मत्तय २१:२३-३२ यावर आधारीत
“एका मनुष्याला दोन पुत्र होते; तो पहिल्याकडे जाऊन म्हणाला, मुला आज द्राक्षमळयात जाऊन काम कर; त्याने उत्तर दिले, मी नाही जात; तरी काही वेळाने त्याला पस्तावा होवून तो गेला. मग दुसऱ्याकडे जाऊन त्याने तसेच म्हटले; त्याने उत्तर दिले, जातो महाराज; पण तो गेला नाही. या दोघांतून कोणी बापाच्या इच्छेप्रमाणे केले? ते म्हणाले पहिल्याने.‘‘ मत्तय २१ : २८-३२. COLMar 201.1
‘डोंगरावरील प्रवचनात ख्रिस्त म्हणाला, ‘मला प्रभूजी, प्रभुजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही; तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचा होईल; खरेपणाची परीक्षा शब्दात नसून कृत्तीत आहे. ख्रिस्त असे कोणालाही म्हणत नाही की दुसऱ्यापेक्षा तुम्ही जादा काय बोलता? पण तुम्ही इतरापेक्षा “विशेष काय करीता?’ मत्तय ५:४७. येशूचे शब्द अर्थभरीत आहेत,‘‘ या गोष्टी तुम्ही समजून उमजून कराल तर तुम्ही धन्य आहा‘‘ योहान १३:१७. शब्दाला जर कुत्तीची योग्य साथ नाही तर त्या शब्दांना काहीच अर्थ नाही. दोन पुत्र या दाखल्यात मुद्दा शिकविला जातो. COLMar 201.2
येशूने यरूशलेयास अखेरची भेट दिली तेव्हा हा दाखला सांगितला. येशूने, मंदिरातील क्रयविक्रय करणारे यांना हाकलून लाविले. परमेश्वराच्या सामर्थ्यान येशूचे शब्द त्याच्या मनाला पटले गेले. त्या लोकांनी अगदी आश्चर्यचकीत होऊन, एक शब्दानेही निमित्त वा प्रतिकार न करिता येशूची आज्ञा मानली. COLMar 201.3
जेव्हा मंदिरात सर्व काही शांत झाले तेव्हा वडील व याजक मंदिरात परत आले, येऊन पाहतात तो ख्रिस्त, आजारी लोकांना बरे करीत होता. याजक व वडील लोकांनी स्तुती व हर्षाची वाणी ऐकली. ज्या ज्या लोकरांना बरे केले ते ते झाडाच्या डहाळया हालवीत व दावीदाच्या पुत्राला होसान्ना असे गीत गात होते. महान वैद्य येशू याचे वर्णन व स्तुती बालके बोबडया ओठांनी करीत होते. इतके पाहुनही त्या याजक व वडील लोकांना त्याच्यातील द्वेष भावनावर विजय मिळविता आला नाही. COLMar 201.4
दुसऱ्या दिवशी ख्रित मंदिरात येऊन शिकवित होता त्यावेळी प्रमुख याजक व वडील ख्रिस्ताकडे येऊन म्हणाले, “तुम्ही कोणत्या अधिकाराने हे करता व तुम्हाला हा अधिकार कोणी दिला?‘‘ (मत्तय २१:२३). COLMar 202.1
याजक व वडील यानी ख्रिस्ताच्या सामर्थ्याचा पूर्ण पुरावा पाहिला. ख्रिस्त मंदिराचे शुध्दीकरण करीत असताना त्याच्या देवत्त्वाचा पुरावा व स्वर्गीय अधिकार ही त्याच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होती. ख्रिस्त, ज्या सामर्थ्याने बोलला त्याचा ते प्रतिकार करू शकले नाहीत. येशूने जे अद्भुत चमत्कार केले त्याद्वारे त्याने त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले होते. त्याद्वारे ख्रिस्ताने दाखविलेला अधिकार ते केव्हाही नाकारू शकले नाहीत. पण त्यांचा तो चमत्कार वा घटना यांची अपेक्षा वा गरज नव्हती. पण त्या याजक व वडील लोकांना येशूने, तो मशिहा असे घोषित करील आणि केव्हा ते त्याच्या शब्दांचा वेगळा अर्थ करून लोकांना ख्रिस्ताच्या विरूध्द करतील अशी ते वाट पाहत होते. ते येशूला बदनाम करून वा दोषी ठरवून ठार मारणेचा प्रयत्न करीत होते. COLMar 202.2
येशूला माहित होते की जर त्याना मजमध्ये परमेश्वर दिसत नाही किंवा त्यांच्या कार्यात येशूच्या देवत्वाचे सामर्थ्य दिसत नाही, तर येशूने त्यांना तो ख्रिस्त आहे हे सांगितले तरी ते विश्वास ठेवणार नव्हते. येशूच्या उत्तरात त्याच्यावर दोषारोप येईल अशी उत्तरे देणे, येशू टाळाटाळ करीत होता. COLMar 202.3
येशूने त्यास उत्तर दिले, मी ही तुम्हास एक गोष्ट विचारीतो ती मला सागाल तर कोणत्या अधिकाराने मी हे करीतो, ते मीही तुम्हास सांगेन. योहानाचा बाप्तिस्मा कोठून होता? स्वर्गातून किंवा मनुष्यातून”(मत्तय २१:२४,२५). COLMar 202.4
याजक व वडीलजण विचारात पडले, “योहानाचा बाप्तिस्मा कोठून होता? मनुष्यातून किंवा स्वर्गातून ? तेव्हा ते आपसात विचार करू लागले की स्वर्गातून असे म्हणावे तर हा आपल्याला म्हणेल, मग तुम्ही त्याजवर का विश्वास ठेविला नाही ? बरे, मनुष्यातून असे म्हणावे तर आपल्याला लोकांची भिती वाटते, कारण सर्व लोक योहानाला संदेष्टा मानितात. तेव्हा त्यांनी येशूला उत्तर दिले, आम्हास ठाऊक नाही. तो त्यास म्हणाला, तर कोणत्या अधिकाराने हे करितो हे मी ही तुम्हास सांगत नाही‘‘ मत्तय २१:२५-२७. COLMar 202.5
“आम्हास ठाऊक नाही अर्थात् आम्ही सांगू शकत नाही. हे उत्तर खोटे होते. याजकास समजले की, आपण कोणत्या कचाटयात सापडलो आहोत आणि म्हणून त्यांनी खोटे उत्तर या पडद्याआड ते दडू पाहात होते. ज्या प्रभू येशूचा अधिकार त्याजविषयी हे शास्त्री परूशी प्रश्न विचारीत होते त्याच प्रभु येशूच्या अधिकाराने योहान साक्ष देत होता. योहान येशूकडे बोट दाखवून संदेश देत होता. “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोंकरा‘‘ योहान १:२९. योहानाने येशूचा बाप्तिस्मा केला, आणि बाप्तिस्मा झाला त्यानंतर येशू प्रार्थना करीत होता... आकाश उघडले; तेव्हा त्याने देवाचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व आपणावर येताना पाहिला, आणि पाहा, अशी आकाशवाणी झाली की, हा माझा पुत्र मला परमप्रिय, याजवर मी संतुष्ट आहे’ मत्तय ३:१६, १७. COLMar 203.1
योहान मशिहाच्या भविष्याचे पुर्नउच्चार करीत असता; येशूच्या बाप्तिस्मा वेळीचे ते दृश्य यांची आठवण यावरून योहानाचा बाप्तिस्मा हा स्वर्गातून नाही असे म्हणावयास ते याजक व वडीलजण धजले नाहीत. तर त्यांनी तसा विश्वास धरिला, असे जर त्यांनी स्वीकारले तर मग योहानाने दिलेली साक्ष व संदेश येशू नासरेथकर हा, परमेश्वराचा पत्र आहे. हे ते कसे काय नाकारू शकतात? योहानाचा बाप्तिस्मा मनुष्यातून आहे असे म्हणावे तर आपल्याला लोकांची भिती वाटते, कारण सर्व लोक योहानाला संदेष्टा मानितात म्हणून ते म्हणाले, आम्हास ठाऊक नाही अर्थात आम्ही सांगू शकत नाही.‘‘ COLMar 203.2
यानंतर ख्रिस्ताने दाखला सांगितला. एका मनुष्याला दोन पुत्र होते. तो पहिल्याकडे जाऊन म्हणाला, मुला आज द्राक्षमळयात जाऊन काम कर ; त्याने त्वरीत उत्तर दिले “मी नाही जात‘‘ त्या मुलाने आज्ञा पाळणे नाकारले, तो दुष्ट मार्गाला लागला व अधम लोकांत मिसळला. पण त्याच मुलास नंतर पश्चात्ताप झाला व बापाची आज्ञा मानून द्राक्षमळयांत कामाला गेला. COLMar 203.3
पिता त्याच्या दुसऱ्या मुलाकडे गेला व त्यालाही तीच आज्ञा केली, “आज जाऊन माझ्या द्राक्षमळयात काम कर‘‘ त्या दुसऱ्या मुलाने उत्तर दिले, “जातो महाराज, पण तो गेला नाही.‘‘ COLMar 203.4
या दाखल्यात पिता हा परमेश्वराचे प्रतिनिधी व द्राक्षमळा म्हणजे मंडळीचे दर्शक आहे. ते दोन पुत्र म्हणजे दोन प्रकारच्या वर्गाचे लोकांचे प्रतिनिधी आहेत. जो पुत्र म्हणाला, “मी जात नाही‘‘ त्याद्वारे तो परमेश्वराची आज्ञा मानीत नव्हता. जे लोक उघडपणे आज्ञाभंग करीत होते. जे लोक देवाभिरूपणाचा ढोंगीपणा करीत नव्हते, परमेश्वराच्या आज्ञा पाळणे या बळजबरीच्या जूंवाखाली येणे याचा ते नकार करीत अशा लोकांचा तो मुलगा प्रतिनिधी होता. अशा लोकांनी शेवटी पश्चात्ताप केला व परमेश्वराचे पाचारण स्वीकारले. जेव्हा त्यांच्याकडे, बाप्तिस्मा करणारा योहानाचा संदेश “पश्चात्ताप करा ; कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे‘‘ (मत्तय ३:२) तेव्हा त्या लोकांनी पश्चात्ताप केला आणि त्याच्या पापांची कबुली दिली.” COLMar 203.5
जो मुलगा म्हणाला, “जातो महाराज, पण गेला नाही, त्या मुलाच्या द्वारे परूशी लोकांचा गुण स्वभाव प्रगट होतो. वरील मुलाप्रमाणे यहुदी पुढारी स्वधार्मिक व निगरगटट होते. यहूदी राष्ट्रांचे व लोकांचे धार्मिक जीवन हे ढोंगीपणाचे झाले होते. जेव्हा सीनाय पर्वतावर दहा आज्ञा लोकांना परमेश्वराच्या वाणीने सांगितल्या तेव्हा सर्व लोक म्हणाले वा प्रतिज्ञा केली, परमेश्वर जे सांगेल ते आम्ही करू वा पालन करू. यहुदी लोक म्हणाले आम्ही जाऊ प्रभुजी, पण ते गेले नाहीत. जेव्हा ख्रिस्त त्यांच्यात येऊन दहा आज्ञाची तत्त्वे काय आहेत हे सांगू लागला तेव्हा यहुद्यांनी येशूला नाकारले.’ यहुदी पुढाऱ्यांना ख्रिस्ताने त्याच्या पृथ्वीवरील दिवसात त्याच्या अधिकारांची व देवाच्या सामथ्याचे सर्व साक्षी परावे पटवून दिले त्यामुळे ते थक्क झाले, त्यांना पुरावे पटले, तरीपण ते त्यांनी पूर्णतः नाकारले. शेवटी ख्रिस्ताने त्यांना हे दाखविले की त्याच्या ठायी आज्ञा पाळणे हा आत्मा नसून ते अविश्वासातच राहिले. शेवटी प्रभुने त्यांच्याविषयी पुढील उद्गार काढले; त्याने आपल्या बापाचा अथवा आईचा सन्मान न केला तरी चालेल. याप्रकारे तुम्ही आपल्या संप्रदायेकरून देवाचे वचन रद्द केले आहे. ते मनुष्याचे नियम, शास्त्र म्हणून शिकवून माझी निरर्थक भक्ति करीतात.‘‘ मत्तय १५ : ६,९. COLMar 204.1
ख्रिस्तापुढे जमावात तेथे शास्त्री व परूशी, याजक व वडील लोक होते. येशूने त्या दोन मुलांचा दाखला सांगितला व त्यानंतर येशूने तेथील श्रोतेजणांस प्रश्न विचारला. “या दोघांतून कोणी बापाच्या इच्छेप्रमाणे केले?”(मत्तय २१:३१) परूशी स्वत:चा विचार न करिता म्हणाले, “पहिल्याने. ते स्वत:विरूध्द साक्ष देतात याचा त्यांनी विचारही केला नाही पण उत्तर बरोबर दिले! त्यानंतर ख्रिस्ताच्या मुखातून दोषारोपाचे उद्गार निघाले, “मी तुम्हांस खचीत सांगतो की जकातदार व कसबिणी तुमच्यापुढे देवाच्या राज्यात जातात कारण योहान धर्ममार्गाने तुम्हाकडे आला, आणि तुम्ही त्याचा विश्वास धरिला नाही, जकातदार व कसबिणी यांनी त्याचा विश्वास धरिला, तर हे पाहून तुम्ही त्याचा विश्वास धरावा असा मागूनही पश्चात्ताप केला नाही.‘‘ (मत्तय २१:३१,३२). COLMar 204.2
बाप्तिस्मा करणारा योहान सत्याची घोषणा करीत होता आणि त्याचा सदेश ऐकूण पापी लोकांनी पश्चात्ताप केला व त्यांचा पालट झाला. हे लोक स्वर्गीय राज्यात प्रथम जातील पण जे स्वत:ला धार्मिक समजतात असे लोक सत्य सुवार्ता स्वीकारणार नाहीत. जकातदार व पापी हे अज्ञानी होते पण हे ज्ञानी लोक यांना सत्य माहित होते. तरीपण स्वर्गीय गृही जाणारा सत्याचा मार्ग याचा त्यांनी नकार केला. जे सत्य त्यांना जीवनाचे जीवन असे होऊन तारण करणारे तेच सत्य त्यांना मारक होऊन मरण असे झाले. जे पापात लाळणारे लोक त्यांनी योहानाच्या हस्ते बाप्तिस्मा घेतला पण हे शिक्षक ढोंगी असेच राहिले. त्यांच्या अंत:करणाच्या कठोरपणामुळे ते सत्य स्वीकारू शकले नाहीत. त्यांनी परमेश्वराचा आत्मा याचाही धिक्कार केला. परमेश्वराच्या आज्ञा पाळणे हे ही त्यांनी नाकारले. COLMar 204.3
तुम्ही स्वर्गीय राज्यात जाऊ शकत नाही असे, ख्रिस्त त्यांना कधीच म्हणाला नाही, पण ते स्वत:च स्वर्गीय राज्यात जाणे यासाठी अडखळण कसे काय आहेत हे येशूने त्यांना दाखवून दिले. या यहुदी पुढारी लोकांसाठी स्वर्गीय दार अद्यापही उघडे आहे, त्यांच्यासाठी अजूनही आमंत्रण आहे. त्या यहुदी पुढारी लोकांनी स्वत:ची चुक समजून पश्चात्ताप करणे व पालट झालेले प्रकट करणे. COLMar 205.1
“परमेश्वराने त्याला पर्वतावरून हाक मारून सांगितले की याकोब वंशास हे सांग... म्हणून आता तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा खास करार पाळाल तर सर्व लोकांमध्ये माझा खास निधी व्हाल ; सर्व पृथ्वी माझी आहे; पण तुम्ही मला याजकराज्य, पवित्र राष्ट्र व्हाल. तुला इस्त्राएल लोकांस सांगावयाचे ते हेच.’ (निर्गम १९:३-६). COLMar 205.2
याजक व वडील लोक हे इस्त्राएलाचे होते व त्यांनी धार्मिक विधी करणे हे पवित्र समजून केले व त्यांचा व इतर व्यवहारिक जीवनाचा संबंध यात अंतर ठेविले. यामुळे ते त्यांचे जीवन संपूर्ण धार्मिक असे समजत होते. पण ते सर्व धार्मिक विधी लोकांनी पाहाणे व त्यांना धार्मिक व समर्पित असे समजावे असेच त्यांना वाटत असे. ते आज्ञापालन करीत आहेत असे ते वरपांगी दाखवित असताना ते परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करीत नव्हते. ते सत्य केवळ शिकवीत होते पण ते सत्याचे पालन करीत नव्हते. COLMar 205.3
बाप्तिस्मा करणारा योहान हा सर्वश्रेष्ठ संदेष्टा होता असे येशूने जाहीर केले. येशूने तेथील श्रोतेजनांस हे ही दाखवून दिले की योहान संदेष्टा हा परमेश्वरापासून होता याबाबत पूर्ण परावे दिले. तो अरण्यात घोषणा करणारा योहान त्याची वाणी सामर्थ्यवान होती. योहानाने संदेश निर्भिडपणे दिला, त्याने याजक व वडील लोकांच्या COLMar 205.4
पापांचा धिक्कार केला आणि त्यासोबत स्वर्गीय राज्याचा संदेशही गाजविला. त्याने हे ही दाखविले की, स्वर्गीय पित्याने त्याना जे कार्य करावयास सांगितले त्याचा धिक्कार करणे ही त्यांची पापी मनोवत्ती. योहानाने पापाशी कधीही समेट केला नाही आणि पुष्कळजण त्याच्या अधार्मिकतेपासून परत फिरले. COLMar 206.1
यहुदी पुढारी जर खरे असते तर त्यांनी योहान बाप्तिस्मा करणारा याची साक्ष खरी मानली असती व येशूचा मसीहा म्हणून स्वीकार केला असता. पण त्यांनी पश्चात्तापाची फळे धार्मिकता व पश्चात्ताप ही दर्शविली नाहीत. तर यहदी पुढारी ज्या लोकांचा धिक्कार करीत होते ते लोक त्याच्यासमोर स्वर्गीय राज्यात जाणेसाठी असंख्य असे दिसत होते. COLMar 206.2
या दाखल्यांतील जो मुलगा म्हणाला, “जातो महाराज’ हा मुलगा, जे लोक विश्वासु व आज्ञाधारक पण कालांतराने ते खरे नाहीत अशा लोकांचा दर्शक होता. पित्याविषयी त्यांच्या मनात खरी प्रिती नव्हती. परूशी लोक त्यांची पवित्रता याविषयी अभिमान बाळगून होते पण जेव्हा त्यांची परीक्षा घेतली गेली तेव्हा ते उणे भरले. जेव्हा नियमाचा त्यांच्यासाठी फायदा करून घेत करणे त्यावेळी परूशी नियमांचे बंधन ते कडक करीत होते, पण जेव्हा का त्याच नियमांचे आज्ञापालन करावयाचे तेव्हा ते धूर्तपणाने खोटे खरे भासविणारा युक्तिवाद करून परमेश्वराच्या नियमांचा ओघ दुसरीकडे नेत व स्वत: अलिप्त होत असत. अशा लोकांविषयी ख्रिस्ताने जाहीर केले, वास्तव ते जे काही तुम्हांस सांगतील ते अवघे आचरा व पाळा, परंतु त्यांच्या करण्याप्रमाणे करू नका; कारण ते सांगतात पण करीत नाहीत’ मत्तय २३:३. कारण त्यांच्याठायी परमेश्वर व मानव यांच्यासाठी खरी प्रिती नाही. जगाला आशीर्वाद देणे यासाठी परमेश्वराने त्यांना पाचारण केले आणि धंदा या दृष्टीने त्यांनी पाचारण स्वीकारले पण कृतीने आज्ञापालन करणे याचा त्यांनी नकार केला. ते स्वत:वर विसंबून विश्वास ठेवीत गेले व त्यांची चांगली कृत्त्ये यांचा त्यांना अभिमान वाटत असे, पण परमेश्वराच्या आज्ञांचा त्यांनी विरोध केला. परमेश्वराने त्यांना ज्या कामावर नेमणूक केली ते करणे त्यांनी नाकारिले; आणि त्यांच्या या आज्ञाभंगाच्या कृतीमुळे परमेश्वर त्यांना आज्ञाभंजक राष्ट्र म्हणून सोडून देणार होता. COLMar 206.3
स्वधार्मिकता ही खरी धार्मिकता नाही, आणि जे कोणी अशा खोटया धार्मिकतेला चिकटून राहतील त्यांना त्याची फसवणूक झाली याबाबत दुर्दैवी परिणाम स्वीकारावे लागतील. सध्या पुष्कळजण परमेश्वराच्या आज्ञा पाळतात पण त्यांच्या अंत:करणात परमेश्वराची प्रिती नाही आणि ती प्रिती इतराकडे वाहत नाही. जगाचे तारण या कार्यात येशू त्यांना बोलावितो पण ते स्वत:चे समाधान करीतात “जातो महाराज’ ते कार्याला जात नाहीत आणि जे कोणी परमेश्वराचे तारणदायी सेवाकार्य करितात त्यांच्याशी सहकार्य करीत नाहीत. कारण ते आळशी आहेत. अविश्वासु मुलाप्रमाणे ते खोटे अभिवचन देतात. मंडळीची सेवाकार्य करणे अशी प्रतिज्ञा करून परमेश्वराचे वचन स्वीकारणे व त्यानुसार वागणे असा पवित्र करार ते करीतात पण त्याप्रमाणे सेवाकार्य करीत नाहीत. ते परमेश्वरांचे पुत्र आहेत असे सांगतात पण जीवन व कार्य याद्वारे ते वरील नातेसबंध ठेवीत नाहीत. ते त्यांचे जीवन परमेश्वराला वाहून देत नाहीत: ते खोटे जीवन जगतात. COLMar 206.4
ते आज्ञापालनाचे अभिवचन पाळावयास सज्ज असत पण त्यात स्वार्थत्याग नसला पाहिजे, परंतु जर का त्या अभिवचनात स्वनाकार, स्वार्थत्याग यांची जरा का गरज दिसली, त्यात वधस्तंभ उचलणे ही गरज दिसली तर त्या सर्वांतून माघार घेत असत. अशाप्रकारे सेवेची निश्चित्तता नाहीशी होत गेली आणि परमेश्वराच्या आज्ञाचे पालन न करणे ही एक परिचयाची सवयच होऊन गेली. परमेश्वराची आज्ञा कानाने ऐकू येते पण ती ऐकणे आत्मिक सामर्थ्य हे केव्हाच सोडून गेलेले असते. त्यामुळे अत:करण कठीण झाले व सद्विवेक निगरगटट् झालेला असतो. COLMar 207.1
तुम्ही ख्रिस्ताला वैरभाव दाखवीत नाही यावरून तुम्ही ख्रिस्ताची सेवा करीता असा समज तुम्ही केव्हाही करू नका. अशा प्रकारे विचाराने आम्ही स्वत:ची फसवणूक करीत आहोत. आम्ही परमेश्वराची सेवा करावी यासाठी परमेश्वराने आम्हास दिलेला वेळ, साधने वा कोणतीही देणगी यांचा आम्ही त्याच्या सेवासाठी उपयोग न करिता, ती आम्ही राखून ठेवितो तर अशाप्रकारे आम्ही परमेश्वराविरूध्द कार्य करितो. COLMar 207.2
सैतान निरर्थक, झोपाळू, आळशी व नामधारी ख्रिस्ती लोकांचा उपयोग करून घेतो व आपल्या बाजूला बहुसंख्य लोक ओढतो. पुष्कळजण खिस्तासाठी व्यक्तिश: काम करीत नाहीत, तरीपण असे लोक ख्रिस्ताच्या बाजूला आहेत असे सांगतात; पण खरे पाहता असे लोक शत्रुला पाठिंबा देतात व शत्रुला साहाय्य करितात. ख्रिस्तासाठी कर्तबगारीने काम न करणे; दिलेले काम न करणे, योग्य वेळी शब्द न बोलणे, याद्वारे सैतान इतर आत्मे यांचा ताबा घेतो; कारण कामदाराने वरील प्रकार केले नसते तर त्यांच्याद्वारे आत्मे जिंकले असते. COLMar 207.3
आम्ही आळशीपणात व काम करणे टाळले तर अशा परिस्थितीत आपले तारण होणार नाही. खरा पालट झालेला मनुष्य हा निरूपयोगी व असाहाय्यक असा कधीही असणार नाही. आम्ही स्वर्गीय राज्यात असे ढकलत ढकलत जाणार नाही. कोणी आळशी माणसाचा स्वर्गात प्रवेश नाही. आम्हास स्वर्गीय राज्यात प्रवेश हवा यासाठी आम्ही जर प्रयत्न आटोकाट करणार नाही, स्वर्गीय राज्याचे नियम काय आहेत हे जर आपण समजून घेणार नाही तर मग आम्ही स्वर्गीय राज्याचा नागरीक होऊ शकत नाही. जर कोणी या पृथ्वीवर परमेश्वराशी सहभागी होत नाही तर ते स्वर्गातही परमेश्वराशी सहभागी होणार नाहीत. यामळे अशा लोकाना स्वर्गात नेणे हे सुरक्षित होणार नाही. COLMar 207.4
ज्या लोकाना परमेश्वराचे वचन माहीत आहे पण त्या वचनानुसार आज्ञापालन करीत नाहीत त्यांच्याहून जकातदार व पापी यांना अधिक आशा आहे. जो कोणी स्वत:ला पापी समजतो, त्याच्या पापावर पांघरून घालीत नाही, जो कोणी, परमेश्वरासमोर, मनाने, आत्म्याने व शरीराने पापी असून त्यामुळे तो स्वर्गापासून कायम विभक्त होणेची भिती बाळगून जागृत होतो. त्या पापी मनुष्याला त्याची स्थिती समजून जो महान डॉक्टर आश्वासन देतो त्याची गरज भासते. “पिता जे मला देतो ते सर्व मजकडे येईल; आणि जो मजकडे येतो त्याला मी घालविणार नाहीच‘‘ योहान ६:३७ अशा आत्म्याचा परमेश्वर त्याच्या द्राक्षमळयात उपयोग करू शकतो. COLMar 208.1
ज्या मुलाने थोडया वेळासाठी त्याच्या पित्याची आज्ञा नाकारली त्या मुलास ख्रिस्ताने दोष दिला नाही, आणि त्याच मुलाची स्तुतिही केली नाही. वरील प्रथम मलाचा दर्शक जो वर्ग आहे त्यांना त्यांच्या कार्याबाबत स्तुतिची गरज नाही. ते स्पष्ट बोलतात हा त्यांचा चांगला गुण समजला जाऊ नये. सत्याने लोकांचे होणारे पवित्रीकरण व पवित्रता त्यामुळे लोक ख्रिस्ताची साक्ष देतील; पण पापी लोक याचा वापर करू लागले त्यामुळे ते उध्दट अपमान व दोषारोप करणे असे जीवन जगतात. एखादा मनुष्य ढोंग नाही म्हणून तो काय कमी प्रतीचा पापी ठरत नाही. जेव्हा आमच्या अंत:करणास पवित्र आत्म्याची हाक ऐकू येते तेव्हा आम्ही विलंब न करिता पवित्र आत्म्याचे ऐकणे यात आपली सुरक्षितता आहे. जेव्हा पाचारण येते. “आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तर आपली मने कठीण करू नका‘‘ इब्री ४ : ७ आज्ञा पालनात दिरंगाई करणे सुरक्षित नाही. कदाचित तुम्हास आमंत्रण पुन्हा दिले जाणार नाही. COLMar 208.2
आमच्या मनातील बाळगून धरलेली पापे, हळूहळू व कालांतराने निघून जातील असा विचार कोणीही करू नये असे कधीही होत नाही. मनाशी वा मनात बाळगलेले प्रत्येक पाप हे शील कमकुवत करिते व सवय भक्कम होत जाते, त्यामुळे परिणामी शारीरिक, मानसिक व नैतिकपणा खालावत जातो हा परिणाम ठरलेला होतो. तुम्ही पाप केले याचा तुम्हाला पश्चात्ताप होईल व तुम्ही नितीच्या मार्गाने चालत राहाल, पण तुमच्या मनाचे परिवर्तन व वाईटाशी झालेला परिचय यामुळे बरे वाईट यातील फरक लवकर समजणार नाही. आम्ही ज्या वाईट सवयी धारण केल्या त्याद्वारे सैतान आम्हांवर पुन्हा पुन्हा हल्ले करीत राहील. COLMar 208.3
“आज द्राक्षमळयांत काम कर’ या आज्ञेत प्रत्येक आत्म्याच्या खरेपणाची परीक्षा आहे. यासाठी प्रतिउत्तर म्हणून शब्द व कृती यांची जोड असेल काय?‘‘ ज्याला असे पाचारण केले ते त्यांना दिलेली प्रत्येक देणगी व ज्ञान, विश्वासुपणे व एकमेव हेतु म्हणजे द्राक्ष मळयाच्या मालकासाठी काम करणे, असे होईल काय ? COLMar 209.1
प्रेषित पेत्र, आम्ही कोणत्या योजनेप्रमाणे काम करावे म्हणून सल्ला देतो. तुम्हाला कृपा व शांति विपुल मिळोत, पेत्र म्हणतात, ज्याने तुम्हांआम्हांला आपल्या गौरवाने व सात्विकतेने पाचारण केले. त्याच्या ओळखीच्याद्वारे त्याच्या दैवी सामर्थ्याने, जीवनास व सुभक्तिस जे सर्व काही साधक ते आपल्याला दिले आहे हे तुम्हाला माहीत आहे, त्यांच्या योगे मौल्यवान व अतिमहान अशी वचनें आपल्याला देण्यात आली आहेत, यासाठी की त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. COLMar 209.2
याच कारणाने तुम्ही होईल तितका प्रयत्न चालवून आपल्या विश्वसांत सात्त्विकतेची, सात्त्विकेत ज्ञानाची, ज्ञानात इंद्रियदमनाची, इंद्रियमनात धीराची, धीरात सभक्तीची, सुभक्तीत बंधुप्रितीची व बंधुप्रितीत प्रितीची भर झाला‘‘ (२ पेत्र १:२-७). COLMar 209.3
जर तुम्ही विश्वासुपणे तुमच्या आत्म्याचा द्राक्षमळा मेहनत करून पिकवित राहाल तर परमेश्वर तुम्हास त्याचा सहकामदार म्हणून समजतो. अशा प्रकारचे कार्य तुमच्या स्वत:साठीच नव्हे तर इतरांसाठीही करणे आहे. मंडळी हा द्राक्षमळा दर्शक आहे तेव्हा ख्रिस्त असे शिक्षण देत नाही की आपली सहानुभूती व कार्य करणे ही केवळ आपल्या सभासद संख्येपुरतीच मर्यादित असावी. प्रभुचा द्राक्षमळा हा अधिक विस्तृत झाला पाहिजे. जस जसे आपणाला शिक्षण व परमेश्वरी कृपा ही प्राप्त होत जाईल त्या त्या प्रमाणात आम्हांस झालेले ज्ञान व काळजी इतरांचीही घेतली पाहिजे. अशा प्रकारे आपण प्रभुचा द्राक्षमळा विस्तृत करू शकतो. आमचा विश्वास, प्रिती व सहनशीलता याकडे परमेश्वर पाहतो. या पृथ्वीवरील प्रभुचा द्राक्षमळा यात आम्ही कुशल कारागीर वा कामदार म्हणून परमेश्वर आमच्या प्रत्येक आत्मिक संधीकडे पाहातो यासाठी आम्हांस परमेश्वराच्या स्वर्गीय एदेन अर्थात नंदनवनात कार्य करिता यावे, त्याच एदेन बागेतून आदाम व हव्वा यांना आज्ञाभंगामुळे बाहेर काढून दिले होते. COLMar 209.4
परमेश्वर त्याच्या लोकांसाठी त्याचा पिता या नात्याने संबंधीत राहतो व आम्ही त्यांची विश्वासुपणे सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे. ख्रिस्ताच्या जीवनाचा विचार करा. ख्रिस्त हा सर्व मानवाचा प्रमुख आहे, त्याने स्वर्गीय पित्याची सेवा केली, आणि आम्ही प्रत्येक मानवाचे पुत्र वा कन्या यांनी स्वर्गीय पित्याची कशी सेवा करावी याचा कित्ता ख्रिस्ताने दिला. ख्रिस्ताने जसे परमेश्वराचे आज्ञापालन केले तसे आज प्रत्येक मानवाने केले पाहिजे. ख्रिस्ताने स्वर्गीय पित्याची सेवा प्रितीने स्वइच्छेने व संतोषाने केली. “हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला संतोष आहे; तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे‘‘ स्तोत्र ४०:८. ख्रिस्त या पृथ्वीवर जे कार्य करावयास आला त्याप्रित्यर्थ ख्रिस्ताला जो स्वार्थत्याग, जे काम करणे होते ते त्याने कधीही अवघड असे समजले नाही. येशू, बारा वर्षे वयाचा असताना म्हणाला, “जे माझ्या बापाचे त्यात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय? लूक २:४९ येशुने पाचारण ऐकले व त्यानुसार काम करणे हे त्याने पत्कारले. येशू त्यांस म्हणाला, ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिध्दीस न्यावे हेच माझे अन्न आहे‘‘ योहान ४:३४. COLMar 209.5
अशाप्रकारे आम्ही परमेश्वराची सेवा करावी. जो कोणी सर्वश्रेष्ठ आज्ञापालन करीतो तोच परमेश्वराची सेवा करितो. जे कोणी परमेश्वराचे पुत्र व कन्या असे पटवून देऊ शकतात तेच परमेश्वराचे, ख्रिस्ताचे व देवदूताचे सहकामदार असे आहेत. प्रत्येक आत्म्याची हीच परीक्षा आहे. जे कोणी परमेश्वराची विश्वासूपणे सेवा करितात त्यांच्याविषयी प्रभु म्हणतो, “मी नेमीन त्या दिवशी ते माझा खास निधि होतील; जसा कोणी आपली सेवाचाकरी करणाऱ्या पत्रावर दया करीतो तसा मी त्यांजवर दया करीन‘‘ मलाखी ३: १७. COLMar 210.1
परमेश्वर त्याच्या सामर्थ्याने, कृपेने मनुष्यांना संधी देऊन त्यांचा स्वभाव वा शील वाढविणे हाच महान हेतू सिध्दीस नेतो. मग ती मनुष्ये जेथे कोठे आहेत तेथेच त्यांची परीक्षा होईल की ते त्याच्या आज्ञाविषयी आज्ञाधारक वा आज्ञाभंजक आहेत. चांगली कृत्त्ये याद्वारे परमेश्वराची प्रिती खरेदी केली जात नाही तर ती चांगली कृत्त्ये याद्वारे परमेश्वराची प्रिती त्यांच्याठायी आहे हे प्रगट केले जाते. आम्ही आपली इच्छा परमेश्वराला शरणागती म्हणून वाहिली तर परमेश्वराची प्रिती खरेदी करण्याचा प्रत्यत्न आपण कधीही करणार नाही. परमेश्वराची प्रिती ही आम्हांस मोफत देणगी अशी आपण स्वीकारू आणि त्या प्रितीच्या देणगीमुळे आम्ही परमेश्वराची आज्ञा पाळणे हा आम्हांस आनंद वाटेल. COLMar 210.2
जगात दोनच वर्गाचे लोक आहेत आणि न्यायनिवाडा समयी दोनच वर्गाचे लोक असतील. एक वर्ग परमेश्वराची आज्ञा मान्य करून पाळणारा व दुसरा वर्ग परमेश्वराची आज्ञा अमान्य करून आज्ञाभग करणारा असा असेल. आम्ही ख्रिस्ताशी प्रामाणिक वा अप्रामाणिक आहो, यासाठी आम्हास परीक्षा दिली जाईल. “येशू म्हणतो, जर मजवर तुमची प्रिती असली तर माझ्या आज्ञा पाळाल‘‘ येशू म्हणतो, माझ्या आज्ञा पाळा... ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत, व त्या जो पाळतो तोच मजवर प्रिती करणारा आहे; आणि जो मजवर प्रिती करितो त्याजवर माझा पिता प्रिती करील. मी ही त्याजवर प्रिती करीन व स्वतः त्याला व्यक्त होईन... मजवर कोणाचे प्रेम नसल्यास तो माझी वचने पाळीत नाही; जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नव्हे तर ज्या पित्याने मला पाठविले त्याचे आहे‘‘ जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रितीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रितीत राहाल. योहान १४ : १५-२४; योहान १५ : १०. COLMar 210.3