आम्ही परमेश्वरावर प्रिती करावी, आपल्या संपूर्ण अंत:करणाने, मनाने, आत्म्याने परंतु आपल्या सर्व शक्तिने प्रिती करावी. यामध्ये सर्व बुद्धिसामर्थ्याचा व शारीरिक शक्तिचाही समावेश आहे. COLMar 265.1
ख्रिस्त हा ऐहिक आध्यात्मिक गोष्टी करणे याबाबत खरा कामदार होता आणि तो जे काही करीत असे ते सर्व स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे करीत असे. या पृथ्वीवरील व स्वर्गीय गोष्टींचा संबंध आहे आणि त्या सर्व ख्रिस्ताच्या प्रत्यक्ष ख्रिस्ताच्या देखरेखीखाली आहेत, याची पुष्कळांना माहिती नाही. या पृथ्वीवर प्रथम निवास मंडप असावा ही योजना प्रथमत: ख्रिस्ताने योजिली. शलमोन राजाने जे भव्य -सुंदर मंदिर बांधले त्याची संपूर्ण माहिती ख्रिस्ताने दिली. जो येशू या पृथ्वीवर असताना नासरेथ खेडे गावी सुतार कामात लक्ष घातले त्याने स्वर्गीय कारागीर म्हणून पवित्रस्थानाची योजना आखली कारण त्या मंदिरास येशूचे सन्मानीय नाव देण्यात येणार होते. COLMar 265.2
निवास मंडपाच्या बांधकामासाठी कामदारांना ख्रिस्ताने ज्ञान दिले, त्यामुळे त्यांना कला कौशल्याचे व फार कसबाचे काम करता आले. ख्रिस्त म्हणाला, “पाहा, मी यहुदावंशातील उरीचा पुत्र व हुराचा नातू बसालेला याला नाव घेऊन बोलाविले आहे ; देवाच्या आत्म्याने मी त्यास परिपूर्ण करून अक्कल, बुद्धि, ज्ञान आणि सर्व त-हेचे कसब ही दिली आहेत, तो कलाकुसरीची कामे करील... आणि पाहा त्याच्या जोडीस मी दानवशातील अहिसामाखाचा पुत्र अहलीयाब यास नेमिले आहे; एवढेच नव्हे तर जितके म्हणून बुद्धिमान आहेत त्या सर्वांच्या हृदयांत मी बुद्धि ठेविली आहे, ती यासाठी की ज्या ज्या गोष्टी संबंधाने मी तुला आज्ञा केली आहे त्या त्या सर्व त्यांनी कराव्या.’ निर्गम ३१:२-६. COLMar 265.3
परमेश्वराची ईच्छा आहे की प्रत्येक धंदयातील त्याच्या कामदारांनी परमेश्वर हा सर्व कला व ज्ञान देणारा आहे असे समजावे. सर्व योग्य संशोधन व सुधारणा यांचे उगमस्थान जो ख्रिस्त अद्भुत सल्लागार व सर्वोत्तम कारागीर हाच आहे. डॉक्टराच्या कौशल्यपूर्ण हस्तस्पर्श, आपल्या मज्जासंस्था व स्नायुसंस्था यावर त्याची सत्ता आहे, आपल्या शरीराच्या नाजुक अवयवाचे त्याला ज्ञान आहे, हे ज्ञान ईश्वरी सामर्थ्याचे आहे, या सर्वाचा उपयोग जे लोक त्रासात आहेत त्यांच्यासाठी व्हावे. सुतार ज्या कौशल्याने त्याची हातोडी वापरून लाकडावर नक्शीकाम करितो व ज्या शक्तिने लोहार त्याचा हातोडा वापरून ऐरणीवर लोखंडाचे हत्यार करितो; हया सर्व कला व शक्ति परमेश्वरापासून प्राप्त होतात. परमेश्वराने मानवास सर्व कला वा दाने याचा विश्वस्त नेमिले आहे आणि त्यांचा कसा काय उपयोग करावा याविषयी परमेश्वराचा सल्ला घेतला पाहिजे. आम्ही जे काही कार्य करू व त्या कार्यासाठी आम्हास कोणत्याही खात्यात कामासाठी नेमिले; त्यावेळी आपण आपल्या मनावर ताबा ठेवावा व आम्ही आपले कार्य पूर्ण करावे. COLMar 265.4
धर्म व व्यवहार हे वेगवेगळे नाहीत; ते दोन्ही एक आहेत. आम्ही जे काही बोलू वा कार्य करू त्या सर्वांत पवित्रशास्त्राचा धर्म हा विणला पाहिजे. ऐहिक व आध्यात्मिक कार्ये साधने यासाठी ईश्वरी व मानवी साधनांचा उपयोग करणे. या सर्वाची एक्यता करून मानवी उध्दार करणे मग तो शेती उद्योग वा यांत्रिक उद्योग, व्यापार व शास्त्रीय संशोधन असो. या सर्वांत सहकार असला पाहिजे व त्याद्वारे ख्रिस्ती कार्ये याचा समावेश केला पाहिजे. COLMar 266.1
परमेश्वराने सांगितलेले हे तत्त्वज्ञान केवळ सहकारावरच अवलंबून आहे. जे कोणी परमेश्वराबरोबर सहकामदार आहेत त्यांचे ध्येय परमेश्वराचे गौरव करणे हे असावे. परमेश्वरावरील प्रिती या हेतूने आपले सर्व काम करावे व त्या सर्व कामात परमेश्वराची इच्छा मान्य करणे. COLMar 266.2
एखादी इमारत बांधणे वा धार्मिक विधीत भाग घेणे ही दोन्ही समान महत्त्वाची समजणे. जर एका कामदाराने त्याच्या शीलसंवर्धनात योग्य तत्त्वे आणली असतील मग त्यानंतर ते ज्या ज्या इमारतीचे बांधकाम करतील तेव्हा ते कृपा व ज्ञान यात वाढतील. COLMar 266.3
परमेश्वराच्या वेदीवर सजीव, स्व वा स्वार्थ जर अर्पण करीत नाही. तर परमेश्वर आपली सर्वश्रेष्ठ सेवा वा सर्वश्रेष्ठ दाने यांचा स्वीकार करणार नाही. आपल्या जीवनाचे मूळ हे पवित्र पाहिजे नाहीतर झाडाला लागणारी फळे यांचा परमेश्वर स्वीकार करणार नाही. COLMar 266.4
परमेश्वराने दानीएल व योसेफ यांना शूर व्यवस्थापक केले. ते स्वत:च्या ईच्छेप्रमाणे करणे नव्हे तर परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करणे अशा प्रकारे कार्य करीत होते म्हणून परमेश्वराने त्याचा उपयोग केला. COLMar 266.5
दानीएलाचे उदाहरण हा आपणासाठी धडा आहे. यावरून दिसते की व्यवहार करणे म्हणजे केवळ कायदे ज्ञान आहे असे नव्हे, तर प्रत्येक वेळी परमेश्वराचे ज्ञान काय आहे हे त्याने समजून घेतले. दानीएल हा त्यावेळी बाबेलोनचा पंतप्रधान असताना, तो परमेश्वराचा संदेष्टा होता, त्याला स्वर्गीय ज्ञान प्रकाशाची प्रेरणा प्राप्त होत होती. राजकारणी पुरूष जागतिक व महत्त्वाकांक्षी यांची तुलना पवित्रशास्त्रात जे गवत व फुल उगवते व ऊन लागताच वाळून जाते त्याचप्रमाणे आहे. तरी परमेश्वराची इच्छा आहे की त्याच्या सेवेत द्धिमान व वेगवेगळया क्षेत्रात कार्य करण्यास पदवीधर मनुष्ये पाहिजेत. व्यवहारदक्ष मनुष्याची गरज आहे अशी माणसे सर्व सत्य तत्त्वे त्याच्या व्यवहारात गुंफून टाकतील आणि त्यांच्या बुध्दीचातुर्याला शिक्षण व प्रशिक्षणाची भर घालून पूर्णता आणली पाहिजे. जर का सध्या मानवास कोणत्या क्षेत्रात प्रगती करणे असून ज्ञानी व कर्तबगार व्हावयाचे असेल तर जे कोणी या जगात परमेश्वराच्या राज्याची वाढ व्हावी असे वाटत असेल या क्षेत्रात ज्ञान, शिक्षण व प्रशिक्षणाची गरज आहे. जेव्हा दानिएलाच्या सर्व कारभाराची परीक्षा घेतली वा तपासणी केली तेव्हा त्याच्या कारभारात एकही चूक वा दोष सापडला नाही. प्रत्येक व्यापारी धदेवाईक माणसाने त्यांच्या कारभारात कसे असावे याचा नमुना दानीएल होता. दानीएलाच्या इतिहासावरून असे दिसते की आम्ही आपली बुद्धि, हाडे व स्नायू व अंत:करण व जीवन परमेश्वराच्या सेवेसाठी समर्पण करावे. COLMar 266.6