहतात. याबाबत ते किती दुर्बल, हताश आहेत हे त्याचे त्यांनाच समजत नाही. परेश्वराची कृपा ही त्यांना मोफत देणगी आहे हे ते समजत नाहीत व स्वीकारीत नाहीत; तर उलट स्वधार्मिकतेत ते स्वत:ला उभारणेचा प्रयत्न करीतात. त्यांच्या स्वत:च्या पापामुळे त्यांची अंत:करणे नम्र होऊन पश्चात्तापी झालेली नाहीत व त्यामुळे ते अगदी त्या दुसऱ्या दासाप्रमाणे इतराबरोबर अक्षम्यपणे वागतात. अशा लोकाचे परमेश्वराविरूध्दचे पाप त्याच्या बंधुपेक्षा, अधिक प्रमाणात आहे म्हणजे त्या राजाने पहिल्या दासाला एक कोटी यांशी तुलना करीता त्या दुसऱ्या दासाचे याशी तुलना करीता त्या दुसऱ्या दासाचे पंचवीस रूपये ते काय ? असे असूनही तो वा ते लोक अक्षम्यपणे वागतात. COLMar 178.1
या दाखल्यांतील त्या कठोर दासाला त्याचा धनी म्हणाला, “अरे दुष्ट दासा, तू मला विनवणी केल्यावरून मी ते सर्व देणे तुला सोडीले ; जशी दया मी तुजवर केली तशी दया तू ही आपल्या सोबतीच्या दासावर करावयाची नव्हती काय ? मग त्याच्या धन्याने त्याजवर रूष्ट होवून तो सर्व देणे फेडीपर्यंत त्याला यातना करणाऱ्यांच्या हाती दिले, येशू म्हणाला, “जर तुम्ही आपापल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही, तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणेच तुम्हांविषयी करील‘‘ जो दुसऱ्याच्या अपराधाची क्षमा करीत नाही तो स्वत:च्या क्षमेची आशा सोडून देतो. COLMar 178.2
पण या दाखल्याच्या शिक्षणाचा गैरसमज करून घेऊ नये. परमेश्वर आमची क्षमा करीतो यामुळे आम्ही त्याच्या आज्ञा पाळणे यात कमी पडता कामा नये. म्हणून आम्ही आमच्या बंधुची क्षमा करणे यात कमी पडता कामा नये. ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना प्रार्थना करावयास शिकविली त्यांत हे ही की “जसे आम्ही आपल्या वृण्यास ऋण सोडीले आहे तशी तू आमची ऋणे आम्हांस सोड.‘‘ मत्तय ६:१२ आमची क्षमा व्हावी यासाठी आम्ही आमचा भाग म्हणजे घेतलेले कर्ज फेडण्याची जबाबदारी टाळणे असे होत नाही. जर कर्जदार, कर्ज देऊ शकत नाही, कारण त्याला त्याचा जमाखर्च बरोबर जमत नसेल, म्हणून त्याला तुरूंगात टाकू नये, त्याचा छळ COLMar 178.3
करू नये, त्याला कडकपणे वागवू नये, त्यांना आळशी बनवू नये. ‘पवित्रशास्त्र शिक्षण देते, परमेश्वर सांगतो, “कोणाला काम करण्याची इच्छा नसली तर त्याने खाऊही नये.‘‘ २ थेस्सल ३:१०. जो कोणी सतत परिश्रम करीतो त्याने आळशी लोकांचे पोषण करावे अशी परमेश्वराची इच्छा नाही. पुष्कळ लोकांना उणीव भासते वा दरिद्रय येते याची कारणे ते त्याचा वेळ वाया घालवितात, प्रयत्न करीत नाहीत, या लोकांच्या दारिद्र्याची जी कारणे आहेत ती जर दुरूस्त केली जात नाहीत तर त्यांच्या पोषणासाठी आपण जे काही करू ते सर्व जणू काय फाटलेली पिशवी आणि त्यात द्रव्य वा पैसे टाकणे यासारखे आहे. तरीपण असे काय दरिद्री अभाग्यवान आहेत की त्यांना आपण दया व मदत केली पाहिजे. आम्ही तशा परिस्थितीत असताना जसे लोकांनी आम्हाला मदत करणेची गरज आहे त्याप्रमाणे आम्ही त्यांना वागणूक द्यावी वा मदत करावी. COLMar 179.1
पवित्र आत्म्याच्याद्वारे प्रेषित पौल आम्हांस अशा प्रकारे सदोध करीतो “यावरून ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन, प्रितीचे काही सात्वन, आत्म्याचे काही भागीपणा, काही कळवळा व करूणा ही जर आहेत, तर तुम्ही समचित्त व्हा, म्हणजे एकमेकांवर सारखी प्रिती करा आणि एकजीव होवून एकचित्त व्हा, अशाप्रकारे, माझा आनंद पूर्ण करा. तुमच्या चित्तवृत्तींत तट पाडण्याचे किंवा पोकळ अभिमान धरण्याचे काही नसावे, तर लीनतेने एकमेकास आपणापेक्षा श्रेष्ठ मानावे; तुम्हांतील कोणी आपलेच हित पाहू नये. तर दुसऱ्यांचेही पाहावे. असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती ती तुम्हांमध्येही असो’ फिलिप्पै.’ २:१-५. COLMar 179.2
पापाविषयी कधीही कमीपणा समजू नये. एखादा बंधू दोषी आहे म्हणून त्याला त्रास देत राहू नये. येशू म्हणतो, “तुझ्या भावाने अपराध केला तर त्याचा निषेध कर‘’; लूक १७.३ कोणते पाप केले त्या पापाचे अचूक नाव घेणे व भाऊ दोषी असेल त्याजपुढे ते स्पष्टपणे मांडावे. COLMar 179.3
पौल, तिमथ्याला अधिकार वाणीने व त्यास पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने लिहितो, “वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखवावे, वाग्दंड कर व बोध कर.”२ तिमथ्य ४:२ आणि तीताला तो (पौल) लिहितो, कारण अनिवार व व्यर्थ बोलणारे आणि फसविणारे असे पुष्कळ लोक आहेत.. ही साक्ष खरी आहे; म्हणून कडकपणे त्याच्या पदरी दोष घाल.‘‘ तीतालापत्र १: १० - १३. COLMar 179.4
“तुझ्या भावाने तुझा अपराध केला, तर जा, आणि तू व तो एकटे असताना त्याचा अपराध त्याला दाखीव ; त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाऊ मिळविला असे होईल, परंतु त्याने जर न ऐकले तर तू आणखी एकदोघास आपणाबरोबर घे; अशासाठी की दोन किंवा तीन साक्षीदारांच्या तोंडाने प्रत्येक शब्द शाबीत व्हावा; आणि जर त्याने त्याचे न ऐकले तर तो तुला विदेशी किंवा जकातदार याच्यासारिखा होवो’ मत्तय १८: १५-१७. COLMar 179.5
प्रभुने सांगितले आहे की ख्रिस्ती लोकांतील भांडणे व कठीण समस्या या सर्व मंडळीतच मिटविणे. जे लोक परमेश्वराचे भय बाळगीत नाहीत अशा लोकासमोर तुम्ही वरील प्रसंगासाठी जाऊ नये. जर ख्रिस्ती मनुष्याने त्याच्या भावाविरूध्द काही गुन्हा केला असेल तर न्याय मागणे यासाठी अविश्वासकापुढे जावू नये. याप्रित्यर्थ ख्रिस्ताने जे शिक्षण दिले आहे त्याचे अनुकरण करावे आपण आपल्या भावाचा सूड घेणे याऐवजी त्याला कसे काय तारावे हे पाहा. जे कोणी परमेश्वरावर प्रिती करीतात व त्याचे भय धरीतात अशा लोकांवर परमेश्वराचा सरक्षणाचा हात राहील; आणि परमेश्वर धार्मिकपणे न्याय करीतो त्याजवर आपण विश्वास ठेवावा व आपल्या सर्व समस्या त्याच्याकडे सोपवून द्याव्यात. COLMar 180.1
जेव्हा एखादा मनुष्य आपला गुन्हा पुनः पुनः करीतो आणि पुनः पुनः गुन्हा कबूल करीतो, तेव्हा अशा गुन्हेगाराचा कंटाळा येतो व त्याला आपण पुरेशी क्षमा केली असे आपणास वाटते. पण असा गुन्हेगार मनुष्य संबंधाने आपण कसे वागावे म्हणून आपणास तारणारा येशूने सांगितले आहे, “तुझ्या भावाने अपराध केला तर त्याचा निषेध कर ; आणि त्याने पश्चात्ताप केला तर त्याला क्षमा कर.’ लूक १७:३ तो तुमच्या क्षमेला लायक नाही असे त्याला समजू नका. “तू ही परीक्षेत पडू नये याविषयी स्वत: संभाळा.‘‘ गलती ६:१. COLMar 180.2
जर तुझ्या भाषाने अपराध केला तर त्याची क्षमा कर. जेव्हा तो/ तुम्हांकडे पाप वा गुन्हा कबुल करावयास येतो तेव्हा तू असे म्हणू नये की त्याने पुरेसा पश्चात्ताप केला नाही व पुरेसे नम्र झालेले नाहीत. तुम्ही जणू काय त्यांची अंत:करणे वाचू शकता म्हणून तुम्हांला असा न्याय करावयाचा काही हक्क आहे काय ? परमेश्वराचे वचन असे म्हणते, “त्याने पश्चात्ताप केला तर त्याला क्षमा कर. त्याने एका दिवसात सात वेळा तुझा अपराध केला, आणि सात वेळा तुजकडे येवून, मी पश्चात्ताप करीतो, असे म्हटले, तर त्याला क्षमा कर.’ लूक १७:३,४ आणि केवळ सात वेळा नव्हे, तर साताच्या सत्तर वेळा - म्हणजे परमेश्वर जितकेदा तुझी क्षमा करीतो तितकेदा तू त्याची क्षमा कर. COLMar 180.3
आम्ही आमचे सर्वस्वी परमेश्वराची मोफत कृपा यावर सर्व काही सोपवून देतो. करारातील कृपा यामुळे तर आपला दत्तकपणा हा दिक्षित झाला. प्रभु ख्रिस्तांतील कृपेमुळे आमचे तारण, आमचा पुर्नजन्म व ख्रिस्ताबरोबर आपला दत्तकपणाचा वारसा हक्कही मिळाला. हीच कृपा इतरांनाही प्रगट केली जावो. COLMar 180.4
जे अपराधी आहेत त्यांनी निराश व्हावे असे काहीही करू नका. परूशी लोकासारिखा कठोरपणा तुम्हांमध्ये येवून तुमच्या बांधवाला त्रास देऊ नका वा होऊ देवू नका. तुमच्या बांधवाकडे कटुत्वाने पाहाणे असा विचारही तुमच्या मनात न येवो. खोचक बोलणे अशा आवाजाची छटाही दिसू देवू नका. तुम्ही तुमच्या मनाचे काही बोलला, तुम्ही दुजाभावाची भावना प्रकट केली, जर तुम्ही संशय दर्शविला किंवा अविश्वास प्रकट केला तर यामुळे त्या आत्म्याचा नाश होवू शकतो. त्या अपराधी मानवी अंत:करणास श्रेष्ठ-ज्येष्ठ बंधु येशू ख्रिस्त याच्या सहानुभूतीचा स्पर्श हवा. त्या अपराधी भावाचा हात धरून सहानुभूतीपुर्वक अंत:करणाने म्हणावे की, “आपण प्रार्थना करू’ परमेश्वर आम्हां दोघांनाही विपुल अनुभव देईल. प्रार्थनेद्वारे एकमेकांचा निकट संबंध येतो व त्यांचा परमेश्वराशी संबंध जोडला जातो. प्रार्थनेमुळे ख्रिस्त आमच्या सान्निध्यात येतो व त्यामुळे आम्ही जे दुर्बल, चिंतातुर आत्मे त्या आम्हांस नवीन सामर्थ्य प्राप्त होवून आपण जगावर, दैहिक गोष्टीवर व सैतावर विजय मिळवू शकतो. प्रार्थनेने सैतानाचे हल्ले परतविले जातात. COLMar 181.1
जेव्हा कोणी मानवी अपूर्णतेपासून फिरून येशूवर त्याची दृष्टी लावितो, तेव्हा त्याच्या शीलांच्या जागी देव स्वभावात रूपातर होते. ख्रिस्ताचा आत्मा त्याच्या अंत:करणावर ख्रिस्ताचा शिक्का मोहर करीतो. मग यासाठी तुमचे प्रयत्न ख्रिस्ताला उंचावणे यासाठी असू द्या’ हा पहा, जगाचे पाप हरण करणारा, देवाचा कोंकरा!‘‘ (योहान १:२९) यावर तुमची मनोदृष्टी केद्रीत करा. तुम्ही हे कार्य करीत असता ही आठवण ठेवा, “तर पापी मनुष्याला त्याच्या भ्रांतिमय मार्गापासून फिरविणारा तो त्याचा जीव मरणापासून तारील, व पापाची रास झाकील, असे त्याने समजावे”याकोब ५:२०. COLMar 181.2
“परंतु जर तुम्ही मनुष्यांच्या अपराधाची क्षमा करीत नाही, तर तुमचा पिता तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही‘‘ मत्तय ६: १५ अक्षम्यपणाच। न्यायीपणा दुसऱ्या कशानेही केला जाणार नाही. जो कोणी दुसऱ्याच्या अपराधाची क्षमा करीत नाही वा दया दाखवीत नाही त्यावरून असे दर्शविले जाते की तोही परमेश्वराच्या क्षमादायी कृपेचा भागीदार नाही. परमेश्वर क्षमा करीतो त्यामुळे पापी मनुष्याचे अंत:करण परमेश्वराच्या एकमेव प्रितीने ओढले जाते. परमेश्वराच्या प्रितीची लाट पापी मनुष्यांच्या अंत:करणात वाहात जाते आणि तेथून प्रितीचा प्रवाह इतरांकडे वाहातो. येशू ख्रिस्ताने त्याच्या जीवनात जी कोमल दया दाखविली तीच वा तशाच कोमल दयेचा सहभागीपणा इतराशी केला जाईल. “परंतु जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नाही तर तो त्याचा नाही.‘‘ रोम ८:९ परमेश्वरापासून त्याचा स्नेह तुटला, आणि तो केवळ सर्वकाळ परमेश्वरापासून विभक्त अशा लायकीचा झाला. COLMar 181.3
हे खरे आहे की एकदा परमेश्वरापासून क्षमा मिळाली असावी, पण त्याचे निर्दय अंत:करण असे दर्शविते की तो आता परमेश्वराच्या क्षमाशील प्रितीचा नकार धिक्कार करीतो. त्याने स्वत:ला परमेश्वरापासून विभक्त केले आहे आणि तो पूर्वी जसा क्षमा करण्यापूर्वीचा होता तसाच तो राहीला. त्याने केलेला पश्चात्ताप याचाही त्याने नकार केला, आणि त्याची पापे जणू काय त्याने पश्चात्ताप केला नाही अशीच राहतील. COLMar 182.1
या दाखल्यातील महान बोधपर धडा म्हणजे परमेश्वराची दया व मनुष्याच्या अंत:करणाची कठोरता हा फरक लक्षात घेणे. खरे पाहाता परमेश्वराचे क्षमाशील माप हेच माप आमचेही असावे. “जशी दया मी तुजवर केली तशी दया तू ही आपल्या सोबतीच्या दासावर करावयाची नव्हती काय ?” COLMar 182.2
आम्ही क्षमा करीतो म्हणून आमची क्षमा केली जात नाही, पण जशी आम्ही क्षमा करीतो त्याप्रमाणे आम्हाला केली जाते. त्याची भूमिका म्हणजे आम्ही लायक नसताना परमेश्वर त्याच्या प्रितीस्तव आमची क्षमा करीतो, पण आम्ही इतरांशी कसे वा कोणत्या भावनेने वागतो त्यावरून समजून येते की, आम्ही परमेश्वराच्या प्रितीसारखी आमची केली आहे का ? यास्तव ख्रिस्त म्हणतो, कारण ज्या प्रकारचा तुम्ही न्याय कराल त्या प्रकारचा तुमचा न्याय होईल आणि ज्या मापाने तुम्ही पाप घालिता त्याच मापाने तुमच्या पदरी पडेल.’ मत्तय ७:२. COLMar 182.3