Go to full page →

दयाळु कृत्ये व प्रिती COLMar 269

दयाळ कृत्ये, उदार मनोवृत्ती व आध्यात्मिक गोष्टींची आकलनशक्ति ही सर्व मौल्यवान दाने आहेत, आणि अशी दाने आहेत त्याजवर मोठी जबाबदारी आहे. या सर्व देणगीचा परमेश्वराच्या सेवेसाठी उपयोग करणे. पण याबाबत पुष्कळजण चुका करितात. या देणगीबाबत समाधान मानून त्यांचा उपयोग इतरांच्या सेवेसाठी करीत नाही. हा त्यांचा पराभव आहे. जर त्यांना संधी प्राप्त झाली, तर परिस्थितीने साथ दिली तर ते चागले व महान कार्य करू शकतील. ते केवळ अशा संधीची वाट पाहत थांबतात. ते लोक गरजु व दरिद्री लोकांची विनंती नाकारतात. ते केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी जगतात व त्यांच्या देणगीचा दुरूपयोग याविषयी ते स्वत: जबाबदार आहेत. असे असूनही ते स्वत:ला चांगले समजतात व इतरांना ते त्यांच्याठायी गुणवत्ता असून उपयोग करीत नाहीत म्हणून त्यांच्यावरील जबाबदारी जादा वाढते. अशा लोकांजवळ जादा श्रध्दा असते म्हणून त्यांची जादा जबाबदारी परमेश्वर व त्यांचे गरजु मित्र व जे कोणी गरजु आहेत त्याच्याविषयीची आहे, म्हणून त्यानी मदत करणे हे कर्तव्य आहे. सामाजिक देणगी यांचा उपयोग त्यांच्या संबंधात जे कोणी येतील त्याना मदत करणे. जी प्रिती केवळ थोडयाशा लोकांना दयाळपणा दाखविते ती प्रिती नव्हे तर स्वार्थीपणा आहे. ती प्रिती केवळ चांगलेपणाचे कार्य व परमेश्वराचे गौरव एवढेच करणार नाही. जे कोणी परमेश्वराने त्यांना दिलेली देणगी यांचा उपयोग प्रभुसाठी करीत नाहीत ते; तर ज्यांनी त्यांच्या देणगीचा उपयोग केला नाही त्याहून जादा गुन्हेगार ठरतील. त्यांना असे म्हटले जाईल, “तुम्हाला तुमच्या धन्याची इच्छा काय आहे हे माहीत होते पण तुम्ही त्याप्रमाणे केले नाही‘‘. COLMar 269.2