देणगी वा दाने यांचा उपयोग म्हणजे ती बहुगुणित होणे. विजय हा अचानक सधी नव्हे किंवा शेवट टप्पा नव्हे; तर परमेश्वराच्या सामर्थ्याने विजय प्राप्त होतो, विजय विश्वासाची देणगी आहे व कार्याची योग्यता आहे, गुणवत्तेची पारख व कामाची चिकाटी ही विजयात दिसून येते. आम्हास दिलेली प्रत्येक देणगी हिचा आपण उपयोग करणे अशी परमेश्वराची इच्छा आहे, आम्ही जर असे केले तर आम्हास कार्य करणेसाठी परमेश्वर जादा देणगीची भर घालील. ज्या देणगीची आम्हाला कमतरता आहे तिची भरपाई परमेश्वर करणार नाही, तर ज्या देणगीचा आम्ही वापर करितो त्या देणगीद्वारे प्रभु आम्हांबरोबर कार्य करून तिची वृध्दी व समृध्दी करील व भरभराट करील; आम्ही प्रभुसाठी पूर्ण अंत:करणाने व खरेपणाने केलेले समर्पण हे प्रभु सेवेसाठी वाढती सेवा असे होईल. आम्ही संपूर्ण अंत:करणाने ख्रिस्ताच्या सेवेसाठी जो काही स्वार्थत्याग करू त्यामुळे आम्हास सामर्थ्य प्राप्त होत जाईल. पवित्र आत्म्याने आम्हाद्वारे कार्य करावे यासाठी आम्ही समर्पण करीत असता, परमेश्वराची कृपा प्राप्त होवून आम्ही आमच्या जुन्या स्वभावाकडे जाणारी भावना हिचा नकार करू ; जे मोह येतील त्यावर जय मिळवू व नवीन चांगल्या संवयी प्राप्त करून देवू. जो जो आम्ही पवित्र आत्म्याचे ऐकू व अपेक्षा करू तो तो आम्हास पवित्र आत्म्याचे जादा सामर्थ्य प्राप्त होईल, आणि आम्ही प्रभुचे कार्य चांगले व अधिक असे करू. आळस निघून जाईल व सेवेसाठी उत्साह येईल व अपंगत्व व दुबळेपणा जाऊन आमच्या जीवनात नाविन्य येईल. COLMar 269.3
जे कामदार नम्रतेने परमेश्वराचा सेवेचे कार्य आज्ञाधारकपणे करितात त्यांना खात्रीपूर्वक परमेश्वर सामर्थ्याचा पुरवठा करील. परमेश्वराचे हे महान व पवित्र पाचारण स्वीकारणे, ही जबाबदारी घेणे म्हणजेच शील उच्च प्रतीचे आहे. यासाठी आपली सर्व बुद्धिमत्ता व आध्यात्मिकता ही कृतित आणणे व आपले मन व अंत:करण बळकट करणे अशी जबाबदारी या पाचारणात आहे. परमेश्वरावरील विश्वासाने व सामर्थ्याने एक दुबळा मनुष्य कसा अभ्युत कार्ये करितो; किती निश्चयपूर्ण त्याचे प्रयत्न कसे फलदायी होतात. जो कोणी त्याच्याजवळ जे ज्ञान आहे ते सांगत सुरूवात करितो व नम्रपणे सांगतो मला एवढे समजते व अधिक ज्ञान प्राप्तीसाठी काळजीपूर्वक शोधीत राहातो, अशा मनुष्यासाठी सारे स्वर्गीय सज्ज असतात. तो जो जो मिळालेला ज्ञान प्रकाश देत राहातो. तो तो त्याला अधिक ज्ञान प्रकाश प्राप्त होतो. आम्ही आमचे ज्ञान व शक्ति यांचा जादा उपयोग करू तेव्हा आम्हास अधिक ज्ञान व शक्ति दिली जाते. COLMar 270.1
ख्रिस्तासाठी केलेला प्रत्यत्न हा आम्हास प्रतिकार्य म्हणून आशीर्वाद असा प्राप्त होईल. आम्ही आमच्या साधनांचा परमेश्वराच्या गौरवासाठी उपयोग केला तर अशी साधनें परमेश्वर अधिक देईल. आम्ही प्रार्थनापूर्वक कार्याला सुरूवात केली, आत्मे जिंकणे हे ओझे ख्रिस्ताकडे नेले व आत्मे जिंकणे यासाठी कार्य करू लागलो तर आपल्या अंत:करणात परमेश्वराच्या कृपेची जाणीव होईल; आमचे ख्रिस्ती जीवन खरेपणाचे होईल, त्यात कळकळ व प्रार्थना यांची भर पडेल. COLMar 270.2
स्वर्गाच्या दृष्टिने मानवाचे मोल मोजमाप म्हणजे त्याच्या अंत:करणात परमेश्वराच्या माहितीचा किती संग्रह आहे हे त्या मनुष्याच्या ठायी असलेले ज्ञान म्हणजे सर्व सामर्थ्याचा उगम आहे. परमेश्वराने मानव निर्माण केला त्याची सर्व शक्ति ही परमेश्वराच्या सामर्थ्याने परिपूर्ण व्हावी, यासाठी परमेश्वर मानवाचे मन हे परमेश्वराच्या मनाशी संबंधीत व्हावे मानवास संधी देत आहे की, ख्रिस्ताशी संबंध साधणे व त्यामुळे ख्रिस्ताची कृपा व स्वर्गीय ज्ञान ही प्राप्त होतील. COLMar 270.3
आम्ही येशूकडे पाहातो त्यामुळे आम्हांस परमेश्वराविषयी स्पष्ट व प्रकाशित दृष्टिकोण प्राप्त होतो, आणि असे पाहाणे यामुळे आमचा पालट होतो. आमच्या शेजाऱ्यांविषयी आम्हांमध्ये निसर्गताच चांगुलपणा व प्रिती निर्माण होते. परमेश्वराच्या शीलाचा जो नमुना त्यानुसार आमचे शील वाढत जाते. आम्ही जो जो परमेश्वराच्या स्वरूपानुरूप होतो तो तो आम्हास परमेश्वराविषयीची जादा माहिती प्राप्त होते. आम्ही अधिकाधिक स्वर्गीय राहावयास प्रवेश करितो; त्यामुळे आम्हास सार्वकालिक ज्ञानाची व संपत्तीची माहिती व सामर्थ्य ही प्राप्त होतात. COLMar 271.1