पवित्र आत्म्याची दाने वा देणगी जी या दाखल्यात सांगितलेली आहेत, तेवढीच आहेत असे नाही. तर जी काही दाने वा देणग्या मग त्या उपजत असोत वा संपादन केलेल्या असोत, नैसर्गिक असोत वा आध्यात्मिक असोत या सर्व देणग्या पवित्र आत्मा देतो. या सर्व देणगींचा ख्रिस्ताच्या सेवेसाठी उपयोग करणे आहे. आम्ही ख्रिस्ताचे शिष्य होतो म्हणजे आमचे जे काही आहे ते सर्वस्वी आम्ही त्याच्या सेवेसाठी वाहून देतो. आम्ही जर असे केले तर आमच्या सर्व देणग्या ख्रिस्त शुध्द व कर्तबगार करून आम्हास त्या परत देतो यासाठी की त्या देणगीच्या द्वारे ख्रिस्ताचे गौरव व्हावे व आमच्या सहमानवांना त्यांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा. COLMar 247.3
प्रत्येक मनुष्याला परमेश्वर।ने देणगी त्याच्या कर्तबगारीच्या प्रमाणात दिली आहे. या देणग्या त्यांच्या श्रध्दाप्रमाणे देण्यात आल्या नाहीत. ज्याला पाच दानांची कर्तबगारी आहे त्याला पाच दाने दिली आहेत. ज्याला दोन दानांची वाढ करिता येते त्याला दोन दाने दिली. जो कोणी एकच दानाचा शहाणपणाने उपयोग करू शकतो त्याला एकच दान दिले. आपल्याला जादा देणग्या दिल्या नाहीत म्हणून कोणीही दुःख करीत बसू नये ; ज्याने त्या त्या मनुष्याला देणग्या दिल्या आहेत त्याचा उपयोग करणे यावर त्याचा सन्मान केला जाईल मग ती देणगी महान वा लहान असो. ज्याला पाच दाने दिली आहेत त्याने पाच दानांचा उपयोग करणे. ज्याला एक देणगी त्याने एका देणगीची वाढ वा उपयोग करणे. ‘ज्या जवळ असेल तसे ते मान्य होते, जे नसेल त्याप्रमाणे नाही’ अशी परमेश्वराची अपेक्षा आहे (२ करिंथ ८:१२). COLMar 248.1
या दाखल्यात ‘ज्याला पाच हजार मिळाले होते त्याने लागलेच जावून त्यावर व्यापार केला व आणखी पाच हजार मिळविले. तसेच ज्याला दोन हजार मिळाले होते त्यानेही आणखी दोन हजार मिळविले‘‘ (मत्तय २५:१६,१७). COLMar 248.2
जे दान दिले होते ते थोडे होते पण त्यांचा उपयोग करणे हे महत्त्वाचे होते. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मला किती मोठी देणगी मिळाली. हा नव्हता ? परंतु मला जे काही मिळाले त्याचा मी काय उपयोग करीत आहे? आम्हास जे जे दान वा सामर्थ्य दिले आहे त्याचा परमेश्वर व आपले सहमानव यांच्यासाठी उपयोग करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. जो कोणी दररोज त्याला दिलेली देणगी यांचा चांगला उपयोग करणे यात वाढत नाही तो, परमेश्वराने दिलेले दान वा देणगी यांचा हेतू पूर्ण करीत नाही. आम्ही ख्रिस्ताचे कामदार होणे व विश्वासाची साक्ष देणे हे ध्येय ठरविले असता, आम्ही पराकाष्ठा करून कर्तबगार व पूर्ण कामदार होणे यासाठी तेणेकरून आम्हांस चांगले व सर्वश्रेष्ठ कार्य करिता यावे. COLMar 248.3
परमेश्वराने आम्हांसाठी महान कार्य करावयास दिले आहे आणि जे कोणी या जीवनात विश्वासूपणे व स्वखुशीने सेवा करतील त्यांच्यासाठी भावी जीवनात सुख देईल. परमेश्वर त्याच्या लोकांची स्वतः निवड करितो, आणि प्रिती दिली त्यांच्या जीवनासाठी असणारी योजना यासाठी प्रत्येक परिस्थितीत वेगवेगळया परीक्षांची निवड करीतो. या प्रत्येक योजनेत परमेश्वर त्याच्या खऱ्या अंत:करणाने त्याची योजना पूर्ण करू पाहातो तो प्रत्येक कामदाराची निवड ते पूर्ण आहेत म्हणून करीत नाही तर परीक्षाद्वारे त्यांच्याबरोबर राहून त्यांना पूर्ण करितो. COLMar 248.4
जे कोणी उच्च ध्येय ठेवितात त्यांचाच परमेश्वर स्वीकार करतो. परमेश्वर प्रत्येक कामदाराने त्याची पराकाष्ठा करावी अशा परिस्थितीत त्याना ठेवितो. त्या प्रत्येक कामदाराने आध्यात्मिक पूर्णता हे ध्येय गाठावे हे अवश्य आहे. आम्ही धार्मिकेचा दर्जा केव्हा कमी करू नये; व आमच्यातील चुकीचे करणे ही प्रवृत्ती हिला बळी पडू नये. आम्हास हे समजले पाहिजे की अपूर्ण व अधार्मिक शील हे पाप आहे. सर्व धार्मिक गुणाचा उगम परमेश्वर आहे, परमेश्वर हा परिपूर्ण, संपूर्ण व सुसंगत कार्य करितो व जो कोणी ख्रिस्ताचा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार करितो त्याला परमेश्वराच्या गुणाचा सहभागीपणा प्राप्त होतो. COLMar 249.1
आणि जे कोणी ख्रिस्ताचे सहकामदार होऊ पाहतात त्यानी पूर्ण शरीर व मन सुध्दा कसलेले व संस्कत करावे. खरे शिक्षण म्हणजे शारीरिक, बौध्दीक व आध्यात्मिक शक्तिंची तयारी करणे म्हणजे प्रत्येक कार्य कर्तबगारीने करीता येईल. ते शिक्षण म्हणजे शरीर, मन व आत्मा यांना प्रशिक्षण देणे म्हणजे परमेश्वराची सेवा करणे सोपे जाईल. हेच शिक्षण आतापासून सर्वकाळ टिकून राहणेस मदत करील. COLMar 249.2
परमेश्वर।ची अपेक्षा आहे की प्रत्येक कार्यात कर्तबगारी व कुशाग्रता ही दाखवावी. ख्रिस्ताने आम्हासाठी वेतन दिले आहे. ख्रिस्ताने स्वत:चे रक्त व त्रास सहन केली यासाठी की आम्ही त्याची सेवा स्वईच्छेने करावी. येशू या जगात आला आणि आम्ही कसे काम करावे याचा कित्ता घालून दिला आणि आपले काम करीत असता आपली वृत्ती कशी असावी हे ही दाखवून दिले. येशूची ईच्छा आहे की आम्ही कसे काम करावे व कामाची वृध्दी कशी करावी, या जगात परमेश्वराच्या नामाचे गौरव कसे काय करावे व कामाची वृध्दी कशी करावी, या जगात परमेश्वराच्या नामाचे गौरव कसे काय करावे ? त्याचा सन्मान करणे, त्याजवर महान प्रिती करून व जीवन समर्पण करून त्याला सन्माननीय मुकुट घालणे या सर्वांचा अभ्यास करणे कारण आपल्या स्वर्गीय पित्याने एवढी प्रिती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याजवर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे‘‘ योहान ३:१६. COLMar 249.3
ख्रिस्ताने हे ही सांगितले की पूर्ण शील प्राप्त करून घेणे हे सोपे काम नाही. उदात्त व पूर्ण शील हे वंशपरंपरेने प्राप्त होत नाही. हे शील काय अचानक मिळत नाही. तर हे उदात्त शील ख्रिस्ताच्या कृपेने व त्याच्या गुणांचा सहभागीपणा वैयक्तिक प्रयत्नाने प्राप्त होते. परमेश्वर आम्हास देणगी व मनाची शक्ति ही देतो, आणि शीलसंवर्धन हे आम्ही तयार करितो. हे शील संवर्धन तयार करणे यासाठी आपल्याला ‘स्व’ बरोबर निकराचा लढा द्यावा लागतो. आपल्या जीवनातील समस्यामागे समस्या आहेत. त्यांना तोंड लागते. आम्ही स्वत:वर कडक टीका करून जीवनात एकही दोष दुरूस्त न करिता ठेवू नये. COLMar 249.4
माझ्या स्वभावातील दोष मला काढता येत नाहीत असे कोणीही म्हणू नये. जर तुम्ही अशा निर्णयास पोहंचाल तर तुम्ही खात्रीपूर्वक सार्वकालिक जीवनास मुकाल. ही अशक्यता तुमच्या ईच्छा शक्तीत आहे. जर तुमची इच्छा नसेल तर तुम्ही तुमच्या सवयींवर जय मिळविणार नाही. खरी अडचण उद्भवते ती अपवित्रीकरण झालेले अंत:करण त्यातून भ्रष्टाचार उद्भवतो आणि परमेश्वराच्या ईच्छेला शरण न जाणे अशी मनोवृत्ती असणे त्यामुळे परमेश्वरापासून जीवनावर अधिकार प्राप्त होत नाही. COLMar 250.1
परमेश्वराने पुष्कळांना त्याची महान व कार्य सेवा करावयास कर्तबगार केले पण ते थोडा प्रयत्न करितात म्हणून थोडेसे कार्य होते. हजारोंजण त्यांच्या जीवनात एकही ठराविक योजना नाही व जीवनाचा उच्च दर्जा गाठणे असे ध्येय नाही व जीवनाचा उच्च दर्जा गाठणे असे ध्येय नाही त्यामुळे ते लोक ध्येयविना जीवन जगतात. अशा लोकांना मिळणारे वेतन त्याच्या कार्याच्या प्रमाणात दिले जाईल. COLMar 250.2
तुम्ही तुमच्या जीवनात जितके उच्च ध्येय ठेवाल तद्वत तुम्ही जीवन मार्ग क्रमित राहाल. तुम्ही हे लक्षात ठेवावे. तेव्हा, तुम्ही तुमचे ध्येय उच्च ठेवा आणि क्रमाक्रमाने मग तुम्हाला कितीही त्रास झाला तरी हरकत नाही, स्वार्थत्याग करीत, तुमच्या जीवनांतील प्रगतीची शिडी चढत राहा. यासाठी तुमच्या जीवनात कशाचाही अडथळा न येवो. मानवी जीवन इतके दुर्देवी नाही की त्यातील गुंतागुतीतून मानवाला निघता येत नाही म्हणून हताश होवून सर्व अशक्य असे म्हणत बसणे. आपल्या जीवनात जर विरोधक परिस्थिती निर्माण झाली असेल तर त्यावर आपण जय मिळविणे असा निश्चय करणे. जीवनातील एक अडखळणावर तुम्ही जय मिळविला तर पुढे जाणेस धैर्य व कर्तबगारी प्राप्त होते. निश्चयाने व योग्य मार्गाने पुढे चला आणि पुढे येणारी परिस्थिती ही तुम्हास साहाय्यक होईल, अडखळण होणार नाही. COLMar 250.3
प्रभुचे गौरव करणे हे ध्येय ठेवा व त्यासाठी उत्तम प्रकारचे संवर्धन करा. तुमच्या शील संवर्धनातील प्रत्येक गुणात तुम्ही परमेश्वराचे गौरव व पसती ही करणे तुम्ही अशा प्रकारे परमेश्वराला संतोष द्याल; कारण हनोखाने त्या काळातील दुष्ट पिढीत राहात असताना त्याने परमेश्वराला संतोष होईल असे धार्मिक जीवन जगला आणि अशा प्रकारे धार्मिक जीवन जगणारे हनोख आमच्या काळात राहात आहोत. COLMar 250.4
दानीएलाप्रमाणे खंबीर उभे राहा, तो विश्वासु राज्यकर्ता, त्या मनुष्याला कोणत्याही मोहाने भ्रष्ट केले नाही. ज्याने तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून ज्याने त्याचा जीव तुमच्यासाठी दिला व तुम्हांवर प्रिती दर्शविली त्याला तुम्ही निराश करू नका. तो (येशू) म्हणतो... मजपासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करिता येत नाही. योहान १५:५ याचे स्मरण ठेवावे. जर तुम्ही चुका केल्या असतील तर त्या चुका म्हणजे इशारा समजणे म्हणजे तुम्हाला विजय प्राप्त होईल. अशा प्रकारे तुमचा पराभव याचे रूपांतर विजयात होईल, तुमच्या शत्रुची निराशा होईल आणि तुम्ही तुमचा तारणारा याचा सन्मान कराल. COLMar 250.5
आपले शील जेव्हा परमेश्वराच्या नमुन्याप्रमाणे होईल, तेच शीलरूपी धन या पृथ्वीवरून नवीन पृथ्वीवर नेता येईल. जे कोणी या जगात ख्रिस्ताच्या शिक्षणानुसार चालतील त्यांचे शील त्यानुसार घडविले जाईल व ते शील स्वर्गीय महालात घेवून जातील. आम्ही स्वर्गात गेलो म्हणजे तेथे सतत शीलाची वाढ करीत राहाणे मग या जगात असताना आपल्या शीलाची वाढ करणे किती महत्त्वाचे आहे. COLMar 251.1
मानवी शील परिपूर्ण व्हावे यासाठी स्वर्गीय देवदूत मानवास साहाय्य करतील तेव्हा आम्ही विश्वासाने शीलाच्या पूर्णतेसाठी कार्य करावे. जो कोणी अशा प्रकारे परिपूर्ण शील व्हावे म्हणून वागणेचा प्रयत्न करतील त्यांना ख्रिस्त म्हणतो मी तुमच्या मदतीसाठी उजव्या हाताला उभा आहे. COLMar 251.2
जशी मानवी इच्छा ही परमेश्वराच्या इच्छेशी साहाय्यक वा आज्ञाधारक होते तेव्हा ती ईच्छा सामर्थ्यवान होते आणि परमेश्वर जे काही करावयास आज्ञा करील ते करावयास तो परमेश्वर शक्ति पुरवितो. परमेश्वर जे काही सांगतो ते पाळावयास कर्तबगार करितो. COLMar 251.3