मत्तय २१:३३-४४ यावर आधारित
यहुदी राष्ट्र - COLMar 212.1
दोन मुलांचा दाखला त्यानंतर द्राक्षमळा हा दाखला सांगितला. एका दाखल्यात ख्रिस्ताने आज्ञापालनाचे महत्त्व किती हे यहुदी शिक्षकांना दाखविले. दुसऱ्या दाखल्यात इस्त्राएलावर किती विपुल आशीर्वाद आणि परिणामी त्यांच्यावर आज्ञापालन करणे हे परमेश्वराने सांगितलेले आहे. परमेश्वराचा हेतु पूर्ण करणे यात इस्त्राएलाचे, वैभव वा गौरव आहे आणि ते केवळ आज्ञापालनाद्वारे त्यांनी पूर्णता करावयाचे होते. हे ही त्यांना दाखवून दिले. परमेश्वराने भविष्याचा पडदा थोडासा बाजूला केला आणि इस्त्राएलांना हे दाखवून दिले की जर ते परमेश्वराचा हेतू परिपूर्ण करणे यात पराभूत झालो तर त्या यहुदी राष्ट्रांना परमेश्वराचा आशीर्वाद गमावून बसावे लागेल व ते त्याच्यावर आपत्ति ओढून घेतील. COLMar 212.2
ख्रिस्त म्हणाला, “कोणी एक गृहस्थ होता, त्याने द्राक्षमळा लाविला, त्या भोवते कुंपण घातले, त्यामध्ये द्राक्षरसासाठी कुंड खणिले व माळा बांधिला; आणि तो माळयास सोपून देऊन आपण परदेशी गेला.’ (मत्तय २१:३३). COLMar 212.3
या द्राक्षमळ्याचे वर्णन यशया संदेष्टयाने दिले आहे : “मी आपल्या वल्लभाप्रित्यर्थ गाणे गाईन, आपल्या प्रियतमाचे त्याच्या द्राक्षीच्या मळ्याविषयीचे गीत गाईन. माझ्या वल्लभाचा द्राक्षमळा डोंगराच्या एका अतिशयित सुपीक शृगावर होता. तो त्याने खणून त्यांतील रोपे काढून टाकिले व तेथे उत्तम प्रतीच्या द्राक्षीच्या वेलींची लागवड केली, आणि त्यांत एक बुरूज बांधिला व द्राक्षकुंड खोदिले, मग त्यापासून द्राक्षे पैदा होतील म्हणून वाट पाहिली, यशया ५:१,२. COLMar 212.4
त्या गृहस्थाने अरण्यात जागा शोधून काढली, त्या शेताला कुंपण घातले, त्या शेताची मेहनत केली व त्या शेतात उत्तम प्रतिच्या द्राक्षीच्या वेलीची लावणी केली व चांगला हंगाम पीक येईल अशी अपेक्षा केली. ही जी जागा निवडली होती त्या जागेत जी मेहनत व कष्ट केले त्या मानाने त्या पडीक जागेतून पीक द्यावयाचे होते. तद्वतच् परमेश्वराने जागेतून लोकांची निवड केली व ख्रिस्ताने त्यांना शिक्षण व प्रशिक्षण दिले. संदेष्टा म्हणतो, “कारण सेनाधीश परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्त्राएलांचे घराणे; त्यांतील त्याची आवडीची लागवड म्हणजे यहुदाचे लोक’ यशया ५ : ७ परमेश्वराने या लोकांना पुष्कळ आशीर्वादीत संधी दिली; त्यांच्यावर चांगलपणाने आशीर्वादीत असे केले. त्या लोकांनी त्या प्रित्यर्थ चांगले फळ देऊन परमेश्वराचा सन्मान करावयाचा होता अशी अपेक्षा परमेश्वराने केली. त्यांनी परमेश्वराच्या राज्याची धर्मतत्त्वें प्रकट करावयाची होती. या जगातील पतित व दुष्ट लोकांत परमेश्वराच्या शीलाचे प्रतिनिधी असे त्यांनी दर्शवावयाचे होते. COLMar 212.5
परमेश्वराचा द्राक्षमळा या दृष्टीने त्यानी इतर विधर्मी राष्ट्र यांच्याहून वेगळे फळे द्यावयाचे होते. तेथील मूर्तीपूजक लोकांनी स्वत:ला सर्वस्वी दुष्टतेला जणू काय कवटाळलेले होते. तंटा व भांडणे, गुन्हे, अधाशीपणा, छळ करणे व इतर दुष्टतेच्या संवयी ते बिनधोक करीत होते. त्या दुष्ट वेलींची फळे पाप, नीचावस्था व दुष्टता अशी होती. परमेश्वराच्या द्राक्षवेलींच्या फळांशी यांची तुलना करणे अशक्य कारण त्यांच्यात विरोध होता. COLMar 213.1
मोशेला दाखविले त्याप्रमाणे यहुदी राष्ट्रांनी परमेश्वराच्या शीलाचे प्रदर्शन करावयाचे होते. मोशेच्या प्रार्थनेला उत्तर म्हणून “कृपा करून मला तुझे तेज दाखीव’ परमेश्वराने अभिवचन दिले, माझे सर्व सौंदर्य तुझ्यापुढे चालवीन ; तुझ्या सन्मुख परमेश्वराच्या नामाची मी घोषणा करीन’ निर्गम ३३: १८, १९. “परमेश्वर त्याच्या समोरून अशी घोषणा करीत गेला. परमेश्वर, परमेश्वर, दयाळु व कनवाळ देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर, हजारों जणांवर दया करणारा, अधर्म, अपराध व पाप यांची क्षमा करणारा, मुळीच गय न करणारा‘‘ निर्गम ३४ : ६,७. अशाच गुणांची फळें त्याच्या लोकांनी द्यावी अशी त्याची ईच्छा होती. त्यांचे शील - शुध्द असणे, त्यांचे जीवन पवित्र, त्यांच्या जीवनात कृपा व दयाळूपणा व कनवाळु वा सहानुभूती असणे ; त्यांनी हे दाखवावयाचे होते की, “परमेश्वराचे नियमशास्त्र पूर्ण आहे, ते मनाचे पुनरूज्जीवन करीते‘‘ स्तोत्र १९:७. COLMar 213.2
यहुदी राष्ट्रांद्वारे परमेश्वराचा हेतू सर्व राष्ट्रांना परमेश्वराच्या आशीर्वादात संपन्न करणे. इस्त्राएलांच्याद्वारे सर्व जगभर सुवार्तेचा प्रकाश देऊन लोकांची तयारी करावयाची होती. जगिक राष्ट्रे अनैतिक व्यवहाराने चालत होती व परमेश्वराच्या ज्ञानास मुकली होती असे असूनही परमेश्वराने त्यांना त्याच्या कृपेने नाहीसे केले नाही. COLMar 213.3
परमेश्वराने त्यांना म्हणजे इस्त्राएल लोकांना मंडळीच्याद्वारे संबंधीत राहाणेची संधी दिली. परमेश्वराने अशी आखणी केली होती की परमेश्वराच्या लोकांचा जो नितिमत्तेचा दर्जा असेल तसाच इतर मानवांच्या दर्जाद्वारे परमेश्वराची प्रतिमा मानवात दिसावी. COLMar 214.1
परमेश्वराने हा हेतू संपादला जावा म्हणून अब्राहमास कनान देशतून मूर्तीपूजक नातलगांतून कनान देशांत राहणेस पाचारण केले. “परमेश्वर म्हणाला, “मी तुजपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन ; तुझे मी कल्याण करीन, तुझे नाव मोठे करीन ; तू कल्याण मुलक हो‘‘ उत्पत्ति १२:२. COLMar 214.2
अब्राहामाचे वंशज याकोब व त्याच्या पिढया यांना मिसरातील महान राष्ट्रात आणले आणि ती राष्ट्र दुष्ट होती. त्यांना परमेश्वराच्या राज्याची तत्त्वे प्रगट करावयाची होती. योसेफाचा प्रामाणिकपणा व त्याने केलेले अद्भुत कार्य त्यामुळे दुष्काळास सर्व मिसरांतील लोकांचा जीव वाचला हे कार्य ख्रिस्ताच्या कार्याचे दर्शक आहे. मोशे व इतरांनीही अशाच प्रकारे परमेश्वराविषयी साक्ष दिली. COLMar 214.3
इस्त्राएल लोकांना मिसरातून आणणे यासाठी परमेश्वराने त्यांचे सामर्थ्य व कृपा ही प्रगट केली. त्या इस्त्राएल लोकांना गुलामगिरीतून बाहेर आणणे आणि त्यांच्या अरण्यांतील प्रवासात परमेश्वराने जे काही केले ते केवळ इस्त्राएलासाठीच होते असे नव्हे तर त्यांच्या सभोवर जी राष्ट्र होती त्यांच्यासाठी बोधपर धडे असे होते. सर्व मानवी अधिकार सत्तेहून परमेश्वर हा श्रेष्ठ आहे हे ही त्यांना दाखविले. जे लोक निसर्गाची पूजा करीत होते त्यांना परमेश्वराने जी चिन्हें व चमत्कार केले त्यावरून परमेश्वराची श्रेष्ठता निसर्गाहून अधिक आहे. हे दाखवून दिले. मिसर देशातील प्रौढी दाखविणारे त्यांच्यातून परमेश्वर गेला तद्वत् शेवटच्या काळी परमेश्वराचे जाणे होईल. परमेश्वर म्हणाला “मी आहे‘‘ या अभिवचनाने लोकाना अग्नि, वादळ, भूकंप व मरण यातून सुरक्षित नेले. परमेश्वराने त्यांना मिसरांतील गुलामगिरीतून बाहेर काढले.”आग्या सर्वांनी व विंचवांनी व्यापिलेल्या विस्तीर्ण व भयानक रानातून आणि पाणी नसलेल्या रूक्ष भूमीतून त्याने त्यांना आणिले‘‘ अनुवाद ८:१५. “त्याने (परमेश्वर) तुजसाठी गारगोटीच्या खडकातून पाणी काढिले‘‘ (अनुवाद ८:१५) ‘खाण्याकरीता त्याने (परमेश्वर) त्याजवर “मान्ना’ चा वर्षाव केला ; आणि त्यांस स्वर्गीचे धान्य दिले”(स्तोत्र ७८:२४) मोशे म्हणाला, “कारण परमेश्वराचे लोक हाच त्यांचा वाटा, याकोब हा त्यांचा नेमिलेला वतनभाग. तो त्यांस अरण्यात, शून्य व घोर अशा मरूभूमीतून आढळला; त्याने त्यांच्या आसपास राहून त्यांची निगा केली, डोळयाच्या बाहलीप्रमाणे त्यांचे रक्षण केले; गरूड पक्षीण आपले कोठे हालविते, आपल्या पिल्याच्या वर तळपत असते. त्याप्रमाणे त्याने आपले पख पसरून त्यास घेतले, आपल्या पंखावर वाहते, परमेश्वरच त्यांचा अनन्य नेता झाला. त्याजबरोबर कोणी अन्य दैवत नव्हते.”अनुवाद ३२:९-१२. अशाप्रकारे ख्रिस्ताने त्याना आपल्याकडे ओढून घेतले, अशासाठी की त्यांनी परात्पराच्या सावलीत रहावे. COLMar 214.4
इस्त्राएल लोक रानात भटकत असताना ख्रिस्त त्यांचा पुढारी होता. दिवसा मेघाने आच्छादित अशी सावली व रात्रौ तोच अग्नि स्तंभ प्रकाश देत असे व लोकांना मार्गदर्शक असा होता. त्यानेच लोकांना अरण्यातील संकटांतून बचाव केला, त्याने (परमेश्वर) लोकांना वचनदत्त देशात आणले, अर्थात् परमेश्वराच्या द्राक्षमळयात, इस्त्राएल लोकांना आणले व जी राष्ट्र परमेश्वराला ओळखत नव्हती त्यांच्या समक्ष इस्त्राएलांची वचनदत्त देशात स्थापना केली. COLMar 215.1
या इस्त्राएल लोकांना परमेश्वराने दहा आज्ञा दिल्या. परमेश्वराने इस्त्राएल लोकासभोवार त्याचे नियम, सार्वकालिक सत्य, न्याय व शुध्दता यांचा तट घातला होता. या सर्वांचे आज्ञापालन करणे यातच इस्त्राएल लोकांचे संरक्षण होते. त्यानी जर पापी संवयीचे अनुकरण केले तर त्यांचे संरक्षक न होता, नाश होणार होता. द्राक्षमळयात जसा माळा असतो. तद्वत् परमेश्वराने त्या देशात उपासना मंदिराची उभारणी केली. COLMar 215.2
इस्त्राएल लोकाचा शिक्षक ख्रिस्त होता. जसा तो अरण्यात त्याच्याबरोबर होता. तद्वत तो ख्रिस्त त्यांचा शिक्षक व मार्गदर्शक म्हणून राहणार होता. त्या पवित्रस्थानातील कोश अर्थात् कृपेचे आसन यावर ख्रिस्ताचे गौरवही राहणार होते; तसेच उपासना मंदिरावरही राहणार. इस्त्राएलावर परमेश्वराने त्याची प्रिती व सहनशीलता यांचा वर्षाव सतत करीत राहिला. COLMar 215.3
परमेश्वर त्याचे लोक इस्त्राएल याची सतत स्तुती व गौरव होईल अशी इच्छा करीत राहीला. त्यासाठी परमेश्वराने त्यांना प्रत्येक संधीचा फायदा होऊ दिला. परमेश्वराचे प्रतिनिधी इस्त्राएल लोक होतील यासाठी त्यांना प्राप्त होणारी प्रत्येक संधी देऊन त्यांना चांगले शील होता येईल असेच परमेश्वराने केले उलट अडखळण कधीच केले नाही. COLMar 215.4
इस्त्राएल लोक परमेश्वराचे आज्ञापालन करून त्यांची अद्भुतपणे भरभराट करतील असे सर्व राष्ट्रांना दिसून येईल. ते जे काही ज्ञानी व कर्तबगारीचे काम करतील त्यांना परमेश्वर त्यांचा शिक्षक असा राहून, तो त्यांना उंचावणार पण त्यांनी परमेश्वराच्या आज्ञा पाळणे याद्वारेच हे सर्व काही होणार होते. ते जर आज्ञापालन करीत राहतील तर इतर राष्ट्रांच्या संसर्ग रोगापासून त्यांना सुरक्षित ठेविले जावून त्यांना आशिर्वाद व आरोग्य ही दिली जातील. त्यांच्या जीवनातील जी काही प्रगती व समृध्दी झाली त्यामध्ये परमेश्वराचे गौरव, सामर्थ्य व सत्ता ही प्रगट करावयाची होती. त्यांचे राज्य हे राजे व याजक यांचे असे असावयाचे होते. या पृथ्वीवर इस्त्राएलांचे सर्वश्रेष्ठ राष्ट्र होणे यासाठी परमेश्वराने सर्व काही पुरवठा केला होता. COLMar 215.5
ख्रिस्ताने मोशाच्याद्वारे इस्त्राएल लोकांना हे अगदी स्पष्ट केले होते की त्यांनी परमेश्वराचा हेतु व त्यांच्या समृध्दीचे मर्म लक्षात ठेवावे. परमेश्वर म्हणाला, “कारण तू आपला देव परमेश्वर याची पवित्र प्रजा आहेस; या अखिल पृथ्वीवरील देशांतील लोकांतून तुझा देव परमेश्वर याने तुला निवडून घेतले आहे ते यासाठी की तू त्याची खास प्रजा व्हावे. हयाकरिता हे पक्के समजून घे की तुझा देव परमेश्वर देव आहे. तो सत्यवचनी देव आहे ; जे त्याजवर प्रेम ठेवितात व त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्या हजारों पिढयाबरोबर तो आपला करार पाळन त्याजवर दया करीतो... यास्तव जे धर्मशास्त्र, जे विधी व नियम मी आज तुम्हांस सांगत आहे ते मान्य करून पाळा. तुम्ही हे नियम ऐकून मान्य केले व त्याप्रमाणे चालला तर तुझा देव परमेश्वर तुझ्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार व दयेचे वचन तुझ्या संबंधाने राखील. तो तुजवर प्रेम ठेवील, तुझे अभिष्ट करील, तुला बहुगुणित करील आणि जो देश तुला देण्याविषयी तुझ्या पूर्वजांशी त्याने आणभाक केली त्या दिवशी तो तुझे पोटचे फळ, धान्य, द्राक्षरस व तेल हा तुझ्या भूमीचा उपज आणि तुझ्या गुराढोरांची व शेरडामेढरांची वाढ यासंबंधाने तुला बरकत देईल. तू सर्व देशच्या लोकाहून धन्य होशील.... आणि परमेश्वर तुजपासून सर्व प्रकारचे रोग दूर राखील. मिसर देशातील ज्या व्याधि तुला ठाऊक आहेत, त्यातल्या कोणत्याही तुला लागणार नाहीत, त्या तुझ्या सर्व वैऱ्यास लागतील‘‘ अनुवाद ७ : ६, ९, ११ - १५. COLMar 216.1
जर ते परमेश्वराच्या आज्ञा पाळतील तर परमेश्वर त्यांना उत्तम गह व खडकातील मध ही देऊ करील. दिर्घायुष्य देवून तो त्याचे सांत्वन करील व त्यांना तारण देईल. आदाम हव्वा यांच्या पापामुळे त्यांना एदेन बाग गमवावी लागली. त्याच्या पापामुळे संपूर्ण पृथ्वीवर शाप आला. जर परमेश्वराचे लोक त्याच्या सांगण्याप्रमाणे करतील तर त्यांचा देश समदीने व सौंदर्याने विपुल होईल. त्या जमिनीची मशागत याविषयी खास परमेश्वराने त्यांना सांगितले होते; आणि त्यांनी परमेश्वराचे ऐकून त्याप्रमाणे करावयाचे होते. अशाप्रकारे सर्व देश व प्रदेश परमेश्वराच्या ताब्यात येवून आत्मिक धडा असा होणार होता. त्यांनी निसर्ग नियमाचे जसे आज्ञापालन करावयाचे त्यानुसार वा त्याप्रमाणात पिकांचे उत्पन्न येईल तद्वत् आम्हास माहीत आहेत त्या नितिनियमांचे आपण आज्ञापालन करून परमेश्वराच्या शीलाचे प्रतिबिब पाडणे हे आपले कर्तव्य आहे. जे कोणी जिवंत परमेश्वराची उपासना व सेवा करतात हे विधर्मी लोकांनाही समजून येईल. COLMar 216.2
मोशे म्हणाला, “पाहा, मी आपला देव परमेश्वर याच्या आज्ञेप्रमाणे तुम्हास विधी व नियम शिकविले आहेत ते अशासाठी की ज्या देशाचे वतन पाळण्यास तुम्ही जात आहा त्यात तुम्ही त्याप्रमाणे चालावे. तुम्ही ते मान्य करून पाळावे, कारण तेणेकरून देशोदेशीच्या लोकांच्या दृष्टिसमोर तुमची बुध्दी व समंजसपणा प्रगट होईल; हे सर्व विधी ऐकून ते म्हणतील की हे मोठे राष्ट्र खरोखर बुध्दीमान व समंजस लोकांचे आहे. आमचा देव परमेश्वर याचा आम्ही धावा करीतो तेव्हा तो आमच्या समीप असतो. ज्याचा देव याप्रकारे समीप असतो असे दुसरे मोठे राष्ट्र कोणते आहे ? जे हे नियमशास्त्र मी आज तुम्हास लावून देत आहे त्यातल्यासारखे यथार्थ विधी व नियम ज्याचे आहेत असे दुसरे मोठे राष्ट्र कोणते आहे ?‘‘ अनुवाद ४ : ५-८. COLMar 217.1
परमेश्वराने इस्त्राएल लोकांना जो प्रदेश दिला त्या सर्वात त्यांनी वस्ती करावयाची होती. ज्या राष्ट्रांनी परमेश्वराची उपासना व सेवा करणे नाकारले त्यांना त्या देशातून काढून टाकावयाचे होते. पण परमेश्वराचा हेतु असा होता की इस्त्राएल लोकांनी परमेश्वराचा स्वभाव प्रदर्शित करून त्यांना आकर्षित करावयाचे होते. त्या राष्ट्रापुढे करावयाची अर्पणे याद्वारे ख्रिस्ताला उंचावणे हे करावयाचे होते व जे कोणी ख्रिस्ताकडे पाहतील ते जीवंत राहतील. राहाब, कनानी, मवाबी रूथ हया मूर्तीपूजक होत्या पण त्याचा पालट होऊन त्यांनी खरा परमेश्वर याची उपासना करणे सुरू केले. अशा प्रकारे परमेश्वराचे निवडलेले लोकांशी ते सामील व्हावयाचे होते. ज्या ज्या प्रमाणात इस्त्राएल लोकांची संख्या वाढणार होती तो तो त्यांनी त्यांची सीमा विस्तृत करणे, आणि अशाप्रकारे संपूर्ण जगात इस्त्राएल लोक व परमेश्वराला स्वीकारणारे यांची संख्या वाढणार होती. COLMar 217.2
परमेश्वराची इच्छा होती की, सर्व लोकांना त्याच्या कृपेच्या अधिकाराखाली आणावे. मानवाची उत्पत्ती सुखासाठी केली व स्वर्गीय शांतीने मानवाची अंत:करणे भरणे ही परमेश्वराची आतुरता आहे. या पृथ्वीवरील कुटंबे ही स्वर्गीय कुटुंबाचा नमुना असावी अशी परमेश्वराची इच्छा आहे. COLMar 217.3
पण इस्त्राएल लोकानी परमेश्वराच्या हेतूची पूर्णता केली नाही. परमेश्वराने विदित केले, “मी तर तुला उत्कृष्ट जातीची उत्तम द्राक्षलता अशी लाविली, ती तू माझ्यासमोर परदेशची हीन जातीची द्राक्षलता कशी झालीस ? ‘यिर्मया २:२१. ‘इस्त्राएल उफाटयाने वाढणारा द्राक्षींचा वेल आहे, त्यांस भरपूर फळे येतात‘‘ होशेय १०:१. “तर आता यरूशलेमकरानों व यहुदांतील लोकानो, माझा व माझ्या द्राक्षींच्या मळयाचा न्याय करा बरे. माझ्या द्राक्षीच्या मळयांत मी केले नाही असे अधिक काय करावयाचे राहिले ? तो द्राक्षे देईल म्हणून मी पाहत असता त्याने रानद्राक्षे का दिली ? आता मी आपल्या द्राक्षीच्या मळ्यांचे काय करणार ते तुम्हांस सांगतो. मी त्याचे कुंपण काढून टाकीन म्हणजे तो खाऊन टाकतील; त्याचे आवार मोडीन म्हणजे तो तुडविला जाईल. मी तो उद्ध्वस्त करीन ; त्याला कोणी खच्ची करणार नाही व कुदळणार नाही ; त्यात काटे सराटे उगवतील; त्यावर पाऊस पाडू नका अशी आज्ञा मी मेघास करीन... त्याने न्यायतत्त्वाची अपेक्षा केली तो अवहार ; धार्मिकतेची अपेक्षा केली तो आक्रोश आढळून आला.‘‘ यशया ५ : ३- ७. COLMar 217.4
परमेश्वराने मोशाच्या द्वारे त्याच्या लोकापुढे अविश्वासाचा परिणाम हा दाखवून दिला. परमेश्वराच्या कराराचा नकार करणे यामुळे त्यानी परमेश्वरापासून जीवन सबंध तोडला आणि परमेश्वराचे आशीर्वाद त्यांच्यावर येऊ शकले नाहीत. मोशे म्हणाला, “आपला देव परमेश्वर याला तू विसरू नये; ज्या आज्ञा,नियम व विधी मी आज तुला सांगत आहे त्या पाळावयाचे सोडून देशील तर संभाळ. तू खाऊनपिवून तृप्त होशील आणि चांगली घरे बांधून त्यात राहशील, तुझी गुरेढोरे व शेरडेमेंढरे यांची वृध्दी होईल, तुझे सोनेरूपे व तुझी सर्व मालमत्ता वाढेल, तेव्हा तुझे मन उन्मत होऊन ज्याने तुला दास्यगृहातून मिसर देशातून काढून आणिले तो तुझा देव परमेश्वर याला विसरू नये म्हणून संभाळ... तसेच हे धन माझ्याच सामर्थ्यान व भुजबलाने मला प्राप्त झाले आहे असे तू मनात म्हणू नको... तू आपला देव परमेश्वर यास विसरून इतर देवांच्या मागे लागशील, त्यांची उपासना करशील, त्यांचे भजनपूजन करशील तर तुमचा समूळ नाश होईल; हे मी तुम्हाला प्रतिज्ञापूर्वक सांगतो. तुम्ही आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकणार नाही तर ज्या राष्ट्राचा नाश परमेश्वर तुमच्या देखत करणार आहे त्यांच्याप्रमाणे तुम्हीही नाश पावाल.‘‘ अनुवाद ८:११-१४,१७, १९,२०. COLMar 218.1
इस्त्राएल लोकांनी वरील दिलेला इशारा ऐकला नाही. ते परमेश्वराला विसरले आणि ते परमेश्वराचे प्रतिनिधी ही महान संधी हे ते विसरून गेले. त्यांना जो आशीर्वाद प्राप्त झाला तो आशीर्वाद जगाला आशीर्वाद असा झाला नाही. त्यांना मिळालेली हरएक संधी त्यांनी स्वत:च्या गौरवासाठी वापरली. परमेश्वराने त्यांना जी धार्मिक सेवा करावयास सांगितले होते त्यात त्यांनी परमेश्वराशी चोरी केली अर्थात अंग चोरून घेतले; आणि त्यामुळे धार्मिक मार्गदर्शन व पवित्र उदाहरण वा कित्ता अशाप्रकारे त्यांनी सहबांधवांची चोरी केली. जलप्रलयापूर्वीच्या लोकांप्रमाणे त्यांनी त्यांच्या मनात येईल त्या दृष्ट कल्पनाप्रमाणे केले. अशाप्रकारे त्यांनी पवित्र गोष्टी वा विधी याचे बाबत नाटक केले व म्हणाले, “हे परमेश्वराचे मंदिर, हे परमेश्वराचे मंदिर...... (यिर्मया ७:४), असे म्हणत असताना परमेश्वराच्या स्वभावा विषयी ते खोटे प्रतिनिधीची होते, ते परमेश्वराच्या नामाचा अपमान करीत होते व परमेश्वराचे मंदिर विटाळ वा भ्रष्ट करीत होते. COLMar 218.2
परमेश्वराच्या द्राक्षमळयांतील कामकरी खरे वा विश्वासू नव्हते. शिक्षक व याजक लोकांना खरेपणाने शिक्षण देत नव्हते. परमेश्वराचा चागुलपणा व दया ही लोकापुढे मांडून परमेश्वराची अपेक्षा लोकांनी परमेश्वरावर प्रिती करणे व सेवा करणे हे त्यांनी लोकांपुढे मांडले नाही. द्राक्षमळयांतील कामदार त्यांच्याच सुखात व वैभवाकडे पाहात होते. द्राक्षमळयांत विपुल पीक यावे ही त्यांची अपेक्षा होती. तरीपण त्यांच्याकडे लक्ष वेधले जाईल व त्यांना किती प्राप्ती याकडे त्यांचे लक्ष होते. COLMar 219.1
त्या इस्त्राएल लोकांच्या पुढाऱ्याचे हे सर्वसाधारण लोकांच्या पापासारखे नव्हते. हे इस्त्राएल लोक परमेश्वराच्या गंभीर प्रतिज्ञा खाली होते. “परमेश्वर असे म्हणतो”हे शिक्षण देणे आणि त्यानुसार त्यांनी शिस्तीने आज्ञापालन करणे असे लोकांना शिक्षण देणे अशी त्यांनी आणभाक केली होती. अशाप्रकारे त्यांनी करणे याऐवजी ते उलट शिक्षण देत होते. लोकांच्या जीवनातील प्रत्येक पावलोपावली विधीच्या कार्यभागाचे ओझे लोकावर लादीत होते. लोक अशांत जीवन जगत होते. कारण शास्त्री यांनी जे शिक्षण दिले त्यानुसार लोकांना जीवन जगणे अवघड झाले होते. अशा प्रकारे ते मानवी आज्ञा पाळणे त्यांना अशक्य झाले त्यामुळे ते आज्ञा पाळणे यात निष्काळजी झाले आणि त्याचाच परिणाम ते परमेश्वराच्याही आज्ञा पाळणे यात निष्काळजी झाले. COLMar 219.2
परमेश्वराने त्याच्या लोकांना सांगितले की, परमेश्वर द्राक्षमळयाचा मालक होता आणि त्याने जे काही दिले तोही त्यांना विश्वासु म्हणून वापरणेसाठी दिले होते. पण याजक व शिक्षक त्यांना दिलेले पवित्र कार्य परमेश्वराची मालमत्ता आहे या दृष्टीने काम करीत नव्हते. परमेश्वराच्या कार्याची वाढ यासाठी त्यांना जे काही दिले होते त्या साधनाचा व संधीची ते पध्दतशीर चोरी करीत होते. त्यांचा लोभीपणा व अधाशीपणा यांचा विधर्मी लोकांनाही वीट येण्यास कारण झाले. याप्रकारे विधर्मी जगाला परमेश्वराचे शील व त्याच्या राज्याचे नियम याचे चुकीचे प्रदर्शन झाले. COLMar 219.3
परमेश्वराने पित-हदयाने हे सर्व काही सहन केले. परमेश्वराने त्याची कृपा देऊन व कृपा काढून घेऊनही त्यांना विनवणी केली. परमेश्वराने सहनशीलतेने त्यांची पापे त्याच्यापुढे मांडली. व सहनशीलतेने व धीराने त्यांची वाट पाहत राहिला. त्या द्राक्षमळयातील कामकरी यांच्याकडे संदेष्टे व संदेशवाहक परमेश्वराने पाठविले, परंतु त्यांचे स्वागत करणे ऐवजी त्यांना शत्रुप्रमाणे वागणूक दिली. त्या मालकांनी (नोकरानी) त्यांचा छळ केला व त्यांना ठार केले. परमेश्वराने आणखी दासांना पाठविले. तरी त्या माळी लोकांनी त्या दासांना पहिल्या दासाप्रमाणे वागणुक दिली आणि त्या माळी लोकांनी अधिक द्वेष दर्शविला. COLMar 219.4
अगदी शेवटचा उपाय म्हणून परमेश्वराने, “त्याचा पुत्र पाठविला‘‘ ते माझ्या पुत्राचा मान राखतील पण त्यांचा राग अधिक भडकला ते आपसांत म्हणतो, चला, आपण याला जीवे मारूं, व याचे वतन घेऊ “मग हा द्राक्षमळा आपला होईल, आपण आपल्या मनाप्रमाणे यातील उत्पन्नाचा उपभोग घेऊ. COLMar 220.1
यहुदी पुढारी लोकांनी परमेश्वरावर प्रिती केली नाही; यामुळे ते स्वत:ला परमेश्वरापासून विभक्त करितात व न्यायीपणाच्या ज्या ज्या मागणीचा हक्क होता तो त्यानी धिक्कारला. ख्रिस्त परमेश्वराचा प्रियपुत्र द्राक्षमळयाची मालकी हक्काने मागणी करावयास आला ; पण ते सर्व माळी त्याच्याशी मनात राग धरून म्हणाले, आम्ही त्यास या पत्राला आम्हांवर धनीपणा चालवू देणार नाही. ख्रिस्ताच्या चांगुलपणाच्या स्वभावाचा त्यांना हेवा वाटला : येशूची शिकवण त्याच्याहन अधिक उत्तम प्रतिची होती, येशूचा विजय होणार याचे त्यांना अतिभय वाटले. येशूने त्यांची कानउघडणी केली, त्याचा ढोंगीपणा उघड केला आणि ते जे काही करितात त्याचा निश्चयी परिणाम दाखविला. यामुळे ते सर्व माळी वेडाने भरले. त्याच्यावर जी टीका केली ती सहन न झाली त्यामुळे ते गप्प बसले नाहीत. ख्रिस्ताने त्यांच्यासाठी जो धार्मिकतेचा उच्च दर्जा दिला होता ते त्याचा द्वेष करू लागले त्यानी पाहिले की येशूच्या शिक्षणामुळे त्याचा स्वार्थ उघड होईल यामुळे त्यांनी त्याला (येशू) ठार मारणे हा निश्चय केला. येशूचा खरेपणा, दया येणे व आत्मिक पातळी उंचावणे ही सर्व त्याच्या कृतीत दिसत होती. येशूचे संपूर्ण जीवन त्यांच्या स्वार्थीपणाचा धिक्कार व जेव्हा अखेरची परीक्षा आली ती परीक्षा म्हणजे आज्ञापालन व सार्वकालिक जीवन किंवा आज्ञाभंग व परिणामी सर्वकाळचे मरण अशी होती, त्या लोकांनी इस्त्राएलाचा पवित्र एकमेव याचा नकार केला. जेव्हा त्याना येशू व बरब्बा या दोघांतून निवड करणेस दिले, तेव्हा ते ओरडले, “आम्हांसाठी बरब्बाला सोडून द्या”(लूक २३ : १८) आणि जेव्हा पिलाताने विचारले, तर ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे?‘‘ तेव्हा ते फारच आरडाओरड करून म्हणाले “त्याला वधस्तंभी खिळवावे‘‘ मत्तय २७:२२; आणि जेव्हा पिलाताने विचारले, “मी तुमच्या राजाला वधस्तंभावर खिळावे काय ? मुख्य याजक व वडील लोकांनी उत्तर दिले, “कैसरावाचून आम्हास कोणी राजा नाही‘‘ जेव्हा पिलाताने हात धरून म्हटले, ‘मी या धार्मिक मनुष्याच्या रक्ताविषयी निर्दोष आहे. तेव्हा याजक त्या अज्ञानी लोकसमुदायासाह भावनाप्रधान होवून म्हणाले, त्याचे रक्त आम्हांवर व आमच्या मुलांबाळांवर असो.’ मत्तय २७:२४,२५. COLMar 220.2
यहुदी पुढारी लोकांनी अशाप्रकारे त्यांची निवड प्रदर्शित केली. त्या लोकांचा निश्चय त्या नोंदवहीत नमूद केलेला योहानाने पाहिला आणि ते पुस्तक राजासनावर बसलेला त्याच्या हाती होते, आणि ते पुस्तक कोणालाही उघडता येत नव्हते. यहदा वंशाचा सिंह जेव्हा राजासनावर बसेल, त्यावेळी या पुस्तकास उघडले जाईल व त्यांतील निर्णय पुकारला जाईल. COLMar 221.1
यहूदी लोकांच्या डोक्यांत एक विचार बसला होता की ते स्वर्गीय राज्याचे आवडते लोक आहेत आणि ते परमेश्वराची मंडळी म्हणून सतत उंचावलेले राहतील. ते अब्राहामाचे संतान आहेत आणि त्यांची भरभराट व प्रगती याविषयी त्यांना इतकी खात्री होती. आकाश व पृथ्वी नाहीशी करतील पण त्यांचा हक्क सोडणार नाहीत पण ते त्यांच्या अविश्वासूपणाने ते आकाश व पृथ्वी नाहीशी करून स्वत: परमेश्वरापासून विभक्त करीत होते. COLMar 221.2
हा द्राक्षमळा दाखला याद्वारे ख्रिस्त याजकांच्या दुष्टपणाचे चित्र किती भयानक आहे हे प्रगट करीत होता. येशूने त्यांना एक प्रश्न टाकला, “तर मग द्राक्षमळयाचा धनी येईल तेव्हा तो त्या माळयाचे काय करील?’ याजक तो दाखला काळजीपूर्वक ऐकत होते, आणि त्या दाखल्याची उपमा त्यांना आहे. यांचा विचार न करता लोकसमुदायासह त्यांनी उत्तर दिले; तो त्या दुष्टांचे हालहाल करून त्यांचा नाश करील, आणि जे माळी हंगामी त्याला उत्पन्न देतील अशा दुसऱ्याकडे तो द्राक्षमळा सोपून देईल.‘‘ मत्तय २१ : ४१. COLMar 221.3
अगदी सहजपणे त्यांनी त्यांचा नाश सांगून टाकला. येशूने त्यांच्याकडे निक्षून पाहिले आणि त्यांना समजून आले की, त्यांची अंत:करणे येशूने अगदी सहजपणे वाचली. येशूच्या देवत्त्वाचे सामर्थ्य त्यांच्यावर पूर्णपणे पडले. त्या माळयांनी जे काही केले त्यामध्ये त्यांना स्वत:च्या कार्याचे चित्र दिसले; आणि बोलून चुकले की, “परमेश्वर अशा कृत्त्यांचा धिक्कार करो!‘‘ COLMar 221.4
ख्रिस्ताने गंभीरपणे त्यांना विचारले, “येशू त्यांस म्हणाला, जो धोंडा बांधणाऱ्यांनी नापसंत केला, तोच कोनाशिला झाला, हे प्रभूकडून झाले, आणि हे आमच्या दृष्टीने COLMar 221.5
आश्चर्यकारक कृत्त्य आहे असे शास्त्रांत तुमच्या वाचण्यांत कधी आले नाही काय ? यास्तव मी तुम्हांस सांगतो की देवाचे राज्य तुम्हांपासून काढून घेतले जाईल; व जी प्रजा त्याचे देईल किंवा तिला ते दिले जाईल जो हया धोंडयावर पडेल त्याचा चुराडा होईल परंतु ज्या कोणावर हा पडेल, त्याचा हा भुगाभुगा करून टाकील.’ मत्तय २१:४२-४४. COLMar 221.6
यहुदी राष्ट्राने जर ख्रिस्ताला प्रगट केले असते तर ख्रिस्ताने त्यांच्यावरील संकटही टाळले असते. पण त्यांच्याठायी असलेला द्वेष व हेवादेवा यामुळे ते दुरावले गेले. येशूचा मसीहा म्हणून ते कधीच स्वीकार करणार नव्हते. जगाचा प्रकाश नाकारला त्यामुळे मध्यरात्री जसे काळोख असते अशा प्रकारच्या काळोखांनी त्यांच्या जीवनास घेरिले होते. त्यांची भयानक वासना ही अनावर झाली व त्यामुळे त्याचा नाश झाला. त्यांच्या रागाच्या आधळेपणात त्यांनी एकमेकांचा नाश केला. त्यांचा तो हट्टी, बंडखोर राग यामुळे रोमी सत्तेने त्यांच्यावर विजय मिळविला. यरूशलेमेचा नाश झाला, मंदिराची नासधूस झाली व त्या मंदिराचा संपूर्ण गाभारा शेताप्रमाणे नांगरून टाकला. यहुदाची मुले भयानक प्रकारे मरण पावली. लाखोंची गुलाम म्हणून विक्री झाली व त्यांच्यापासून द्राक्षमळा काढून घेतला. त्यांना दिलेली संधी याचा त्यांनी दुरूपयोग केला; कामाची हेळसांड केली त्यामुळे ते काम इतरांनी करावे म्हणून त्यांच्यावर जबाबदारी दिली. COLMar 222.1