Go to full page →

पवित्र आत्म्याची दाने वा देणगी COLMar 246

ख्रिस्त त्याच्या मंडळींना जी दाने देतो, विशेषत: आशीर्वाद व देणग्या देतो ही सर्व पवित्र आत्म्याद्वारे दिली जातात. “एकाला आत्म्याच्याद्वारे ज्ञानाची शक्ति मिळते, एकाला त्याच आत्म्यानुसार विद्येची शक्ति ; एकाला त्याच आत्म्यांत विश्वास ; एकाला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने; एकाला अद्भुत कार्ये करावयाची शक्ति; एकाला संदेशशक्ति; एकाला आत्मे ओळखण्याची शक्ति; एकाला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ति; व एकाला भाषांचा अर्थ सांग सांगण्याची शक्ति मिळते, तरी ही सर्व कार्ये तोच एक आत्मा करितो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो‘‘ १ करिंथ १२:८-१२. सर्व मनुष्यांना एकच देणगी दिली जात नाही; पण प्रभुजी त्याच्या प्रत्येक सेवकाला वचनानुसार पवित्र आत्म्याची एकतरी देणगी देतो. COLMar 246.4

ख्रिस्त त्याच्या शिष्यांना सोडून जाणेपूर्वी, “ख्रिस्ताने त्याजवर फुकर टाकिला, आणि त्यास म्हणाले, पवित्र आत्मा घ्या‘‘ योहान २०:२२. पुनः ख्रिस्त म्हणाला, पाहा माझ्या पित्याचे वचन दिलेली देणगी मी तुम्हांकडे पाठवितो;’ लूक २४:४९. परंतु येशूचे स्वर्गारोहण झाले नाही तोवर त्याच्यावर पवित्र आत्मा पूर्णपणे आला नव्हता. जोवर शिष्यांनी प्रार्थना व विश्वास याद्वारे प्रभुसेवेला समर्पण केले नव्हते तोवर पवित्र आत्मा त्यांच्यावर आला नव्हता. त्यानंतर खास प्रभावाने स्वर्गीय भांडारातील साहाय्य ख्रिस्ताचे अनुयायी यांना देण्यात आले. “त्याने उच्चस्थानी आरोहन केले तेव्हा त्याने कैद्याना कैद करून नेले, आणि मनुष्यांस दाने दिली, तरी आपल्या प्रत्येकास ख्रिस्ताने दिलेल्या दानाच्या परिमाणाप्रमाणे कृपा दिली आहे. इफिस ४:८,७. “तरी ही सर्व कार्ये तोच एक आत्मा करितो. तो (ख्रिस्त) आपल्या ईच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो.”(१ करिंथ १२:११). या सर्व देणग्या आम्हास ख्रिस्तांत आमच्याच झालेल्या आहेत, पण ज्या प्रमाणांत आपण पवित्र आत्म्याला स्वीकारू त्या प्रमाणात त्या आपल्या होतील. COLMar 247.1

पवित्र आत्म्याच्या अभिवचनाचा जसा स्वीकार करावयास पाहिजे तसा केलेला नाही. पवित्र आत्म्याची परिपूर्णता म्हणावी तशी समजली नाही. पवित्र आत्म्याची गैरहजेरी त्यामुळे सवार्ता कार्य इतके सामर्थ्यहीन आहे. शिक्षण घेणे, कलाकृती, भाषावक्तृत्त्व, प्रत्येक उपजत कला वा प्रशिक्षण, कला ही संपादन करिता येते. परंत् परमेश्वराच्या आत्म्याच्या सामर्थ्याशिवाय कोणत्याही मनाचा पालट होवून कोणीही पापी ख्रिस्ताकडे वळला जाणार नाही वा जिंकला जाणार नाही. दुसरी बाजू पाहता जर त्या मानवाचा परमेश्वराशी संबंध जोडला गेला जर त्यांना पवित्र आत्म्याची देणगी प्राप्त झाली, तर अगदी अडाणी व दरिद्री असा ख्रिस्ताचा शिष्य असेल त्या शिष्याच्या संदेशाचा लोकांच्या अंत:करणावर परिणाम होईल. परमेश्वर अशा आत्म्याने प्रेरित झालेला शिष्य परमेश्वराच्या ज्ञानाचा प्रवाह व प्रभाव याचा पगडा लोकांवर पाडितो.” COLMar 247.2