लग्नाच्या जेवणावळीचा दृष्टांत मग त्याजबरोबर भोजनास बसलेल्यापैकी कोणाएकाने या गोष्टी ऐकून त्याला म्हटले, जो देवाच्या राज्यात अन्न खाईल तो धन्य. त्याने त्याला म्हटले, कोणाएका मनुष्याने संध्याकाळची मोठी जेवणावळ केली, तेव्हा बहुतांस आमंत्रण केले; आणि जेवणाच्या वेळेस, आता या, तयारी झाली आहे, असे आमंत्रितांस सांगावयाला त्याने आपल्या एका दासास पाठविले. तेव्हा ते सर्वजण सारखेच निमित्त सांगू लागले. पहिला त्याला म्हणाला, मी शेत विकत घेतले आहे, ते मला जाऊन पाहिले पाहिजे; मी तुला विनंती करीतो, मला क्षमा असावी. दुसरा म्हणाला, मी बैलाच्या पाच जोडया विकत घेतल्या आहेत, त्या मी तपासावयाला जातो, मी तुला विनंती करीतो, मला क्षमा असावी. आणखी एकजण म्हणाला, मी बायको केली आहे, म्हणून माझे येणे होत नाही. मग त्या दासाने येऊन आपल्या धन्याला हे वर्तमान सांगितले. तेव्हा घरधनी रागावून आपल्या दासाला म्हणाला, नगराच्या रस्त्यांत व गल्लयांत लवकर जा, आणि दरिद्री, व्यंग, आंधळे व लंगडे यास इकडे आण. दास म्हणाला, महाराज आपण आज्ञा केल्याप्रमाणे झाले आहे. तरी अद्यापि जागा आहे. धनी दासास म्हणाला, माझे घर भरून जावे म्हणून सडकावर व कुंपणाकडे जाऊन लोकांस आग्रह करून आण; कारण मी तुम्हांस सांगतो की त्या आमंत्रित मनुष्यांतून एकही माझ्या जेवणातले काही चाखणार नाही’ लुक १४: १, १२-२४. COLMar 158.3
परूशी लोकांच्या मेजवानीस तारणारा येशू पाहुणा म्हणून हजर होता. श्रीमंत व गरीब या सर्वांच्या आमंत्रणाचा येशूने स्विकार केला, आणि त्याच्या परिपाठाप्रमाणे त्याजपुढे जे दृश्य होते त्याचा संबंध सत्याचे धडे याजशी येशूने जोडला. यहुदी लोकांतील सर्व सण वा मेजवानीचे कार्यक्रम त्याचे राष्ट्रीय कार्यक्रम व धार्मिक आनंद याजशी संबंधित होते. ते सर्व कार्यक्रम त्यांना सार्वकालिक आर्शिवादाचे नमुने असे होते. मोठया मेजवानीत ते अब्राहाम, इसाक व याकोब यांच्यासोबत बसणे असा सन्मान मानीत असत, तर विदेशी लोक बाहेर उभा राहत व तेथून आतुरतेने पाहात असत की हे काय चालले आहे आणि अशा मुद्यावर येशू, त्यांना इशारा व शिक्षण देत असे, आता हा मुद्दा येशू या मोठया मेजवानीद्वारे लोकांना स्पष्ट करून सांगत होता. यहुदी लोकांना वाटत होते की, परमेश्वराचा आशिर्वाद सध्याच्या काळात व भविष्य काळातही केवळ यहद्यासाठीच राखून ठेवणे. या दाखल्याद्वारे येशू त्याना दाखवून देत होता की, ते म्हणजे यहुदी आता कृपेचे आमंत्रण नाकारणे अशा काळाच्या अखेरीस आलेले आहेत, त्यांना परमेश्वराच्या राज्याचे हे शेवटले आमत्रण ठरले जात होते. जे हे आमंत्रण यहुदी लोकांनी क्षुल्लक समजून नाकारले तेच आमंत्रण त्यांनी ज्यांचा ते धिक्कार करीत होते त्यांना द्यावयाचे असते. ज्या लोकांचा स्पर्श होऊ नये म्हणून ते त्यांची वस्त्रे उचलून धरीत त्या लोकांना ते महारोग्याहून अधिक समजत असत. COLMar 159.1
परूशी लोकांनी त्यांच्या मेजवानीला त्यांच्या आवडीप्रमाणे पाहण्याना आमंत्रण दिले होते. ख्रिस्त त्यांना म्हणाला, “जेव्हा तू दुपारची किंवा संध्याकाळची जेवणावळ करशील तेव्हा तू आपले मित्र, आपले भाऊ, आपले नातलग, किंवा धनवान शेजारी यांस बोलावू नको; बोलाविल्यास कदाचित ते ही तुला उलट आमंत्रण करतील व तुझी फेड होईल. तर तू मेजवानी करशील तेव्हा दरिद्री, व्यंग, लंगडे व आधळे यांस आमंत्रण कर. म्हणजे तू धन्य होशील. तुझी फेड करावयास त्याजजवळ काही नाही; तरी धार्मिकांच्या पुनरूत्थानसमयी तुझी फेड होईल‘‘ लूक १४: १२-१४. COLMar 159.2
ख्रिस्ताने मोशेच्याद्वारे इस्त्राएल लोकांना जे शिक्षण दिले होते त्याची तो पुनरावृत्ती करीत होता. पवित्र मेजवानीचे मेळे जेवणावळ भरतील त्याबाबत प्रभुने शिक्षण दिले होते. “तुझ्या वेशीच्या आत असलेला परदेशी अनाथ व विधवा यांनीही येऊन पोटभर खावे, म्हणजे तुझा देव परमेश्वर तुझ्या उजव्या हाताच्या सर्व कामास बरकत देईल‘‘ अनुवाद १४:२८. हे मेळे म्हणजे इस्त्राएल लोकांना बोधपर धडे असे होते. अशाप्रकारे आदरातिथ्याचा खरा हर्ष वा आनंद शिकविला गेला. स्थानिक लोकांनी जे दुःखित व दरिद्री वा गरीब अशा लोकांची वर्षभर काळजी घ्यावयाची असते आणि हे मेळे वा मेजवानीचे कार्यक्रम त्यात उदात्त हेतू होता. इस्त्राएल लोकांना जे आध्यात्मिक आशिर्वाद दिले ते केवळ त्यांच्या करिताच नव्हते. परमेश्वराने त्यांना दिलेली जीवनी भाकर त्यांनी सर्वानी जगाला वाटून द्यावयाची होती. COLMar 160.1
“अहो तान्हेल्यांनो, तुम्ही सर्व जलशयाकडे या, जवळ पैका नसलेले तुम्ही या; सौदा करा, खा; या, पैक्यावाचून व मोलावाचून द्राक्षारसाचा व दुधाचा सौदा करा ! जे अन्न नव्हे त्याकरिता दाम का देता? ज्याने तृप्ति होत नाही त्यासाठी श्रम का करिता ? माझे लक्षपूर्वक ऐका. आणि उत्तम ते खा; तुमचा जीव पौष्टिक पदार्थाचे सेवन करून संतुष्ट होवो. COLMar 160.2
या कार्याची त्यांनी पूर्णता केली नाही. ख्रिस्ताचे शब्द त्यांच्या स्वार्थाचा धिक्कार करीत होते. ख्रिस्ताचे शब्द परूश्यांना कडू वाटत होते. संभाषणाचा ओघ बदलावा म्हणून एकजण पवित्रतेचे ढोंग आणून म्हणाला, “जो देवाच्या राज्यात अन्न खाईल तो धन्य’ लूक १४: १५ हा मनुष्य खात्रीपूर्वक आश्वासनाने बोलला जणु काय याला स्वर्गाच्या राज्यात खात्रीशीर जागा मिळाली आहे. ज्या लोकांची मनोवत्ती अशी असते की ते ख्रिस्ताद्वारे तारण पावलेले आहेत पण ज्या अटीवर वा शर्तीवर तारण प्राप्त होते त्या ते करीत नाहीत अशा मनुष्याप्रमाणे वरील मनुष्याची स्थिती आहे. या मनुष्याची वृत्ती बलामाप्रमाणे आहे जेव्हा बलामाने प्रार्थना केली तशी आहे. धार्मिकाप्रमाणे मला मृत्यू प्राप्त होवो, माझा अंत त्याच्या सारखा होवो.’ गणना २३:१०. परूशी लोकात स्वर्गात जाऊन आनंद करणे याचा विचार करीत होते पण स्वर्गात जाणे यासाठी स्वत:ची तयारीचा विचार करीत नव्हते. येशूचे शब्द याद्वारे त्या पाहुण्यांचे लक्ष सध्याची जेवणावळ यापासून त्यांचे व्यवहारिक काय कर्तव्य आहे याकडे लावणे हा येशूचा हेतू होता. ते जे सध्याचे जीवन जगत होते तेथून त्याचे लक्ष पुढे होणारे धार्मिकांचे पुनरूत्थान याकडे लावावयाचे होते. COLMar 160.3
जे दांभिक लोक होते त्यांची मने येशूने वाचली आणि त्याच्यावर येशूने त्याची दृष्टी केंद्रीत करून सध्याचे शील, सध्याची संधी यांचे महत्त्व येशूने सांगितले. सध्या त्यांना या जीवनात धार्मिक जीवन जगणे ही संधी आहे. त्यामुळे भविष्य काळातील भावी जीवनाचे आशिर्वादप्राप्त होतील वा भावी काळी आर्शिवादीत जीवन प्राप्त होईल. COLMar 161.1
येशू म्हणाला, “कोणा एका मनुष्याने संध्याकाळची मोठी जेवणावळ केली, तेव्हा बहुतांस आमंत्रण केले; आणि जेवणाच्या वेळेस, आता या, तयारी झाली आहे, असे आमंत्रितांस सांगावयाला त्याने आपल्या एका दासास पाठविले. तेव्हा ते सर्वजण सारखेच निमित्त सांगू लागले. पहिला त्याला म्हणाला, मी शेत विकत घेतले आहे, ते मला जावून पाहिले पाहिजे, मी तुला विनंती करीतो, मला क्षमा असावी. दुसरा म्हणाला, मी बैलाच्या पाच जोडया विकत घेतल्या आहेत, त्या मी तपासावयाला जातो; मी तुला विनंती करितो, मला क्षमा असावी. आणखी एकजण म्हणाला, मी बायको केली आहे, म्हणून माझे येणे होत नाही; COLMar 161.2
त्या प्रत्येकांनी सांगितलेली कारणे सबळ नव्हती. ज्या मनुष्याला वाटले की शेत विकत घेतले ते जाऊन पाहिले पाहिजे‘‘ कारण त्याने ते शेत आधीच विकत घेतले आहे. त्याची गोडी त्या विकत घेतलेले शेत यांत होती. बैलजोडी विकत घेतली होती केवळ गोडी म्हणून बैल जोडी पाहावयास तो गेला. तिसरा जो निमित्त सांगत होता त्यात काही साम्यच नव्हते. त्याच्या पत्नीने त्याचे कधीही स्वागतच केले असते. जेवणावळीत जाऊन आनंद करणे यापेक्षा आपण अधिक आनंद करू अशी त्याची योजना होती. पाहणे यांच्याशिवाय इतर लोकांचा सहवास याची त्याला आवड वाटली. तिसऱ्या गृहस्थाने काय क्षमा मागितली नाही, किंवा आपण आमंत्रण नाकारतो याबाबत दिलगिरीही प्रकट केली नाही “माझे येणे शक्य नाही‘‘ हे म्हणणे सत्य झाकणे यासाठी पडदा असे होते, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे याचा खरा अर्थ “मला तुमच्या आमंत्रणाविषयी पर्वा नाही.‘‘ COLMar 161.3
सर्व निमित्ते म्हणजे त्यांच्या मनात इतर गोष्टींचा भरणा होता त्यामुळे ते घातक वा विरोधक होते. हे सर्व आमंत्रित पाहणे त्यांच्या त्यांच्या कामात गुंग झाले होते. त्यांनी जे आमंत्रण येतो म्हणून स्वीकारले ते त्यांनी बाजूला ठेविले आणि त्यांचा जो उदार मनाचा मित्र होता त्यांचा त्यांनी असा फरक वा वेगळी कारणे सांगून अपमान केला. COLMar 161.4
ही जी मोठी जेवणावळ याचा अर्थ सुवार्ताद्वारे ख्रिस्त हा आशीर्वादीत देणगी असा सादर केला आहे. या मेजवानीत पुरेसे आशिर्वाद ख्रिस्त येशू आहे. येशू हा स्वर्गातून उतरलेली जीवनी भाकर आहे, त्याजपासून तारणाचे उकळते झरे वाहतात. प्रभुच्या संदेशवाहकांनी तारणारा येशू याचे प्रथम येणे हे यहूदी लोकांना सांगितले, त्यांनी येशूकडे बोट दाखवून सांगितले, “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा, देवाचा कोंकरा!’ योहान १:२९ येशू या जेवणावळीत परमेश्वराने त्यांना स्वर्गीय उत्तमोत्तम देणगी दिली आहे. या देणगीची तुलनाच नाही. परमेश्वराने त्याच्या प्रितीने अति मौल्यवान जेवणावळ दिली, तिचा संग्रह अक्षय आहे. ख्रिस्त म्हणाला, “या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ वाचेल.‘‘ योहान ६: ५१. COLMar 162.1
परंतु आम्हांला जर सुवार्ता जेवणावळीचे आमंत्रण स्वीकारावयाचे असेल तर त्यांनी आद्यस्थान ख्रिस्त व त्याची धार्मिकता यांना देणे व जगिक गोष्टी यांना दुय्यम मानणे. परमेश्वराने मानवासाठी सर्व काही दिले आणि परमेश्वराची मानवाकडून ही मागणी आहे की मानवाने परमेश्वराची सेवा ही प्रथम करणे मग इतर गोष्टी करणे. परमेश्वर दुमत कधीच स्वीकारीत नाही. जे अंत:करण पृथ्वीवरील गोष्टींत गढून गेले आहे ते अंत:करण परमेश्वराला सादर करीता येत नाही. COLMar 162.2
हा धडा आपणा सर्वांसाठी व सर्वकाळासाठी आहे. परमेश्वराचा कोंकरा जेथे कोठे जाईल तेथे तेथे त्याच्या मागे आम्ही गेले पाहिजे. आम्ही कोंकऱ्याचे अनुकरण करावे, जगिक मित्रापेक्षा आपण येशूची मैत्री महत्त्वाची समजावी. ख्रिस्त म्हणतो, “जो माझ्यापेक्षा बापावर किंवा आईवर अधिक प्रिती करीतो तो मला योग्य नाही; जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रिती करीतो तो मला योग्य नाही, मत्तय १०:३७. COLMar 162.3
सर्व कुटंबातील लोक एकत्र बसून भोजन करीत असता, ख्रिस्ताच्या काळात पुष्कळजण म्हणत असत, “जो देवाच्या राज्यांत अन्न खाईल तो धन्य’ परंतु येशुने सागितले की प्रभुने जी अमोल देणगी देवून जे भोजन तयार केले आहे त्यासाठी पाहुणे सापडणे किती कठीण आहे. जे कोणी प्रभुचे हे म्हणणे ऐकत होते त्यांनी समजून घेतले की या कृपेच्या भोजनाचा त्यांनी नकार केलेला आहे. कारण त्यांनी जगिक संपत्ति, मालमत्ता व ख्याली-खुशालीची आवड होती व ते त्यांत गुंग झाले होते. त्या सर्वांनी एकोपा करून निमित्तें सांगितली होती. COLMar 162.4
“मी जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी अरण्यांत मान्ना खाल्ला तरी ते मेले. स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती कोणी खाल्ली तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जीवंत भाकर मी आहे, या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ वाचेल, जी भाकर मी देईन ती जगाच्या जीवनासाठी माझा देह अशी आहे.‘‘ योहान ६:४८-५१. COLMar 162.5
आताही त्याप्रमाणे आहे. त्या प्रत्येकांनी जेवणावळीस न येण्याची कारणे सांगितली त्याद्वारे सुवार्तेचे जे आमंत्रण ते नाकारणे याचे कारण असू शकते. सार्वकालिक जीवनापेक्षा लोक, त्यांच्या जीवनाच्या ऐहिक वा संसाराच्या गोष्टीकडे लक्ष देतात. परमेश्वराने त्यांना ज्या बाबीत आशिर्वाद दिला त्याच बाबी त्याचा आत्मा व उत्पन्नकर्ता व तारणारा परमेश्वर याजपासून विभक्त करीतात. त्यांच्या जगिक उद्योगधंदयात अडखळण येवू देत नाहीत म्हणून ते कृपेच्या संदेश वाहकास म्हणतात, आता तू जा, संधी सापडली म्हणजे तुला बोलवीन. “प्रेषितांची कृत्ये २४:२५ ज्या इतरांच्या सामाजिक जीवनात परमेश्वराची आज्ञा पाळणे हे अडखळण येते तेव्हा ते निमित्त सांगतात. त्यामुळे ते म्हणतात की यामुळे आमच्या नातेवाईकांतील संबंध बिघडले जातील, आमचे सोबती यांना आवडणार नाही. अशी निमित्ते सांगन या दाखल्यातील लोकाप्रमाणे हे ही लोक वागतात. या जेवणावळीचा कारभारी त्यांची ही निमित्ते ऐकून त्याला राग येतो. COLMar 163.1
जो मनुष्य म्हणाला, ‘मी बायको केली आहे, म्हणून माझे येणे होत नाही, हा मनुष्य एका मोठया जमावाचा प्रतिनिधी आहे. पुष्कळजण परमेश्वराचे पाचारण यापासून परावृत्त होतात याचे कारण त्याची पत्नी वा पती यांचे अडखळण येते. पति म्हणतो, “माझ्या सद्विवेकाप्रमाणे मला करीता येत नाही कारण माझी पत्नी मला विरोध करीते. तिचा विरोध असल्यामुळे मला तसे करणे फारच फार अवघड जाणार आहे. पत्नीला जेव्हा कृपेचे आमंत्रण देण्यात येते की, “या, तयारी झाली आहे”आणि पत्नी म्हणते,“मला माफ करा, कारण माझा नवरा या आमत्रणाचा मला स्वीकार करू देत नाही. तो म्हणतो त्याला त्याचा उद्योग धंदा करावयाचा आहे त्यात काही अडखळण नको. मला माझ्या पतीबरोबर सहमत झाले पाहिजे म्हणून मी हे आमंत्रण स्वीकारू शकत नाही‘‘ मुलामुलीच्या मनावर चांगली छाप पडली म्हणून ते येऊ इच्छितात. मुलामुलींचे आईवडीलांवर प्रेम आहे आणि ते जर येऊ शकत नाहीत तर आम्ही कसे काय जावे, म्हणून मुलेमुलीही म्हणतात, “आम्हांलाही माफ करा.” COLMar 163.2
हे सर्वजण तारणारा येशू याचे कृपेचे आमंत्रण नाकारतात कारण घरात फूट पडेल म्हणून भिती वाटते. परमेश्वराची आज्ञा नाकारणे यामुळे त्यांना वाटते की त्यांच्या घरात शांतता व भरभराट ही खात्रीपूर्वक राहील, पण ही त्यांची कल्पना भ्रामक आहे. जे कोणी स्वार्थाची पेरणी करतील ते स्वार्थाची कापणी करतील. जे कोणी ख्रिस्ताची प्रिती नाकारतात ते, मानवी प्रितीचे उगम, स्थिरता व शुध्दता नाकारतात हे त्यांना समजत नाही. ते अशाप्रकारे नाकारणे यामुळे केवळ स्वर्गालाच मुकणार नाहीत तर, त्यांच्या जीवनाच्या सौख्यासाठी स्वर्गाने प्रायश्चित्त केले याचा ते नकार करतील. COLMar 163.3
या दाखल्यातील जेवणावळ देणारा याने पाहिले की, त्याच्या आमंत्रणाचा कसा नाकार केला त्यामुळे तो रागावून त्याच्या दासाला म्हणाला, “नगराच्या रस्त्यांत व गल्ल्यात लवकर जा, आणि दरिद्री, व्यंग, अधळे व लंगडे यास इकडे आणा.” COLMar 164.1
जेवणावळीचा मालक पूर्वीचे आमंत्रित यांच्याकडून वळला व जे लोक दरिदी, धनवान नव्हते, घरदार व जमीन वा शेती नव्हती अशा लोकांकडे वळला. जे लोक दरिद्री, भुकेले व जे भोजनानंतर खुष होतील अशांना आमंत्रण दिले. ख्रिस्त म्हणाला, “जकातदार व कसबिणी तुमच्यापुढे देवाच्या राज्यात जातात’ मत्तय २१:३१. मानव कोणत्याही प्रकारचे असोत, कितीही टाकाऊ वा झिडकारलेले, तरी ते परमेश्वराच्या दृष्टीने कमी प्रतीचे वा दुष्ट गणले जात नाहीत वा परमेश्वराच्या दृष्टीआड नाहीत. अशा टाकाऊ, कष्टी, भाराक्रांत लोकांनी ख्रिस्ताकडे यावे अशी त्याची इच्छा आहे. अशा लोकांना इतर कोठेही मिळणार नाही अशी शांति, आनंद व जीवन प्रकाश ख्रिस्त देणेस आतुर आहे. सर्व पापी लोक हे ख्रिस्ताची सहानुभूती, प्रिती व दया याबाबतचे ध्येय असे आहेत. ख्रिस्त, त्याचा पवित्र आत्मा पाठवून त्यांना प्रितीने व कोमलपणे त्याजकडे आकर्षित करावे म्हणून पाठवून देतो. COLMar 164.2
“यावरून त्यांनी त्याला ये म्हटले....”आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला; असे लिहिले आहे की त्याने त्यास स्वर्गातून भाकर खावयाला दिली. यावरून येशूने त्यास म्हटले, मी तुम्हांस खचीत खचीत सांगतो, मोशाने तुम्हांस स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही, माझा पिता तर स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हांस देतो. कारण जी स्वर्गातून उतरते व जगाला जीवन देते ती देवाची भाकर होय.. जीवनाची भाकर मी आहे, जो मजकडे येतो त्याला भूक लागणार नाही आणि जो मजवर विश्वास ठेवितो त्याला कधीही तहान लागणार नाही‘‘ योहान ६:३०-३५. COLMar 164.3
ज्या दासाने दरिद्री व अंधळे यांना जेवणावळीस बोलावून आणले तो जेवणावळीच्या मालकास म्हणाला, “महाराज, आपण आज्ञा केल्याप्रमाणे झाले आहे, तरी अद्यापि जागा आहे. धनी दासास म्हणाला, माझे घर भरून जावे म्हणून सडकावर व कुंपणाकडे जाऊन लोकांस आग्रह करून आण.”येथे ख्रिस्ताने सुवार्ता कार्याचा प्रसार याविषयींची यहदी यांना सोडून, जगातील हमरस्ते व छोटे रस्ते या भागात प्रसार झाला पाहिजे. COLMar 165.1
या आज्ञेचे पालन म्हणून पौल व बर्णबा यांनी यहुद्यांना सांगितले की, “देवाचे वचन तुम्हांस प्रथम सांगावयाचे अगत्य होते, तरी ज्या अर्थी तुम्ही त्याचा अव्हेर करिता व आपणास सार्वकालिक जीवनाकरीता अयोग्य ठरविता त्याअर्थी पाहा, आम्ही विदेशी लोकाकडे वळतो. कारण प्रभूने आम्हांस आज्ञा दिली आहे, ती ही की-मी तुला राष्ट्राचा प्रकाश असे ठेविले आहे, यासाठी की पृथ्वीच्या दिगंतापर्यत तू तारण असे व्हावे. हे ऐकूण विदेशी लोक हर्षयुक्त झाले, आणि त्यांनी देवाच्या (परमेश्वर) वचनाचा महिमा वर्णिला, तेव्हा जितके सार्वकालिक जीवनासाठी नेमलेले होते तितक्यांनी विश्वास धरीला’ प्रेषितांची कृत्ये १३:४६-४८.. COLMar 165.2
ख्रिस्तांच्या प्रथम शिष्यांनी जो सुवार्ता संदेश दिला तो संपूर्ण जगाला येशूचे पहिले येणे हा आहे. ख्रिस्तावरील विश्वासाने तारण प्राप्त होते ही सुवार्ता सर्व मनुष्यांना सांगितली. या सोबत येशचे दुसरे देणे याकडे बोट दाखवून वैभवी तारण, आशा ही त्याच्या लोकांना विश्वासाने व आज्ञा पालनाने व या सत्य प्रकाशाचा सहभागीपणा संताबरोबर करणे याद्वारे हे सर्व प्राप्त होते हे सांगितले. सध्याच्या लोकांना आजही हा संदेश दिला जातो व त्यासोबत ख्रिस्ताचे द्वितीयागमन अगदी नजीक आहे हे ही सुसंगत केले जाते. येशू ख्रिस्ताने स्वत: जी ही चिन्हें दिली ती पूर्ण होत आली आहेत; आणि पवित्र शास्त्राचा अभ्यास यावरून आपणास समजून येत आहे, की येशूचे येणे दारानजीक आले आहे. COLMar 165.3
प्रकटीकरणकर्ता योहान हा, येशूचे येणे याविषयी सुवार्ता संदेश सांगत आहे. तो देवदूतास आकाशात उडतांना पाहातो, “अंतराळाच्या मध्यभागी उडताना पाहिला, त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणारे जन म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, भाषा व लोक यास सांगावयास सार्वकालिक सुवार्ता होती. तो मोठयाने म्हणाला, देवाची भिती बाळगा व त्याचे गौरव करा, कारण त्याची न्यायनिवाडा करावयाची घटिका आली आहे”प्रकटीकरण १४ : ६-७. COLMar 165.4
या भविष्यांत न्यायनिवाडा याचा इशारा व येशूचे मेघारूढ येणे या दोन्हींचा संबंध आहे. न्यायनिवाडा याचा संदेश म्हणजे येशू ख्रिस्ताचे येणे नजीक आले आहे आणि ही घोषणा म्हणजे सार्वकालिक सुवार्ता म्हटली आहे. अशाप्रकारे ख्रिस्ताचे द्वितीयागमन व ते किती नजीक आले आहे. हे गाजविणे हा सुवार्ता संदेशाचा महत्त्वाचा भाग आहे. COLMar 165.5
“मी पाहत असता आसने मांडण्यात आली आणि एक पुराणपुरूष आसनारूढ झाला; त्याचा पेहराव बर्फासारखा पांढरा होता, त्याच्या डोक्याचे केस स्वच्छ लोकरीसारखे होते, त्याचे आसन प्रत्यक्ष अग्निज्वालामय होते व त्या आसनांची चक्रे धगधगीत अग्निरूप होती त्याच्या समोरून अग्निप्रवाह वाहत होता; हजारों लोक त्याची सेवा करीत होते, लाखो लोक त्याच्यासमोर उभे होते ; न्यायसभा भरली ; वहया उघडल्या’ दानीएल ७:९,१०. COLMar 166.1
पवित्र शास्त्रांत उल्लेख केला आहे की, शेवटल्या काळी मनुष्ये जगिक गोष्टींत गंग होतील; ख्याली खुशाली व पैसे मिळविणे. सार्वकालिक खरेपणा याविषयी ते अंधळे होतील. ख्रिस्त म्हणतो, “नोहाच्या दिवसातल्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात ‘नोहा नौकेत जाईपर्यंत लोक खातपीत होते’ लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते, आणि जलप्रलय येऊन सर्वांस वाहवून नेईपर्यंत त्यास समजले नाही; तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल.”मत्तय २४:३७-३९. COLMar 166.2
आजही तसेच आहे. स्वत:चा स्वार्थ साधावा यासाठी मनुष्ये धावत आहेत आणि त्यांना जणू काय परमेश्वर नाही, स्वर्ग नाही व या जीवनानंतर पुढे काहीच नाही. नोहाच्या दिवसात लोकांना जागे करण्यासाठी अगोदरच जलप्रलयाचा इशारा देणारा संदेश दिला होता, यासाठी की लोकांनी त्यांच्या दुष्टतेपासून मागे फिरून पश्चात्ताप करावा. तद्वतच ख्रिस्ताचे द्वितियागमन हा संदेश देण्यात येत आहे. यासाठी की लोकांनी जगिक गोष्टी सोडून देणे. लोकांनी सार्वकालिक जीवन कोणते आहे याचा विचार करणे, यासाठी की त्यांनी प्रभूच्या मेजाकडे यावे हे जे आमत्रण दिले जाते त्याचा त्यांनी विचार करून स्वीकार करावा. COLMar 166.3
हे सुवार्तेचे आमंत्रण सर्व जगभर दिले पाहिजे — “प्रत्येक राष्ट्र, वंश, भाषा व लोक’ प्रकटी १४:६ अखेरचा इशारा देणारा संदेश व कृपेचा संदेश यांनी सर्व जग पृथ्वी प्रकाशित व गौरवी करावी. हा संदेश सर्व लोकांना अर्थात, श्रीमंत व गरीब, उच्च व मागासलेले, अशा सर्वापर्यंत पोहचला पाहिजे. ख्रिस्त म्हणतो, “माझे घर भरून जावे म्हणून सडकांवर व कुंपणाकडे जाऊन लोकांस आग्रह करून आणा.‘‘ COLMar 166.4
सुवार्ते अभावी जग नाशाप्रत जात आहे. परमेश्वराच्या वचनाचा दुष्काळ आहे. फार थोडे लोक मानवी रूढीशिवाय सुवार्ता सांगतात. जरी लोकांच्या हातात पवित्रशास्त्र आहे तरी त्यातील जो आशिर्वाद आहे तो त्यांना प्राप्त होत नाही. प्रभू त्याच्या सेवकांना सांगत आहे की त्याचा सवार्ता संदेश लोकांना सांगणे, जे त्यांच्या पापात नाश पावत आहेत त्यांना हे सार्वकालिक जीवनी वचन सांगितले पाहिजे. COLMar 167.1
जे कोणी येशूच्या नामाने सुवार्तिक म्हणून सेवेसाठी बोलाविले आहेत त्या सर्वाना येशू ख्रिस्त आज्ञा करितो तुम्ही सर्वजण हमरस्ता व गल्ल्यांत ही जा. ख्रिस्ताच्या सेवेसाठी सेवकांना सर्व जग हे कार्यक्षेत्र आहे. सर्व जगिक कुटुंब हे ख्रिस्ताची धार्मिक सभा आहे. या जगिक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तिला प्रभुच्या कृपेचा संदेश दिला पाहिजे अशी प्रभुची इच्छा आहे. COLMar 167.2
हे कार्य संपादन करणेसाठी व्यक्तिवाचक कार्याची फार मोठी गरज आहे. हीच ख्रिस्ताची पध्दत होती. ख्रिस्त, व्यक्तिवाचक भेटी घेऊन त्याना संदेश देत असे. एक व्यक्तिने ऐकणे या कार्यात येशूचा फार विश्वास होता. त्या एका आत्म्याद्वारे अर्थात व्यक्तिद्वारे सुवार्ता संदेश हजारोंना जणाल दिला गेला वा प्रसार होत गेला. COLMar 167.3
लोकांनी आम्हाकडे यावे याची आम्ही वाट पाहू नये तर लोक जेथे आहेत तेथे शोध करीत जावे. जेव्हा आम्ही वेदीवरून संदेश देतो तेव्हा कार्याला सुरूवात होते. असे काही लोक वा समाज आहेत की आम्ही सुवार्ता संदेश त्यांच्याकडे जाऊन सांगितला पाहिजे. COLMar 167.4
जेवणावळीचे आमंत्रण प्रथमत: यहुदी लोकांना दिले होते; ज्या लोकांना शिक्षक व पुढारी म्हणून कार्य करावयाचे होते, ज्या लोकांच्या हाती ख्रिस्ताच्या येण्याच्या भवितव्याचे भविष्यक संदेश होते, आणि येशूने जी जी सेवा करावयाची होती त्या त्या सेवेचा लाक्षणिक व भावी कार्यभाग म्हणून या यहुदी लोकांना करावयाचा होता. ते यहुदी व याजक यांनी त्यांना झालेले पाचारण जर ख्रिस्ताच्या संदेशाशी व सुवार्ता आमंत्रणाशी संबंध जोडला असता तर त्यानी आमंत्रणाचा स्वीकार केला असता, व जगाला हे सर्व विदित केले असते. जे सत्य त्यांना दिले होते. त्याचा त्यांनी सहभागीपणा करावयाचा होता. जेव्हा यहुद्यांनी आमंत्रणाचा नाकार केला तेव्हा तेच आमंत्रण गोरगरीबांना, व्यंग आंधळे यांना देण्यात आले. जकातदार व पापी लोकांनी आमंत्रणाचा स्वीकार केला. जेव्हा सुवार्ता पाचारण विदेशांना दिले तेव्हा त्यांनाही कार्य करणेची तीच पध्दत दिली. सुवार्तेचा प्रथम संदेश जे हमरस्त्यांवरील लोकांना देणे म्हणजे जे लोक जगिक कार्यात पुढारी आहेत, शिक्षक आहेत त्यांना प्रथम संदेश देणे. COLMar 167.5
जे प्रभुचे सुवार्तिक आहेत त्यांनी हे लक्षात ठेवावे. कळपाचे मेंढपाळ आहेत त्यानी, परमेश्वराने नेमिलेले शिक्षक त्यानी, परमेश्वराच्या वचनाचे आज्ञापालन करावे. जे समाजात उच्च वर्गाचे आहेत त्यांना प्रेमळपणे व बंधुभावाने वागवावे. जी मनुष्ये उद्योग क्षेत्रात आहेत, जे अधिकारी जबाबदारीच्या हुद्यावर आहेत, जे संशोधक विचाराचे व शास्त्रीय विज्ञानाचे आहेत, जे तज्ञ आहेत, या काळातील खास सत्य समजणे व शिक्षण देणे यासाठी जे शिक्षक नाहीत अशाना सुवार्ता सत्य प्रथमतः सांगणे. या लोकांना सुवार्ता मेजवानीचे आमंत्रण जरूर देणे. COLMar 168.1
जे श्रीमंत आहेत त्यांच्यासाठीही काम करण्याची गरज आहे. ज्यांना स्वर्गीय देणगी दिली आहे. तद्वत् या श्रीमतानाही दिलेली देणगी हिची जाणीव करून देणे. परमेश्वर जीवंत व मृतांचा न्याय करीतो तद्वत् श्रीमंतानाही त्यांच्या जीवनाचा हिशोब देणे आहे हे समजून सांगण्याची गरज आहे. परमेश्वराचे भय व प्रिती या दृष्टीने श्रीमतांना तुमच्या कार्याची गरज आहे. श्रीमंत जादा पैशावर भरवसा ठेवतात व जीवनातील धोके याकडे दुर्लक्ष करीतात. आपल्या जीवनात महत्त्वाचे व सार्वकालिक काय टिकणारे आहे याकडे त्याचे लक्ष वेधून घेणे अवश्य आहे. खरा चांगुलपणा याचा मालक कोण व तो काय म्हणतो हे त्यांना समजले पाहिजे; “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जूं आपणांवर घ्या व मजपासून शिका, म्हणजे ‘तुमच्या जिवास विश्रांती मिळेल’ कारण माझे जूं सोईचे व माझे ओझे हलके आहे”मत्तय ११: २८ -३०. COLMar 168.2
जे लोक जगात उच्च शिक्षण, संपत्ती व नावलौकीक यामुळे श्रेष्ठ गणले जातात अशा लोकांना त्यांच्या आत्म्याविषयी फार क्वचित बोलले जाते. अशा लोकांना भेटावयास पुष्कळ ख्रिस्ती कामदार दिरंगाई करीतात. परंतु असे असू नये. जर एखादा मनुष्य पाण्यात बुडताना आम्ही पाहात असताना आम्ही कडेला उभा राहून कधीही म्हणत नाही की तो वकील आहे, तो न्यायाधीश आहे व तो व्यापारी असे म्हणत आपण त्याला बुडू देत नाही. जर एखादा मनुष्य कडयावरून घसरत आहे तर आम्ही त्याचा हुद्दा वा नावलौकिक न पाहता त्याला बचाव करणेचा इशारा देऊ. असे असताना मग आम्ही सर्व मनुष्यांना त्यांच्या आत्म्याचा नाश याबाबत इशारा का देऊ नये ? जरूर द्यावा. COLMar 168.3
ते लोक जगिक वातावरणात राहतात म्हणून आपण त्याच्याबाबत हेळसांड वा निष्काळजीपणा करू नये. पुष्कळजण जरी मोठया हद्यावर असले तरी त्याच्या अंत:करणात दु:ख हे आहेच व जगातील व्यर्थ गोष्टी त्यांना आवडत नाहीत. ते लोक शांति हवी यासाठी आतुर आहेत पण ती शांति त्यांच्याकडे नाही. जरी ते समाजाच्या मोठया हद्यावर आहेत तरी त्यांना तारणाची तहान व भूक लागलेली आहे. जर प्रभुचे कामदार त्यांना वैयक्तिक भेटतील तर त्याना योग्य मदत प्राप्त होईल त्यांच्याकडे ख्रिस्ताची प्रिती, कोमल अंत:करण व दयाळू शब्दाने आपण जावे. COLMar 168.4
सुवार्ता संदेशाचा विजय हा काही सुशिक्षित भाषणे, वकृत्त्वाची साक्ष व सखोल वादविवाद यावर अवलंबून नाही. तर सुवार्ता संदेशाचा विजय साधी सुवार्ता, समोरील माणसाच्या जीवनाला लागू पडेल कारण तो मनुष्य तारणाच्या भाकरीसाठी भुकेला आहे “आत्म्याची गरज काय आहे? माझे तारण व्हावे यासाठी मी काय करावे?”असा विचार तो करतो.‘‘ COLMar 169.1
साधा संदेश घेऊन व नम्रपणे जर आपण लोकांकडे गेलो तर हजारों लोकांशी संपर्क साधता येईल. जगाचे विद्वान लोक, ज्या स्त्री पुरूषांना/दैवी देणगी आहे, त्याना साधे शब्द वापरून सांगितले की, परमेश्वर त्यांच्यावर प्रिती करीतो. अशा गोडीच्या गोष्टी जर त्यांना बोलू लागलो तर त्यांची गोडी जादा वाढेल. COLMar 169.2
कधी कधी खूप तयारी करून व अभ्यास करून सादर केलेल्या शब्दाचा प्रभाव कमी पडेल परंतु देवाच्या पुत्र व कन्यांनी प्रामाणिकपणे देवाचे वचन साध्या भाषेत सादर केल्यास जी अंत:करणे ख्रिस्त व त्याची प्रिती यासाठी बंद झाली होती ती खुली केली जातील. COLMar 169.3
ख्रिस्ताच्या कामगाराने हे लक्षात ठेवावे की त्यांनी सुवार्तेचे काम त्यांच्या सामथ्यांनी करावयाचे नाही. परमेश्वराच्या सामर्थ्याने सिंहासनापुढे उभे राहून विश्वासाने कार्य करावे. परमेश्वराने त्याला जे कार्य दिले ते कार्य दिलेली साधने याद्वारे प्रार्थनापूर्वक करावे. पवित्र आत्मा आपणास सर्व काही पुरेसे पुरविल. अंत:करणावर सत्याचा पगडा पडावा यासाठी पवित्र आत्म्याची पूर्तता केली जाईल. COLMar 169.4
यरूशलेमातील शिक्षक व पुढारी यानी जर का ख्रिस्ताचे सत्य स्वीकारले असते तर ते शहर मिशनरी केंद्र झाले असते. सत्यापासून पराभूत झालेल्या इस्त्राएल लोकांचा पालट झाला असता. प्रभुची सेवा करण्यास अफाट सैन्य उभा राहिले असते आणि जगाच्या कानाकोपऱ्यात सुवार्तेचा किती जलद प्रसार झाला असता. सध्या त्याप्रमाणे जर का प्रतिष्ठित व श्रीमंत याच्यावर जर का सत्याचा पगडा पडून त्यांना ख्रिस्ताकडे आणणे यात यश मिळाले तर मग, त्यांच्याद्वारे पतित, लाचार व जमाती बाहेर टाकलेले यांना हातभार लावणे व सुवार्ता प्रसार यात कितीतरी मदत होईल. हे आमंत्रण जलद वेगाने सर्वाना दिले जाईल व प्रभुच्या मेजासभोवार मेजवानीस किती किती असंख्य पाहुणे गोळा होतील. COLMar 169.5
परंतु आम्ही केवळ श्रीमंत व दानशूर व्यक्ति याचाच विचार करू नये, तसेच दरिद्री व गरीबांकडे दुर्लक्ष करू नये. ख्रिस्त त्याच्या सुवार्तिकांना बोध करीतो की जे सडकावर व कंपणाकडे आहेत त्यांच्याकडेही जा, जे दरिद्री व व्यंग आहेत त्यांनाही जाऊन आमंत्रण द्या. मोठया शहराच्या पटागणात व गल्ल्यांत खेडयांतील एकांत रस्त्यावर कुटुंबे व व्यक्ती कदाचित ते परकीय म्हणून आले असतील व त्यांना कुठल्याच मंडळीची माहिती नसल व संबंधही आणि अशा एकलकोंडया परिस्थितीत ते विचार करीत असावेत की परमेश्वर त्यांना विसरला असेल. त्यांचे तारण व्हावे यासाठी त्यांनी काय करावे याविषयी त्याना काहीच समजत नसावे. पुष्कळजण पापात रूतून गेले आहेत. पुष्कळजण निराश्रित झाले आहेत. त्यांच्या जीवनात दुःख, गरजा, अविश्वास व इतरावर अवलंबून राहाणे यामुळे ते दडपून गेले आहेत. शारीरिक व आत्मिक आजारांनी त्यांना बेजार केले आहे. त्यांच्या जीवनातील त्रास यातून काय मार्ग निघतो याची त्यांना आतुरता लागलेली असते, आणि सैतान त्यांना ख्यालीखुशाली यांचा मोह घालून नाश व मरण याकडे नेत असतो. तो त्यांना सदोमाचे सफरचंद दाखवितो, आणि ते खातांच त्यांच्या तोंडात राख होऊन जाते. जे अन्न नव्हे त्यासाठी ते त्यांचा पैसा खर्च करीतात व जेणेकडून समाधान होत नाही त्यासाठी ते श्रम करीत असतात. COLMar 170.1
जे लोक अशा प्रकारे दु:ख सोसतात त्या लोकांना तारावयास ख्रिस्त आला हे आम्हास दिसून आले पाहिजे. “अहो तान्हेल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या, जवळ पैका नसलेले तुम्ही या, सौदा करा, खा, या पैक्यावाचून व मोलावाचून द्राक्षरसाचा व दुधाचा सौदा करा!... माझे लक्षपूर्वक ऐका, आणि उत्तम ते खा, तुमचा जीव पौष्टिक पदार्थाचे सेवन करून संतुष्ट होवो. कान द्या, मजकडे या, ऐका, म्हणजे तुमचा जीव वाचेल, आणि मी तुम्हांबरोबर सर्वकाळचा करार करीन, अढळ प्रसाद तुम्हांस देईन‘‘ यशया ५५:१-३. COLMar 170.2
जे परकीय, बहिष्कृत व आध्यात्मिक बाबीत दुबळे आहेत अशा लोकांशी आम्ही कसे वागावे म्हणून परमेश्वराने खास आज्ञा दिली आहे. जे कोणी धार्मिक बाबीत वेगवेळेपणा दाखवितात तेच लोक अंत:करणात स्वास्थ्य व शांति यासाठी आतुर असतात. जरी ते पापाच्या तळाशी खोलवर गेले आहेत तरी त्यांचे तारण होण्याची शक्यता आहे. COLMar 170.3
ख्रिस्ताच्या सेवकांनी ख्रिस्ताचे अनुकरण करावे. येशू जसा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना त्याने पिडीतांचे समाधान केले व आजाऱ्यांना बरे केले. यानंतर येशूने त्याच्या साम्राज्याचे महान सत्य त्यांना सांगितले. येशूच्या सेवकांनी हेच व असेच काम करावे. त्यांच्या शारीरिक गरजा तुम्ही पुरवून सुटका कराल त्याद्वारे त्यांच्या आत्म्याच्या गरजा समजून तुम्ही त्यांची सेवा कशी करावी हे मार्ग समजतील. तुम्ही त्याच्या नजरा तारणारा येशूकडे वळवा, आणि तो जो अदभूत महान डॉक्टर त्याच्या प्रितीविषयी सांगा, कारण आपल्या सर्व समस्या सोडविण्याचे सामर्थ्य केवळ येशूकडेच आहे. COLMar 170.4
आपल्या जीवनात आशा नाही म्हणून जे गरीब हताश होऊन बसलेत त्यांना सांगा त्यांनी आशाहीन होण्याची गरज नाही. जरी त्यांनी चुका केल्या आहेत; ते जरी धार्मिक शील बनवून शकले नाहीत, परमेश्वरास त्यांच्या ठायी शील उभारणेस आनंद वाटेल; अधिक हर्ष त्यांना तारण देणे यात वाटेल. सैतानाने ज्या लोकांचा उपयोग करून त्यांना आशाहीन केले. अशा लोकांना घेऊन त्यांच्या तारणाप्रित्यर्थ कृपेचा वापर करणे यात परमेश्वराला आनंद आहे. ज्या आज्ञाभंजक लोकांवर क्रोधाचा वर्षाव होणार आहे त्यापासून वरील लोकांची सुटका करण्यात परमेश्वराला आनंद वाटतो. प्रत्येक आत्म्याला त्याच्यासाठी परमेश्वराकडे बरे करणे, शुध्द करणे याचे सामर्थ्य देवाकडे आहे हे त्यांना सांगा. परमेश्वराच्या मेजावर त्याना जागा आहे. परमेश्वर त्यांचे स्वागत करावयासाठी त्यांची वाट पाहात आहे. COLMar 171.1
जे कोणी गल्ल्यांत व कुंपणाकडे जातील तेव्हा तेथील लोक वेगळया व विचित्र स्वभावाचे दिसतील आणि अशाचीच सेवा करण्याची गरज आहे. काही लोकांना जो सत्य प्रकाश मिळाला त्याप्रमाणे ते लोक जीवन जगणेची पराकाष्ठा करीत आहेत व त्याप्रमाणे परमेश्वराची सेवा करीत आहेत, पण त्यांना समजते की त्यांच्यासाठी व त्यांच्या सभोवती जे लोक आहेत त्याच्यासाठी अजून महान कार्य करावयाचे आहे. त्यासाठी त्यांना परमेश्वराची अजून माहिती व्हावी यासाठी ते आतुर आहेत, पण त्यांना केवळ एक दोन किरणे दिसतात. ते विश्वासाने व रडून प्रार्थना करीत आहेत की परमेश्वर त्यांना अधिक आशीर्वादीत प्रकाश देईल. कित्येक शहरातील भ्रष्टाचारातील अशा लोकांना शोधून काढले पाहिजे. त्याच्यापैकी पुष्कळ गरीबीत नम्रपणे जीवन जगत असावेत आणि जग त्याच्याकडे दुर्लक्ष करीत असावे. अशा लोकाची माहिती कितीतरी मंडळया व पाळकवर्ग यांनाही नसावी. पण हेच लोक त्यांच्या दरिद्री अवस्थेत राहतात. तेथे ते परमेश्वराची साक्ष देतात. वरील लोकाना ख्रिस्ती प्रशिक्षण मिळाले नसेल पण त्यांना सत्य प्रकाश थोडासा मिळाला; तरीपण त्यांच्या जीवनाचा उघडावाघडेपणा, भूक, थंडीत राहणे अशा परिस्थितीत त्यांनी इतरांची सेवा केली. पण जे परमेश्वराच्या कृपेचे कारभारी आहेत त्यांनी अशा आत्म्यांचा शोध करावा, त्याच्या घरी जावून भेट घ्यावी, व पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्यांच्या गरजेसमयी त्यांचे साहाय्य करावे. तुम्ही त्यांच्या घरी जा व त्यांच्याबरोबर पवित्रशास्त्राचा अभ्यास करावा त्यांच्याबरोबर प्रार्थनाही करा, अशा प्रकारे तुम्ही साधे कार्य केले तर पवित्र आत्मा सामर्थ्याने सर्व फलदायी होईल. ख्रिस्त त्याच्या सेवकास असा संदेश देईल तो त्याच्या आत्म्यास स्वर्गीय जीवनी भाकर होईल. हा मौल्यवान संदेश व आशिर्वाद एका अंत:करणापासून दुसऱ्या अंत:करणापर्यंत व एका कुटुंबापासून दुसऱ्या कुंटुबापर्यंत नेला जाईल. COLMar 171.2
या दाखल्यांतील आज्ञा, “लोकांस आग्रह करून आणा‘‘ याचा बहुधा गैरअर्थ केला आहे. आम्ही सुवार्ता संदेशाचे शिक्षण याबाबत लोकावर जादा दबाव आणून सुवार्ता संदेश स्वीकारावयास लावतो, परंतु आग्रह याचा अर्थ असा की हा संदेश तातडीचा आहे, आमंत्रण तातडीचे आहे व यासाठी सुवार्ता संदेश प्रेरक, उत्साह व आकर्षक करावा म्हणजे परिणाम होईल. ख्रिस्ताकडे लोकांना आणणे याबाबत सुवार्ता कधीही दबाव आणीत नाही. सुवार्ता संदेश असा आहे, “अहो तान्हेल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या‘‘ यशया ५५ : १ “आत्मा व वधू ही म्हणतात, ये... आणि ज्याला पाहिजे तो जीवनी पाणी फुकट घेवो.’ प्रकटीकरण २२: १७ परमेश्वराची प्रिती व कृपा यांच्या सामर्थ्याने मानव ओढला जातो, सावरला जातो व येतो. COLMar 172.1
तारणारा येशू म्हणतो, “पाहा, मी दाराजवळ उभा आहे व ठोकीत आहे; जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याजबरोबर जेवीन, आणि तो मजबरोबर जेवील‘‘ प्रकटीकरण ३:२० लोकांनी थट्टा केली म्हणून तो काय परत जात नाही वा त्यांना विरोध करीत नाही. जरी त्यांनी धमकी दिली तरी तो म्हणतो, “मी तुला कसा सोडून देईन ? होय ११:८ जरी हट्टी अंत:करणाच्या लोकांनी येशूच्या प्रितीचा नकार केला तरी येशू अधिक प्रितीने त्यांच्याकडे जाऊन “पाहा, मी दारानजीक उभा आहे व ठोकीत आहे; “येशूची विजयशाली प्रिती त्या आत्म्यास आग्रह करीत आहे व आत या म्हणत आहे आणि ते लोक ख्रिस्ताला म्हणतात, “तुझ्या लीनतेमुळे मला थोरवी प्राप्त झाली आहे”स्तोत्र. १८:३५. COLMar 172.2
जे हरवलेले लोक त्यांच्यास्तव ख्रिस्त ज्या कळकळीच्या प्रितीने शोधीतो तशाच प्रकारची प्रिती ख्रिस्त त्याच्या सुवार्तिकांना देईल. आम्ही केवळ शाब्दिक ‘या’ असे म्हणू नये. काही लोक असे आहेत की ते आव्हान ऐकतात पण त्यांचे कान वा अंत:करण इतके मंद असते की त्यांना त्या आव्हानाचा अर्थच कळत नाही. भांडारात त्यांच्यासाठी काय साठा आहे हे त्यांच्या डोळ्यांना दिसत नाही इतके ते आंधळे झाले आहेत. पुष्कळांना दिसून येते की ते लोक किती अधोगतीस गेले आहेत. ते म्हणतात तुम्ही मला मदत करावी यासाठी मी लायक नाही म्हणून मला सोडून दया. पण कामगारांनी त्यांचे प्रयत्न बंद करू नयेत. जे असे हताश झालेले, निराश झालेले त्यांच्यावर प्रिती करावी, कोमल वृत्तीने, सहानुभूतीने त्यांचा पालट करावा. तुम्ही त्यांना धैर्य, आशा व सामर्थ्य तुमच्या अनुभवाद्वारे सांगा. प्रेमळपणाने त्यांना आग्रह करा व आणा. “जे कित्येक संशयांत आहेत त्यांजवर दया करा; कित्येकास अग्नीतून ओढून काढून त्यांचे तारण करा आणि देहाने डागाळलेली वस्त्रे देखील द्वेष समजून भितीयुक्त वृत्तीने कित्येकांवर दया करा.‘‘ यहूदा २२,२३. COLMar 172.3
परमेश्वराचे सेवक जर विश्वासाने प्रभुबरोबर चालतील तर त्यांच्या संदेशाला सामर्थ्य प्राप्त करून दिले जाईल. सुवार्तिक प्रभावीपणे प्रभुची प्रिती प्रगट करतील आणि कृपेचा नकार करणे किती धोकादायक आहे हे समजून ते सुवार्ता स्वीकारतील. सुवार्तिकांना दिलेला भाग जर ते करतील तर ख्रिस्त त्यांच्यासाठी अद्भुत चमत्कार करील. गत पिढीमध्ये जसा पालट झाला तसा सध्याही मानवाच्या जीवनात पालट घडू शकतो. जॉन बनियान यांची सुटका धर्मानिंदा व चैनबाजी यापासून झाली, जॉन न्यूटन, यांची गुलामांची विक्री करणे यापासून सुटका झाली व पुढे हेच लोक तारणारा येशूची सुवार्ता सांगू लागले. सध्याच्या काळातील बनियान व न्यूटन हे ही तारण पावू शकतील. मानव जेव्हा परमेश्वराशी साहाय्य करील तेव्हा कित्येक गरीबांचे तारण होईल आणि त्यांच्याद्वारे मानवात परमेश्वराची प्रतिमा दिसून येईल. कित्येक लोकांना अशा प्रकारे थोडीशी संधी मिळाली, त्यांना दुसरा मार्ग माहीत नव्हता म्हणून ते चुकीच्या मार्गाने चालले आणि अशाच लोकांच्या मार्गावर सत्यप्रकाश किरणे येतील. जक्कयाकडे जसे ख्रिस्ताचे शब्द आले, (लूक १९:५) तशाप्रकारे त्यांनाही येशूचे शब्द ऐकावयास मिळतील, जे कोणी कठोर अत:करणाचे पापी असतील त्याची अत:करणे बालकांच्या अंत:करणाप्रमाणे कोमल असतील कारण ख्रिस्ताने त्यांच्याकडे लक्ष दिले म्हणून कित्येक कितीतरी गुन्हे व पापी जीवन यातून येतील व ज्याना संधी होती व विशेष हक्क होता तरी ते आले नाहीत व त्याची त्यांना किंमत वाटली नाही. पण गुन्हेगार व पापी याचा फायदा घेतील. ते लोक परमेश्वराने निवडलेले, मौल्यवान पसंत केलेले असे होतील आणि जेव्हा ख्रिस्त त्याच्या राज्यात येईल तेव्हा ते वरील लोक येशूच्या सिंहासनाजवळ उभा राहतील. COLMar 173.1
परंतु “जो बोलत आहे त्याचा अवमान करू नये’ म्हणून जपा. इब्री १२:२५ येशू म्हणाला, “त्या आमंत्रित मनुष्यातून एकही माझ्या जेवणातले काही चाखणार नाही.”त्या लोकांनी आमंत्रण नाकारले आणि त्यांना पुनः आमंत्रण दिले नाही. ख्रिस्ताचा धिक्कार करणे याद्वारे ते यहुदी त्यांची अंत:करणे कठीण करीत होते आणि ते सैतानाच्या ताब्यात जात असता येशूची कृपा स्वीकारणे हे त्यांना अशक्य असे होते. सध्याही असेच आहे. आम्ही जर परमेश्वराच्या प्रितीचा स्वीकार करीत नाही व त्या प्रितीच्या तत्त्वाप्रमाणे आमचे जीवन नम्र व कोमल होत नाही, तर असे समजणे की आमचा पूर्णपणे नाश झाला आहे. प्रभु परमेश्वराने त्याच्या प्रितीचा जो प्रभाव दाखविला त्यापेक्षा तो अधिक दाखवू शकत नाही. जर येशूच्या प्रितीने आपले अत:करण जिंकले जात नाही तर आपल्या अंत:करणापर्यंत पोहचणेसाठी दुसरे कोणतेच साधन नाही. COLMar 173.2
ज्या ज्या वेळी तुम्ही कृपेचा संदेश ऐकण्याचा नकार करीता त्या त्यावेळी तुम्ही तुमच्या अविश्वासात खोलवर जाता. ज्या ज्यावेळी ख्रिस्त तुम्हांशी बोलतो तेव्हा तुम्ही तुमच्या अंत:करणाचा दरवाजा बंद करीता त्या त्यावेळी येशूचे ऐकावयाचे नाही अशी तुम्ही तुमची नकारार्थी इच्छा दर्शविता. कृपेची अखेरची हाक तुम्ही प्रत्युत्तर देणे नको म्हणून तुम्ही तुमची संधी दवडत आहात. प्राचीन इस्त्राएलाबाबत जे लिहिले गेले ते तुम्हांविषयी न लिहिले जावो ; “एफ्राईम मूर्तीवर आसक्त (प्रिती करणारा) झाला आहे, त्याचे नाव सोडून द्या. होशेय ४:१७. येशू जसा यरूशेलेमाकडे पाहून रडला तसा तो तुम्हाबाबत न रडला जावो, येशू म्हणाला, “जशी कोंबडी आपली पिले पखाखाली एकवट करीते तसे तुझ्या मुलाबाळास एकवट करावयाचे किती तरी वेळा माझ्या मनात आले; पण ते तुमच्या मनात आले नाही! पाहा, ‘तुमचे घर तुम्हाकरीता ओसाड असे पडले आहे,‘‘ लूक १३:३४, ३५. COLMar 174.1
मनुष्याच्या लेकराबाळांना शेवटचा कृपेचा संदेश व शेवटचे आमंत्रण दिले जाईल अशा काळात आपण राहात आहोत. आज्ञा अशी की, “सडकावर व कुपणाकडे जाऊन लोकांस आग्रह करून आणा’ ही आज्ञा शेवटच्या कार्याची पूर्णता करीत आहे. प्रत्येक आत्म्याला ख्रिस्ताचे आमंत्रण दिले जाईल. संदेश वाहक म्हणतात, “आता या, तयारी झाली आहे‘‘ मानवांबरोबर देवदूत सहकार्याने काम करीत आहेत. पवित्र आत्मा प्रोत्साहन देत आहे की तुम्ही या आमंत्रणास हजर राहावे. तुम्ही तुमचे अंत:करणरूपी दार उघडून येशूने आत यावे असे आमंत्रण द्यावे या संधीची येशू वाट पाहात आहे. आणखी एक पापी हरवलेला स्वर्गीय नगराकडे येण्यास मान्य असा मिळाला ही बातमी ऐकण्यासाठी स्वर्गीय देवदूत आतुर आहेत. स्वर्गीय नगरीतील गायक संघ त्यांच्या हाती प्रत्येकजण वीणा घेऊन एक आनंदाचे गीत गाणे यासाठी सज्ज आहेत. ते गीत गाण्यासाठी सुवार्ता मेजवानीचे आमंत्रण स्वीकारून आणखी एका आत्म्याने तारणाचा स्वीकार केला‘‘. COLMar 174.2