परमेश्वराने मानवाच्या स्वाधीन धन व सामर्थ्य ही विश्वासाने केली आहेत. मानवाने धन प्राप्त करावे म्हणून त्यास समर्थ केले आहे. परमेश्वर पृथ्वीवर आकाशातून दंव व पावसाचा वर्षाव करितो. परमेश्वर सूर्य प्रकाश पाडितो त्यामुळे पृथ्वीला उब येते, सर्व निसर्गातील जीवना जाग येते, फुले उमलतात व फळांची रेलचेल होते. आणि त्यानंतर परमेश्वर म्हणतो मी मानवास दिले त्यातून मलाही परत द्यावे. COLMar 267.1
आमचे पैसे आम्ही केवळ आमचा सन्मान व गौरव यासाठीच खर्च करावेत यासाठी दिलेले नाहीत. विश्वासु कारभारी म्हणून आम्ही या पैशाचा उपयोग परमेश्वराचा सन्मान व गौरव यासाठी करणे. काहीना असे वाटते की परमेश्वराने जे दिले त्यापैकी काही भाग हा परमेश्वराचा आहे. जेव्हा परमेश्वराचा भाग धार्मिक व धर्मदाय सेवेसाठी दिला जातो; त्यानंतर राहिलेला भाग ते त्यांच्या स्वत:साठी आणि त्यांच्या मर्जीप्रमाणे ते वापरू शकतात. पण असे करणे यात ते चुक करितात. आमचे सर्व जे काही असेल ते परमेश्वराचे आहे आणि आम्ही त्याचा कसा काय उपयोग करितो याचा आम्हांस हिशोब देणे आहे. जो खर्च केलेला प्रत्येक पैसा त्याविषयी परमेश्वर पाहणार की त्या पैशाच्या खर्चात आम्ही सर्वश्रेष्ठ प्रिती परमेश्वरावर केली काय आणि आमच्या शेजाऱ्यावरही प्रिती केली काय? COLMar 267.2
पैशाला फार मोल आहे कारण पैशामुळे फार चांगले कार्य करिता येते. परमेश्वराच्या लेकराच्या हाती असलेला पैसा म्हणजे भुकेले त्यांच्यासाठी अन्न, तान्हेलेले त्यांच्यासाठी पाणी, उघडे असतील त्यांना पांघरूण-वस्त्र असे आहे. गांजलेले त्यांची सुटका करणे ; आजाऱ्यांना मदतीची साधने देणे. तसा पैसा पाहू जाता त्याला वाळपेक्षा महत्त्व नाही परंतु जेव्हा तोच पैसा जीवनाच्या गरजा पुरविणेसाठी उपयोगात आणिला जातो वा दिला जातो तेव्हा तो पैसा इतरांना आशीर्वाद होतो व परमेश्वराच्या कार्याची वाढ व ख्रिस्ताच्या राज्याची प्रगती होते. COLMar 268.1
संपत्तीचा साठा यामुळे हा निरूपयोगी व तो एक शाप आहे. संपत्तीचा साठा हा, या जीवनात जीवाला सापळा आहे, यामुळे आपले लक्ष स्वर्गीय संपत्तीकडे लागणे त्याऐवजी जगिक संपत्तीकडे लागते. परमेश्वराच्या न्यायनिवाडा दिवशी ज्यानी असा संपत्तीचा साठा केला तो साठा करणारे त्यांच्या विरूध्द साक्ष देईल. त्या श्रीमंतांनी त्यांच्या दानाचा व संपत्तीचा उपयोग केला नाही. पवित्रशास्त्र सांगते, “अहो धनवानांनो, जे कष्ट तुम्हांला होणार त्याविषयी आक्रोश करीत रहा. तुमचे धन नासले आहे, व तुमच्या वस्त्राला कसर लागली आहे. तुमचे सोने व तुमचे रूपें यास जग चढला आहे. त्याचा तो जग तुम्हाविरूध्द साक्ष होईल, आणि तो ‘अग्नी’ सारखा तुमचा देह खाईल. तुमचे धन साठविणे, शेवटल्या दिवसात झाले, पाहा, ज्या कामकऱ्यांनी तुमची शेते, कापिली आहेत त्यांची तुम्ही अडकवून ठेविलेली ‘मजुरी ओरडत आहे, आणि कापणाऱ्यांच्या आरोळया’ सेनाधीश प्रभुच्या कानी’ गेल्या आहेत‘. याकोब ५:१-५. COLMar 268.2
आपल्या सर्व साधनांचा उपयोग निष्काळजीपणे वा उधळपट्टी असा करू नये अशा प्रकारास ख्रिस्त अनुमती देत नाही. काटकसर याविषयी ख्रिस्त आम्हास धडा देतो, “ते जेऊन तृप्त झाल्यावर त्याने आपल्या शिष्यांस सांगितले, काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा मग जेवणाऱ्यांस पुरे झाल्यावर जवाच्या पाच भाकरीपैकी उरलेले तुकडे त्यांनी गोळा केले; त्या तुकडयांनी बारा टोपल्या भरल्या‘‘ (योहान ६१२, १३). पैसा वा धन हे परमेश्वराचे दान आहे असे जो समजेल तो त्या पैशाचा वा धनाचा काटकसरीने उपयोग करील आणि बचत करणे हे कर्तव्य समजून बचत करील यासाठी की त्याला देतो येणे हे ही कर्तव्य आहे. COLMar 268.3
जो जो आपण जादा पैसे आपल्या स्वत:चा पोषाख व चैनीसाठी खर्च करू तो तो आपणांस भुकेलेले यांना अन्न व उघडे यांना वस्त्र देणेसाठी पैसे कमी असतील. आम्ही गरज नसताना खर्च केलेला पैसा त्यामुळे आम्ही चांगले करणे या कामाची संधी गमावून टाकतो. परमेश्वराने आम्हांस त्याचा विश्वासू कारभारी म्हणून ज्या COLMar 268.4
दानाचा उपयोग चांगल्याप्रकारे करून परमेश्वराचे गौरव व सन्मान करणे अशा असगांची आपण चोरी करीत आहोत. COLMar 269.1